माझाही झब्बू.. To be or not to be..

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मधे bsk चा लेख वाचत असताना मला माझ्या ब्लॉग वरच्या ह्या जून्या लेखाची आठवण झाली. मी STL हून परत जायच्या आधी १/२ महिने लिहिला होता... त्यामूळे एक झब्बू माझ्याकडूनही.... Happy

भारतात परत जाण्याबद्द्ल जेव्हा जेव्हा चर्चा चालू होतात तेव्हा दर वेळी भयंकर द्विधा मनस्थिती होते... माझ्या दोन मनांचं जणू डिबेट च चालू होतं.. हे दुसर मन वास्तविक फार शांत आणि passive आहे.. फक्त निर्णय घ्यायच्या वेळीच मुसंडी मारून वर येतं... मग तो निर्णय अगदी भारतात परत जाण्याइतका महत्त्वाचा असो की Burger King मधे खायचं का Tacobell मधे इतका trivial असो..
एक मन म्हणतं.. "कशाला जायचय परत ? इथे सगळं settled आहे.. घर चांगलं आहे.. मित्र मैत्रिणी आहेत.... रहा की गप्प पणे.. " पण मग दुसरं मन म्हणतं.. "भारतात काय गोष्टी settled नाहियेत ? तिथे तर ह्या पेक्षा मोठं घर आहे.. बाईक आहे.. गाडी आहे.. इथले नाही पण बाकीचे मित्र मैत्रिणी आहेतच की.."
मग पहिलं मन म्हणतं... "काम पण सुरळीत चाललय... चांगला role आहे.. जबाबदार्या आहेत... आजूबाजूचे लोक खूष आहेत.." दुसरं मन म्हणतं... "अरे जबाबदार्यांचं काय.. घ्यायची तयारी असली की त्या येतातच आपोआप...आणि करायची इछा असलेल्याला काम द्यायला लोकं तयारच असतात.."
पहिलं मन तरीही कामाचा विचार करतच राहातं.. "ह्या प्रोजेक्ट मधे सुरुवातीपासून असल्याने सगळंच माहिती आहे.... अगदी टिम पासून applications पर्यंत.." दुसरं मन म्हणतं " त्याने काय फरक पडतोय... आपल्या comfort झोन मधून कधितरी बाहेर पडायलाच पाहिजे... नाहितर challenges घ्यायची सवय हळूहळू बंद होते... मेंदू गंजेल तुझा अशाने..."
पहिलं मन तरी त्याचा हेका सोडत नाही... '"इथल्या टिम बरोबर चांगला रॅपो जमलाय... इथला बॉस तर मिटींग मधे म्हणाला पण की "as everything is well settled and there are no issues, we conveniently forget about your project" ... आणि team lead पण बोंबाबोंब करेल.." दुसरं मन हसून म्हणतं.. "ह्या अश्या स्तुतीने गुददुल्या होणं सहाजिक आहे... पण शेवटी ते मॅनेजर आहेत... प्रोजेक्ट टिम मॅनेज करणं त्यांच काम आहे... चालत्या गाड्याला खिळ घालणं कोणाला आवडेल... तुझा एक Junior team member दुसर्या टिम मधे गेला तेव्हा तू नव्हती आदळ आपट केलीस?? पण त्याच्याशिवाय आज सगळं चालू आहेच ना? आणि इथली टिम काल पर्यंत दिपक ला requirements आणि issues पाठवत होती.. आज तुला पाठवत्ये.. उद्या आणखी कोणाला... whatz the big deal?"
पहिलं मन अचानक track बदलून personal गोष्टींकडे वळतं.. '"पण मला इथली life style आवडते... स्वत:चं काम वेळेवर करा आणि बाकीच्या वेळी enjoy करा... '" दुसरं मन म्हणतं '"हो?? मग दिवाळी/गणपतीत दिवस दिवस eskal आणि maharashtratimes वरच्या बातम्या वाचून आपली हौस का भगवतोस? ते सगळं miss नाही करतं.."
"अरे त्या वेळेला सुट्टी घेऊन जाऊन यायचं भारतात इव्हडं काय त्यात?"
दुसर्या मना कडे उत्तर तयारच असतं.. '"येणारी दिवाळी ही भारताबाहेरची चौथी दिवाळी असेल असं तू परवाच कोणाला तरी सांगत होतास... !!!!!"
पहिलं मन विचार करून म्हणतं.. "पण इथलं YMCA, week end ची potlucks, late night hang outs..हे सगळं भारतात कसं मिळणार ?"
