प्रतीक्षाकाळातला ताण

Submitted by गजानन on 8 December, 2014 - 01:36

आयुष्यातली एखादी महत्त्वाची घटना घडून येताना अथवा घडवून आणताना जेंव्हा आपण शक्य तेवढी तजवीज, तडजोड, जुळवाजुळव करून ठेवतो; तरीही कुठेतरी बिनसण्याची शक्यता असते; या शक्यतेचाही बर्‍यापैकी विचार करून ठेवलेला असतो; त्यासाठी पर्यायी व्यवस्था/योजनाही आखलेली असते; आर किंवा पार होणार हे कळते; 'आर'च राहिलो तर पुन्हा सुरुवातीपासून मोर्चेबांधणी करायला लागणार हे सगळे कळते...

आणि अशा अवस्थेत जेंव्हा ती घटना पूर्णत्त्वास जाण्यापूर्वी किंवा फिस्कटण्यापूर्वी मधला काळ हा बर्‍यापैकी वाट बघण्याचा असतो तेंव्हा अशा या वेटींग पिरिअडमधला ताण कसा हाताळावा?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गजानन, खूप छान विषय आणि मोजक्या शब्दात मांडलास.

अशावेळी आपण आपल्या मनाचे धैर्य आणि स्वास्थ ह्यावर केन्द्रीत करावे. माहिती आहे ती घडना घडायला अवकाश आहे. ह्या अवकाशात खूप विचार करुन, खूप वाट बघून थकून जाण्यापेक्षा सतर्क रहावे. तू म्हणतो तसे आर होणार किंवा पार होणार. दोन्हीपैकी काहीही होवो आपली पुढली पावले काय असतील. आणि मुख्य म्हणजे अशावेळी आपल्यावर जी लोक अवलबून आहेत त्यांचा विचार करावा. आपल्या येवढीच ती खंबीर आहेत का? कणखर आहेत का? हे बघावे.

ताण केंव्हा येतो जेंव्हा आपल्याकडे वेळ कमी असतो, वा आपण प्रीपेर नसतो, जवळ रीसोर्सेस नसतात. अशावेळी प्राप्त परिस्थितीतून चांगले काय शक्य आहे त्याचा विचार करावा. कुणाची जर मदत लागलीच तर अशा लोकांशी आधीच थोडे बघून पहावे.

टेक इट डे बाय डे. खूप पेशन्स ठेवायचा. मध्ये मध्ये ढेपाळायला झाले तरी ते वैयक्तिक ठेवून आजुबाजुच्यांना ( घरच्यांना )त्याचा त्रास होउ द्यायचा नाही. प्रचंड मोठा इंपॅक्ट असणारा इव्हेंट बारक्या बारक्या स्टेप्स मध्ये डिव्हाइड करून प्रत्येक स्टेप अचीव्ह केली की मनात खुणगाठ बांधायची. कोणती स्टेप सर्वात क्रिटिकल आहे आणि सर्वात वेळ खाउ आहे ते नोंद करायचे. क्रिटिकल स्टेपच वेळखाउ असेल असे नाही. चेन ऑफ अ‍ॅक्टिव्हीटीज मध्ये आपला कार्यभाग बरोबर करायचा. इतरांवर योग्य तेच प्रेशर टाकायचे किंवा मग योग्य वेळी दूर व्हायचे व घटना घडायला वेळ द्यायचा. स्पेस द्यायची.

आपल्याला ताजमहाल बांधायचा आहे तर एकेक दगडी चिरा बसवताना धीर सोडायचा नाही.

नाहीच होउ शकणार असे जाणवू लागले तर संबंधिताना आधी कल्पना करायची. प्लॅन बी तयार ठेवायचा.

प्रतिक्षाकाळातील असो वा ईतर काही कारणांमुळे असो, ताण-तणाव हाताळण्याच्या पद्धतीत काही फरक नसावा. ताण-तणाव व्यवस्थापनावर एक धागा येऊन गेला आहेच.

