विवाहाच्या निमित्ताने....

Submitted by limbutimbu on 26 November, 2014 - 02:31

हिंदुस्थानातील कुटुंब संस्थेच्या अनेक अंगांपैकी एक अविभाज्य अंग म्हणजे विवाहसंस्था होय.

प्रत्येकास आयुष्यात कधीनाकधी विवाह सोहळ्यात, त्या आधीच्या पुर्वतयारीत, प्रत्यक्ष सोहोळ्यातील कामात, व नंतरची मांडवपरतणी उरकण्यात सहभागी व्हायचा योग येतो, मग तो स्वतःच वधु/वर या भुमिकेत असेल, वा वर/वधुचे माता/पिता/नातेवाईक/मित्र/निरिक्षक या भुमिकेतून असेल.

तर हा धागा विवाहा निमित्ताने सध्या होणार्‍या घडणार्‍या अनेक योग्य वा अयोग्य रिती रिवाज रुढी परंपरा यांच्या आलेल्या स्वानुभवावर आधारित घटनांची/प्रसंगांची चर्चा करण्यासाठी आहे.

काही छान नविन प्रथाही सुरू होताना दिसत असतील, बरेच चांगलेही होत असेल तर ते ही इथे मांडणे अपेक्षित आहे, न की केवळ टीकात्मक लेखन.

चार माणसे जमली, की टाळक्याला टाळकी भिडणारच, त्यातुन विवाहप्रसंगी तर बघायलाच नको, तर अशावेळेस अनुभवलेल्या गंभीर/हलक्याफुलक्या/विनोदी प्रसंगाचे वर्णन इथे देण्यास कसली हरकत असावी? पुढच्यास ठेच, मागचा शहाणा, असे व्हावयाचे असेल, तर आपले अनुभव सांगायलाच हवेत ना?

(कृपयाच, इथे ऐकीव/ वा दुसर्‍या कुणीतरी मांडलेल्या विचारांचे/तत्वांचे सादरीकरण/प्रचार करण्याऐवजी, स्वानुभव व त्यावरील विचार मांडणे अपेक्षित आहे. धाग्यावर हलकीफुलकी चर्चा अपेक्षित असून कोणत्याही जातीधर्माला / समुहाला / व्यक्तिला दुखावणे अपेक्षित नाही)

या धाग्याव्यतिरिक्त, अशास्वरुपाच्या विषयावर मायबोलिवर आधिच एक धागा आहे, इच्छुकांनी तो देखिल नजरेखालून घालावा: लग्नातल्या गमतीजमती : http://www.maayboli.com/node/13968
जुनी मायबोली: http://www.maayboli.com/hitguj/messages/644/112938.html?1153310676

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इब्लिसा, नाहीरे, मी आहे तोच तस्साच आहे, अन आजही मी माझे समोरील ज्येष्ठांन्ना वाकूनच नमस्कार करतो, अनमान करीत नाही, "कां..कूं" तर मुळीच करीत नाही.
उद्या जर तू एक रेडा आणून माझेसमोर उभा करून हाच तो ज्ञानेश्वरांचा वेद वदलेल्या रेड्याचा वंशज असे म्हणालास, वा एखादे गाढव आणून तूच त्याचेकडून वेद वदवून घेतले आहेस असे सांगितलेस तरी मी अनन्य भक्तिभावाने त्या रेड्याला वा गाढवाला (सुरक्षित अंतरावरून) वाकुन नमस्कार करीन. कधी आणतोस बोल... Lol

हाडा हो हाडा
मी घालिते सडा
तुमच्यावर उडेल शिंतोडा
तुम्ही तिकडेच तडफडा

अशी ओवी आहे ती

माझ्या सासुच्या माहेरी मामीने आपल्या भाच्याच्या पाया पडायची प्रथा आहे. म्हणजे कुठल्याही सणासुदीला माझ्या नव-याच्या मामीने माझ्या नव-याच्या पाया पडायचे. दर वेळेस मामी पाया पडतेय की नाही हे माझी सासू आणि नवरा अगदी काळजीपुर्वक पहायचे आणि ती विसरली तर आठवणीने पाया पडुन घ्यायचे. आता गेली ती बिचारी. एकुलती एकच होती, त्यामुळे ती परंपरा आता तुटली.

