आपण यांना पाहिलंत का?

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 11 October, 2014 - 02:15

तीन दशकांहून अधिक काळ मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषांमधील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि नाटके पाहत आहे. अनेकदा असे होते की एखादा चेहरा आवडतो, पण पुन्हा कुठे फारसा दिसतच नाही. माध्यमांतूनही त्या चेहर्‍याची चर्चा होत नाही. जसे काही हा चेहरा सर्वांच्या विस्मृतीतच गेला आहे. नेमका हा चेहरा मला बर्‍यापैकी आठवत असतो, पण इतर अनेकांना त्याचा परिचयच नसतो.

अशाच काही (इतरांच्या) विस्मृतीत गेलेल्या पण मला आवडत असलेल्या या चेहर्‍यांबद्दल.

  1. अभिनव चतुर्वेदी:- हमलोग मालिकेतील नन्हे हे पात्र. या मालिकेनंतर पुन्हा बुनियाद या मालिकेत आणि रिश्ते मालिकेच्या एका भागात पल्लवी जोशीसोबत पाहिले होते, पुन्हा दर्शन नाहीच.
  2. डॉ. पलाश सेनः- फिलहाल चित्रपटात सुश्मिता सेन चा नायक, विद्या बालन सोबत एका विडीओ अल्बम मध्ये नायक व गायक देखील. पुन्हा फारसा दिसला नाहीच.
  3. भानू उदय- स्पेशल स्क्वाड या स्टार वाहिनीवरील मालिकेचा नायक. बराच काळ दूर राहून आता पुन्हा सोनी पल वाहिनीवर डॉक्टरच्या भुमिकेत दिसतोय.
  4. लवलीन मिश्रा:- हमलोग मालिकेतील छुटकी हे पात्र. या मालिकेनंतर पुन्हा स्टार वाहिनीवरील श्श्श कोई है च्या एका भागात इरफान खान सोबत पाहिले होते, पुन्हा दर्शन नाहीच.
  5. काजल किरणः- हम किसीसे कम नही चित्रपटाची नायिका. पुन्हा मांग भरो सजना या चित्रपटात जितेन्द्रसोबत लहानशा भूमिकेत दिसली होती. विक्रम और वेताल च्या दोन भागांमध्येही तिने दर्शन दिले. तिने बहुतेक सर्व बी ग्रेड चित्रपटांतूनच काम केले. तिचे कराटे, सबूत, भागो भूत आया, अंदर बाहर, हमसे बढकर कौन व सात बिजलीयां हे चित्रपट माझ्या संग्रहात आहेत.
  6. वैशाली दांडेकरः- अधांतरी मालिकेची नायिका आणि हमाल दे धमाल चित्रपटात नायिकेची बहीण. पुन्हा दर्शन नाही.
  7. शीतल क्षीरसागरः- रात्र आरंभ चित्रपटातील डॉक्टर. पुन्हा कधीच कुठल्याच चित्रपटात, मालिकेत दिसली नाही. काल अचानक महाराष्ट्र टाइम्स च्या पुणे टाईम्स पुरवणीत दिसली. http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/44755907.cms?prtpa... सत्ताधीश-किस्सा खुर्चीचा, गारंबीचा बापू, इत्यादी नाटकांतून काम करत असते, अर्थात मी अजून पाहिली नाहीत. रामचंद्र पुरुषोत्तम जोशी या आगामी चित्रपटातूनही तिचे दर्शन होईल.
  8. नंदिनी जोग:- काही दूरचित्रवाणी मालिका तसेच पंढरीची वारी, आघात, थांब थांब जाऊ नकोस लांब, कळत नकळत आणि आईशप्पत अशा काही चित्रपटांमधून दिसलेली ही अभिनेत्री आता गायबच झाली आहे.
  9. वन्या जोशी:- हिमालय दर्शन, मैला आंचल, मंझिले, अशा दूरदर्शन मालिका आणि सरदार व संशोधन या चित्रपटांतून दिसलेली ही अभिनेत्री आता कास्टिंग डायरेक्टर बनली आहे.
  10. वंदना पंडितः- अष्टविनायक चित्रपटातून सचिन पिळगांवकर सोबत दिसलेली ही अभिनेत्री पुन्हा कुठेच दिसली नाही.