मला वाटते हा प्रश्न "Stress Management" बद्दल आहे. (with the Assumption that Risk Management has been taken care of already. Having Plan B etc)

मुख्य करुन हे तेव्हा होते जेव्हा आपल्या मनात Negative विचार घर करु लागतात. जर सगळे काही व्यवस्थित झाले तर काळजीचे कारणच नसते पण अमुक एक झाले नाही किंवा अमुक एक अमुक एक प्रकारे झाले नाही तर पुढे काय? मग काय करणार? इ.इ प्रश्न आपल्या मनात येउन आपल्याला Depress करतात. यावर उपाय एवढाच की निगेटीव्ह विचारांना प्रयत्नपुर्वक मनात थारा येउ न देणे. चांगले विचार मनात आणावेत. आपण कोणाचे वाईट केले नाही..चिंतिले नाही मग आपले वाईट होइलच कसे हे एकसारखे मनावर बिंबवत राहणे.
जर आस्तिक असाल तर ..
नामस्मरण करावे. रोज प्रार्थना करावी. जर परमेश्वराची दृष्टी माझ्याकडे सदैव आहे तर मला काळजी करण्याचे काय कारण आहे. तो जे काही करेल (चांगले किंवा वाईट) हे माझ्या हिताचेच असेल ही भावना दृढ झाली की जे काही होइल त्याबद्दल निश्चिंत व्हाल.

वरती सर्वांनी छान लिहिले आहे.
आपण कल्पना करू शकतो, त्या सर्व शक्यतांचा विचार करुन ठेवावा. प्रत्येक स्थितीमधे आपली स्ट्रॅटेजी काय असेल, त्याचाही विचार करुन ठेवावा. कितीही वाईट आणि घडू नये अश्या शक्यतेचाही विचार करुन ठेवावा...
असे सगळा विचार केल्यानंतर मधल्या काळात आपल्याला करण्यासारखे जे असेल ते अवश्य करत रहावे. मुख्य म्हणजे स्वतःला व्यस्त ठेवावे.
हि व्यस्तता अध्यात्माची असो वा एखाद्या छंदाची.. व्यसनाची मात्र नसावी.

>>>> आणि अशा अवस्थेत जेंव्हा ती घटना पूर्णत्त्वास जाण्यापूर्वी किंवा फिस्कटण्यापूर्वी मधला काळ हा बर्‍यापैकी वाट बघण्याचा असतो तेंव्हा अशा या वेटींग पिरिअडमधला ताण कसा हाताळावा? <<<<<

मला हे असे ताण सहन होत नाहीत हे मी आधीच सांगून टाकतो.

