भ्रमनिरास अमेरिकेबद्दल

Submitted by श्रीकान्त जोशी on 13 December, 2014 - 13:09

नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न अस म्हणतात. मला काही विश्वास बसत नाही यावर. मुमताजच्या लग्नात कोणी विघ्न आणल ? ( तुम्हाला म्हणून सांगतो. आम्ही दोघा-तिघानी ठरवल होत पण ऐन वेळेला नक्की तारीखच कोणी कळवली नाही.) धार्मिक वाद सुद्धा आले नाहीत. ते जाऊदे, ती सुंदर तरी होती. पण आत्ता शिल्पा शेट्टीच्या वेळी काही ?

कशावरून विषय निघाला, की हिच म्हणण पडत की माझ कुठलही काम सरळ होत नसत. (माझ्यामुळे) मी ठरवलेल्या कामात काहीतरी गोची होणार हे ती गृहीत धरते. अर्थात मला नकटा म्हणण म्हणजे सोनियानी मनमोहन सिंगना " ए टकल्या गप बसायला काय घेशील ? पहाव तेंव्हा पिरपिर पिरपिर...." म्हणण्याइतक अशक्य.

जाऊ दे, सांगायचा मुद्दा वेगळाच आहे. मागच्या मंगळवारी मी निघालो त्यावेळी माझ्यावर कशी गेम पडली किंवा पडत होती ते सांगायचय. म्हणजे माझ विमान रात्री नऊच म्हणून रीतसर सहा वाजता विमानतळावर दाखल झालो. एअ इंडियाच्या काउंटरवर जाऊन विमानाची चौकशी केली. तिथला अधिकारी व्यक्ती क्षणभर उर्ध्व लावून बसला. "अहो, तुमची दिल्लीपर्यंतची फ्लाईट डोमेस्टीक असल्याने सांताक्रुझवरून सुटणार. (इथे कशाला कडमडलात ?) तिकडे जा." आता मी आडवा. सहारवरून या भल्या मोठ्या तीन बॅगा घेऊन कुठल्याही वहानाने सांताक्रुझला या अशा सातच्या सुमारास किमान दीड ते दोन तास लागणार, पुढच विमान गेलच धरायच. आयुष्यात फॉरेन रिटन व्हायचा चान्सेस संपला. मी गळाठलो. हात पाय गळणे, लहान मेंदूपासून मज्जारज्जूमार्गे माकडहाडापर्यंत घामाचे थेंब जातांना कसं मुंगळ्यांची ओळ चालल्यासारखी वाटते ते अनुभवत असता अचानक अंतराळातून " काका तुम्ही कसे काय ? कुठे निघालायत ?" अशी आकाशवाणी झाली. अविश्वासाने वर बघितले तर इण्टलिजन्स ब्युरोचे अधिकारपत्र लावलेला एक आडदांड इसम उभा होता. आता हा मला आंतरराष्ट्रीय विमानतळावर विनापरवाना घुसल्याबद्दल अंदर करतो की काय म्हणून "क्या हुवा, निघते टैम घाईघाईमे नक्की विमानतळ देखनेकाच राहून गया. नाहीतर हम हम्मेशा इसीच विमानतळसे विमान पकडते है ...." वगैरे जुळवाजुळव सुरु केली.
" काका मी विनोद. ओळखलं नाहीत वाटत."
बरोबर हा माझ्या कॉलेजच्या मित्राचा जयदेवसिंगचा मुलगा. पंधरा एक वर्षांनी पाहिला. मधेच कुठे पानिपत की सोनीपतला शिकत होता वगैरे ऐकायचो.
" विनोद तू इथे कसा ?"
" दोन वर्ष झाली इथे पोस्टिंग झाल्ये. तुम्ही कुठे निघालायत ?"
त्याला सर्व कर्म कहाणी सांगितली. त्याने त्याच्या प्रेमळ शब्दात एअर इंडियाच्या लोकांच्याकडे चौकशी केली. असा गोंधळ कसा होऊ शकतो असेही नम्रपणे विचारले. निष्कर्ष म्हणा किंवा मार्ग म्हणा असा निघाला की साडेनऊला इथूनच न्यू यॉर्कची फ्लाईट जाणार आहे. त्याने दिल्लीपर्यंत जायचे आणि पुढे आपली आपली फ्लाईट पकडायची. आता हे तिकिट त्या तिकिटात कसं वळवायचं ते तुम्हीच आपापसात मिटवा हेही त्यांना सांगून विनोद आला. इतकंच नाही तर नउला मला विमानापर्यंत सोडलेन आणि "मेरे चाचा है " असे त्या उभ्या माणसाला बजावले.

