क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्याप्रमाणे Coalition Government मधे सगळ्या पक्षांना खूष करायला मंत्र्यांची संख्या वाढवतात, तसे भारतीय क्रिकेटने सुद्धा संघात १६ खेळाडू घ्यावेत. पाच जण नुसते गोलंदाज, उरलेले ११, ज्यात रैना, युवी व आश्विन असतील, ते फलंदाज. पाच गोलंदाजात एक स्पिन गोलंदाज.

मग ऑस्ट्रेलिया विरुद्ध जरा आशा आहे.
मला वाटते आपले गोलंदाज थकले. ते सुधारण्या ऐवजी ऑस्ट्रेलियाचे फलंदाजच त्यांची गोलंदाजी खेळण्यात सुधारले.

आत्महत्या क्रिकेट मधे कशी करावी हे रोहीत शर्मा शिवाय दुसरा कोणि सांगु शकेल का....
हत्यार म्यान करुनच खेळ चाललाय..

स्टीव्ह स्मिथ, इफ यू कॅन स्कोअर फोर हंड्रेड्स इन द सिरीज, सो कॅन आय!

वेल प्लेड विराट कोहली!

+१

बाकी रहाणे गेला...
आता सावधानी बाळगा.. आपले शेपूट रैनापासूनच सुरू होतेय Wink

साहाने यावेळी जिगर दाखवायला हवी, या आधी त्याला कल्पना होती की आपण चांगले खेळलो तरी फक्त धोनी दुखापतग्रस्त असतानाच संघात येणार, पण आता ती जागा ओपन झाली आहे.

रैनाची शैली आणि तंत्र पाहता त्याला का कसोटी संघात घेतात वा का कसोटी प्लेअर बनवायच्या मागे लागले आहेत हे समजत नाही.

रैनाची शैली आणि तंत्र पाहता त्याला का कसोटी संघात घेतात वा का कसोटी प्लेअर बनवायच्या मागे लागले आहेत हे समजत नाही.>> +१

स्मिथ च्या शतकांपेक्षा कोहलीची काकणभर सरसच म्हणायला पाहिजे. एकतर बाहेरच्या मैदानांवर. त्यात कप्तानपदाचे बदल. त्यात शास्त्रीला हॅण्डल करायचे. त्यात त्या कोणाकोणाशी भांडणे Happy

फारेंड, अनुमोदन. स्मिथ खेळायला येतो तेंव्हा वॉर्नरचे शतक तरी झालेले असते किंवा शतकी भागिदारी तरी.
आणि कोहलीला उमेश यादवची बॉलिंग खेळायला मिळत नाही!!!

विराट कोहली जिगरबाज आहे. हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलं. राहुलने ही चांगली साथ दिली.

Not Shane Watson he couldn't get a 100 even if it was scripted for him

- ऑस्ट्रेलिअन फॅन जेव्हा क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या फेसबुक पेज वर सचिनवरील चित्रपटाची माहीती देण्यात आली
बरेच कॉमेंट्स मजेदार आहेत.
सचिन वर शेलक्या कमेंट्स मी तरी त्यावर बघितल्या नाहीत Happy

कोहलीला उमेश यादवची बॉलिंग खेळायला मिळत नाही!!!
Proud

असेच मागे एकदा बॅरिंग्टन नि गावास्कर बोलत असता बॅरिंग्टनने गावास्करला म्हंटले तू माझ्याहून जास्त चांगला खेळतोस, तेंव्हा गावास्कर म्हणाला तुला भारतीय गोलंदाजी खेळावी लागते, मला काय, इंग्लंडचेच गोलंदाज, मग काय कठीण?

(बॅरिंग्टन हा एक जुना इंग्लिश फलंदाज, अनेक वर्षांपूर्वी त्याने भारतात बरीच ठोकाठोकी करून धावांचा डोंगर उभारला होता. )

कोहलीला मानले. इतकी व्यवधाने बाळगून आपले कर्तव्य करणार्‍या माणसाला पंतप्रधान करा! निदान गृहमंत्री तरी!

रहाणेला तर खोटा आउट दिला. रैनाचे काय झाले ते त्यालाच माहित. कदाचित तो अजूनहि समजत असेल की भारतीय संघात फक्त एक दोघांनाच खेळायला परवानगी आहे. बाकीचे फलंदाज असले तरी त्यांना धावा काढायची जबाबदारी नाही.

साहा नवीन आहे, त्याला असल्या सवयी लावू नका. प्रत्येकाने, अगदी दहावा अकरावा खेळाडू असला तरी अनेक धावा करायला हव्यात हे जॉन्स्टन, हॅरिस वगैरेकडून शिका.

मला वाटते हे पाहून व्यंगचित्र काढायला भाऊंना उत्साहच नसावा. आम्हाला पण ते बघायचा तितकासा उत्साह नाही.

सामने संपल्यावर एक झकास चित्र टाका - सगळे दु:ख विसरून जाईल असे.

ऑसीज ६८-२ पण फक्त ११ ओवरमध्ये.. मस्तच! असेच हे खेळले तर उद्या सुट्टी सार्थकी लागणार बहुतेक रंगतदार सामना बघण्यात.

कसली धुलाई होतेय आपली, वर्ल्डकपला काही खरे नाहीये या बॉलर्सचे.. उमेश यादवला पण नेताहेत का..

३५० चा लीड घेतला आहे आणि ६ विकेट्स गेल्या आहेत. उद्या बहुदा लंच पर्यंत खेळुन घोषित करतील आणि ४००-४५० चे टारगेट देतील

दिदे, लंचपर्यंत का खेळतील?
फक्त ८ ओवर खेळून ५० मारले तरी आपल्याला ८० ओवरमध्ये ५ च्या धावगतीने ४०० चे अशक्यप्राय टारगेट होईल.

बाकी मानला पाहिजे त्यांना, पहिल्यापासून मारून खेळले, वॉर्नर लवकर जाऊनही, शेपटात ताकद असण्याचा फायदा.

उद्या शेवटचा दिवस आहे. इतकी रिस्क घेणार नाही. कोहली चेसिंगला जाणारच आहे. हे त्यांना माहीत आहे. आणि तो चेसींग करताना जबरदस्त बॅटींग करतो. त्यामुळे मला तरी वाटत नाही. आणि जिंकण्याची संधी दोन्ही संघाला देणारा स्टिव्ह वॉ नाही आहे. Happy

Pages