मन्दमर्री, तेलंगाना येथून बीजापुर, छत्तीसगढ़ जाण्याकरिता मार्गाची माहिती हवी आहे.

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 6 November, 2014 - 09:28

मला काही कामानिमित्त माझ्या निगडी, पुणे येथील निवासस्थानापासून गुणुपूर, जिल्हा रायगड, राज्य ओरिसा येथे जायचे आहे. मला यानिमित्ताने माझे स्वतःचे वाहन घेऊन जायची इच्छा आहे.

गुगल मॅप्सची मदत घेतली असता त्याद्वारे

सोलापूर - हैदराबाद - खम्मम्, सोभनाद्रिपूरम् - तूनि - विशाखापट्टनम् - श्रीकाकूलम

मार्गे जाण्याचे मार्गदर्शन केले जात आहे. अंतर १३८६ किमी व अंदाजे वेळ २२ तास दर्शवित आहे. मला हा मार्ग उगाचच अधिक वळसा घेऊन लांबून जात आहे असे वाटते.

नकाशा मोठा करून स्वतःच जवळचा मार्ग शोधला असता बार्शी - लातूर - उद्गीर - संगम - करीमनगर - मंदमर्री - बीजापूर - जगदालपूर हा मार्ग सरळ व अधिक जवळचा वाटतो.

असे असतानाही गुगल मॅप्स हा मार्ग का दाखवित नाही याचा शोध घेण्याकरिता मी निगडी, पुणे येथून टप्प्या टप्प्याने आधी बार्शी मग लातूर अशी ठिकाणे वाढवित गेलो असता मन्दमर्री इथवर व्यवस्थित सरळ व जवळचा मार्ग दिसला. पण पुढे ...

https://www.google.co.in/maps/dir/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80,+%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0,+%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%A2%E0%A4%BC/@18.9771159,79.0968075,8z/data=!3m1!4b1!4m14!4m13!1m5!1m1!1s0x3a32b3ef236f3865:0x86c22ba81119258a!2m2!1d79.4791434!2d18.9871177!1m5!1m1!1s0x3a318810bc8b08b1:0x414e337c25d5691e!2m2!1d80.8128636!2d18.7977099!3e0?hl=hi

मन्दमर्री, तेलंगाना येथून बीजापुर, छत्तीसगढ़ हे अंतर जवळपास ६०० किमी १० तास दाखवित आहे. म्हणजे खरी मेख इथेच आहे. साध्या डोळ्यांनी नकाशा पाहिला असता या दोन स्थानांमधले अंतर ५० ते ६० किमी असावे व ते कापण्यास एक तासाहून अधिक वेळ लागायला नको असे वाटते. शिवाय या दोन स्थानांना जोडणारी एक पिवळ्या रंगाची रेघ देखील दिसत आहे म्हणजे हा एखादा मार्ग असावा असे वाटते. असे असतानाही जवळचा मार्ग सोडून अत्यंत लांबचा वळसा घालून १० पट अधिक अंतर व वेळ खर्च करण्याचा सल्ला गुगल मॅप्स का देत आहे हे समजत नाही.

वाचकांपैकी कोणी या मार्गाने प्रवास केला आहे काय? इथे नेमकी काय अडचण आहे? जवळच्या मार्गावर प्रतिबंधित जंगल, वन्यप्राणी, डाकू, नक्षलवादी यांचा धोका यापैकी काही असावे काय?

इथे जवळचा मार्ग वापरता आला तर वेळेची फार मोठी बचत होऊन मी साधारण १६ ते १७ तासांत माझ्या निवासापासून (निगडी, पुणे) इच्छित गंतव्य स्थानी (गुणुपूर, रायगड, ओरिसा) जाऊ शकेन.

आपले बहूमोल मार्गदर्शन / सल्ला / सहकार्य यांची अपेक्षा आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला यानिमित्ताने माझे स्वतःचे वाहन घेऊन जायची इच्छा आहे. >>>>> अरे बापरे!

मी साधारण १६ ते १७ तासांत माझ्या निवासापासून (निगडी, पुणे) इच्छित गंतव्य स्थानी (गुणुपूर, रायगड, ओरिसा) जाऊ शकेन. >>>> (अरे बापरे!) गुणिले १००

मामी गुगल मॅप्स ने दर्शविलेल्या मार्गाने अंतर १३८६ किमी असून मी त्याहून जवळच्या मार्गाचा शोध घेत आहे जेणेकरून अंतर अजुनही कमी होऊ शकेल. असे असता आपण लावलेला १६ / १७ तास गुणिले १०० हा हिशेब इथे होऊ शकत नाही.