दुसरं मन लगेच म्हणतं.. "YMCA तून परत आल्यावर स्वत:च्या स्वैपाक स्वत: करायला किती जिवावर येतं त्याचं काय? potluck झाल्यावर साफसफाई करण्यासाठी कामवाल्या बाई असत्या तर किती बरं झालं असतं असं वाटतं त्याचं काय? आणि late night hangouts बद्द्ल म्हणायचं तर भारतात असताना किती week ends ना रात्री लवकर घरी आला होतास? आणि घरी होणारे लाड, निरज निशांत बरोबर खेळणं, घरातली बाग एव्हडच काय पण पूण्याचं ऑफिस देखिल तू इथे miss करतोसच ना.. आणि एकदा settle झाल्यावर हे सगळं हळूहळू कमी होतच..."
"ते खरं आहे.. पण तिथल्या त्या मराठी मालिका, तेच ते जातिचं राजकारण, ऑफिस ला पोचायला लागणारा तास भर वेळ, काही काही अति irritating आणि तरीही सहन करावे लागणारे नातेवाईक, 'लोग क्या कहेंगे' चं pressure हे सगळं इथे नाहिये ना...."
ह्यावर मात्र दुसर्या मनाकडे काही उत्तर नसतं... ते confuse झाल्यचं बघून पहिलं मन आपले बालिश इमले बांधू लागतं...
"जर दोन्ही कडच्या चांगल्या गोष्टी घेऊन तिसरं वेगळंच जग निर्माण झालं तर.. म्हणजे मी सकाळी उठीन तेव्हा माझा southmoor मधल्या खोलीत असेन... म्हणजे खिडकी बाहेर दिसणारं lush green lawn, सुंदर झाडं.. माझं table, त्यावरची lampshade... आणि त्याच्या बाजूच्या अनेक perfumes च्या बाटल्या... मग मी जेव्हा आवरून बाहेर येईन तेव्हा आमच्या पूण्याच्या किचन टेबल वर असेन.. आई मला चहा आणि breakfast देईल.. आणि डब्बा सुद्धा....चहा पिताना मी बाबांकडून सकाळ काढून घेऊन त्यामधल्या पूणेरी बातम्या वाचेन आणि त्यांना मी निघेपर्यंत TOI वाचायला लावेन.. आज्जी ची पूजेची तयारी चालू असेल.. वहिनी ऑफिसच्या तयारीत खालीवर पळापळ करत असेल आणि दादा तिला त्रास देत असेल... नुकतेच उठलेले निरज निशांत तिथे बसून दूध पित असतील... निघताना मी निशांत ची काहितरी खोडी काढेन आणि मग तो मोठ्याने भोकाड पसरेल... Happy घरातून बाहेर पडून मी माझी Camry काढेन आणि I-55 वर drive करून १५ मिनिटात downtown मधे पोचेन... ऑफिस मधे माझा पूण्याचा ग्रुप असेल.. आणि lunch ला कॅंटिनमधे आम्ही खूप टवाळक्या करू... ऑफिस मधे मी आणि बाकीची लोकंही कामाच्या वेळी dedicatedly कामच करतिल आणि सगळे वेळेवर घरी जातिल... घरी येईन परत येईन तेव्हा सगळे नुकतेच परतलेले असतिल.. TV वर कोणतही cartoon किंवा मराठी मालिका चालू नसेल आणि आम्ही चहा पिताना एकत्र बसून गप्पा मारू... तेव्हा आम्ही फक्त आमच्याच घरातले सगळे जण असू.. कोणिही unwanted नातेवाईक हजर नसतिल किंवा त्यांचे फोन ही आलेले नसतिल... तितक्यात कौशिक आणि चंदनाचा फोन येईल मग आम्ही soouthmoor मधे थोडावेळ टेनिस किंवा बॅडमिंटन खेळू आणि नंतर YMCA त जाऊ... घरी येऊन मी shower घेईन तो पर्यंत गरम जेवण तयार असेल.. जेवणानंतर गौतम रश्मी किंवा विनोद चा फोन येईन आणि मग आम्ही stake n shake किंवा Denny's मधे जाऊन shake किंवा ice cream खाऊ... ते करताना ऑफिस मधल्या गॉसिप discuss करून खूSSप ह्सू आणि दंगा करू...
घरी येईपर्यंत आई, वहिनी आणि निशांत सोडून सगळे झोपलेले असतिल आणि बोबलकांदा निशांत मला "काका तू 'भोप्पा' नाही का अजून??" असं विचारेल.. Lol मग आई तिचं लिखाणं करत बसेल आणि मी तिथेच बसून laptop वर timepass करेन...
तोपर्यंत दुसरं मन भानावर येऊन म्हणतं.. "साहेब कल्पनांच्या भरार्या मारणं बंद करा आणि manager आणि senior project manager बरोबरच्या मिटींग च्या तयारीला लागा... जे होणार नाही त्याचा विचार करत बसून वेळ घालवण्यापेक्षा जे उद्या करायचं आहे त्याची तयारी करा.."
पहिलं मन सारे विचार झटकून कामाला लागतं आणि दुसरं मन आता काही काम न उरल्याने परत passive mode मधे निघून जातं.. "To be or not to be ? चा प्रश्ण शेवटी अनुत्तरितच रहातो... !