खरचं फाल्तु पद्धत आहे ती. खानदेशातल्या आहेत अशा पध्दती हे कळाले. या पद्धतीमुळे आता त्या घरातल्या कोणाच्याच पाया पडत नाही.

बरेच किस्से जमा होत आहेत.
काही काही प्रकार तर अचंबित करणारे.

रजिस्टर लग्न हेच बरय खरच.

>>>> मामीने आपल्या भाच्याच्या पाया पडायची प्रथा <<<< अचाट आणि अतर्क्य.....

मंदारडि, अहो ते होणारच, लाखोनी नमुने आहेतच अस्तित्वात, मग त्यांचेही वर्णन येणारच.
किंबहूना कुटुंबसंस्थेला व विवाहपद्धतीला आणि स्त्रीजन्मप्रमाणाला सरळ सरळ सुरुंग लावण्याचेच काम बहुतेक "सासरची" लोक आजवर करीत आली आहेत, तेव्हा आपणही उद्या सूनेचे (सासू)सासरे झाल्यावर कसे वागू नये याची उदाहरणे प्रबोधन म्हणून वाचायला हरकत नाही.

तुमच्याकडे हलकेफुलके काही असेल, तर तेही मांडा ना.... !

सासर बॅशिंग.
नाही हो.
आमचे सासर बॅशींग नाही चालू.

आम्ही फक्तं सासरी काय प्रथा आहेत ते सांगितले. Wink
आमच्या माहेरी तर याहून विचित्रं प्रकार आहे. पण तो कुणाला सागितला तरी आकलनाच्या पलीकडे आहे.
अँड आय हेट देम फॉर दॅट . असो.

ड्रीमगर्ल, तुम्हाला आलेला अनुभव दुर्दैवी आहे आणि खरंच उडदामाजी काळे गोरे या न्यायाने काही कोकणी लोकही वाईट असू शकतातच.

आता आपल्या विवाहविधीत मला अज्जिबात न आवडणार्या गोष्टी -
-फोटोसाठी महत्वाच्या विधींचे पण रिपीटस करणे
-मुलीला/मुलाला हार घालायच्या वेळी उचलून घेणे
-बूट पळवणे
- बफे जेवण किंवा अपारंपारिक जेवण ठेवणे

>>> आता आपल्या विवाहविधीत मला अज्जिबात न आवडणार्या गोष्टी - <<< सहमत.

>>>> -फोटोसाठी महत्वाच्या विधींचे पण रिपीटस करणे <<<<
हो अन, सारखे सारखे इकडे पहा म्हणूण क्यामेरात डोळे घालायला लावणे... नैसर्गिकता नष्टच होते.

>>>> -मुलीला/मुलाला हार घालायच्या वेळी उचलून घेणे <<<< धरून बदकावे वाटते...
याच्याच जोडीला अक्षता फेकून मारणे, ब्राह्मण वा कोणी मंगलाष्टके म्हणताना त्यांच्या तोन्डात अक्षता भिरकाविणे, तर्‍हतर्‍हेचे फेसाचे फवारे वगैरे उडविणे हे अजिबात आवडत नाही.

>>>> -बूट पळवणे <<<< हा मूर्खपणा हिंदी सिनेमाच्या स्टाईलवर केला जातो, तो आपल्या संस्कृतीत नाही. आमच्या इथेही करणार होते, पण मी एका नजरेनेच दटावल्यावर तो बाष्कळपणा रहित झाला, तर वराकडची "मुले" उसकवत बसली होती बराच वेळ, न्या की न्या की पळवून.... ! Uhoh

>>>> - बफे जेवण किंवा अपारंपारिक जेवण ठेवणे <<< काही अंशी असहमत.
बफे जेवण सोय म्हणुन करावे लागते. याला इलाज नाही. पाचपाचशे लोक येणार असतील तर पन्गती घालणे प्रॅक्टीकली अवघड आहे. व गावाकडच्या जेवणातल्या पंगतीसारखे लग्नातल्या पंगतीत चालत नाही.

मुलीला/मुलाला हार घालायच्या वेळी उचलून घेणे व बूट पळवणे हे मुळचे महाराष्ट्रातील प्रकार नसावेत. सिरियल्स आणि सिनेमातून ह्या प्रथा उचलल्या असाव्यात. हल्ली आदल्या दिवशी सिमांतपूजनाबरोबर "संगीत" पण ठेवलं जातं.

