सोडलेले गाव मागे राहिले

Submitted by जयदीप. on 16 December, 2014 - 22:54

सोडलेले गाव मागे राहिले
तू दिलेले घाव ताजे राहिले

काळ गेला, बदलली आता घरे
फक्त रस्ते बदलण्याचे राहिले

वाटले पण दुःख नाही संपले
तू दिले होतेस तितके राहिले

पावसाने भिजवले आहे असे
आग विझली, पण निखारे राहिले!

वादळांनी माैन होते ठेवले
कागदावर व्यक्त होणे राहिले

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users