दिल्लीला थोडी धावाधाव झाली पण पुढच विमान मिळाल बुवा एकदाच. आता वाटेत तेलपाणी बीलपाणी काही न करता तडक शिकागो म्हणे. जरी मध्यरात्री निघालो असलो तरी पंधरा सोळा तास प्रवास करून पहाटे शिकागो. पण सुदैवाने या विमानात कमीतकमी निम्म्या शिटा मोकळ्या होत्या. त्यामुळे खुशाल तीन बाकड्यांवर पसरून मस्त चार पाच तास ताणून दिली. पण खर सांगू का ? नीट स्वस्थ झोप लागत नाही हो. समजा लागली गाढ झोप आणि ही हवाई सुंदरी आलीच काहीतरी खायला प्यायला घेऊन तर नंतर मागितल तर " मी आले होते घेऊन, तुम्ही झोपला होता त्याला मी काय करू ?" हे ऐकून न मिळण्याची मनाची तयारी ठेवायची. जाता जाता एक शंका. मागे केंव्हातरी या हवाई सुंदरींबद्दल वाचल होत त्यात एक मुद्दा म्हणजे नियंम असा असलेला आठवतोय की त्या लग्न न झालेल्या असायला लागतात. आजच्या या प्रकरणांकडे पहाता तो नियम पूर्वी चुकीचा वाचला असावा अस वाटतय. खरोखर त्या नियमाप्रमाणे लग्न न होऊ शकलेल्या मुलींना परवानगी असावी

असो. तर धड झोपही नीट किंवा पुरेशी झाली नाही. अखेर उजाडता उजाडता शिकागो आले एकदाचे. चार तास काढायचे होते इथे. पण आंतरराष्ट्रीय वरून आंतर्देशीय विमानतळावर जायच होत. सहार सांताक्रुज सारखच. पण जायला एक आगगाडी होती. सतत फिरत होती. विचीताच विमान अगदीच पिल्लू. दोन्ही बाजूच्या खिडक्याच्या लगत दोन ओळी. मधून जायला वाट. अस चिंचोळ विमान. म्हणजे सर्वांना विंडो सीट आणि सगळ्यांना आयल सुद्धा. वीस बावीस उतारू, सुंदरी, ड्रायव्हर संपली एकूण जनता आमच. नशीब खडतरच. या खेपेला अशोक वनात सीतेवर पहारेकरी असलेल्या स्त्रिया कवळी काकडी वाटाव्या अशी निग्रो पहिलवान आमच्या वाटणित आली. या छोटूश्या विमानात तिला वाकूनच उभ रहायला लागत होत. रांगेतून मागे जायच तर ते अगडबंब शरीर दोन्ही बाजूस धक्के देत देत जायच. पट्टे लावलेत का नाही ते बघण्यापुरती ती मागेपर्यंत आली. नंतर प्रवासात काही देण्याची बात नस्से त्यामुळे ती जी बसली ती विमान उतरल्यावरच हालली . तस बघता हे बरच झाल कारण सुरुवातीला तपासणी करायला जेंव्हा ती मागे जात होती तेंव्हा आमच काटकुळ विमान जरा जरा डुलतय अस वाटत होत. पण एकूण गाव झकास वाटल विमानांच्या कारखान्यांच गाव. जस पुणे ऑटोमोबाइल हब तस. परवा विमानांचा एक शो झाला. पण त्याबद्दल आणि इतर काही परत उद्या परवा.

असा सहजासहजी सोडणार नाही. माझ्याशी खेळताय काय लेको. अजून दोन तीन तरी झब्बू देतो की नाही बघा. सध्या सोडतोय. .... नो म्यान्शन प्लीज.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जोशी बुवा बरं लिहिलयं. पण काही वाक्य उडवा , शोभत नाही तुम्हाला ( तुम्हालाच काय , माणुसकी असलेल्या कुठल्याही व्य्क्तीला)
<<<खरोखर त्या नियमाप्रमाणे लग्न न होऊ शकलेल्या मुलींना परवानगी असावी.>>>
<<<या खेपेला अशोक वनात सीतेवर पहारेकरी असलेल्या स्त्रिया कवळी काकडी वाटाव्या अशी निग्रो पहिलवान आमच्या वाटणित आली. >>>
अतिशय खालची पातळी गाठलीत तुम्ही.