हा ताण येण्यामागे अनेक कारणे, पैकी, उत्सुकता (अ‍ॅन्क्शियस), अशाश्वती-अशक्यता, ही प्रमुख कारणे, तर अमकीच घटना घडायलाच हवी, व मला हवी तशीच घडायला हवी हा हट्टीपणा हे अन्य कारण. अन्य दुय्यम कारणात प्लॅन बी वा सी चा विचार केलेला नसणे किंवा विचार करूनही तसे प्लॅन प्रत्यक्षात असण्याची /घडविण्याची सूतराम शक्यता नसणे हे देखिल असू शकते... जसे की लोकसभेचे निकाल.... कसेही लागले तरी ते लगेच बदलविण्याचि सूतराम शक्यता माझेपाशी (वा कुणापाशीच) नाही.
आपल्याला नेमक्या काय कारणाने ताण आलाय याचे मूल्यमापन व्यक्तिस स्वतःच करता आले तर यावर सहजी मात करता येऊ शकते हा स्वानुभव.
उत्सुकता (अ‍ॅन्क्शियसनेस) हा "दुर्गुण" मानावा असे स्वभाव वैशिष्ट्य आहे. सहसा मंगळ/शुक्र/बुध अशा जलदगती ग्रहांच्या राशीप्रभावाखालील व्यक्तित हा गुण सर्रास आढळतो. उत्सुकतेवर मात करायची तर बुद्धिने संयम जाग्रुत करुन करता येते.
अशाश्वती-अशक्यता ही वैचारिक/तार्किक विचारातून येऊ शकते, वा खरोखरच असू शकते. मात्र खरे तर जे शक्यच होणार नाही, त्या मृगजळामागे धावावे का, व त्याचा अधिक विचार करून स्वतःला संतापवून/मनःस्ताप करवुन का घ्यावा इतक्या साध्या विचारानेही यावर मात करता येते. अशावेळेस, अशाश्वत व अशक्यप्राय गोष्टींची इच्छा धरल्याबद्दल स्वतःला दोष देण्याची हिम्मत असावी लागते. ती असेल, तर पुढील कार्य सोपे होते. याच ठिकाणी "ठेविले अनंते तैसेची रहावे" या उक्तिचा उपयोग करुन घ्यायचा असतो (न की कर्तव्य/कर्म न करता बसणे या अर्थाने).
हट्टीपणा हा दुर्गुण सर्व राशीव्यक्तिंमधे आढळू शकतो, विशिष्ट रास असे गणित नाही. निश्चयाचे रुपांतर हट्टीपणात/हेकटपणात जेव्हा होते, तेव्हा वर वर्णन केलेले ताण कित्येक पटींनी वाढतात.
अमुक घडले नाही, तर तमुक घडवू, व तमुक घडले नाही तर अमकेतमके घडवू अशा शक्यताच नसतील, व आर वा पार अशीच परिस्थिति असेल, तर ताण येऊच न देण्यासाठी/निर्माण न होण्यासाठी मुळातच "प्रतिकुल ते तेच घडेल" असा सावरकरी विचार अंगी बाणवुन प्रतिकुलतेस तोन्ड देण्याची सिद्धता जर आधी केली असेल, तर ताण येत नाही. पण प्रतिकुल तेच ते घडेल हा विचारच सहन होत नसेल तर अशांनी तत्काळ मानसोपचार तज्ञाकडून उपचार करुन घेणे सर्वथैव चांगले.
विषय गहन आहे. खूप काही लिहीता येईल.

माझ्या मते कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण कमी करण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्ह्णजे सोशलायझेशन, नियमित व्यायाम आणि छंद जोपासणे.

>>>> आणि अशा अवस्थेत जेंव्हा ती घटना पूर्णत्त्वास जाण्यापूर्वी किंवा फिस्कटण्यापूर्वी मधला काळ हा बर्‍यापैकी वाट बघण्याचा असतो तेंव्हा अशा या वेटींग पिरिअडमधला ताण कसा हाताळावा? <<<<
हे ताण हाताळता आले नाहीत, तर मात्र ताण येणारी व्यक्ति झपाट्याने निराशावस्थेत जाऊ लागून, वेळेस आत्महत्येपर्यंत पोहोचू शकते. हे घडू द्यायचे नसेल्, तर आज, आत्ता उत्पन्न झालेल्या परिस्थितीस बाकि जग कसे जबाबदार आहे याची गणती करण्या ऐवजी, आज जे आहे, ते आहे, व त्यास मीच कसा व किती जबाबदार आहे याचा विचार केल्यास, (वेळेस नेमके याच्या उलटही करावे लागते जसे की स्वत:कडे दोष घेण्या ऐवजी, जगावर दोष ढकलून समाधान करुन घेणे) व असा विचार करत मन शांत होईस्तोवर कालहरण केल्यास असे ताण कमी होतात.
वर लिहिल्याप्रमाणे स्वत:कडे स्वत:चे मूल्यमापन करुन दोष स्विकारल्यासही निराशावस्था कमी होईलच असे नाही, तसेच जगाकडे बोट दाखवुन दोषारोप केल्यासही परिस्थिती (जग) बदलूच शकत नाही अशा विचारानेही निराशावस्था येणारच नाही असे सांगता येत नाही, व निराशावस्थेची अनवस्था परिस्थिती वरील उपायाने टाळली जाईलच असेही नाही.
तेव्हा, आपल्या पूर्वजांनी, अशा मानसिक परिस्थितीपासून मुक्त होण्याचा अतिशय सोपा उपाय सांगितला तो म्हणजे पूर्ण श्रद्धेने "श्रद्धास्थान/देवावर" भार सोडावा व आपण निश्चिंत व्हावे. ज्यास हे सहजी जमते, तो या सर्व जगातील सर्वात सुखी माणूस म्हणावा लागेल.
अन् हे तत्व पटलेले असल्यानेच जे जे परकीय हल्ले ज्या ज्या माध्यमातुन होतात, ते ते समाजाच्या "श्रद्धास्थानांवरच" केले जातात हे सूत्र असंख्य ऐतिहासिक व वर्तमान घटनामधुन जाणून घेता येईल.