आपल्याला कार ने जायला आवड्ते व बाफचा विषयही तोच आहे हे देखील लक्षात घेउनही, मुंबई भुबनेश्वर २ तास १० मिनिटे फ्लाइट आहे व भुबनेश्वर गुणुपुर ५ तास बसने जायला लागतील एकाच दिवसात फेअर्ली आरामात आपण पोहोचू शकाल.

अवांतर प्रतिसादा बद्दल क्षमस्व. स्टेट हायवे ची कंडिशन, नक्षल एरीआतून प्रवास. इत्यादी रिस्क फॅक्टर आहेत.
पण रोड ट्रिपच असेल तर शुभेच्छा. परत येताना पुरी मंदीर, लिंगराज मंदीर भुबने श्वर नक्की बघा. पिपली वर्क च्या वस्तू, इकतच्य साड्या, कटक मधे सिल्वर वेअर उत्तम ज्वेलरी इत्या दी, पटचित्रे, लाकडी चित्रे इत्यादी घेता येइल. भुवने श्वर मध्ये इ करामा हाट पण चांगली जागा आहे लाकडी शिल्पे व इतर वस्तूंसाठी.

.

सावली, अमा आणि ऋग्वेद आपणा सर्वांचे आभार.

माझ्या निवासस्थानापासून (निगडी, पुणे) मन्दमर्री, तेलंगाना हे ७१९ किमी आहे आणि बीजापुर, छत्तीसगढ़ येथून इच्छित गंतव्य स्थान (गुणुपूर, रायगड, ओरिसा) ४५२ किमी आहे. हे एकत्र केल्यास ११७० किमी होतात. सलग १२०० हून अधिक किमी वाहन चालविण्याचा अनुभव तसाही मला आहेच. शिवाय यावेळी अधिक शक्तिशाली वाहन (इंडिका विस्टा) देखील नेता येऊ शकेल. आता प्रश्न फक्त मन्दमर्री, तेलंगाना येथून बीजापुर, छत्तीसगढ़ एवढ्याच अंतराचा आहे जे मला सरळ ५० ते ६० किमी असावे असे वाटते तर गुगल मॅप्स ते वळसा घालून ६०० किमी दाखवित आहे.

मला फक्त याच दोन स्थानांमधील मार्ग कोणी प्रत्यक्ष प्रवास करून अनुभवला असल्यास त्याबद्दल सल्ला द्यावा अशी अपेक्षा आहे.

Tumhi google maps enlarge karun pahile tar lakshat yeil ki madhe ek river aahe. Ti cross karayala javal bridge nasel. Karan nadila cross karanaara rasta map madhe disat naahie.
Either bridge asel pan khup navin asalyane map madhe nasel, which is rare condition.
Nahitar kharach bridge nasel mag tumhala 600 km cha valasa ghalun asalelya bridge ne river cross karavi lagel.

सावली बरोबर सांगत आहेत. तिकडे नदीवर पूल दिसत नाही गुगल मॅप मध्ये. तो भाग पुर्ण जंगल असल्यासारखा दिसतो आहे.प्रत्यक्श अनुभव नाही पण विशाखापट्टणम वरुन जाणेच बरोबर वाटते आहे. अमा ने सांगितल्याप्रमाणे नक्षल एरीआतून प्रवास हा मुद्दा आहेच.

धन्यवाद धनि,

<< तिकडे नदीवर पूल दिसत नाही गुगल मॅप मध्ये. तो भाग पुर्ण जंगल असल्यासारखा दिसतो आहे >>

नकाशा मोठा करून पाहिला असता हिरव्या रंगाने आच्छादलेला भूभाग जंगल आहे हे कळते, निळ्या रंगाची रेघ नदी आहे हे देखील समजले; पण त्या निळ्या रेषेला छेदून जाणारी एक पिवळ्या रंगाची रेघ देखील दिसत आहे. पिवळ्या रंगाच्या रेघेचा अर्थ काय? तो रस्ता आहे का? असेल तर नदीवर पूल आहे असा त्याच अर्थ होऊ शकतो.

मन्दमर्री, तेलंगाना येथून बीजापुर, छत्तीसगढ़ पर्यंतच्या प्रदेशाचा नकाशा अजून मोठा करून पाहिला तर

चिन्नुर, तेलंगाना - सिरोंचा, महाराष्ट्र - भद्रकाली, महाराष्ट्र ही ठिकाणे सरळ रेषेत येतात असे दिसते. परंतु

चिन्नुर, तेलंगाना पासून सिरोंचा, महाराष्ट्र हे सरळ रेषेत अगदी १५ ते २० किमी अंतर भासत असले तरी गुगल मॅप्स त्याकरिता फार मोठा वळसा घालून ३५० किमी जाण्यास सूचवित आहे व अंदाजे वेळ ६ तास १८ मिनीटे.

