साडेसाती

Submitted by विक्रमादित्य पणशीकर on 1 December, 2014 - 21:18

साडेसातीचा बागुलबुवा नको !
- विक्रमादित्य पणशीकर

साधारणपणे बाळाच्या जन्मापासूनच त्याचा आणि ग्रहांचा अजाणतेपणे संबध येत असतो , असे म्हणावे लागेल. बालकाचा जन्म झाल्यावर प्रत्येक घरात त्याच्या नवजात अर्भकाचा नामकरण सोहळा करण्याची उत्सुकता निर्माण होते , नाव काय ठेवावे यासाठी जन्मदिनांक , जन्मवेळ व जन्मस्थळ याची माहिती ज्योतिषाला सांगून अवकडहा चक्राआधारे चंद्र रास-नक्षत्र- नक्षत्र चरण या आधारे चरणाक्षर काय हे पाहून आद्याक्षर निश्चित केले जाते त्याआधारे नाव ठेवले जाण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत आहे.

त्या वेळेपासूनच अर्भकाचा पत्रिकेशी संबंध जोडला जातो. शालेय जीवनापासून आयुष्यातील प्रत्येक वळणावर आपल्या उज्वल भविष्याची स्वप्न रंगवताना पेपरमधील भविष्य नियमित वाचणारे वाचक अनेक आहेत. नवग्रहांच्या भ्रमणाआधारे लिहिलेले उत्साहवर्धक भविष्य मनास निश्चितच आधार व मार्गदर्शन करणारे ठरते.

नवग्रहांपैकी रवी , चंद्र , मंगळ , बुध , गुरु , शुक्र , शनि , राहू आणि केतू यापैकी शनिग्रहाविषयी अकारण मनात भय बाळगले जाते असे म्हणावे लागेल. शनी हा ग्रह न्यायदान करणार , कर्मकारक ग्रह आहे. शनिच्या कृपाकटाक्षाने अनेकांचा किंबहुना प्रत्येकाचा भाग्योदय होत असतो. त्याचे प्रधान कारण शनी गुरु या ग्रहांच्या सहकार्याशिवाय कोणतेही कर्म करणे शक्य होत नाही. कार्य मंगलकारक असो व अमंगलकारक त्यात शनिची भूमिका अनन्यसाधारण आहे असेच म्हणावे लागेल.

आपण जेव्हा आपली साडेसाती सुरु होणार असे वाचतो तेव्हा जणू काही आपणावर संकट ओढावणार आहे असा आपला समज होतो. साडेसाती केव्हा येते ते पहाणे गरजेचे आहे. समजा आपली जन्म रास तुळ आहे तर कन्या - तुळ - वृश्चिक राशीतून होणारे शनिचे भ्रमण आपणास साडेसाती आणणारे ठरणार आहे , म्हणजे राशीस बारावा-पहिला-दुसरा शनि असताना साडेसाती असते .

केवळ जन्म राशीस शनी प्रतिकुल आहे यामुळे प्रगतीचा मार्ग आकुंचन पावेल किंवा मार्गात अचानक गतीरोधक निर्माण होतील असे मुळीच नाही. ज्याप्रमाणे आपल्या जन्मराशीस महत्त्व आहे , त्याचप्रमाणे
१) जन्म नक्षत्र ,
२) जन्मचंद्राचे अंश ,
३) शनिचे भिनाष्टक वर्ग , ( उदा. समजा वृश्चिक राशीची साडेसाती असणा-या जातकाच्या पत्रिकेत तुळ राशीत शनिभिन्नाष्टक वर्गात ८ पैकी १ शुभ बिंदू आणि ७ अशुभ बिंदु आहेत,प्रथम कक्षेत शुभबिंदु असल्याने ०० अंश ते ०३अंश.४५कला या कालखंडातून शनि भ्रमण साडेसाती असूनही शनि शुभ फल देईल. याचा अर्थ असा की वृश्चिक राशीत शनि प्रवेश करेल ०२ नोव्हेंबर २०१४ ते ०४ डिसेंबर २०१४ या काळात जातकाची प्रगती होईल. ( या प्रमाणे शुभ किंवा अशुभ कालखंड केव्हा सुरु झाला व केव्हा संपणार आहे हे पंचांगाव्दारे सांगणे शक्य आहे.)
४) कुंडलीचे सर्वाष्टक वर्ग ,
५) गोचर शनिचे सर्वचंचाचक्रातुन होणारे कक्षात्मक भ्रमण ,
६) शनि भ्रमण करत असलेल्या राशीस्वामीचे जन्म कुंडलीतील स्पष्ट अंश ,
७) गोचर शनीचे नवमांश भ्रमण
८) कुंडलीतील चालु महादशास्वामी , अंतर्दशास्वामी ,
९) गोचर गुरु , राहु केतु याची साथ जातकास आहे का ?
या सर्वांची तलौनिक चिकित्सा केल्या शिवाय केवळ साडेसाती आहे याचा एकमात्र अर्थ अनर्थ आणि अनर्थकारक कोण तर शनि असा अर्थ लावणे , भक्तवत्सल शनिवर अन्याय करण्यासारखे होईल असे आम्हास वाटते.

