हेल्मेटसक्ती

Submitted by प्रकाश घाटपांडे on 12 November, 2014 - 22:55

अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्‍या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी उचल्यांविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेल्मेट सक्ती असलीच पाहिजे.
दिवाकर देशमुख, लिंबूटिँबू
यांना अनुमोदन.
मी स्वत: नेहेमी हेल्मेट घालतो.

धन्य ते पुणे आणि धन्य ते पुणेकर...

असो,

एकूणच पुर्वी सारखे पुणे राहिले नाही आत्ताशा....

माझा मित्र त्याच्या भावाला घेवून येत होता.मोटरसायकलचा वेग जास्त न्हवता, पण गाडी घसरली.मित्राच्या डोक्यावर हेल्मेट असल्याने, मित्र वाचला पण त्याचा भाऊ मात्र कोमात गेला आणि एक ८-१० दिवसांत मित्राचा भाऊ देवाघरी गेला.

असो,

एका वाक्यात सांगायचे तर, प्रत्येक मनूष्य आपापली अमुल्य वस्तू सांभाळायचा जीवापाड प्रयत्न करतो.

सक्ती केली कि निमूटपणे सहन करायची याला षंडपणा म्हणतात. मोटार वाहन कायद्यात कित्येक गोष्टींची सक्ती आहे ती किती लोक्स पाळतात. त्यांनी सक्ती करत रहायचे आणि आम्ही गांधी विचाराने एक थोबाडीत खाल्ली आहे आता दूसरा गाल पुढे करुन अजून एक मारा आम्ही सहन करण्यास तयार आहोत असे म्हणायचे.

आज ना उद्या बळजबरीने किंवा दमदाटीने, दंडाने का होईना सक्ती होणारच आहे. याचे कारण बहुसंख्य शहरात आणि मिलीटरी कँपस,क्न्टोन्मेंट,एअर फोर्स कँम्प किंवा एनडीए सारख्या भागात ती पुर्वीपासून आहेच. आता केवळ समस्त पेठींनी किंवा शहरवासीयांनी विरोध तरी तो तितकासा प्रभावी ठरणार नाही. त्यात हेल्मेटचे फायदे आहेतच त्याला इथे चर्चा करणा-यांपैकी कुणीचेही दूमत नाही. फक्त जो पुणेकर खिशात ५०-१०० रुपये घेवूनही सहज फिरु शकत होता त्याने किमान ५०० रुपये जवळ बाळगावे जेणेकरुन हेल्मेट नसेल तर मामाच्या संध्याकाळच्या कॉर्टरची सोय होऊ शकेल.

सरकारला नागरिकांच्या सुरक्षेची काळजी असल्याने त्याने पुढील गोष्टीवरही सक्ती करावी
१) हेल्मेट घालूनही एखादा अपघात झाल्यास त्यास जवळच्या रुग्णालयात मोफत आणि तातडीची उपचार सुविधा
२) हीट अँड रन केसेसच्या किंवा ड्रींक अँड ड्राईव्ह केसेसमधील आरोपींना कठोर शिक्षा . मग तो सेलीब्रीटी का असेना.
३) सर्व गाड्यांचा फिटनेस दरवर्षी चेक करुन घेणे ( सध्या फक्त जड वाहनांचा केला जातो ). इतर वाहनांचे अपघात हे जीवघेणे नसावेत कदाचित ? Happy
वगैरे वगैरे.............. धागाकर्त्याची अपेक्षा सक्तीबाबत चर्चा व्हावी अशी असावी मात्र इथे जणूकाही आपलेच हेल्मेटचे दूकान आहे आणि त्याचे मार्केटींग करुन ते खपवायचे यासाठी अत्यंत समर्पक उदाहरणे आणि विधाने अल्याचे दिसते.... जय हो

गांधी विचाराने एक थोबाडीत खाल्ली आहे आता दूसरा गाल पुढे करुन अजून एक मारा आम्ही सहन करण्यास तयार आहोत असे म्हणायचे.
<<
हा गांधी विचार नाही.
*
मामाच्या संध्याकाळच्या कॉर्टरची सोय होऊ शकेल.
<<
क्वार्टर.
त्याचेही भाव वाढताहेत. त्या प्रमाणात बिचार्‍यांचे पगार शासनाने वाढवले नाहीत. त्यामुळे ही नवी सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
*
हेल्मेट घालूनही एखादा अपघात झाल्यास त्यास जवळच्या रुग्णालयात मोफत आणि तातडीची उपचार सुविधा
<<
सर्वच रुग्णालये आपल्याच / सरकारच्या तीर्थरूपांच्या मालकीची आहेत या थाटात लिहू नये. जवळच्या "सरकारी" रुणालयात असे म्हणावे.