तसेच सिरोंचा, महाराष्ट्र पासून भद्रकाली, महाराष्ट्र हे सरळ रेषेत अगदी १५ ते २० किमी अंतर भासत असले तरी गुगल मॅप्स त्याकरिता फार मोठा वळसा घालून ६५० किमी जाण्यास सूचवित आहे व अंदाजे वेळ ११ तास ८ मिनीटे.

https://www.google.co.in/maps/dir/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B0,+%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE,+%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/%E0%A4%AD%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80,+%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/@19.8978399,80.1895839,10z/data=!4m20!4m19!1m5!1m1!1s0x3a32eba6dab548af:0x35e523ff8debdcbb!2m2!1d79.7910165!2d18.8540596!1m5!1m1!1s0x3a32f3b53ffebeb7:0x6b983fa7ef40edc7!2m2!1d79.968195!2d18.847244!1m5!1m1!1s0x3a3244184863475f:0xda5c5e7870d4657d!2m2!1d80.3589049!2d18.8203155!3e0?hl=hi

अर्थातच माझा नियोजित प्रवास मी रद्द करीत आहे. पण या निमित्ताने आपल्या महाराष्ट्रातच अजूनही आपण संपर्क व दळवळणाच्या बाबत किती मागास आहोत हे लक्षात आले. म्हणजे जे अंतर सरळ रेषेत ३० किमीहूनही कमी आहे व जे एरवी आपण अर्ध्या तासात पार करू शकू त्या करिता १००० किमी आणि साडे सतरा तास खर्च करावे लागत आहेत. याशिवाय या संपूर्ण वळसा घालून जाणार्‍या मार्गाच्या क्षेत्रात जयपूर, मंचिर्याल, मन्दमर्री, रामकृष्णपूर, बेल्लाम्पल्ल्ली, कोत्थापल्ले, असिफाबाद, राजुरा, बल्लारपूर, सिरपूर, सिरपूर-कघजनगर, कथाला, पपंपेट, दहेगाव, अहेरी, चर्मोशी, गडचिरोली, धनोरा, मानपूर, भानुप्रतापपूर, बिरागाव, अंतागढ, रोवघाट, नारायणपूर, बेळनार, निमेद, बीजापूर, भोपाळपट्नम्, पंखजूर, इत्यादी जी असंख्य गावे आहेत त्यांच्या आपसातील संपर्काचे देखील काय माध्यम असेल? या भागात रस्तेच नसतील की काय? असे असेल तर येथे वैद्यकीय व शैक्षणिक सुविधा, इतर प्रगतीची साधने, नक्षलवाद्यांपासून संरक्षण या बाबी कशा काय साध्य होत असतील? स्वातंत्र्य मिळून सात दशके होत आली तरी भारतात त्यातही महाराष्ट्रा सारख्या एका प्रगत राज्यात आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात ही अवस्था आहे हे जाणून सखेद आश्चर्य वाटले.

सरळ दिसणार्‍या व जवळच्या अंतरावरील भासणार्‍या मार्गापेक्षा वळसा घालून जावे लागणारा मार्ग गुगल मॅप्स ने सुचविला असल्यामुळे हा प्रवास टाळण्याकडेच माझा कल होता. तसा आटोकाट प्रयत्न केला तरीही काही अपरिहार्य कारणास्तव मला गुणुपूर, रायागडा, ओडिशा येथे जाणे भागच आहे.

तसेही गुगल मॅपने सुचविलेल्या

सोलापूर - हैदराबाद - खम्मम्, सोभनाद्रिपूरम् - तूनि - विशाखापट्टनम् - श्रीकाकूलम

या मार्गापेक्षा जवळचा असा

औरंगाबाद - गडचिरोली येथून जाणारा मार्ग मला सापडला आहेच.

आता लगेचच मी प्रवासाकरिता निघत आहे. आठवडाभराने प्रवासाहून परतलो की वर्णन इथे टाकले जाईल. तोवर मायबोलीवर नसेन.

मदतीकरिता सर्वांचे आभार.

पुन्हा कोणत्या तरी गोळ्या प्रिस्क्रीप्शन शिवाय खाउ नका आणि विरुद्ध बाजूच्या लेन मधे न घुसता गाडी चालवा !