हम्म्म्म्!!
माझ्या पोस्टीनंतर इतक्या पोस्टी पडल्या, पण कोणीही माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत.
हा बाफ केवळ मनोरंजनार्थ चालू केलाय असं दिसतंय.

तेव्हाच तुम्ही दोघांनी ठाम नकार द्यायचा होता ना.>> गरजवंताला अक्कल नसते ही म्हण अक्षरश: भोगली आम्ही त्यावेळी!! दोघांनी विरोध करायचा खूप प्रयत्न केला. अधून मधून माझा बंडखोर स्वभाव उसळी मारायचा... सुनावलेलं ही त्यावेळी खडसावून साबा साबूला! साबा बिचारे नरम स्वभावाचे होते थोडे! बायको पुढे काही चालायचं नाही त्यांचं!

मावस सासू एकदा म्हणालेली : ही आजकालची लव्ह मॅरेजेसची थेरं आमच्या काळी नव्हतीच! दीर यायचा आणि वहीनीला मांडीत बसवून साखरपुड्याची अंगठी घालायचा Uhoh
नवर्‍याने फटकळपणे विचारलेलं तुझ्या दिरांनी पण!! मग तू पण छोट्या वहीनीला भैय्याच्या मांडीत बसवून अंगठी घालवून घेतलेलीस?
बोलण्यापूर्वी विचार का करत नाहीत हे लोक!! आणि खरंच ही अशी प्रथा होती का? अर्थात त्या काळी लहान वयात मुलींची लग्ने होत आणि दीर अगदी वडीलांच्या वयाचा वै. असावा!

मंजू, आमच्याकडल्या लग्नात (जे दिल्लीत झालं होतं आणि सापु पुण्यात झाला होता). सापु मध्ये व्याह्यांनी त्यांच्या पद्धतीने कैच्याकै गिफ्ट्स आणलेल्या पाहून सापुच्या रात्री आम्ही घरातल्यांनी चर्चा करुन एक निर्णय घेतला होता. दुसर्‍या दिवशी व्याह्यांना सांगितलं की तुम्ही अश्याच प्रकारे ह्यापुढेही खर्च करणार असाल तर लग्न रजिस्टर होईल, इतका खर्च केलेला आम्हाला चालणार नाही. जर तुम्ही जबरदस्तीने अजून गिफ्ट्स वर खर्च करणार असाल तर आम्ही गिफ्ट्स नाकारु, मग अपमान वाटून घेऊ नका. व्याही म्हणू लागले की आमच्यात असं द्यावंच लागतं नाहीतर लोक म्हणतील की काय गरीब लग्न केलंय एवढा सी.ए. जावई मिळाला तरी! मग आम्ही म्हटलं की तुमची मुलगीही सी.ए. आहे हे तुम्हीच विसरलात का? मग म्हणू लागले "हम लडकीवाले है". शेवटी प्रयत्नपुर्वक सांभाळल्या आदरार्थी हिंदीला कट मारुन दिरांनी बंबईय्या हिंदीत त्यांना चांगलंच खडसावलं व "कोण तुमच्याकडले लोक काय म्हणतील त्यांना माझ्याकडे पाठवा" असं सांगितलं तेव्हा कुठे पुढे लग्न दिल्लीत साधेपणाने झालं. दोन्ही घरची मिळून फक्त १५० माणसं होती. वराकडल्यांनी म्हणजे आम्ही साड्या, दागिने वगैरे काहीही घेतलं नाही मानपानाचेही. अर्थात दिलंही नाही. सापुचा दोन्हीकडला खर्च आम्ही केला होता (१५० माणसं) त्यांच्या लोकांच्या ३ दिवस राहण्या, फिरण्यासकट आणि लग्नाचा दोन्हीकडला खर्च त्यांनी केला (१५० माणसं) आमच्या लोकांच्या ३ दिवस राहण्या, फिरण्यासकट. त्यामुळे कुणावरही ओझं राहिलं नाही. जोडपं सुखात आहे. नॉर्थमध्ये मुलीकडे रहायला जात नाहीत ही प्रथाही आम्ही मोडून काढली आहे व मुलीच्या माहेरच्यांना दरवर्षी मुंबई ट्रिप असतेच १-२ वेळातरी.

