मटार उसळ फॅन क्लब

Submitted by मंजूडी on 18 December, 2014 - 00:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

लोकहो, मस्त थंडी चालू झाली आहे आणि बाजारात जागोजागी मटाराच्या शेंगांचे ढीगच्या ढीग दिसू लागलेत. खादाडीचे, चंगळ करण्याचे दिवस चालू झाले आहेत.

'नाव एक चवी अनेक' यानुसार प्रत्येकाची मटाराची उसळ करण्याची पद्धत वेगवेगळी असेल. या धाग्यावर आपण निरनिराळ्या चवीच्या मटार उसळीच्या कृती जमवूया.

पाककृती वेगळ्या, नवीन धाग्यावर लिहा, इथे प्रतिसादात फक्त लिंक द्या, मी हेडरमधे अपडेट करेन. कारण काय आहे की ढीगाने आलेल्या प्रतिसादांतून नेमकी पाककृती शोधणे अवघड जाईल, स्वतंत्र धाग्यावर लिहिलेल्या पाककृती शोधायला सोपे जाईल कारण त्या सर्चमध्ये येतात.

मटार पुलाव, मटार पॅटीस, मटार कचोरी, मटार हलवा, मटार खीर इत्यादींसाठी वेगळा फॅन क्लब काढा Wink

इथे फक्त आणि फक्त मटार उसळच येऊद्या. करी, भाजी इत्यादी पदार्थ चालतील, थोडक्यात पोळीशी लावून खायचे मटाराचे पदार्थ इथे येऊ द्या. आणि पाककृतीमध्ये फोटो हवेतच. Happy

:मटार उसळ करण्याची माझी पद्धत:

चार वाट्या ताजे मटाराचे दाणे
दोन छोटे कांदे
अर्धी वाटी ओलं खोबरं
तीन-चार लसणीच्या पाकळ्या
गोडा मसाला, लाल तिखट, मीठ, गूळ
तेल आणि फोडणीचं साहित्य

क्रमवार पाककृती: 

मटाराचे दाणे शिजवून घ्या. अगदी टणटणीत दाणे नकोत आणि अगदी गाळही शिजवायचे नाहीत. मी बेबीकूकरमधे एक शिट्टी काढून शिजवून घेते, म्हणजे सगळेच दाणे एकसारखे शिजतात.

कांदा उभा पातळ चिरून घ्या. लसणी सोलून घ्या. कढईत अगदी दोन-तीन थेंब तेल तापवून त्यात कांदा-लसूण-ओलं खोबरं खमंग भाजून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमधून मस्त गुळगुळीत वाटून घ्या.

कढईत तेल तापवून मोहरी-जिरं-हिंग-हळदीची फोडणी करा. शिजलेले मटार त्यात परतून घ्या. थोडं पाणी घालून एक उकळी येऊ द्या. मग त्यात कांदा-खोबर्‍याचं वाटण घाला. लाल तिखट, मीठ, गोडा मसाला, गूळ घालून ढवळा. आमच्याकडे तिखट-गोड या चवी बरोबरीने लागतात त्यामुळे गूळ लागतोच. रस्सा पातळ हवा की अंगासरशी हे आपापल्या आवडीप्रमाणे ठरवा त्याप्रमाणे आवश्यक तेवढं पाणी घालून उसळ मस्त उकळू द्या.
गरम फुलक्यांबरोबर ओरपा. सोबत ताजा गाजरहलवा असेल तर मग स्वर्गच!

matar usal.jpg
वाढणी/प्रमाण: 
तीन-चार माणसांसाठी
माहितीचा स्रोत: 
पारंपरिक
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओगले आज्जींनी मटार बर्फी आणि मटार घालून संत्र्याची बर्फी पण दिलीय.. मी नाही केली ( अजून ) कुणी केलीय का ?
पुर्वी लग्नाच्या रुखवतात मटाराची विड्याची पाने ठेवत असत. त्याची कृती बर्फीसारखीच अहे.

@अगो, बाबू वडापाववाला म्हणजे पार्ले टिळक शाळेजवळचाच ना? की आणखी कोणी?
@शर्मिला, रुची कुठे आहे? 'आमच्या इथे रुचीकडे ताज्या मटारच्या गरमागरम करंज्या मिळतात. दुपारच्या चहाबरोबर मस्त.' हे वाचून रहावलं नाही. Happy
मंजूडी या अवांतर चौकश्यांबद्दल सॉरी. Happy

भारी. आजच फ्रोझन मटारची करणार. कायम चिंच-गुळ-गोडा मसालावाली खाल्लेली, आणि इतकं काय कौतुक असतं मटार उसळचं असंच वाटतं आलेलं. पण इथल्या रेसिप्या तोंपासु आहेत. तर्रीवाली पासून सुरुवात. बरोबर थोडा कडक-कडा असलेला स्लाईस ब्रेड मस्त लागेल. जमली आणि लक्षात राहिलं तर फोटो डकवतो.