माझ्या मते कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण कमी करण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्ह्णजे सोशलायझेशन, नियमित व्यायाम आणि छंद जोपासणे.>>

--सहमत.

योग्य तार छेडलीत!
'द बटरफ्लाय सर्कस' 'यु ट्युबवर आहे. त्यातला संदेश मला महत्त्वाचा वाटतो. तसेच ह्याची पूर्ण जाणीव आहे की नुसते सांगणे सोपे असते पण स्वतः वर आले की खरी जाणीव होते अन तेव्हा सारेच कठीण वाटते.

"यह भि बद्ल जायेगा" हा मंत्र लक्षात ठेवावा .
निसर्ग नियमा नुसार कुठली ही अवस्था शाश्वत व ध्रुव नसते सुखाची व दु;खाची ही.
परिवर्तनशिलता{अनित्यता} हा निसर्गाचा नियम आहे.
जर हा निसर्ग नियम समजुन घेतला तर मनाचे धैर्य आणि स्वास्थ टिकवुन परिस्थिती हाताळता येते.

एक सोपा उपाय - टास्क असे मॅनेज करायचे जेणेकरून मधला वेटींग पिरीअड कमीत कमी होईल. थोडक्यात, जेव्हा तुमचे टेंशन पीक वर असेल तेव्हा तुम्ही त्याच कामात बिजी असाल.

याचे एक सोपे उदाहरण - विद्यार्थी दशेतील आपली लास्ट नाईट स्टडी.

हे करताना घ्यायची काळजी - सिलॅबस किती आहे याचा वेळीच अंदाज घेणे.

आता एक तत्वज्ञान - आयुष्य याच्या आधीही होते आणि याच्या नंतरही असणारच.

मस्तच लिहिलय सगळ्यांनी .दिनेशदा तुमची हे लाईन मस्त "स्वतःला व्यस्त ठेवावे हि व्यस्तता अध्यात्माची असो वा एखाद्या छंदाची.. व्यसनाची मात्र नसावी".

जो प्रतिक्षाकाळ आहे तो जर का जितका पॉझिटिवली घेता येईल तितका घ्यावा. हे सांगणं सोपं आहे करणं कठीण आहे मान्य आहे मला. पण जितके आपण निगेटिव्ह विचार करु तीतका ताण अजुनच वाढतो.आणि आलेच निगेटिव्ह विचार मनात तर त्यापासुन आपण आपलं लक्ष जितके बाजुला (Distract )करु तीतका आपल्या आरोग्यावर होणारा वाईट परीणाम कमी होतो आणि पर्यायाने आजुबाजुंच्या लोकांचाही. उदा. एखादी व्यक्ती आजारी आहे पण त्या प्रतीक्षा का़ळातला ताण जर का आपल्या चेहरयावर दिसला तर तो बाकीच्यांसाठी व त्या आजारी व्यक्तीसाठीही खुप गंभीर व निराशाजनक बनवु शकतो. परिस्थिती अधिक नेगेटिव्ह बनते .

<<"यह भि बद्ल जायेगा" हा मंत्र लक्षात ठेवावा .
निसर्ग नियमा नुसार कुठली ही अवस्था शाश्वत व ध्रुव नसते सुखाची व दु;खाची ही.
परिवर्तनशिलता{अनित्यता} हा निसर्गाचा नियम आहे.
जर हा निसर्ग नियम समजुन घेतला तर मनाचे धैर्य आणि स्वास्थ टिकवुन परिस्थिती हाताळता येते.>> एकदम योग्य वाक्य आहेत @सुरेख यांनी लिहिलेली समजायला. हाच विचार पुढे आपल्याला मार्ग दाखवतो.

