मतलबी बगळा

Submitted by पल्ली on 11 January, 2015 - 02:38

पाणी जेवढं संथ शांत
तेवढं खोल असतं म्हणे..
असेना का, मला काय त्याचं?
खोल असो उथळ असो
मला पाण्याशी मतलब
आणि
पाण्यातल्या माशांशी..
मतलबी कोण नसतं?
सांगा ना??
तर...
मीही एक मतलबी बगळा.
तर काय!
मीही होते ना कधी काळी
सर्वांसाठी नेहमीच तत्पर.
मला काय मिळालं?
सांगणं अवघड आहे..
कशाचं सोयर सूतक नाही.
आताशा मी खूपच शांत असते,
खोल खोल अथांग.....
एक पाय पोटाशी घेऊन
मीही उभी असते वाट पहात
साधु संत पणाचा आव आणणार्‍या
शुभ्र निर्लज्ज बगळ्यासारखी...
संधी साधू मतलबी
शुभ्र सभ्य बगळा.....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users