व्यायामासाठी सायकल हवी आहे

Submitted by बन्या on 27 November, 2014 - 07:10

मी पुण्यात राहणारा असून
शरीराच्या उत्तम टोनिंग साठी मला एक सायकल हवी आहे
माझी गरज फक्त आणि फक्त व्यायाम व्हावा इतकीच आहे

मला कुठलीही रेस लावायची नाही , कुठलीही म्याराथोन जिंकायची नाही, कोकण किंवा तत्सम ठिकाणी जाऊन त्यावर धागेही टाकायची इच्चा नाही

फक्त प्युअर व्यायामा करता एखादी सायकल हवी आहे
मा बो कर उत्तम मॉडेल सुचवतील यात शंका नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

cycle.jpg

स्वस्त आणि मस्त, ही घेवून टाका याच्याभोवती १० फे-या रोज चालायचे ( सायकल पोराला चालवायला दिली तरी चालेल) Happy

जोक्स अपार्ट , ह. घ्या.
सेकंड हँड घेवून टाका एखादी दूधवाला टाईप सायकल किंवा २/५ गियरमध्ये मिळतात त्यातली.

फिरवायला जागा असेल तर रस्त्यावर चालवायची सायकल घ्या. अन्यथा एलिप्टिकल मशिन.

हर्कुलीसच्या एम.टी.बी. प्रकारच्या सायकली चांगल्या आहेत. जास्त महागही नाहीत.

व्यायामासाठी घेणार असाल तर अठवड्यातून किमान पाच दिवस रोज किमान ८ किमी = २०-२५ मिनिटे सलग चालवली गेली पाहिजे असे बघा. हा व्यायाम कार्डिओ प्रकारचा आहे.

अमा यांनी दिलेला धागाही नजरेखालून घाला.

हर्कुलीसच्या एम.टी.बी. प्रकारच्या सायकली चांगल्या आहेत>> तोच पिन्गुचा रणगाडा. Lol

झकासराव, रणगाडा राजने चालवायला घेतला आहे. त्याच्याकडे दुसरी सायकल आहे, ती वाटल्यास बन्याला घेता येईल..

tumala treadmill havay ka? mazyakade ahe - Manual ahe. ani juna ahe. Mi punyamade rahate. tyavar khup paise havet ashipan apeksha nahiye.

अन्यथा एलिप्टिकल मशिन.

>>>>>>>>
ह्या सायकल ची किंमत किती असेल?
हा ओप्शन ओके वाटत आहे..
अशा सायकलचा कोणाला काही अनुभव आहे का?

माझ्याकडे एक लेटेस्ट मॉडेलची सायकल आहे व्यायामाची . मी १५ के ला घेतली होती दीड-दोन वर्षापुर्वी. नॉमिनल किमतीस देणे आहे. कुणास हवी असेल तर संपर्का. pradeep.opale@gmail.com

घरात जागा नाही अन विकत घेतानाचा व्यायामाचा उत्साह उरला नाही Sad वर अजुन बाकीची दुखणी. पडुन खराब होण्यापे़षा कुणाला उपयोगी आली तर बरे म्हणून विकतोय.