आणि दाऊदवर गोळी चाललीच नाही!

Submitted by शांताराम कागाळे on 13 December, 2014 - 09:49

प्रमाणे अमेरिकेने कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनला पाकिस्तानमध्ये घुसून मारले होते तशाच प्रकारे मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमला ठार मारण्याची संधी भारताकडे चालून आली होती. मात्र अगदी शेवटच्या क्षणाला हे मिशन रद्द करण्यात आल्याने १९९३च्या मुंबई बॉम्बब्लास्ट प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आजही पाकिस्तानात मोकळेपणे फिरत आहे.

दाऊद अनेक वर्षापासून कराचीमध्येच वास्तव्याला आहे. तो रोज त्याच्या क्लिप्टन रोडवरील घरातून डिफेन्स हाऊसिंग सोसायटीकडे जात असे. याचदरम्यान दाऊदला संपवण्याची योजना आखण्यात आली. त्यानुसार 'सुपर बॉइज'ने या मार्गावर असलेल्या दर्ग्याजवळ दाऊदला शूट करण्याचे निश्चित करण्यात आले होते. नियोजीत प्लॅननुसार १३ सप्टेंबर २०१३च्या दिवशी हे नऊ कमांडोज दर्ग्याजवळ पोजिशन घेऊन बसले होते. दाऊद कसा दिसतो, याबद्दल सर्व कमांडोजला पूर्ण माहिती असल्याने शिकार चुकण्याचा प्रश्नच नव्हता. काही क्षणातच दाऊदची गाडी दर्ग्यासमोर येणार तेवढ्यातच मुख्य कमांडोला फोनवरुन गोळी न चालवण्याचे आदेश आले आणि सगळा प्लॅन फसला. दाऊद समोरून गेला पण त्याचा 'गेम' मात्र होऊ शकला नाही. दरम्यान, हा कॉल कुणी आणि का केला होता, याबद्दल माहिती देण्यास संबंधित सुत्रांनी नकार दिला.

१३ सप्टेंबर २०१३ ला अस्तित्वात असलेल्या काँग्रेस सरकार कडेच ह्याच उतरदायीत्व !!असाव

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिंब्या गल्ली चुकली ..

तिकडे आग्रा वसई धर्मांतरावर महायुद्ध्ह सुरु आहे.

आणि तू हिकडे रशिया कम्युनिस्ट वगैरे बडबडत बस्ला आहेस.

वत्सा तिकडे जा ( ये)

तुमच्या या धाग्याला ना शेंडा ना बुडखा...
सोयिस्कर तेवढं सांगायचं इतकच जमतं तुम्हाला बहुदा. इतकी तपशीलवार जर माहीती आहे, कोण कुठे लपलं होतं ते तर फोन कुणाचा आला तेही सांगून टाका की...
तिथेच कशी माशी शिंकली तुमची...

आशुचँप,

तपशीलवार माहीती ? कश्याला आता सारवा सारव करताय ?

जर गुप्तहेरांबाबत ईतकी माहीती आम जनतेला दिली असती तर त्या ऑपरेशनचे अगोदरच बारा वाजले असते

आणि त्यात तुम्हाला "कंधहार" वैगेरे आणायची काय गरज होती ?

तुम्हाला उपचाराची गरज आहे हेच सिद्ध होतय !! गेट वेल सुन !!

Pages