आता पॉझिटिव्ह विचार कसे आणायचे तर आपल्यापेक्षाही कीतीतरीजास्त दु:खी, तणाव्ग्रस्त आणि निराश व्यक्तींचे अनुभव आपल्याला त्याही परीस्थितीत दिलासा देतात.आणि ताण Distract करण्याचे मार्ग जसे कीवर लिहिल्याप्रमाणे " सोशलायझेशन, नियमित व्यायाम आणि छंद जोपासणे." परंतु कधी कधी या ताणात यातलेही काहीच सुचत नाही किंवा करावेसे वाटत नाही .तेव्हा खरे प्रयत्न करावे लागतात.त्यासाठीही फार काही करण्याची गरज नसते .एखादा अनाहुत पणे कानावर पड्लेले संगीत ,चांगले मेसेज ,जवळच्या मित्रमैत्रीणींचा सुंदर आशादायक संवाद,निसर्गाचे एखादे सुंदर रुप ,अगदी अनोळखी निरागस असे बाळ जरी कुठे, क्षणासाठी दिसले तर ताण हलका व्हायला मदत होते.
मला तर फालतु पीजे बघुनही ताण हलका झाल्याचे वाटते. Happy असो प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहे तो.

<<मला हे असे ताण सहन होत नाहीत हे मी आधीच सांगून टाकतो.>> माना अगर न माना प्रत्येकालाच या किंवा कमीअधिक ताणाला सामोरं जावच लागतं ते टाळता येत नाही .सहन करावच लागतं .पण तेव्हा खरी आपली कुवत कळते ताण सहन करण्याची.आणि जर का त्यातुन आपण बाहेर पडलो तर तो आपला चांगला काळ होता असं गॄहीत धरायचं .आणि जर का "आरच" राहीलो तर यालाच आयुष्य म्हणतात. जे कधीही एका वाईट गोष्टीने संपत नाही. Happy त्यामुळे तुमच्या बाबतीत चांगलं घडण्यासाठी तुम्हाला "ऑल द बेस्ट ".

आपल्या आयुष्यात पूर्वी घडून गेलेले तणावाचे प्रसंग आठवावे - विशेषतः ज्यातून सहीसलामत बाहेर पडलो असे, किंवा ज्यातून "पार" झालो नाही, पण त्या परिस्थितीशी दोन हात केले, आणि त्यातूनच पुढे काही अनपे़क्षित चांगल्या गोष्टी घडल्या असे प्रसंग. आणि सगळयांनी म्हटल्याप्रमाणे व्यस्त राहणे/ सकारात्मक विचार करणे/ hope for the best and prepare for the worst/ प्लॅन बी/ याला जीवन ऐसे नाव - ह्या सर्व "कळतंय पण वळत नाही" अश्या गोष्टी आचरणात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहणे!

ताण कमी करण्याच्या पद्धती या खरंतर ताणामुळे होऊ शकणार्‍या हानीपासून वाचण्याच्या पद्धती आहेत.
या पद्धती ताणाच्या कारणागणिक बदलतात. ताण हा दु:खासारखाच आहे. जो भोगूनच संपवावा लागतो.

अजून तपशीलात काही संपर्कातून पाठवते आहे.
सार्वजनिक करायची इच्छा नाही म्हणूनच इथे न लिहिता संपर्कातून पाठवते आहे तरी सार्वजनिक/ निमसार्वजनिक बाफवर त्या गोष्टींचा उल्लेख न झाल्यास बरे. धन्यवाद.

उत्सुकता (अ‍ॅन्क्शियसनेस) हा "दुर्गुण" मानावा असे स्वभाव वैशिष्ट्य आहे. ...... उत्सुकतेवर मात करायची तर बुद्धिने संयम जाग्रुत करुन करता येते.अशाश्वती-अशक्यता ही वैचारिक/तार्किक विचारातून येऊ शकते.>> उत्सुकता किंवा धीर नसणे याबाबतीत एक साधं उदा.फक्त कळावं यासाठी नाहीतर वरील ताणाशी त्याची तुलना होउ शकत नाही.