विषय: 
प्रकार: 

मस्त रे ! द्वंद्व छान मांडलय.

सहीच लिहीलं आहेस अडम!
एकत्र बसून चहा पिताना टीव्ही नाही, आणि भोप्पा प्रचंड आवडले!! Happy

www.bhagyashree.co.cc/

Happy

प्रभावी आहे .. मला आपलं पिक्चर मध्ये असतं तसं adm चं एक आरशाबाहरेचं आणि एक आरशातलं मन दिसलं .. आरशाबाहेरचं jeans/tee घातलेलं आणि आरशातलं झब्बा पायजमा घातलेलं .. :p

मस्त लिहीलंय रे. कल्पना जबरी आहे.

मस्तच. दोन्ही मनातले विचार छान मांडलेत.

जर दोन्ही कडच्या चांगल्या गोष्टी घेऊन तिसरं वेगळंच जग निर्माण झालं तर.. >> अगदी माझ्या मनातल अडम Happy

छान आहे लेख.

छान लिहीलयस अडम! Happy

इकडे पहिल्यांदा येताना अज्ञातात किती आत्मविश्वासाने उडी मारतो आपण आणि परत जाताना सर्व परीस्थिती माहीत असूनही मन कचरतं. किंबहुना माहीत असतं म्हणूनच कचरतं.

------------------------------------------
प्यार की कसम है, न देख ऐसे प्यार से

अडम मलाही असच वाटतं , पार कन्फुझ व्हायला होतं.........
छान .........अगदी मनातलं बोललास........

दोन्ही कडच्या फक्त चांगल्याच गोष्टी घेऊन तिसरंच वेगळं जग.... हं, आवडली कल्पना. मनातल्या मनात इमले रचायला काय जातंय. हो की नाही?

मस्तच लिहील आहेस अड्म. परदेशी असणारया अनेक मित्रानच्या मनात हे युद्ध चालु असत. आणि दर वेळी हा प्रश्न अनुत्तरीच राहातो.
दोन्ही कडच्या सुखद गोष्टी घेउन तू तयार केलेले चित्र उत्तम आहे.

छान लिहीले आहेस. मी या द्विधा मनस्थितीत पडतच नाही. ९६ पासुन ऑनसाईट ऑफशोअर खेळतोय. एकच तत्व बाळग Be a Roman in Rome. मला एका मित्राने मधे विचारले देशात रहाण्याचे फायदे तोटे सांग. मी त्याला एकच तोटा सांगीतला ऑनसाईटसारखे पैसे मिळत नाहीत. बाकी देशात २५ एक वर्षे राहुन कधी तोट्याचा विचार केला का? मग झाल तर. Happy

बाकी त्या भरार्‍या वाचुन मला पूर्वी Star Trek मधे दाखवायचे ती कल्पना प्रत्यक्षात यावी असे फ्लाईटमधे कायम वाटते. त्यात नाही का ते कॅप्टन वगैरे मंडळी एका ट्युबमधे शिरली की लगेच चंद्रावर, मंगळावर तसेच घरात एका ट्युबमधे शिरलो की दुसर्‍या क्षणी पुण्याच्या घरातल्या ट्युबमधुन बाहेर. हा. का. ना. का.

मस्त लिहीलय Happy

छानै. Happy
घरात एका ट्युबमधे शिरलो की दुसर्‍या क्षणी पुण्याच्या घरातल्या ट्युबमधुन बाहेर.>>> Lol मोदक

वा, छानच लिहिलय Happy
द्विधा मन:स्थितीचे यथायोग्य वर्णन Happy

वा, छान लिहिलय इथलं (भारताबाहेरचं) सगळ practical आहे... पण शेवटी ओढ 'आपली माती आपली माणसं' याचीच!