>>>>> या चालीरितींची इथे चर्चा करून आपण त्यातून काय घेणार आहोत? <<<<< आपणही उद्या सूनेचे (सासू)सासरे झाल्यावर वा सून-जावई झाल्यावर कसे वागू नये याची उदाहरणे प्रबोधन म्हणून वाचायला हरकत नाही.

>>>>> जे आपल्याला पटत नाही, झेपत नाही, आवडत नाही ते आपल्यावर प्रसंग आल्यावर न करण्याचं धाडस कितीजण दाखवतील? <<<<< हा भविष्याचा पोपटाचा धागा नाही, असले अंदाज बांधणे व्यर्थ आहे, त्यापेक्षा कितीजण धाडस दाखवायला प्रवृत्त होतील. गेला बाजार विचार तरी करतील हे बघितले पाहिजे. पी हळद हो गोरी अशा गत परिणाम केवळ एखाद्या क्रीमचा असू शकतो. व्यावहारिक जगात हळू हळू विचार झिरपवायला लागतात.

>>>>> मुलीच्या लग्नात झालेला मनःस्ताप, अपमान हे प्रसंग दुसर्‍यावर येऊ नयेत यासाठी मुलाच्या लग्नात कितीजण लवचिकता दाखवतील? <<<<< मी नक्कीच दाखवेन, किंबहूना माझ्या स्वतःच्याच लग्नात माझ्याइतका "लवचिक" जावई पूर्वी बघितला नाही अजुनही बघायला मिळत नाही असे माझ्या सासरकडचे आजही म्हणतात.... !

>>>>> अगदी साधं विचारायचं तर स्वतःच्या मुलाच्या लग्नाचा खर्च वधूपक्षाबरोबर निम्मा वाटून घेण्याची तयारी कितीजण दाखवतील? <<<<< सगळेजण दाखवतील, जेव्हा "मागणी तसा पुरवठा" यातिल पुरवठा ठामपणे रोखला जाईल.

माझ्या धाकट्या दीराचं लग्न झालं तेव्हा धाकट्या जाऊबाईला साबाने मांडीत घेतलेलं....
मी नवर्‍याला म्हणाले व्वा मस्तंय ही प्रथा! मग मला का सावत्र वागणूक??
नवरा म्हणाला तुझे आकारमान बघून धसका घेतला असेल तिने! Proud

या चालीरितींची इथे चर्चा करून आपण त्यातून काय घेणार आहोत? जे आपल्याला पटत नाही, झेपत नाही, आवडत नाही ते आपल्यावर प्रसंग आल्यावर न करण्याचं धाडस कितीजण दाखवतील? मुलीच्या लग्नात झालेला मनःस्ताप, अपमान हे प्रसंग दुसर्‍यावर येऊ नयेत यासाठी मुलाच्या लग्नात कितीजण लवचिकता दाखवतील? अगदी साधं विचारायचं तर स्वतःच्या मुलाच्या लग्नाचा खर्च वधूपक्षाबरोबर निम्मा वाटून घेण्याची तयारी कितीजण दाखवतील?

हे आहेत मंजुडीचे प्रश्न. आणि या प्रश्नांचे उत्तर आहे हे आपल्यावर वेळ आली की "काय करणार? अमुकतमुकाचे मन मोडू नये म्हणुन करतोय" "आम्हाला करायचेच नाही पण मुलीकडचे लोक दणक्यात खर्च करणारच म्हणताहेत तर करुदे बापडे" इ.इ. उद्गार काढायचे आणि जे काही चाललेय ते चालु द्ययचे.

माझ्या ओळखीच्या कित्येक मुलांशी मी लग्नात मुलीकडुन खर्च घेणे या विषयावर वाद घातलेत आणि त्यांनी अशीच कारणे दिलीत. शेवटी खर्च घेतलाच. माझ्या लग्नातही माझ्या सासुबाईंनी लग्नखर्च मागितला आणि "एकच मुलगी आहे" म्हणत माझ्या बाबांनी तो दिला. मी दागिने बिगिने असले काहीही केले नाही मग. जे आधीपासुन होते त्याच्यातच चालवुन घेतले.

