मानसिक विचार

Submitted by तनुदि on 17 December, 2014 - 01:18

कधी कधी जुन्या गोष्टी सतत आठवतात आणी मग खुप वेग वेगळे विचार मनात येतात की आपण हे करायला हव होतं किंवा हे बोलायला हवं होतं. हे का नाही केलं स्पष्ट का कोणाशी नाही बोललो. थोड्क्यात पश्ताताप कसा कंट्रोल करायचा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाहीच येत करता मला तरी Sad ते म्हणतात ना hindsight is always 20-20! काळ हाच सर्वात उत्तम उपाय कारण मग काही काळाने नवीन पश्चाताप करण्यासारख्या गोष्टी घडतात आणि जुन्या मागे पडतात!
आवडतील इथले उपाय वाचायला!

Give a proper outlet. Diary may not be enough. Internet forum is risky, from what one gets to read, some people might put you in a box and start questioning. You need some listener, who just listens, without advising or sharing his/her own regrets (at that time).....
Being a listener brings it's own stress factors. Ask me. Happy

तनुदि,
असे विचार मनात येतात तेंव्हा त्या विचारांकडे तटस्थपने बघायला शिक त्या विचारांना दुर ढकलन्याचा प्रयत्न करु नकोस.
ती घटना घटित होउन गेली आहे.पण त्या घटनेची उजळनी करुन पुन्हा पुन्हा आपण ती अवस्था जगत असतो.
या सगळ्या गोष्टी मनातच घडत नसतात तर संवेदनाच्या रुपाने शरिरात ही घडत असतात.क्रोध येण्यासारखी घटना घडली असेल तर घटना घडताना जश्या शरिरात संवेदना निर्मान होतात( श्वासावी गती वाढने शरिराला कंप सुट्ने रुद्याचे ठोके वाढ्ने) तशाच संवेदना थोड्याफार प्रमानात ती घटना आठवताना ही घडत असतात.ज्या आपल्याला अप्रिय वाटतात.तर जेव्हा जेंव्हा या गोष्टी आठवतिल शरिरातिल संवेदना व श्वासाकडे बघायचे मनातिल विचार कमिकमी होऊन मन शांत व्हायला लागेल.
हे सगळे शब्दात सांगने कठिन आहे पण प्रयत्न केला आहे.

सुरेख यांनी जे म्हटलं आहे त्याला योगशास्त्रामध्ये 'साक्षीभावना' असे म्हटले आहे

तनुदी मला सुद्धा असाच प्रश्न पडला होता. ह्या प्रकाराला पास्ट लाईफ बॅगेज म्हणतात. सतत तेच आठवल्याने तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तिथेच तिथेच घोळत बसता. मी समुपदेशन घेतले. भूतकाळातल्या गोष्टी तर आपण बदलू शकत नाही. म्हणून मी इथून पुढे तरी आपण मूग गिळून का गप्प बसलो असा प्रश्न पडू नये म्हणून स्वतःत अनेक बदल केले. आत्मविश्वास वाढवला. वर्तमानात जेव्हा मला स्वताबद्दल कॉन्फिडन्स आला त्या बरोबर हळू हळू भूतकाळातल्या गोष्टीं बद्दल काही वाटेना झाले. उलट ते झालं ते बरंच, त्यामूळे माझ्यात आज चांगला बदल झाला असं मला वाटतं.

शारीरिक आणि मानसिक अशा दोनही आघाड्यांवर काम करा त्याचा खूप फायदा होतो असा माझा वै. अनुभव आहे.
शारीरिक - योगासन, meditation, running किंवा कोणताही excersize अगदी नियमितपणे
आहार - आहारात चांगले बदल करा. थोडा काळ का होईना स्वत:ला स्वत:ची priority बनवा.
याचा एकत्रित चांगला परिणाम विचारांवर होतोच.
मानसिक - समुपदेशन व जे आवडते त्यात गुंतवून घ्या. आपल्याला या विचारांतून बाहेर पडायचे हेच कायम लक्षात ठेवा

काळ हा एक मार्ग झाला पण तो यशस्वी होईलच असे नाही. शक्य असल्यास स्वतःला दुसरी संधी देणे हे महत्त्वाचे.

