प्रबोधनकार कला दालन बोरिवली

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

प्रबोधनकार नाट्यगृह बोरिवली च्या तळ्मजल्यावर अगदी दर्शनी भागात येक प्रशस्त कला दालन आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे कधीही नाटकाला गेलो तर तिथे फक्त साड्या, कपडे आणि गृहपयोगी वस्तूंचे स्टॉल्स दिसायचे.
काही दिवसांपुर्वी या कलादालनाचे नुतनिकरण झाले आहे आणि तेथे बोरिवली परिसरातील काही नावजलेल्या चित्रकार आणि शिल्पकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन चालु आहे . हे पर्दर्शन ३१ तारखे पर्यंत चालु आहे.
या प्रदर्शना बरोबर सायंकाळी ६:०० वाजता रोज कला प्रत्यक्षिकांचे / व्याख्यानांचेही आयोजन केले जात आहे
२७ मार्च - व्यक्तीचीत्रण - श्री. वासुदेव कामथ
२८ मार्च - पुरातत्व विद्या - श्री. विनायक परब -संपादक लोकप्रभा
२९ मार्च - सुलेखन - श्री. अच्युत पालव
३० मार्च - व्यक्तीशिल्प - श्री चंद्रजीत यादव

पश्चीम उपनगरातील कला रसिकांना हे कलादालन खुप सोईचे ठरणारा आहे आणि कलाकार आणि कालरसिक दोन्हींचा प्रतिसाद लाभुन हे दालन नावारुपाला यावे हीच इच्छा. अन्यथा सगळ्या गॅलरीज फक्त दक्षिण मुंबईत ही ओरड करायला आपण मोकळे.
गॅलरी नविन असल्याने आपल्यातील कुणा चित्रकार, प्रकाश्चित्रकार , शिल्पकार मंडळीना इथे प्रदर्श्न /ग्रूप शो करायचे असल्यास सध्या बुकींग मिळणे सोप्पे असेल.

विषय: 
प्रकार: