नजर शोधते

Submitted by मी मी on 18 April, 2014 - 14:18

निर्वेद क्षण, एकल तारा
अंधारी रात्र, रुश्क वारा

खोल मनाचा गाळ उपसता
भावनांचाच नीर पसारा

आठवणींच्या उरात दडल्या
थोडी उब अन थोड्या गारा

ओंजळीत या भरून उरल्या
भिजले स्मित, ओला सुस्कारा

ओथंबलेली नजर शोधते
ते क्षण, मन तो आसमंत सारा !!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users