Endless to-do list

Submitted by Mother Warrior on 12 January, 2015 - 20:56

ही अशीच गंमत. ही माझी फक्त मुलासंबंधित टूडू लिस्ट. तरी शाळेसंबंधित काहीच आले नाही यात.
नो वंडर, मला मुलाखेरीज दुसरे काहीच सुचत नाही..

autism_to_do_list

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>
नो वंडर, मला मुलाखेरीज दुसरे काहीच सुचत नाही>> हो खऱंच. हे सगळं महत्वाचं आहेच ह्यात वाद नाहीच पण तुमचा मुलगा शाळेत जातो तेव्हा तुम्ही स्वतःकरता असं खास काही करता का? करत नसल्यास काहीतरी करायला लागा. यू डिझर्व्ह ईट.

रागवु नका पण थोडा साठी काहीतरी करा.

अगदी नाही केलेत तरी एक लिस्ट अशीच बनवा. कधी ना कधी करालच ती लिस्ट पाहूनच.

यु आर डेवॉटेड मॉम, नो डॉब्ट. Happy

अं नाही तसं नाही आहे हे. मी म्हणत होते ही फक्त मुलाची कामं आहेत. माझी कामं, माझ्या आवडीनिवडी, इतर कुटूंबातील जबाबदार्‍या मी ह्यात गणलेल्याच नाहीत. त्याची वेगळी लिस्ट असेल, अन तसंही ती मी कशाला पब्लिश करू? Happy माझ्या आयडीपासून माझ्या वेबसईटपर्यंत सगळंच माझ्या मुलाबद्दलच आहे. मागे लिहीलेली पॉझिटीव्ह दृष्टीकोन पोस्टच फक्त माझ्याबद्दल होती. Happy

सीमंतीनी, ही लिस्ट जनरल आहे. ह्यातली बरीच कामं प्रत्येक दिवशी करायची आहेत तर माझं वाचन, मुलासाठी अ‍ॅक्टीव्हिटीज शोधणं, काही स्पेशल बायोमेडीकल ट्रीटमेंट्ससाठीचा रिसर्च या लाँग टर्म टूडू लिस्टमध्ये जातील.

मवॉ, तसं नव्हे, ह्या टू डू लिस्टमधल्या सगळ्या कामांना वेळ लागणारच. मग ही रोज करायची असोत किंवा एक दिवसाआड वगैरे.. तुम्ही डेडिकेटेड आहात हे माहिती आहेच पण ह्या सगळ्यातून थोडा वेळ स्वतःकरता नक्कीच द्या (देत नसाल तर) असं म्हणायचं होतं. ती लिस्ट पब्लिश करा वगैरे अजिबातच म्हणणं नाही.

Okay. How much of this list is due to your parenting style vs. Autism? i.e. even if it were a typically developing kid you would do it - Massage once a day, read child development books, find classical music for kids etc? I think a lot of this you would have done anyways. Is that right?

सीमंतिनी,

मी एरवी , मुलाला ऑटीझम असो वा नसो त्या तुम्ही नमूद केलेल्या गोष्टी केल्याच असत्या.
पण एक बेसिक फरक आहे. जेव्हा तुमच्या मुलाला ऑटीझम असतो, त्याचे सेन्सेस बरोबर काम करत नसतात, तेव्हा ह्याच छोट्या, नैसर्गिक वाटणार्या गोष्टी 'कामं' होऊन बसतात. मी मुलाला मसाज दिलाच असता, पुस्तकं वाचलीच असती. पण त्याची नोंद टूडू लिस्ट मध्ये झाली नसती कारण ते सगळं करणं खूप सहजसोपं व आनंददायी झाले असते. चॅलेंजिंग काम झाले नसते. मुलगाच स्वतःहून मला म्हटला असता आई आज हे पुस्तक वाचून दाखव. आई हे गाणं म्हण्/लाव. माझ्या मुलाकडून हे होत नाही, किंवा असं कम्युनिकेट करायचे असते हे त्याला कळत नाही. मला अजुनही मुलाला रोज आख्खं पुस्तक वाचून दाखवणं जमत नाही. इतकं त्याचा अटेन्शन स्पॅन कमी आहे. किंवा त्याची एनर्जी जास्त आहे.
मी कोठेही मी इतर पालकांपेक्षा वेगळं करत आहे असं म्हणत नसून, ह्या साध्या अ‍ॅक्टीव्हिटीजच कामं होऊन बसत आहेत हे म्हणत आहे..

मवॉ.. खूप कौतुक आहे तुमचं.. नुसती लिस्ट पाहूनच छाती दडपली.. तुम्ही इतकं सगळं मॅनेज करता..
वरचे प्रतिसाद पाहून आश्चर्य वाटलं. या लिस्टची आणि बाकी (जनरल) मुलांच्या रिलेटेड कामांची कम्पॅरिझन कशी होऊ शकते?

Hey no comparison. But just to streamline the list, to feel less pressurized i would take off things that i would do anyways. Pan ticha point of view barobar aahe. Tila jya goshti list var havya vatatat tya havyach. So lets not digress. We all support her.

येस सीमंतिनी, मलाही आता कळले तुम्ही काय म्हणताय ते. पण नशीबाने मला लिस्ट्स पाहून डोकं शांत होते. स्ट्रेस तितका येत नाही. त्यामुळे उलट सगळी कामं नीट लिहीली की बरं वाटतं. इथे/वेबसाईटवर लिहीण्याचाही हाच उद्देश. जितकं लिहू तितकं मला सुटसुटीत फिलिंग येत आहे. Happy

बाकी, हेही तितकंच खरे आहे, की ही 'टूडू लिस्ट' आहे. डन डना डन लिस्ट नाही. Happy मी माणूसच आहे, बर्‍यापैकी फॉल्टी पीस! माझ्या बर्याच गोष्टी लक्षातही राहीनात म्हणून लिस्ट करून ठेवली आहे. हे सगळं रोजच जमते असं नाही.