श्री +१

निग्रो स्त्री विषयीचे वाक्य रेसिस्ट आहे.

तुमचा लेख वाचला नि प्रवास करताना स्वतः केलेला वेंधळेपणा दुसर्‍यांनी प्रयत्नांची शिकस्त करुन कसा सावरुन घेतला याचे वर्णन करणारा मुपीतला हा लेख आठवला.

http://online4.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5481112503169367923&Se...मुक्तपीठ&NewsDate=20141207&Provider=डॉ. सतीश देसाई&NewsTitle=प्रवासाआधीची शर्यत (मुक्‍तपीठ)

र्थात मला नकटा म्हणण म्हणजे सोनियानी मनमोहन सिंगना " ए टकल्या गप बसायला काय घेशील ? पहाव तेंव्हा पिरपिर पिरपिर...." म्हणण्याइतक अशक्य.<<<< हे वाक्य अत्यंत वाईट आहे, आता प्रतिसादामध्ये वाचलेले वाक्यदेखील तसलेच रेसिस्ट आहे.

तीव्र निषेध.

भ्रमनिरास हवाईसुंदरींच्या सौंदर्याबद्दल का?
की क्रमश: आहे?

माझ्या जुन्या ऑफिसच्या समोर हवाईसुंदरी प्रशिक्षण केंद्र होते. आम्ही चहा प्यायला वरच्या कॅन्टीनमध्ये गेलो की त्यांचे टेरेस आणि त्या दिसायच्या. अफलातून सुंदर मुली होत्या सर्वच. पण त्यांना ईथेतिथे बघायला परवानगी नसायची बहुधा, कारण कधी माझ्या दिशेने त्यांनी फारसे बघितल्याचे आठवत नाही.. कदाचित आमचे टेरेस उंचावर होते हे देखील कारण असावे..

..

बाकी प्रतिसादांमध्ये उल्लेखलेल्या आक्षेपार्ह विधानांशी सहमत. या प्रकारचे विनोद स्वत:वर व्हावेत तर तो विनोद, अन्यथा हिणकस थट्टा टवाळी वाटते..

श्री यांना अनुमोदन.
अतिशय रेसिस्ट आणि कोत्या मनाचे प्रदर्शन करणारा लेख.
आपले वय काय? आपण बोलताय काय?

कातडीचा रंग कुणाला कुठला मिळाला आहे हे इतके महत्त्वाचे आहे का?
सर्व्हिस मिळाली ना? मग झाले तर.
हवाई सुंदरी कशी आहे यावर खालच्या दर्जा चे विनोद कशाला करता?
हीन विचार आणि अतिशय खालच्या दर्जाचे लेखन.

एवढ्याशा लेखनातील जाणूनबुजून टाकलेल्या विनोदी(!?) वाक्यांनी आमचातरी भ्रमनिरास झाला आहे. पुढच्या असल्या भागाची अजिबात वाट पाहत नाही.दुर्रीचा झब्बू अथवा विमानप्रवास जाऊ दे आमचा पेडगावबुद्रुकचा यसटिच्या प्रवासाचा किस्सा इथे देण्याचा विचार रहित केला आहे.

या खेपेला अशोक वनात सीतेवर पहारेकरी असलेल्या स्त्रिया कवळी काकडी वाटाव्या अशी निग्रो पहिलवान आमच्या वाटणित आली.>> हे अगदी चुकीचे व रेसिस्ट आहे. तुरंत एडिट करा. आफ्रिकन अमेरिकन म्हणा.

निनाद+१००००

Sad लग्न न होवू शकलेल्या मुली अनाकर्षक आणि सेवेमध्ये कुचराई करणाऱ्या असा अर्थ निघतो वाचताना हे ध्यानात आले का आपल्या? असे लिहून काय साधते? नशीब ते विमान बिघडल नाही! नाहीतर एखाद्या लग्न न झालेल्या मुलीच्या हाती तुमच्या पॅराशुटची दोरी, आणि ती कशाला तुम्हाला उद्धारी!!!!!!!

कुठल्याही व्यक्तीचा वर्ण लिहिण्याची आवश्यकता आहे का? अगदी गरजच असल्यास मराठीत शिष्टसंमत आणि रूढ शब्द वापरले तर बर. सामान्यपणे मराठीत गौरांगना किंवा श्यामला असे वर्णन करतात.

There is no co-relation between title and the experience written.