सुखरूप आणि सुरक्षित प्रवासाच्या शुभेच्छा

जिथे रस्ता अस्तित्त्वातच नाहीये तो शोधला तर कसे सापडेल.. पूर्ण झूम करुन बघितल्यावर गोदावरी नदीवर पुलच नाहीये.. त्यामुळे नदी ओलांडण्यासाठी लांबचा पल्लाच गाठावा लागणार आहे.. त्यातूनही तिथे नदी पार करण्यासाठी बोट वगैरेची सोय आहे का ते शोधाल्यास कदाचित काही वेळ वाचू शकेल..

गुगलचे अलगोरिदम इतकेही फालतू नाहीये की जवळचा रस्ता दाखवणार नाही...

या धाग्याचा उद्देश एव्हाना संपुष्टात आला असावा, तरी पुन्हा पुढे काही माहिती हवी असल्यास एक फु. सल्ला देत आहे.

१. त्या भागात सहली आयोजित करणार्‍या प्रवास कंपन्यांना विचारू शकता.
२. तुम्हाला ज्या ठिकाणाची माहिती हवी असेल त्या राज्याच्या पर्यटन केंद्राला संपर्क करून विचारू शकाल.
३. या उपरही निट माहिती मिळाली नाही तर त्या भागात असलेल्या एखाद्या संस्थेचा (रूग्णालय, पोलिस इ.) फोन नंबर मिळवून त्यांना संपर्क करून विचारू शकता.
४. आणि एवढे करूनही माहिती मिळाली नाही तर त्या भागातुन प्रवास करण्यामधे जोरदार धोके असू शकतात असा सुज्ञ विचार करून पर्यायी मार्गाचा विचार करणे.

शुभेच्छा ! Happy

बैठकीच्या संयोजकांनी वाहनप्रवासाचा खर्च देण्यास असमर्थता दर्शविली आणि वातानुकूलित शयनयान - ३ (थ्री टीयर ए/सी) चेच भाडे देण्यास अनुकूलता दर्शविल्यामुळे नाईलाजास्तव कोणार्क एक्स्प्रेसने पुणे-पलसा असा रेल्वेप्रवास आणि पलसा-गुणुपुर हा रस्त्यावरील प्रवास (संयोजकांच्या वाहनातून) जाताना आणि येताना करावा लागला.

त्यामूळे स्वतःच्या वाहनातून प्रवास करणे इच्छा असूनही शक्य झाले नाही.

बापरे चेतन, तुम्ही कोणार्क एक्स्प्रेस गाडीने गेलात? याबद्दल साष्टांग दंडवत घातलं पाहिजे तुम्हाला! Light 1
आ.न.,
-गा.पै.

गामा ? का ? का ? सा.न. का ? काय विशेष अनुभव कोणार्कचे ?
चेसुगु, तुमचा अनुभव कसा होता ?

चेसुगु कोणार्क एक्स्प्रेसने पुणे-पलसा किती वेळ लागला?

१९९६ मध्ये भुवनेश्वर वरुन मुम्बई ला ही गाडी ४८ तासा पेक्षा जास्त घेत होती. आणी हमकास १२ -१६ तास लेट असायची.

आम्ही जाताना मी गिताजलीत झर्सुगुडा का राउर्केला वरुन गेलो होतो.

येताना भुवनेश्वर वरुन कुठली तरी सुपर फास्ट गाडी घेउन (जी कोनार्क च्या १५ मिनिटे नंतर सुटायची) हैद्राबाद ला १६ तासाचा ब्रेक घेउन हुसेन सागरनी आलो तरी पण कोनार्क च्या आदी आलो.

मला तरी कोणार्क एक्स्प्रेस फारशी उशिराने धावत असल्याचा अनुभव आला नाही. ही आगगाडी छत्रपती शिवाजी टर्मिनस ते भुवनेश्वर दरम्यान प्रवास करते. माझा प्रवास पुणे जंक्शन ते पलासा स्थानक असा होता.

जाताना
- पुणे जंक्शन येथे २५.११.२०१४ रोजी १९:०० वाजता येणे अपेक्षित होते - १० मिनीटे उशिराने आली.
- पलासा स्थानक येथे २७.११.२०१४ रोजी ००:२० वाजता पोचणे अपेक्षित होते - १० मिनीटे उशिराने पोचली.

येताना
- पलासा स्थानक येथे २८.११.२०१४ रोजी १९:१५ वाजता येणे अपेक्षित होते - १५ मिनीटे लवकर आली.
- पुणे जंक्शन येथे २९.११.२०१४ रोजी २३:४५ वाजता पोचणे अपेक्षित होते - ५ मिनीटे लवकर पोचली.

इथे आपण सर्व नोंदी पाहू शकता.

http://runningstatus.in/status/11019-today