मस्तं धागा आहे. वाचून आज मटरउसळ कराविशी वाटतेय.

ही पाककृती आधी कुठेतरी लिहिलीय, तरी इथेपण टाकते:

भरपूर कोथिंबीर, हिरव्या मिर्च्या, आल्याचा तुकडा, लसूण पाकळ्या आणि ओलं खोबरं बारिक वाटून घ्यायचं. तेल किंवा साजुक तूप गरम करून त्यात जिरं, हिंग घालून फोडणी करायची. बारिक चिरलेला कांदा यात परतून घेऊन हिरवं वाटण घालून पुन्हा भरपूर परतायचं. यात मटरदाणे घालून एकत्र केल्यावर रस्सा जितका पातळ हवा त्यानुसार आधणाचं पाणी घालायचं. वरून मीठ आणि थोडी (ताजी) लवंग-दालचिनीपूड घालायची. एक उकळी आणायची. उसळ वाटीत घेतल्यावर थोडं लिंबू पिळायचं. चपात्या, पराठे, पुर्‍या, भात सगळ्यांबरोबर खाल्ली. पण ज्वारीच्या भाकरीशी हा प्रकार बेस्ट लागला.

कोंकणी प्रकारचे बटाटा व मटारचे नारळाच्या दुधातले आंबट कसे करतात? मला माहिती असलेल्या कृतीत लाल सुक्या मिरच्या तेलात परतून नारळ व चिंचेच्या कोळाबरोबर मिक्सरवर एकजीव वाटतात. एकीकडे बटाट्यांच्या फोडी पाण्यात शिजवायच्या, त्या शिजत आल्या की त्यात हे ना दू घालायचे. मटार घालून शिजवायचे. मीठ घालायचे. तेलात कांदा क्रिस्पी परतून तो वरून घालायचा. अशीच कृती आहे की आणखी काही वेगळी कृती आहे?

मटार उसळ आवडते पण ताज्या मटारची असेल तरच. आमच्याकडे मोंढ्यावरून तडक घरी पोत्यानं मटार यायचे. दिवसभर जसा वेळ सुटेल तसं प्रत्येकाकडे ते सोलायची ड्युटी असायची. हिवाळ्यातल्या कोवळ्या उन्हात अंगणात बसून मटार सोलत बसायला मजा यायची. ताजे कोवळे मटारदाणे मात्र नुसतेच खावेत, उसळ-बिसळ करून त्याचा सत्यानाश करू नये. सोलता सोलता दाणे खाली पडले तर त्या घरंगळणार्‍या दाण्यांचा पाठलाग करायला मांजरीच्या पिलांना भारी मजा येते. दाणे पकडीत आले की एखादी मोठी शिकार मिळाल्याच्या थाटात ते आपल्याकडे बघतात. एकदम मिलियन डॉलर मोमेंट असते ती. त्यामुळे उगीच एखाद-दुसर्‍या दाण्यासाठी त्या पिलांवर डाफरू नये. ~समाप्त~

मी पण या क्लबात! तर्रीदार, गोडा मसाला सगळे प्रकार आवडतात. मंजूडी, मी मृ ने दिलीये तशी हिरवं वाटण लावून कांदा वगळून उसळ करते ती अगदी छान हिरवीगार दिसते.

मटार पराठे , मटार मोमो करंज्या हेही इथे लिहावे.

धाग्याचे नाव नुस्ते मटार फ्यान क्लब ठेबावे.

वेल मी पण बहुतेक या क्लबात. म्हणजे मटार उसळ आवडतेच, पण फार वेळा केली नाही जात. बहुतेक विसरून जाते मी. Happy
अकु, जोशींची मटार करंजी!! काय आठवण काढलीस!

नवीन कर्नाटक हायस्कुल माहीतीय का? एरंडवण्यातले? तिकडे, समोरच्या गल्लीत आहे डाव्या हाताला 'जोशी स्वीट्स'. समोरच गणेश भेळ आहे. जोशींकडच्या मटार करंज्या व उकडीचे मोदक हे असतातच आमच्या घरी कायम.

मी पण ठेवीन हो लक्षात.

मटार कधीतरीच वापरला जातो. मंजुडीचा फोटो मस्त! बहुतेक ३१ ला पार्टीला हीच उसळ व ब्रेड करावे वाटत आहे. पण अर्थात फ्रोजन वापरुन, ताजी नाही.

तृप्ती, मांजरीबद्दल अनुमोदन. मस्त लिहिलयस. आमची तिनी पोरं कागदाचा तुकडा पडला तरी पकडायला धावतात. (काही गोष्टींसाठी मात्र डाफ्रावं लागतं बिचार्‍यांना, विलाज नाही) असो, मटारात मांजर आणायचा मोह टाळुन थांबत आहोत.

वा ! छानच धागा.
लेखात जो फोटो दिलाय तो अगदी यम्मी आहे. बटर तंदुरी रोटी असेल तर मज्जाच.
पण त्यात पाणी घातल्यानंतर त्याला उसळ म्हणता येतं का ?

Pages