तुम्ही लिहिलेत, ते म्हणजे 'हेल्मेट घालूनही भूक लागली तर जवळच्या घरात घुसून मोफत व तातडीने जेवू घालावे' अशा स्टाईलचे आहे. इतरही उपमा आहेत. पण सध्या नकोत.

धन्यवाद!

लिंबूकाका +१११११११११११११११११११

सर्वच रुग्णालये आपल्याच / सरकारच्या तीर्थरूपांच्या मालकीची आहेत या थाटात लिहू नये. जवळच्या "सरकारी" रुणालयात असे म्हणावे.

मग डोके तर आमच्या मालकीचे आहे ना बाबानो त्यावर सक्ती करणारे हे भेंडी कोण ?

एखाद्या ठिकाणी अपघात झाला तर त्याने सरकारी दवाखाना शोधत फिरावे असा आपला आग्रह दिसतोय. सरकारी दवाखाने किती अंतरावर उपलब्ध आहेत, तिथे त्या वेळी डॉक्टर उपलब्ध आहेत का ? याची माहिती घ्यावी आधी आणि नंतर सरकारचा पुळका दाखविल्यास बरे होईल.

तातडीने उपचार मिळणे आणि तातडीने जेवू घालणे यात फार फरक आहे हे आपल्याला वेगळे सांगायला हवे का ?

>>>तातडीने उपचार मिळणे आणि तातडीने जेवू घालणे यात फार फरक आहे हे आपल्याला वेगळे सांगायला हवे का ?<<<

Lol

किरणकुमार, मी तुमच्याशी सहमत आहे.

एखाद्या ठिकाणी अपघात झाला तर त्याने सरकारी दवाखाना शोधत फिरावे असा आपला आग्रह दिसतोय. सरकारी दवाखाने किती अंतरावर उपलब्ध आहेत, तिथे त्या वेळी डॉक्टर उपलब्ध आहेत का ? याची माहिती घ्यावी आधी आणि नंतर सरकारचा पुळका दाखविल्यास बरे होईल.
<<
सरकारचा पुळका गेला .... योग्य त्या जागी, त्याच्याशी मला घेणे देणे नाही.

माझ्या दुकानातून कुणाही राहचलत्याला फुकट सेवा देण्यास माझा विरोध आहे. मग कारण का-ही-ही असो. हव्या त्या घरात घुसून रुबाबात तातडीने फुकट जेवू घाल असे म्हणता येत नाही, तसेच हव्या त्या दवाखान्यात घुसून तातडीने व फुकट ट्रीटमेंट दे असे म्हणू नये, हे सांगतो आहे.

(हे संपादन खाली लोळणार्‍या जोशींसाठी.

दवाखाना तुमच्या मालकीचा नसतो. तसेच रस्त्यावरची इतर घरेही. किरणकुमार जेवण व ट्रीटमेंटमधे फरक विचारताहेत, मी जबरदस्तीने घरात घुसणे अन सेवा फुकट ओरबाडण्याचा प्रयत्न करणे याबद्दल बोलतो आहे. त्यांना समज कमी आहे, पण समजावून सांगितले तर समजते, तुम्हाला फक्त लोळता येते, व समजवून सांगून कळत नाही, हा फरक आहे.)

तातडीने उपचार मिळणे आणि तातडीने जेवू घालणे यात फार फरक आहे हे आपल्याला वेगळे सांगायला हवे का ?>>

किकू, टू मच Smiley

किकू: मी फक्त तुमच्या विनोदाला हसलो आहे बरं का. Wink

दुसरं, तुमच्या माहितीसाठी.