मस्त Happy
***************
ॐ नमश्चण्डिकायै |

छान लिहीलय. Happy
बुध्दीजीवी लोकांपेक्षा कष्टकरी बरे पण, असे नसते विचार त्यांना त्रास देत नाही. Proud

अडम, खूप सुंदर लिहीलंयस्..अगदी सहज.. आवडलं. Happy

खरच मनापासून लिहीले असेल तर, सरळ भारतात परत जा. तुमच्या लिखाणात इथल्या ज्या चांगल्या गोष्टी लिहील्या आहेत, त्यात काही खरा अर्थ नाही. ते सगळे लवकरच तुम्हाला भारतात मिळेलच. पण भारतातले जे तुम्हाला आवडते, ते इथे तुम्हाला कदापीहि मिळणार नाही. ते म्हणजे, तुमच्या आवडत्या माणसांचे प्रेम.

इथेच मायबोलीवर दुसर्‍या एका लेखात चर्चा झाली होती की परदेशी राहिल्यावर आपली भारतीयांबद्दल नि त्यांची आपल्याबद्दल मते कशी बदललात. जास्त दिवस राहिलात, तर त्या आवडत्या माणसांची मते नि तुमची मते जुळणार नाहीत, जसे इथे राहिलेल्या अनेकांचे झाले. मग उगीचच एकमेकांवर टीका करायची. त्याला काही अर्थ नाही. स्वानुभव व इतर अनेक मित्रांचे अनुभव जमेस धरून सांगतो आहे.

शिवाय अमेरिकेची नि भारताची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, अमेरिकेचा '१९९० पूर्वीचा' भारत होणार आहे, नि भारताची '१९७० पूर्वीची' अमेरिका होणार आहे. येत्या दहा वर्षात! Happy Light 1

मस्त कल्पना! छान लिहीले आहे.

छान लिहिलं आहेस. आवडलं.
हे जे 'बेस्ट ऑफ बोथ द वल्ड्स' आहे हे खूप जणांचं द्वंद्व आहे. पण शेवटी ती (सध्या तरी) एक कल्पनाच आहे. तुम्हाला एक कोणता तरी डिसिजन शेवटी घ्यायलाच लागतो.
माणसाला नेहेमी चांगल्या गोष्टींची आस असते. मग त्या भारतातल्या असो वा दुसर्‍या कोणत्या देशातल्या. आणि जे लोक बाहेरच्या देशात राहून आणि तिथल्या चांगल्या राहणीमानाचा अनुभव घेऊन आलेले असतात त्यांच्याकडे कंपेअर करायला भरपूर डेटा असतो. बाहेरच्या चांगल्या गोष्टी आपल्याला बोलवत असतात आणि आई बाबा, दिवाळी, टपरीवरचा चहा-भजी अशा संख्या गोष्टी आपल्याला परत बोलवत असते. जेंव्हा कुठे राहायचे हा डिसिजन घ्यायचा असतो तेंव्हा तर हा कॉन्फ्लिक्ट प्रकर्षाने वर येतो. हे ऑल्मोस्ट सगळ्यांच्याच बाबतीत घडते.
छान मांडलयस तू.

छान लिहिलं आहे. दोन दगडांवर पाय ठेऊन रहाता आलं तर?

मस्तच लिहिलय. मलाही सेम वाटतं की काहीतरी टाईम मशिनसारखं यंत्रं असावं आणि त्यात बसून पटकन भारतातल्या घरी जाऊन यावं.
इथे असलं की भारताची (त्यापेक्षा स्वतःच्या घराची) खूप आठवण येते. पण मागच्यावेळेस मी भारतात गेलेले तेव्हा मला इकडची पण खूप आठवण आली.

अ‍ॅडम,
छान लेख.
खर तर परदेशी चांगली माणस, चांगल्या गोष्टी कुठेही मिळतात. आणि सवयीच्याही होतात.
नसतात फक्त आई -बाबा. त्यांना विचारात घेउन उत्तर शोधायच.
मग उत्तर सोप होत, पण आचरणात आणता येइल असे नाही.

अरे, हे पाहिलच नव्हतं. मस्त लिहीलयस रे अ‍ॅडम.

छान लिहीलय अडम!

>>>इकडे पहिल्यांदा येताना अज्ञातात किती आत्मविश्वासाने उडी मारतो आपण आणि परत जाताना सर्व परीस्थिती माहीत असूनही मन कचरतं. किंबहुना माहीत असतं म्हणूनच कचरतं. >>>सहमत

>>>>खर तर परदेशी चांगली माणस, चांगल्या गोष्टी कुठेही मिळतात. आणि सवयीच्याही होतात.
नसतात फक्त आई -बाबा >>>>>>>
मलाही असेच वाटते.
बाकि दोन्ही कडच्या फक्त चांगल्याच गोष्टी घेऊन तिसरंच वेगळं जग.... आवडली कल्पना. खरच मस्त होइल असं जग असेल तर Happy

Pages