या सर्व चिकित्सा पद्धतीतून जर शनिच्या कृपादृष्टीस आपण पात्र ठरत नसु तर शनिची उपासना करणे अत्यावश्यक ठरते. शनिची उपासना करताना आचरणात " परोपकाराय पुण्याय । " हा विचार रुजवणे व त्यानुसार वागणे , नानाविविध खर्चिक अनुष्ठानापेक्षा अधिक लाभकारक ठरल्याचे निदर्शनास आल्याचे आवर्जून सांगावेसे वाटते. शनि कृपेसाठी खालील साधे सोपे उपाय करावेत.
१) श्रमजीवी वर्गास किंवा त्यांच्या मुलाबाळांना जर अन्नपदार्थ दान केल्यास ( अपरिचितांना) लाभ होतो.
२) अंध मुकबधिर अपंग याना स्मितमुखाने सहकार्य करावे ,
३) कावळ्यास अन्नदान करावे.
४) ॐ शनैश्चराय नमः । हा मंत्र जप करावा.
( या मंत्राची mp 3 file हवी असल्यास विनामूल्य पाठवण्यात येईल. त्यासाठी panshikar999@gmail.com या पत्त्यावर मेल करावा )
६) हनुमान चालीसा किंवा सुंदरकाण्ड याचा रोज पाठ करावा.
७) पिंपळवृक्षाची सेवा करावी. मारुती दर्शन घ्यावे.
८) समर्थ रामदासस्वामीनी स्थापन केलेल्या ११ मारुतींचे दर्शन घेणे.( कोल्हापूर, पुणे जिल्हात ही मंदिरे आहेत)
Year 1566 - Shahapur, Chunyacha Maruti,
Year 1567 - Masur, Maharudra hanuman
Year 1570 - Chaphal, Daas Maruti + Pratap Maruti
Year 1571 - Shinganwadi, Khadicha Maruti or Baal Maruti
Year 1571 - Umbraj, Umbraj Maruti or Mathatil Maruti
Year 1571 - Maajgav, Maajgavcha Maruti
Year 1573 - Baahe-Borgav, Baahe-Borgav cha Maruti
Year 1573 - Manapadale, Manapadale cha Maruti
Year 1574 - Pargav, Pargav cha Maruti
Year 1576 - Shirole, Veer Maruti stance
११ मारुती मंदिराचा मार्ग नकाशा लिंक -
http://commons.wikimedia.org/wiki/File:11_maruti_map.jpg
९) सुमिरि पवनसुत पावन नामू । अपने बस करि राखे रामू॥ हा जप करावा. मारूती कृपा होते.