पृथ्वीराजबाबा मुमं असताना शासनाने महाराष्ट्रात एक अती सुंदर स्कीम त्यांनी सुरू केली, व ती व्यवस्थीत सुरूही आहे. कुठल्याही अपघात्/आजारपणात १०८ नंबर डायल करा. शासनाची अतीशय सुंदर व सुसज्ज अँब्युलन्स फुकट तुमच्या दारी येते, अन तुम्ही सांगाल त्या दवाखान्यात तुम्हाला घेऊन जाते. त्या अँब्युलन्समधे २४ तास डॉक्टरही उपलब्ध आहेत.

हे कुठल्याही खेड्यापाड्यातून अ‍ॅक्सेसिबल आहे.

<<मामाच्या संध्याकाळच्या कॉर्टरची सोय होऊ शकेल>>

मामाच्या संध्याकाळच्या कॉर्टरची सोय होऊ शकेल की नाही हेही आपल्याच हातात आहे की.दंडा ची रक्कम देउन दनद्नित पावती फाडल्यावर कॉर्टरची सोय कशी होऊ शकेल? ते तुम्ही ५००च १०० वर आनल्यावरच होईल ना.
बाहेर जाताना न विसरता पायात जसे बुट चप्पल घालतो तसेच मोटरसायकलवर बसताना हेल्मेट घालावे
{माझे हेल्मेटचे दूकान नाही आहे.}

ती बाबांची स्किम चांगली आहे हो पण एखाद्या अपघातात दोघे जखमी झाले त्यानंतर १०८ डायल केला , दोघांपैकी एकाची आर्थिक परिस्थेती बिकट असल्यास त्या १०८ वाल्यांनी एकाला रुबीला न्यावे आणि दुस-याला ससूनला न्यावे असे म्हणायचे का आपल्याला..... मी फूकट ट्रीटमेंट डॉक्टरने द्यावी असे म्हणत नाही , डॉक्टरने ट्रीटमेंट करावी आणि त्याचे बिल सरकारने द्यावे अशी अपेक्षा ठेवणारा आहे..................
आता सरकारने तरी का द्यायचे असे प्रश्न विचारणारे येतीलच ...
कारण अपघात कुणी स्वत:हून करत नाही, किंवा तो होईल हेही सांगता येत नाही. रत्यावरच्या अपघातात मरण पावलेल्या किंवा जखमींना सरकार आर्थिक मदत करते .ती मिळेपर्येंत गंभीर जखमी दगावलेले असतात आणि किरकोळ जखमी बरे झालेले असतात, त्याऐवजी अपघातात सापडलेल्या सर्वांना वैद्यकीय सेवा (सरकारी खर्चाने) उपलब्ध करुन देणे योग्य ठरणार नाही का.. असो

मग मला हेल्मेट घालायचे नाही म्हणून मी सरकारच्या उणीवा काढत बसणेही योग्य नाही... त्या तर मी हेल्मेट घालूनही काढू शकतो.

सक्ती केली आणि नंतर सगळ्या हव्या त्या सुविधा दिल्यानंतर हेल्मेट न घालणार्‍याला सरकारने रस्त्यात उपचार न देता सोडुन द्यावे ? ? तुम्ही हेल्मेट घाला अथवा न घाला सरकार सुविधा देतच आहे.

पुणेकरांसाठी खुशखबर.
सत्ता'रूड' मोदी सरकारने आत्महत्येचा प्रयत्न करणे हा गुन्हा नाही असा कायदा केलेला आहे.
या बेसिसवर हेल्मेटसक्ती रद्द करवता येईल. आम्ही हेल्मेट न घालून आत्महत्येचा प्रयत्न करीत आहोत, व हा नव्या कायद्यानुसार गुन्हा नाहि. सबब हेल्मेटसक्ती रद्द करावी असे आर्ग्युमेंट करता येईल.

इब्लिस उर्फ उत्सर्ग अभिनिवेष काटकर,

पुणेकरांनी काय करावे हे नंदुरबारसारख्या अतीप्रगत भागातून कृपया बकू नयेत.

(आणि उंदरांनी कसेबसे स्वतःसाठी शोधलेल्या बिळातून प्रश्न विचारू नयेत)

आजच्या महाराष्ट्र टाईम्स मधील बातमी:-
सीआयडी प्रमुखांना पुणेरी डोस
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/cid/articleshow/...

