चंद्रावर मनुष्य पोचलाच नाही!!!????

Submitted by हर्ट on 8 November, 2009 - 08:29

आज मी हा ५ भागांचा माहितीपट पाहिला. खाली संकेतस्थळ देत आहे. पाच भाग पाहिल्यानंतर मलाही हेच वाटायला लागले आहे की चंद्रावर अमेरिकन मनुष्य गेलाच नाही. तुम्हाला काय वाटतं ते लिहा.

http://www.youtube.com/watch?v=Y5MVVtFYTSo

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

होय चक्रम, आमचं गणेशोत्सव मंडळ आहे. माबोवर इतरत्र माझं लिखाण वाचलंत तर त्याबद्दल अधिक माहिती मिळेल. शोधा. Happy

किती लिंका आहेत या धाग्यात, सगळे उलटसुलट वाचून बघून चक्रावलो.
कोणीतरी सुस्पष्ट मराठीत नक्की सांगेल का हे खरे की खोटे आणि त्यामागची कारणमीमांसा..
बाकी राहिला प्रश्न अमेरिकेचा तर तो जरा बदमाशच आहे. सहज विश्वास ठेवणे कठीणच.

चंद्र आहे याबद्दल काहीच शंका नाही. पाहिजे तर ही क्लिप पाहा. युके मधले प्रसिद्ध रॅपर अली जी यांनी खुद्द एडविन (बझ) ऑल्ड्रिनची घेतलेली मुलाखत आहे ही.
https://www.youtube.com/watch?v=hTKedyQQkZQ

सर्व शंका दूर होतील.

>>>आपण टोपली खाली झाकलेल्या कोंबडीसारखे कुणा एलियनने पाळलेले प्राणी आहोत.<<<
Lol

असू शकेल. पण मग ते न आपल्याला चारा टाकायला येतात ना दुध अंडी न्यायला. आपला उपयोग काय त्यांना? याचे उत्तर मिळाले कि आपला "जीवन उद्देश " आपल्याला कळेल. मग उगा तो शोधण्यासाठी अध्यात्माच्या मागे धावायला नको. Lol

दिवाकर देशमुख | 27 December, 2014 - 10:30 नवीन
किमान चंद्र अस्तित्वात आहे हे मान्य केल्याबद्दल साष्टांग नमस्कारसहित दंडवताचा मानाचा मुजरा.
>>>

+१११११११

लेझर रेजच्या सहाय्याने ११०० वर्षांपूर्वी झालेली धडक सिद्ध होणे आणि आजही चंद्र थरथरत असल्याचे सिद्ध होणे >>

डोळे झाकून यावर विश्वास ठेवणे ही अंधश्रद्धा नाही का ? हे कसं काय हे कुणालाच विचारावंसं वाटत नाही. पण तळपदेंच्या विमानविद्येबाबत कितीही पुरावे दिले तरी लोकांचं समाधान होत नाही.

ताई ईथे नका हो सुरू होऊ, तळपदेंचा विषय तुमच्या उथळपणाच्या धाग्यावरच ठेवा. हा धागा चंद्रावर माणुस उतरला का ह्याचा आहे ज्यावर आधुनिक विचारांनी प्रेरित असलेल्या मायबोलीकरांनी आपआपल्या परीने उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे तो ही उथळपणा न करता.

ते पाहीलचं की. टोपलं, अंडी आणि काय काय.
माफ करा हं , मी एक अडाणी बाई आहे. इतकंही मनावर घेऊ नका माझं.

मी एक अडाणी बाई आहे. इतकंही मनावर घेऊ नका माझं. >> जाहीर सत्कारच करावा म्हणतो. आजच्या जमान्यात सतयुगी लोक क्वचितच मिळतात Happy

>>जाहीर सत्कारच करावा म्हणतो. आजच्या जमान्यात सतयुगी लोक क्वचितच मिळतात Lol
करा करा खरच करा सत्कार ! निदान दोघेही खरे कोण आहेत ते कळेल सर्वांना Lol Light 1

किमान चंद्र अस्तित्वात आहे हे मान्य केल्याबद्दल साष्टांग नमस्कारसहित दंडवताचा मानाचा मुजरा. >>> आदरपूर्वक स्वीकारतो. मला आपल्याबद्दल असलेल्या आदर पूर्वक Happy

हो ना. माझा आज सकाळपर्यंत विश्वास नव्हता. पण या मुलाखतीचा फायदा झाला.

अलीजीजी साहेबांनी इतर अनेक मौलिक प्रश्न येथे विचारलेले आहेतः
१. तुम्ही तेथे पोहोचलात तेव्हा चंद्रावरील लोकांनी तुमचे स्वागत कसे केले?
२. लुई आर्मस्ट्राँग पहिला व तुम्ही दुसरे म्हणून तुम्हाला वाईट नाही का वाटले?
३. तुम्ही चंद्रावर चालून सुद्धा मायकेल जॅक्सन ला मूनवॉक चे क्रेडिट दिले जाते याबद्दल तुम्हाला काय वाटते?
४. माणूस कधी सूर्यावर जाऊ शकेल का? यावर ते शक्य नाही असे उत्तर दिल्यावर, "निदान हिवाळ्यात तरी?, कारण सूर्य तेव्हा गार असेल" अशी विचारणा चतुराईने त्यांनी केली.

उत्साहाच्या भरात बझ ऑल्ड्रिन चा उल्लेख त्यांनी बझ लाईटइयर असाही केला.

खगोलशात्रातील कुतूहलाबरोबरच इंग्रजी ग्रामर करता ही क्लिप उपयुक्त आहे. एकूण अली जी साहेबांच्या सर्वच.

Pages