वर सातींनी लिहिलेय की त्यांना बारशी दणक्यात करणे परवडले, आवडले आणि त्यांनी ते केले. पण बारसा असा थाटात केला जातो हे इतर पाहतात आणि मग ज्यांना परवडते ते अनुकरण करतात, ज्यांना परवडत नाही त्यांना असे केले नाही तर लोक काय म्हणतील याचे दडपण येते. लग्ने दणक्यात करण्याच्या पद्दती अशाच पडल्या असाव्यात. अजुन काय?

साती तुम्ही हे कृपया पर्सनली घेऊ नका पण आहे हे असे आहे.

>>>>> अगदी साधं विचारायचं तर स्वतःच्या मुलाच्या लग्नाचा खर्च वधूपक्षाबरोबर निम्मा वाटून घेण्याची तयारी कितीजण दाखवतील? <<<<< सगळेजण दाखवतील, जेव्हा "मागणी तसा पुरवठा" यातिल पुरवठा ठामपणे रोखला जाईल.>>>

मागणी थांबवू असे का नाही आले? Proud

अश्विनी.... मस्त. Happy
ड्रीमगर्ल, मूळात साखरपुडा वगैरे समारंभ नसतोच. ते गेल्या पन्नासपाऊणशे वर्षात वाढलेले खूळ आहे.
पूर्वी मुलाचे आईवडील मुलगी बघायचे, तेव्हा पसंती कळविण्यासाठी खरोखरचा साखरेचा पुडा तिच्या हाती द्यायचे. साखरपुड्याची अंगठी वगैरे भानगड गेल्या पन्नास वर्षातील, व ती देखिल मुलाचे वडील स्वहस्ते मुलिच्या बोटात घालायचे. हल्ली जे वरवधू एकमेकांच्या बोटात अंगठ्या घालतात ती प्रथा गेल्या पंचवीसतीस वर्षात फार बोकाळली, व त्यास हिंदी सिनेमातील ख्रिश्चनसमाजी लग्नातील दृष्ये बरीचशी कारणीभूत आहेत.
अन्यथा पुराणकाळात राजा दुष्यंताने शकुंतलेला दिलेल्या "खुणेच्या" अंगठी व्यतिरिक्त कुठेही "साखरपुड्याच्या"/विवाहनिश्चितीच्या अंगठीचा उल्लेख नाही. Lol

मंजूडीने ज्या गाण्याची आठवण काढलीय, त्याचेच विडंबनही एका चित्रपटात होते.
ओटीत घातला मुलगा विहिणबाई... आशानेच गायले होते.

माझ्या आठवणीप्रमाणे अशोक सराफ, रंजना, पद्मा चव्हाण, सुलोचना वगैरे होते.

कुणाला, पृथ्वीराज कपूर, जयश्री आणि ललिता पवारचा " दहेज " चित्रपट आठवतोय का ? इतका परीणामकारक चित्रपट असूनही.. अजून समाजावर काही परीणाम नाही.

आम्ही मूळ कोकणातले असल्याने, आमच्याकडची बहुतेक लग्ने अशी मानपान, नखरे याशिवायच झाली. तीन पिढ्यांपासून आमच्या घराण्यात आंतरजातीय प्रेमविवाह होताहेत. कुणीही त्यावरून लग्नात वा नंतर काही बोलल्याचे आठवत नाही.

ज्यांना परवडत नाही त्यांना असे केले नाही तर लोक काय म्हणतील याचे दडपण येते. लग्ने दणक्यात करण्याच्या पद्दती अशाच पडल्या असाव्यात. अजुन काय? >>> साधना बरोबर. स्पर्धा आणि दडपण Sad

>>>> मागणी थांबवू असे का नाही आले? <<<< मागणी पुरवठा मी पैशासंदर्भात नव्हे तर "वर्-वधु" उपलब्धतेबद्दल मांडला आहे. असल्या वरांन्ना जेव्हा वधूच सरळ सरळ नकार देऊ लागतील, अर्थात वधूंचा पुरवठा थाम्बेल (तसाही तो विशिष्ट समाजात हजारी साताठशे इतका उतरला आहे) तेव्हाच हे सुधारले जाईल. दुर्दैवाने पुरवठाच थाम्बवण्याची धमक पश्चिम महाराष्ट्रात फार कमी ज्ञातीसमाजातील मुलिंमध्ये आहे, मात्र त्याचे अनुकरण येत्या दहावीस वर्षात सर्वदूर होईल यात शंका नाही.