पुणेकरांच्या तिरकसपणाचा अनुभव थोरामोठ्यांना अनेकदा आला आहे. असाच एक अनुभव राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) प्रमुख संजय कुमार यांना बुधवारी आला. त्यांची सरकारी गाडी विद्यापीठ चौकातील सिग्नलला उभी असताना, एका पुणेकराने त्यांच्या चालकाला सीटबेल्ट लावण्याचे सांगून नियम पाळण्याचा सल्ला दिला.

पाषाण रोडला विद्यापीठ चौकाजवळच 'सीआयडी'चे मुख्यालय आहे. कुमार हे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आपल्या सरकारी गाडीतून गणेशखिंड रोडला जाण्यासाठी निघाले होते. मुख्यालयातून बाहेर पडल्या पडल्या लगेचच सिग्नल लागतो. या सिग्नलला त्यांची सरकारी गाडी उभी होती. सिग्नल जवळपास शंभरहून अधिक सेंकदांचा आहे. तेवढ्यात दुचाकीवर असलेल्या गृहस्थांनी आपली दुचाकी लावली आणि संजय कुमार यांच्या गाडीजवळ जात काचेवर टकटक केली.

गाडीत बसलेल्या वायरलेस ऑपरेटरने (बॉडीगार्ड) काच खाली घेतल्यावर त्या गृहस्थाने चालकाला 'सीटबेल्ट' लावण्याचा सल्ला दिला. वायरलेस ऑपरेटरनेही ​सीटबेल्ट लावणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले. हा सर्व प्रकार संजय कुमार पाठीमागे बसून पाहत होते. तेवढ्यात त्यांनी आपली काच खाली घेत संबंधित पुणेकरांशी संवाद साधला. ऑपरेटरच्या कमरेला पिस्तुल (वेपन) असल्याने त्यांना 'सीटबेल्ट' लावणे अवघड होत असल्याचे सांगितले. दरम्यान, त्यांचे बोलणे सुरू असताना त्यांच्या चालकाने 'सीटबेल्ट' लावला होता. सिग्नल सुटण्याची वेळ झाल्याचे पाहत त्या पुणेकराने आपल्या दुचाकीकडे मोर्चा वळवला. वाहतूक पोलिसांकडून सुरू असलेल्या तीव्र कारवाईच्या पार्श्वभूमीवर या घटनेद्वारे एका पुणेकराने आपल्या नाराजीला वाट करून दिली. सीआयडी प्रमुखांच्या चालकाला सल्ला देणाऱ्या पुणेकराने मात्र, हेल्मेट घातले नव्हते.

एरवी सामान्य वाहनधारकांनी नियमांचे उल्लंघन केल्यानंतर त्याला कायद्याची भाषा समजून घेण्यासाठी तत्पर असणाऱ्या खाकी वर्दीतील अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावणाऱ्या या इरसाल पुणेकराची चर्चा घटनेनंतर चांगलीच रंगली होती.

21_05_2015_003_019.jpg

सीआयडी प्रमुखांना ‘पुणेरी डोस’
http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31835&articlexml=210...

स्वतः हेल्मेट न घालता दुसर्‍याला सीटबेल्ट लावण्याचा सल्ला देणार्‍या नागरिकाबद्दल वाचून अंमळ मौज वाटली.

हेल्मेट सक्तीचे माहीत नाही, पण काल सकाळच्या पुरवणीत ( खरे तर ती मागचीच होती, पण काल वेळ झाला बघायला) सम्पादक श्री उत्तम काम्बळे यानी कवि प्रदिप निफाडकर यान्च्या मुलीच्या अपघाती निधनाबद्दल लिहीले होते. आधी बेफिकीर यानी प्रान्जलला श्रद्धान्जली म्हणून लिहीले तेव्हा डिटेल्स माहीत नव्हते. काल वाचले आणी धक्काच बसला. हेल्मेट न घातल्यामुळे डोक्याला जबरी मार बसला आणी त्यात ती गेली हे वाचुन सुन्न व्हायला झाले. काय अपराध त्या मुलीचा? मागे लहान बाळ ठेवुन ती देवाकडे गेली. त्या बाळाचेही काय नशीब. वाचवेना काही असले.