मदर वॉरिअर,

आमच्या पण लिस्टा अश्याच आहेत. तुम्ही ऑटिझम पेरेंट आहात आम्ही सिंगल पेरेंट त्यामुळे अशीच लिस्टा बनवून कामे पार पाडलेली आहेत व करतो आहोत. इतके प्रेशर घेउ नका. मुलाचे बालपण एंजॉय करा. अतिशय थकून कामावरून परत येउन मग मुलांचा गृहपाठ घेणे, रात्रीबेरात्री बसून प्रॉजेक्ट पूर्ण करणे परत उद्या पाचला उठून शाळेची तयारी इत्यादी, ह्यात आर्थिक नियोजन, अ‍ॅक्टिविटीज, आजारपणाचे मॅनेजमेंट हे आलेच. तुमचा स्ट्रगल तर समजून घेतच आहे पण जनरली पालक वर्ग अश्याच कामाच्या ओझ्याखाली भरडत असतो. ऑर्गनाइज व स्ट्रीमलाइन जितके केले तितके मस्तच.

ब्रेक व मी टाइम पण स्केड्यूल करा.

ही पोस्ट, गंमत म्हणून होती. ह्यातून चुकीचा मेसेज जात आहे का? मला कोणाचेही कष्ट कमी लेखायचे अथवा डिनाय करायचे नाहीत. पालकत्व हे अवघडच असते, इन फॅक्ट फक्त दोघंच, एकटंच जरी राहीले तरी आयुष्य स्ट्रेसफुल होते/असू शकते हे देखील माहीत आहे. पण त्याचबरोबर, आमच्या घरात साधी साधी कामं डोंगर होऊन बसतात हे देखील आढ्यता न बाळगता अधोरेखीत करायचे आहे. बहुतेक जमलं नाही नीट.

म. वॉ. , ह्यापैकी काही माहीती आम्ही कोणी शोधून संकलीत करून पाठवू शकू. माहीतीचा महास्फोट आहे त्यातून उपयोगी शोधायला मदत करायला आवडेल.

Mrudula, the training period may be painfully long but eventually most kids learn to communicate about it. So lage raho warriorbai. Smiley..

खरंच खूप कौतुक वाटतं तुमचं...किती निगुतीने आणि well-organized पध्दतीने तुम्ही सुजाण संगोपन करत आहात..hats off to you..
मलाही लिस्ट्स बनवण्याची, प्रत्येक गोष्ट लिहून ठेवायची सवय आहे. त्याने कामं नीट होतात काही विसरायला स्कोप कमी असा अनुभव आहे. मी हार्ड कॉपी लिस्टसाठी कलरफुल स्टिकी नोट्स वापरते आणि सॉफ्ट कॉपीसाठी अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप्स वापरते.
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा Happy

लिस्ट केली की डोक्याचा थोडा ताप कमी होतो असा स्वानुभव आहे. मग ते काहीही असो. कारण कधी कधी साध्या वाटणार्‍या गोष्टीसुद्धा विस्मरणात जातात. त्या डोळ्यासमोर राहिल्या की बरं असतं. Nice job making the list!

प्राजक्ता_शिरीन थँक्स! काही लागले तर नक्की संपर्क करीन. Happy

सीमंतिनी, मृदुला - मी पाहीलेल्या / ऐकलेल्या बर्‍याच उदाहरणात ऑटीझम स्पेक्ट्रमवरची मुलं अगदी ८-१० वर्षाची असली तरी डायपरमध्ये आहेत. ह्या मुलांना साधं पाणी दे, भूक लागली कम्युनिकेट करणं अवघड जाते, शू व शी ह्या फार कॉम्प्लेक्स गोष्टी आहेत. म्हणजे शी झाल्यावर माझा मुलगा कधीकधी कसंतरी कम्युनिकेट करतो. परंतू शू झालेली त्याला बॉदर होत नाही, किंवा शी होण्याच्या अगोदर मला येऊन सांगणे हे खूप अवघड आहे त्याच्यादृष्टीने.

गेल्या समरमध्ये आम्ही , एबीए थेरपीस्टच्या मदतीने २ महिने पॉटी ट्रेनिंगचा प्रयत्न करून पाहीला. त्याला शूचं सांगता येत नसल्याने लास्ट शू झाल्यानंतर बॉटलभर पाणी प्यायला घालून मग तो शू किती वेळाने करतो ह्याबद्दलचा डेटा घेत राहायचा. साधारण १ ते दिड आठवड्यात आपल्याला त्याचे साधारण बॉडी फन्कशिंग कळते. सपोज, पाणी प्यायल्यानंतर २० मिनिटांनी पहिली शू होत असेल तर पणी प्यायल्या दिल्यानंतरच्या १५ मिनिटांनी त्याला पॉटीवर बसवायचे. ५ ते १० मिनिटं तिथे बसून शू नाही केली तरी ५ मिनिटाचा ब्रेक. परत ५-१० मिनिटं पॉटी. पॉटीत शू केली तर खूप मोठे रिवॉर्ड! अगदी आरोळ्या! पण माझ्या मुलाने पॉटीत शू २ महिन्यात एकदाच केली व नंतर तर तो शू होल्ड करून बसायला लागला. त्यामुळे सध्या तात्पुरता ब्रेक घेतला आहे. परत नव्याने प्रयत्न करायचे आहेत.