तर एखादा पदार्थ करताना आपण फार मेहनतीने अगदी जीव ओतुन सगळी तयारी करतो पण त्याला शेवटी ओव्हन मधे ४० मिनिटांसाठी ठेवुन वेळ सेट करुन त्याची प्रतीक्षा करायची आहे.तो वेळ आपल्याला माहीत जरी असला तरी अजुन त्या पदार्थाला ५ ,१० मिनिटे जास्त लागु शकतात. आपण तो पदार्थ वेळेआधी काढु शकत नाही पण तो वेळ आपल्याला द्यावाच लागणार, पदार्थ नीट जमुन येण्यासाठी. जो पदार्थ ओव्हन मधे गेल्यानंतरचा जो काळ आहे तो आपण ताणात न घालवता जर का संयमाने व शांतपणे आणि कमीत कमी सहन करावे लागेल असा "व्यस्त" घालवला तर शेवटी होणारा पदार्थ यशस्वी होण्याची शक्यता खुप पटींने वाढते. तेवढा वेळ कीतीही तापदायक असला तरी द्यावा लागतो आणि तो कधीना कधी संपतोच.

मी हे असं करते,(त्या त्या क्षणाला मदत होते)

१) त्याच ठिकाणी बसून रहात नाही. शक्यतो आपण एकाच ठिकाणी बसलो की ज्यास्त विचार येतात डोक्यात. बाहेर जावे. तिथून उठावे.
२) पार्कात जाणे, कोणाशी तरी गप्पा माराव्या.
३) हॉटेलात काहितरी आवडीचे खावे.( मी वडापाव, रसमलाई, भजी वगैरे मागवून खाते नाहितर बाहेर जावून आणते, येताना मूवी सीडी)
४) जिम मध्ये जावून लोकांना न्याहळत फिरावे. Proud (व्यायम तर होतच नाही ना मन शांत नसले की)
५) मोठ्याने गाणी लावणे.
काहीच नाही जमलं तर थंडगार भरपूर पाणी प्यावे.(जोक वाटेल, पण स्ट्रेस कमी होतो. त्याचे एक कारण वाचलेले की कसा ते? पण आता आठवत नाही. मला काय होते ते आठवून स्ट्रेस नाहि करायचाय. :फिदी:)
बाकी, लाँग टर्म साठी प्लॅन बी असतोच आपल्याकडे. किंवा त्याची तयारी ठेवावी.
नाहितर नुकतच लग्न ठरलेल्या लोकांना विचारा काय करतात ते प्रतिक्षाकाळातला ताण कसा मॅनेज करतात?) Wink ह. घ्या.

लग्न ठरलेल्या लोकांना विचारा काय करतात ते प्रतिक्षाकाळातला ताण कसा मॅनेज करतात?>>>> तो ताण बहुतेक कधीच संपु नये या कॅटेगरीतला असा वाटत असतो बरयाचदा ..:फिदी: Wink तुमचे पाचही उपाय मस्त आहेत त्यातला ५) खुप इफेक्टिव आहे माझ्यासाठी तरी . Happy

लांब फिरुन या.>> सर्वात योग्य आणि स्ट्रेस हार्मोंन्स कमी करण्यासाठी असलेला उपाय आहे. शक्य तितक्या ताज्या हवेत फिरल्याने फार फरक पडतो ताण कमी होण्यास.

मी हे असं करतो.

१) व्यायाम : चालणे, पळणे, खेळणे. शरीराचं आणि मनाचं नातं आहे. त्यात सहसा मनातल्या विचारांमुळे शरीरावर होणार्‍या परिणामाबद्दल लिहलं जातं. पण त्याचा उलटा फायदा करून घेऊन शरीराकडून मनावरचा त्राण कमी करता येतो.

२) आवडत्या गोष्टी खाणे. (याचा अतिरेक होणार नाही याची काळजी घ्या). पण सणासुदीला/ काही अपेक्षापूर्ती झाल्यावर (celebration) आपण ज्या आवडत्या गोष्टी खातो, त्या आधीच खाल्ल्या तर काही काळ मनावरचा त्रास कमी होतो (mind goes to celebration mood) असा माझा तरी अनुभव आहे. एकदा माझ्याकडून त्याचा अतिरेक झाला. पण नंतर झालेल्या पोटदुखीवरच जास्त लक्ष केंद्रित झाल्यामुळे ताणाकडे लक्षच गेले नाही.