4-5 opinions written above might be offensive to the most. I feel this writer has such opinions about certain things which might not be socially acceptable or wrong also. I would prefer truth (real thinking ) than following some protocols of writing diplomatically. The writer might be inclined to take back some words or offer an explanation as to why he has written so but at this age his thoughts are not going to change.

अतिशय रेसिस्ट आणि कोत्या मनाचे प्रदर्शन करणारा लेख.
आपले वय काय? आपण बोलताय काय?>>>>>>>>>>>>> वत्सलास अनुमोदन.
आणि अमेरिकेबद्दल कसला भ्रमनिरास तेही नाही कळलं.

बाकी प्रतिसादांमध्ये उल्लेखलेल्या आक्षेपार्ह विधानांशी सहमत. या प्रकारचे विनोद स्वत:वर व्हावेत तर तो विनोद, अन्यथा हिणकस थट्टा टवाळी वाटते.....
ऋन्मेष ला अनुमोदन.

मुक्तपिठिय लेख इकडे कसा काय?
एक आगाउ (आणि फुकट ) सल्ला : अमेरिकेत कोणाला निग्रो म्हणु नका, तुमचा चेहरा एलियन सारखा करतिल ते लोक..

बहुतेक उल्लेख हे सार्वजनिक माध्यमात गैर ठरावेत असे आहेत.
तूम्हाला तूमच्या ट्रॅव्हल एजंटने विमानतळाबाबत नीट माहिती दिली नाही, कि तूम्ही लक्षात घेतली नाहीत ?
तिकिटावर देखील विमानतळ कुठला ते लिहिलेला असतो.

<<या प्रकारचे विनोद स्वत:वर व्हावेत तर तो विनोद, अन्यथा हिणकस थट्टा टवाळी वाटते..>.

करायला (लिहायला)गेलो मारुती झाला त्याचा माकड अस काहीस झालय लेखकाच.

काही उल्लेख आक्षेपार्ह आहेत हे नक्की, परंतु मराठी साहित्यक्षेत्रात अगदीच बिनवापरातले नाहीत. अभिनयक्षेत्रातील व्यक्ति आणि देशी व विदेशी महिलांकरिता यापेक्षा भयानक वाईट उपमा व विशेषणे शिरीष कणेकर व सुभाष भेण्डे (काही प्रमाणात व थोड्या सौम्य पातळीवर द्वारकानाथ संझगिरी) या मराठी व्यावसायिक विनोदी लेखकांच्या लिखाणामध्ये आढळतात. गेल्या तीन दशकांपासून विविध वर्तमानपत्रे, साप्ताहिके व पाक्षिकांमधून यांचे लिखाण वाचनात येत असते. देव आनंद व आशा पारेख यांच्याविषयी लिहीताना तर शिरीष कणेकरांची भाषिक पातळी कमालीची घसरलेली दिसून येते. या लेखकांना मात्र स्वतःचे लिखाण प्रसिद्ध करून पैसा तर मिळतोच शिवाय कोणी त्यांच्यावर थेट टीकादेखील करीत नाही.

मात्र गेली अनेक वर्षे सातत्याने असे लिखाण वाचून त्याचा प्रभाव असल्याने त्याचप्रकारचे लेखन करून मराठी संकेतस्थळावर ते विनामोबदला प्रसिद्ध करणार्‍या लेखकांस मात्र वाचकांनी एकजुटीने झोडपावे ही अत्यंत खेदाची बाब आहे.

मायबोलीच्याच कितीतरी वाचकांनी सई ताम्हणकर या अभिनेत्रीच्या धाग्यावर तिला गेंडी, कैदाशीण, बोकी, ठमाकाकू, माठ, रांजण, नर्मदेतील घासून घासून गुळगुळीत झालेला गोटा, कमरासाईज कटी, चेहरा बोक्या सारखा , डोळे खुप जवळ बटाटे/गट्टाणे , फिगर बद्दल न बोल्लेलं बरं या; तर स्वप्नील जोशीच्या धाग्यावर त्याला बोदलेबुवा, कापसाच्या पोत्यासारखा दिसणारा, रामदास पाध्येंच्या अर्धवटरावासारखा दिसणारा (बुद्धी अर्धवटरावाला जास्त असावी ह्याच्या पेक्षा या अ‍ॅडिशनसह), धुवट, बाळु, मोरू, शॅम्पल या महान विशेषणांनी गौरविले आहे. किती हा विरोधाभास.