  11. सोनाली जोशी:- एक्स्क्यूज मी चित्रपटातून आणि एका हिन्दी मालिकेतून श्रेयस तळपदेसोबत दिसलेली अभिनेत्री.
  12. फातिमा शेखः- देव आनंद यांच्या सौ करोड या चित्रपटाची नायिका
  13. सारा खान:- ढुंढ लेंगी मंझिले हमें ही दूरचित्रवाणी मालिका आणि पेबॅक हा चित्रपट यात मुख्य भूमिका केल्यावर ही मध्यंतरी टोटल सियप्पा चित्रपटात नायिकेची बहीण म्हणून दिसली होती.
  14. गायत्री जोशी:- स्वदेस चित्रपटाची नायिका आणि मॉडेल. आयएमडीबीनुसार वाँटेड देखील तिच्या नावावर दिसतोय, मला तरी त्यात दिसली नाही. इतरत्रही फारसे दर्शन नाहीच.
  15. बरखा मदन:- काही दूरदर्शन मालिका, खिलाडीयोंका खिलाडी चित्रपटात सहनायिका, भूत चित्रपटातील भूत आणि सोच लो चित्रपटात प्रमुख नायिकेची भूमिका केल्यावर आता संन्यास घेऊन बौद्ध भिक्खू झाली आहे.
  16. अपर्णा टिळकः- फुटपाथ चित्रपटा इम्रान हाश्मीची नायिका, जीत या स्टार वाहिनीवरील अंकूर नय्यर ची नायिका, लेफ्ट राईट लेफ्ट व कही किसी रोज या मालिकांमधील काही भागांत लहानशी भूमिका तसेच जुन्या सब टीवीवरील एका विनोदी मालिकेत कंवलजीत सिंहच्या मुलीची भूमिका करून आता गायब झाली आहे.
  17. पल्लवी कुलकर्णी:- क्या हादसा क्या हकीगत, वैदेही आणि कहता है दिल या मालिका तसेच बॉबी देओलच्या क्रांती चित्रपटात त्याची बहीणीची भूमिका करून सध्या गायब. https://www.youtube.com/watch?v=Rp_dqBOC9t8&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA
  18. वैदेही अमृते:- अभिनेत्री / मॉडेल. गृहस्थी मालिकेत किरणकुमार सोबत होती.
  19. अमृता रायचंदः- चित्रपट - बात बन गयी, मालिका - माही वे, रिअ‍ॅलिटी शो - ममी का मॅजिक, जाहिराती - व्हर्लपूल, पॉण्ड्स व इतर अनेक.
  20. आरती चांदूरकरः- खतरनाक चित्रपटात महेश कोठारेंची नायिका https://www.youtube.com/watch?v=B7fYRg2vdb4&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA
  21. इंदु वर्मा:- सिद्धांत मालिकेतली आर्किटेक्ट अलका, नायक अ‍ॅडव्होकेट सिद्धांतची क्रमांक २ ची प्रेयसी.
  22. जमुना:- दो फंटूश, अंधेरा चित्रपटांतली नायिका, प्रसिद्ध नृत्यांगना

अज्ञात चेहरे:-

  1. हेच माझे माहेर चित्रपटातील मोहन गोखलेची नायिका.
  2. माझं घर माझा संसार चित्रपटातील अजिंक्य देवची नायिका
  3. देव आनंदच्या बुलेट चित्रपटात डॉ. श्रीराम लागूंच्या कन्येची भूमिका करणारी अभिनेत्री
  4. ताल चित्रपटातील ऐश्वर्या राय सोबत असलेली अभिनेत्री. मी चित्रपट पाहिला नसल्याने तिची भुमिका किती मोठी आहे ते माहित नाही पण इथे https://www.youtube.com/watch?v=p_OoCr4uRhM या गाण्यात ३ र्‍या सेकंदाला निळ्या कपड्यांत दिसतेय. अजून एका गाण्यात अक्षय खन्नाला काही तरी चिडवतेय असे पाहिले होते.
  5. पाप चित्रपटातील जॉन अब्राहम ची बहीण https://www.youtube.com/watch?v=ObRQx4PHeTg&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA

