कुणालाही तुझ्याइतका नसावा माज आयुष्या

Submitted by जयदीप. on 4 January, 2015 - 10:24

कुणालाही तुझ्याइतका नसावा माज आयुष्या
असावी फार थोडी, पण असावी लाज आयुष्या

तुझ्या नकळत उथळ झाले असावे येथले पाणी
किनारा दूर आहे पण तरी ही ...गाज आयुष्या?

तुला कळले नसावे की तुलाही पोकळी आली..
किती घोंघावतो आहे तुझा आवाज आयुष्या!

उद्यावरती नको टाकू कधीही आजची कामे
उद्या येणारही नाही कदाचित आज आयुष्या

घरी पोचायचे आहे मला सुखरूप आयुष्या
नशा होऊ नये इतकी मला तू पाज आयुष्या

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उद्यावरती नको टाकू कधीही आजची कामे
उद्या येणारही नाही कदाचित आज आयुष्या

घरी पोचायचे आहे मला सुखरूप आयुष्या
नशा होऊ नये इतकी मला तू पाज आयुष्या

व्वाह .

किती घोंघावतो आहे तुझा आवाज आयुष्या!<< मिसराही मस्त . Happy

तुला कळले नसावे की तुलाही पोकळी आली..
किती घोंघावतो आहे तुझा आवाज आयुष्या! <<< वा छानच

जमीनीला अधिक न्याय मिळायला हवा होता असे वाटले.

माझ्या ह्या खालील दोन गझला ह्या गझलेवरून आठवल्या, त्या द्यायचा मोह झाल्याबद्दल दिलगीरी!

http://www.manogat.com/node/16175

http://www.maayboli.com/node/46530

शुभेच्छा!

अरविंद सर, सुशांत ,वैभव सर __/\__!!!

बेफिजी ... दोन्ही गझला अफाट आहेत! मनोगत ची मी आधी वाचली नव्हती कदाचित

धागा दिल्याबद्दल खूप आभार

माझ्या कुवतीप्रमाणे प्रयत्न केला आहे लिहायचा सर

पुढे काही सुचलं तर बदल करतो

धन्यवाद Happy

>>>माझ्या कुवतीप्रमाणे प्रयत्न केला आहे लिहायचा<<< (ह्या ओळीतला सर हा शब्द गाळला आहे, मला सर म्हणायची काहीही आवश्यकता नाही.

>>>उद्या येणारही नाही कदाचित आज आयुष्या <<<

उद्या आज कसा येईल तसाही? उद्या, उद्याच येणार! गझलेत आशयाच्या तांत्रिक चुका (गझलतंत्रातल्या नव्हेत, आशयातील, जसे काळ इत्यादी) नसाव्यात!

जमीनीच्या मोहात शेर होणे नवे नाही. ह्यापासून मी सुटू शकलेलो नाही. शक्य तितके अर्थवाही व गुणगुणण्यालायक शेर रचायचा प्रयत्न त्यातल्यात्यात करतो इतकेच! पण तुमच्या ह्या गझलेत जमीनीने बियाणे खाऊन टाकल्यासारखे वाटले म्हणून चार शब्द लिहिण्याचा जास्त शहाणपणा केला इतकेच!

कृपया गैरसमज नसावा. Happy

मनोगतातल्यापेक्षा "बेफिकीरी"तली जराश्या फरकाने आहे आणि ती जास्त छान आहे असे एक वै म .ती आपण वाचावीत जोशी , अशी विनंती