दुसऱ्या दिवशी टीव्हीवर बातम्या ऐकताना निफाडकरचं आवाहनही वाचलं. खूप आनंद वाटला आणि तो घराबाहेरच्या सर्वच मुलींचा बाप बनलाय असं वाटलं... ते आवाहन असं होतं ः‘रस्त्यावर हेल्मेट न घालता गाडी चालवणाऱ्या मुलींना स्वतःची मुलगी समजून हेल्मेट घालण्याची विनंती करावी. ती गरीब असेल, तर तिला तीन-चारशे रुपये द्यावेत. तिच्यात आपली मुलगी पाहावी. माझी मुलगी कशीही, कितीही अपंग, विकलांग झाली असती, तरी मी तिला सांभाळलीच असती; पण अपघातानं मेंदूवर आघात केला आणि अपघाताच्या वेळी तिच्याकडं हेल्मेट नव्हतं...’
खूप बरं वाटलं... निफाडकर आता आपल्या दुःखाला एक विधायक वळण देतोय.

हा बोल्डमधील मजकूर श्री काम्बळेन्चा. खरे तर त्यान्च्या परवानगी शिवाय हे बोल्ड केलेले मी इथे लिहीले, कारण रहावेना. श्री. काम्बळे साहेब माफ करा.

रश्मी आणि मयेकर,

विषय निघाला आहे म्हणून थोडी अवांतर माहिती देतो.

निफाडकरांचा संदेश व्हायरल झाल्यानंतर आणखी एक विचित्र संदेश पसरला, जो बहुधा अनेकांना माहीत नसेल. प्रांजलीच्या पतीचा संदेश! त्यांनी निफाडकरांनी प्रकाराला दिलेल्या वळणाबद्दल नापसंती व्यक्त करून काही खासगी गोष्टीही त्यात लिहिल्या. प्रांजलीच्या मृत्यूनंतर काही दुर्दैवी उलटसुलट प्रकार व्हॉट्स अ‍ॅपवर घडत राहिले. इतकेच नाही तर ती सपोर्ट सिस्टीमवर असताना ती गेल्याची बातमी पसरली, त्यानंतर ती बातमी खोटी आहे अशी बातमी पसरली आणि नंतर पुन्हा बातमी खरीच असल्याची बातमी पसरली. एकुणच प्रकार अत्यंत हृदयद्रावक ठरला.

निफाडकर आणि वहिनींचा आक्रोश बघवत नव्हता. एका दुर्दैवी कारणाने जवळपास महाराष्ट्रातील संपूर्ण गझलवर्तुळ वैकुंठावर जमा झाले होते.

पण फॅक्ट ही आहेच की प्रांजलीने हेल्मेट घातले असते तर कदाचित ती वाचली असती.

हेल्मेट सक्ती अजूनही अंमलात आणता आलेली नाही, पण हेल्मेट घालायलाच हवे हे निदान अधिक प्रमाणात मान्य होऊ लागलेले दिसत आहे. त्यातच ह्या अश्या दुर्घटनांमुळे ती जाणीव अधिकच बोचरेपणाने पसरते.

एक विचित्र मुद्दा बहुधा पुण्यातील प्रशासनाकडून लक्षात घेतला जात नाही आहे. कित्येकवेळा हेल्मेटसक्तीचा प्रयत्न करूनही हेल्मेटसक्ती का अंमलात येऊ शकली नाही ह्यावर विचार तरी होत आहे की नाही कोण जाणे! सीटबेल्टसक्ती अंमलात आली. लेनकटिंगबाबतची शिस्त वाढली. पण हेल्मेटसक्ती काही केल्या अंमलात येत नाही आहे. ह्याचा अर्थच कुठेतरी बेसिक घोळ आहे. हा पुणेकरांचा अती शहाणपणा नाही. हा पैश्यांचाही प्रश्न वाटत नाही. हेल्मेट घ्यायची इच्छाच का होत नाही ह्यावर संशोधन व्हायला हवे बहुधा! होत असेलही!

बेफी या करिता आपण विवेक वेलनकर प्रभृतींशी चर्चा करणे बरे राहील. ही मंडळी आता हेल्मेट घालून जाणार्‍या व्यक्तीना खाली उतरवून हेल्मेट काढून वाहन चालवायला भाग पाडायचीच बाकी राहिलीत.::राग:

बाकी हे तुमचे जुने पोस्ट वाचा....
बातमीमुळे तुम्हाला झालेला आनन्द लपत नव्हता.
हेल्मेटसक्ती बेकायदेशीर असल्याचे काल सिद्ध झाले. महाराष्ट्र टाईम्सला बातमी होती.

Pages