हे चेहरे मी उल्लेख केल्याव्यतिरिक्त आपण कुठे पाहिले असल्यास जरूर नमूद करावे. तसेच आपणांस देखील असे कुठले जनतेच्या विस्मृतीत गेलेले चेहरे आठवत असतील तर त्यांचा देखील उल्लेख करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सीमाताई कपूर, हुमाताई खान, कल्पनाताई अय्यर, पद्माआजी खन्ना या माताभगिनी सध्या कुठे असतात काही कल्पना?

पद्माआजी होत्या मध्ये सोनीच्या शिरेलीत. अंजना मुमताजचा मुलगा हिरो होता त्यात आणि संगीता घोष हिरोईन.

अभिवन चतुर्वेदी काही वर्षापूर्वी एका चित्रपटात व्हिलन होता ज्यात करिष्मा कपूर आणि धर्मेंद्रचा दुसरा मुलगा बॉबी देवल हे दोघे हिरो हिरोईन होते.

वेदिका२१ +१
हसरते मध्ये सुरवातीला सीमा कपुर च होती नंतर शेवटचे काही भाग किव्वा बरेच भाग शेफाली छाया ने तिला रिप्लेस केले Happy सगळे जण किती वगवेगळ्या लोकांच्या आठवणी काढताहेत Happy

सीमा कपूरपेक्षा डेफिनेटली तिने काम चांगलं केलं होतं. तेव्हा माझ्याकडे केबल नव्हती पण आईकडे आले की बघणं व्हायचं.

क्योंके मधली, मधली सून कोमलिका गुहा ठाकुरता काल सोनीवरच्या भंवर या कोर्ट केसेसवर आधारित मालिकेत दिसली.

Padma Khanna (born 10 March 1949) is an Indian actress, dancer and director. She appeared mainly in Hindi and Bhojpuri films in the 1970 and 80s. In television, she is most remembered for her role in movie 'Saudagar' with Amitabh Bachhan & also as Queen Kaikeyi in Ramanand Sagar's epic series Ramayan (1987–1988).

She is married to film director Jagdish L. Sidana.[1] She currently resides in New Jersey, USA, and runs Indianica Dance Academy in Iselin, New Jersey. She has a daughter Neha Sidana, son Akshar Sidana and Daughter-in-law Anu Sarin Sidana.

http://en.wikipedia.org/wiki/Padma_Khanna

तरुण धनराजगीर काय छान दिसायचा! अाताचे त्याचे फोटो पाहून जुना चेहरा अाठवतंच नाहीये पण.

२००६ साली अलका आठल्ये, सतीश पुळेकर, सुबोध भावे, शरद पोंक्षे, डॉ. विलास उजवणे व संतोष जुवेकर यांच्या प्रमुख भुमिका असलेली एक मालिका ई टीव्ही मराठी (आताची कलर्स मराठी) वाहिनीवर प्रसारित होत असे. त्यात शरद पोंक्षेची स्टीलकिंग राणे ही भुमिका होती. या स्टीलकिंग राण्याची मुलगी सुरुवातीला नकारात्मक भुमिकेत असते व शेवटी ती चांगली असल्याचे दाखवले होते. ही अभिनेत्री कोण होती? नकारात्मक भूमिका तिने फार छान वठविली होती. नंतर पुन्हा कुठल्या मालिकेत / चित्रपटात तिने अभिनय केला आहे का?