उदा: वडिलांच्या बाबतीत ऑपरेशन करावे का न करावे असा प्रश्न असताना मुलाने "चुकीचा" निर्णय घेतला आणि वडील अंथरुणाला खिळून राहिले. पुढे मुलगा कुठल्याही वैद्यकीय प्रसंगी बहिणीवर निर्णय सोपवतो आणि वडिलाना टाळतो. अशा प्रकारच्या पश्चातापाने ना बहिण खुश रहाते ना इतर जवळचे लोक. योग्य ती माहिती काढून, योग्य तो सल्ला घेवून आपण बरोबर निर्णय घेवू शकतो हे भान राखणे गरजेचे.

ही स्वतःला संधी देण्याची क्षमता येण्यासाठी कुणाला समुपदेशन लागेल, कुणाला ध्यान, कुणाला योगविद्या, कुणाला डेल कार्नेगी ची पुस्तके. सर्वाना एकच सोल्युशन असेल असे नाही. त्यामुळे चांगल्या गोष्टी ट्राय करत रहा. क्लिशे आहे पण स्वतःला क्षमा करणे ही सगळ्यात मोठी लढाई आहे. त्यामानाने दुसर्‍याच्या "चुकानां" क्षमा करणे सोपे आहे.

धन्यवाद. सगळेच प्रतिसाद पटले. मी आता प्रयत्न करतेय काही नविन शिकण्याचा एन्गेज राहिल्यानी पण फरक वाटू शकतो. xcersize पण सुरु केले आहे. थोडा काळ का होईना स्वत:ला स्वत:ची priority बनवा.>> बरोबर
पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद.

प्रत्येकाला कधी ना कधी तरी या परिस्थितीतून जावे लागते...पण या गोष्टीकडे त्र्ययस्थ नजरेने पहावे...सतत मन गुन्तुन राहील असे करावे....सन्गीत एकणे हा उत्तम पर्याय आहे असे मला वाटते...

आहार - आहारात चांगले बदल करा.>>> +१

Gut flora (शरीरातील चांगल्या बॅक्टेरियांचे प्रमाण) व्यवस्थित राखण्यासाठी घरी विरजण लावलेलं दही, आंबवलेले पदार्थ (इडली, ढोकळा वगैरे) खा. अजून डिटेल्ससाठी http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2674977/

साधी साखर खूप कमी करा. त्यातील fructose मेंटल हेल्थसाठी आणि अजून बर्‍याच प्रकारच्या आरोग्यासाठी चांगले नसते.

प्रत्येकाने आयुष्यात कधितरी काहितरी चुका ह्या केलेल्याच असतात. त्यामुळे चुका करणारे आपण एकमेव नसतो. असा विचार केल्याने मनाला लागणारी टोचणी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते. परन्तु त्यातून बोध घेउन ती चूक पुन्हा होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. तरीहि मन मोकळे होत नसेल तर शक्य असेल तर त्या व्यक्तिची माफि मागून सरळ त्या विषयावर बोलावे आणि शक्य नसेल तर आपल्या एखाद्या अगदी जवळच्या व्यक्तिशी (शक्यतो आपली आई) त्या विषयी बोलावे.

मला राहून राहून टायटल खटकतेय
मानसीक विचार
एकतर सी नाही सि असावे
आणि दुसरे म्हणजे विचार मानसिकच असतात ना? मानसिक विचार असे आपण लिहित नाही, उथळतेसारखे काहीतरी होतेय.

डीविनिता जेव्हा टायटल दिल तेव्हा मला पण थोड वेगळ वाटल पण दुसर काही सुचल नाही म्हणुन मानसिक विचार लिहुन टाकल. मोराप, अश्विनी के , बी आणी रसना२ धन्यवाद