हे उपाय अत्यंत साधे सोपे कमी खर्चाचे असले तरी कार्यसाधक असे आहेत , त्यांचा जरूर अनुभव घ्यावा. शनि न्यायाधिशाची भूमिका पार पाडताना साडेसातीत आपल्या संचिताप्रमाणे फल देतो. प्राप्त पुराव्यानुसार अपराध्यास नियमांच्या कक्षेत राहुन शिक्षा करणा-या न्यायाधिशास दोष देणे जसे स्वार्थाचे लक्षण आहे , म्हणून शनिच्या न्यायदानाने आर्थिक समस्या , कोर्टकेस , शत्रुपीडा , व्यवसायिक अस्थैर्य , अपप्रचाराचे षडयंत्र , कौटुंबिक मतभेदाचा शंखनाद व आजार यातील कोणती गोष्ट जातकाच्या पदरात पडेल याचा संशोधकपणे विचार करणे नितांत गरजेचे आहे. तसेच या समस्यांची धार कशा प्रकारे बोथट करता येईल , त्यासाठी विषेश काय उपाय करावा ते पुढिल लेखात पाहू.

( इति लेखन सीमा)
संपर्क - 9049600622
panshikar999@gmail.com

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> शनिचे भिनाष्टक वर्ग <<<<
मला हे तितकेसे नीट पणे समजले नाही. थोडे विस्तार करुन सांगाल का? त्या त्या राशी नक्षत्राच्या चरणांचा/चरणस्वामींचा संबंध आहे का इथे? शुभ/अशुभ बिंदू कसे ठरवावेत?

विप, छान लिहिले. आणि इतर माहिती छान दिली. धन्यवाद.

११ मारुतिंचे दर्शन हे अष्टविनायकाप्रमाणे करता येते का? आय मीन, अशी एखादी गाडी आहे का जी ही ११ मंदीरे दाखवेन? पुण्यापासून लांब आहेत का?

ho bee, punyat chandwadkar ani itar kahi travel comp vale 11 maruti darshanachi tour netat 12 hi mahine, mumbait ashi soy aahe ka kunakade yababat matra kalpana nahi.

अरे वा ! कावळ्याला अन्नदान आवर्जुन करतो. कावळ्याला अन्नदान करताना आपल्या ताटातील अर्धी पोळी / भात घालणे ... म्हणजॅ आपण तितके कमी खाणे.

माझी शुगर कंट्रोल झाली ,

Happy

मधली साडेसाती सुरु आहे... वृश्चिक - अनुराधा ..

साडेसाती आणि ...

नोकरी व्यवसायात बदल
प्रॉपर्टी
परदेश गमन

याबाबत लिहावे.

( तसेही आम्ही तुमचे ऐकणार नाहीच .. पण इतर लोकाना मार्गदर्श्न होइल. )

लग्न कुंडली , चलित कुंडली , राशी कुंडली , नवमांश कुंडली ह्यातली कोणती कुंडली कधी पाहतात ?
जन्म राशी मधली रास खरी कि लग्न कुंडली मधली रास खरी ? (जन्म रास - वृश्चिक , लग्न रास - मकर )

चलित कुंडली, नवमांश कुंडली यांना तसा आकाशातील ग्रहांची स्थिती या कोनातून काही आधार नसतो.
_____________________
१)जन्म रास - वृश्चिक इकडे भारतीय ज्योतिष्याप्रमाणे कुंडली काढलेली असल्यास ८ अंकाचा चंद्र आहे आणि रास वृश्चिक आहे. चंद्र आकाशात डोक्यावर येत होता.

२)लग्न रास - मकर ) म्हणजे जन्म झाला तेव्हा मकर उगवतीवर पूर्वेला होती.

पेपरात राशी भविष्य पाहताना जन्म २२नोव्हेंबर ते २१ डिसेंबर -वृश्चिक असे असेल तर ते लागू नाही. ते पाश्चात्य रवि राशीप्रमाणे.
३)राशी कुंडली ही एक मांडण्याचीपद्धत आहे पण तसे ग्रह आकाशात नसतात. गुणमेलनासाठी वापरतात.

धन्यवाद Srd !!
मग नक्की कोणती पत्रिका (लग्न कुंडली , जन्म कुंडली , नवमांश ) पाहून सध्याची ग्रहस्थिती ठरवता येईल ? मला स्वतःला मकर पेक्षा वृश्चिक चा स्वभाव जुळतोय असे वाटते ..

लग्न कुंडलीच पाहा. आणि वृश्चिकचे भविष्य पाहा.
(भागीदार,जोडीदार,मित्रमेत्रीणींशी चांगलं जमेल. जनसंपर्क जिथे येतो ती नोकरी,व्यवसाय करावा.)