आजुन एक नटी,'रमा विज' नुक्कड, विक्रम वेताळ सिरिअल आणी प्रेम कैदि चित्रपटातील,तीचा पन काही पत्ता नाही

"दृष्ट लागण्याजोगे सारे..." गाणे पाहत होतो. बापरे! अजिंक्य देव बरोबरची ती अभिनेत्री आज हयात नाही हे माहित नव्हते. व्हिडिओखालच्या कॉमेंट वाचल्यानंतर कळले. गुगल वर सहज शोध घेतला तर त्यांच्याविषयी कळले. हा धागा सुद्धा गुगल करतानाच सापडला म्हणून इथे नोंदवून ठेवत आहे:

"माझं घर माझा संसार" या एकाच चित्रपटात त्यांनी काम केले होते आणि वयाच्या वयाचा अवघ्या ३१ व्या वर्षी कर्करोगामुळे त्यांचा मृत्यू झाला. ५ डिसेंबर १९९४ साली कॅन्सरचे निदान झाले आणि १० एप्रिल १९९६ रोजी जगाचा निरोप घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, मुग्धा केवळ अभिनेत्री नव्हती तर ती उत्कृष्ट कथा-कथनकारही होती. भारत आणि अमेरिकेत त्यांनी कथाकथन शैलीत ५०० कार्यक्रम सादर केले होते. मुंबईतील ‘ऑल इंडिया रेडिओ’मध्ये पुष्कळ कार्यक्रम सादर केले. १८ फेब्रुवारी १९६५ साली त्यांचा जन्म झाला. मुग्धा चिटणीस उमेश घोडके यांच्याशी लग्न झाले होते. कॅन्सरने मृत्यू झाला तेव्हा मुलगी ईशा अवघ्या ५ वर्षाची होती.
बातमी स्त्रोत: https://zeenews.india.com/marathi/entertainment/marathi-actress-maza-gha...

मी मुग्धाच्या बाबांचे पुस्तक वाचलेलं, आत्मचरित्र टाईप त्यामुळे डीटेल्स कळले होते. मला नाव आठवत नाही पुस्तकाचे पण बाबांचे नाव अशोक चिटणीस.

गोलमाल, खूबसुरत मध्ये मित्राचं काम करणारा पानाचा विडा खाणारा कलाकार आता काय करतो?चांगली कामं असायची.

रामायणमध्ये भरत झालेला घारे डोळे होते त्याचे, तो बहुतेक हयात नाही पण त्यांच्यासारखाच दिसणारा आता हॅम्लेटमध्ये काम करतो, नाना जोग यांचा नातू, यांचे काही नाते आहे का.

पूर्वी सोनी TV वर "थोडा हे थोडे कि जरुरत हे" आणि "सैलाब" म्हणून दोन सिरीयल यायच्या ..खूप आवडायच्या मला...सचिन खेडेकर होता.. हिरोईन साधी छान होती ..काय तीच नाव?

रामायणमध्ये भरत झालेला घारे डोळे होते त्याचे, तो बहुतेक हयात नाही पण त्यांच्यासारखाच दिसणारा आता हॅम्लेटमध्ये काम करतो, नाना जोग यांचा नातू, यांचे काही नाते आहे का. >>>>>>> भरत झालेला सन्जय जोग. त्याचा मुलगा रणजित जोग. त्याने मराठी सिरियल्समध्ये कामे केली आहेत. तो आहे का हॅम्लेटमध्ये?

पूर्वी सोनी TV वर "थोडा हे थोडे कि जरुरत हे" आणि "सैलाब" म्हणून दोन सिरीयल यायच्या ..खूप आवडायच्या मला...सचिन खेडेकर होता.. हिरोईन साधी छान होती ..काय तीच नाव? >>>>>>>> प्राजक्ती देशमुख. विकीवर वाचल.

दूरदर्शनच्या कशिश नावाच्या धारावाहिकेतून आपली छाप सोडणारी मालविका तिवारी पण नंतर फारशी चमकली नाही.., हि मालिका कुठे पहाय्ला मि़ळु शकेल ??

सुचेता, सेम पिंच. मी पण मालविका तिवारीबद्दलच लिहिणार होते आणि हीच सिरियल. सुदेश बेरी होता ना हिरो यात?

Pages