3) संगीत्/गायन ऐकून. किंवा त्यात प्रवीण असाल तर स्वतः करून.
आवडत्या छंदात रमणे. देवाचे नामस्मरण हा यातलाच उपप्रकार.

४)मुंबईत असताना धारावीतून चक्कर मारत असे. तिथल्या लोकांची अवस्था पाहून आणि तरी सुद्धी त्यांची जगण्याची ईर्षा पाहून माझा ताण्/दु:ख कुठल्याकुठे पळून जात असे. आपण जगात किती खुजे आहोत याची नव्याने जाणीव झाली की मनाला स्वत:च्या ताणाकडे बघायची वेगळी सवय लागते.

५) कंप्यूटरवरचे गेम्स खेळणे.

>>> ताण कमी करण्याच्या पद्धती या खरंतर ताणामुळे होऊ शकणार्‍या हानीपासून वाचण्याच्या पद्धती आहेत. या पद्धती ताणाच्या कारणागणिक बदलतात. ताण हा दु:खासारखाच आहे. जो भोगूनच संपवावा लागतो. <<<
नीरजा, अचूक शब्दात मांडलेस.
ताण भोगूनच संपवावा लागतो, पण आलेला ताण घालवायच्या वरील पद्धतीशिवाय, मी आधीच्या पोस्टमधे सांगु पहात होतो की मनोवृत्तीच अशी तयार करावी जेणेकरून "ताण" उद्भवणारच नाही, मनाचे वारू चौखुर उधळू न देणे हे कसब आहे, व "श्रद्धा" हा एक असा उपाय आहे जो "ताणास" थाराच देत नाही.

सिनी, समजुन घेतले तर उदाहरण बरोबर आहे, अ‍ॅन्कियसनेस (अतिउत्सुकता) व त्यामुळे येणार्‍या ताणाचे उदाहरण म्हणू शकतो की.

प्रत्येक इवेंट मागे काही एक लॉजिक असते किंवा कार्यकारण भाव असतो. त्यामुळे आउट्कम निश्चित होतो. टायर पंचर झाल्यास श्रद्धा खूप असली तरीही पंक्चर काढल्याची कृतीकेल्याशिवाय तो ताण कमी होणार नाही. हवा जाऊन वेळेची खोटी होउ नये म्हणून प्रवासाला जायच्या आधी हवा चेक करणे,
स्टेपनी बरोबर बाळगणे, दिवसा प्रवास पूर्ण करणे ह्या प्रोअ‍ॅक्टिव स्टेप्स घेउ शकतो. पण जरी हायवे वर कार टायर पंक्चर झाले तर ते दुरुस्त करूनच घ्यावे लागेल. स्ट्रेस घेउन काही होणार नाही. त्यामुळे

प्रत्येक घट्नाक्रमाचा लॉजिकल एंड मॅप केल्यास ताण कमी होईल. भावनात्मक उपाय तात्पुरतेच उपयोगी पडतील. गेम थिअरी वाले लोक लिहा कि काहीतरी. झेन आणी द आर्ट ऑफ मोटरसायकल मेंटेनन्स मध्ये ह्यावर खूप छान विवेचन आहे... धार्मिक पुस्तक नाही आहे हे.

मंडळी, प्रतिसादांबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.

तुमच्याकडून लिहिल्या गेलेल्या युक्त्या, मतं, नक्कीच उपयुक्त आहेत.

नीधप, धन्यवाद. संपर्कातून पाठवलेल्या तपशीलांचा उल्लेख माझ्याकडून सार्वजनिक ठिकाणी होणार नाही.

अजय, तुम्ही लिहिलेल्या उपायांबद्दलही धन्यवाद. मायबोलीवरच्या अनेक प्रसंगांमधल्या तुमच्या संयत आणि समतोल पोस्टीही मार्गदर्शक असतात.

Pages