मागणी पुरवठा मी पैशासंदर्भात नव्हे तर "वर्-वधु" उपलब्धतेबद्दल मांडला आहे. असल्या वरांन्ना जेव्हा वधूच सरळ सरळ नकार देऊ लागतील, अर्थात वधूंचा पुरवठा थाम्बेल>>> सॉरी बरं का लिंबूभाऊ! तुम्ही वापरलेली 'मागणी तसा पुरवठा' ही म्हण वधू-वर उपलब्धतेसाठी अयोग्य आहे. शब्दांचे खेळ करून उगाच मुद्दा/ विषय बदलू नका.

>>>> ज्यांना परवडत नाही त्यांना असे केले नाही तर लोक काय म्हणतील याचे दडपण येते. लग्ने दणक्यात करण्याच्या पद्दती अशाच पडल्या असाव्यात. अजुन काय? <<<<
अजुन म्हणजे, मुलिला सासरी नंतर त्रास होऊ नये म्हणूनही मुकाटपणे केले जाते.

मुलीच्या लग्नात झालेला मनःस्ताप, अपमान हे प्रसंग दुसर्‍यावर येऊ नयेत यासाठी मुलाच्या लग्नात कितीजण लवचिकता दाखवतील?>> मला आणि माझ्या घरच्यांना कुठल्या मानसिक अवस्थेतून जावं लागलं याचा अनुभव असल्याने माझ्या मुलाच्या लग्नात वधू पक्षाची मनस्थिती नक्कीच समजून घेऊ शकेन! आणि लवचिकता दाखवायची कशाला? नवं नातं जोडायचं तर तेवढा समजूतदारपणा हवाच!

जे आपल्याला पटत नाही, झेपत नाही, आवडत नाही ते आपल्यावर प्रसंग आल्यावर न करण्याचं धाडस कितीजण दाखवतील? >> दाखवायला हवा खरं तर! समोरचे दुखावले जाऊ नये या भीतीने आम्ही दोघं आणि माझ्या घरचे असंख्य वेळा दुखावले गेलो. दुखावणार्‍याला मात्र ना तर त्याची जाणीव होती ना तर फिकीर! आपल्याला हव्या तश्या आपल्या सोयीने प्रथांची रिती रिवाजांची ढाल पुढे करून वरचष्मा ठेऊ पाहणार्‍यांना समजावणार तरी कुठल्या शब्दांत!"

या चालीरितींची इथे चर्चा करून आपण त्यातून काय घेणार आहोत? >> चर्चेने जर इथल्या पैकी कोणाचे काही पूर्वग्रह असतील तर ते बदलायला आणि एक नवीन चांगली सुरूवात व्हायला नक्कीच मदत होईल! बर्‍याच ठिकाणी हुंडा घेतलाच जातो... बर्‍याच जणांना त्यात गैर ही वाटत नाही! पद्धतच आहे तशी! असे मानतात. बर्‍याच जणांना पटतं की चूक आहे पण हुंडा घेतला नाही तर आपल्यातच खोट आहे अशी समजूत होऊ नये म्हणून मूक संमती देतात. बर्‍याच ठिकाणी हुंडाच मानपान या गोजिरवाण्या अवगुंठनाखाली घेतला जातो! नक्की काय प्रथा होत्या, आहेत आणि काय बदलत आहे, बदललं पाहीजे हे या चर्चेने समजलं तर छानच नाही का?

>>> शब्दांचे खेळ करून उगाच मुद्दा/ विषय बदलू नका <<<<
मंजुडी, आत्ता पर्यंत या धाग्यात मी दोन ते तिन वेळेस तरी स्त्रीयांचे पुरुषांसोबतच्या दरहजारी प्रमाणावर भाष्य केले आहे... दर हजारि पुरुशांमागे ८००/८५० स्त्रीया म्हणजे १५० स्त्रीया कमी पडत असूनही ही तर्‍हा असेल, तर पुरवठाच बंद व्हायला हवा असे हे धोरण मी व्यक्त करतोय. पण तुम्हाला ते शब्दाचे खेळ वाटत असतील तर तसे वाटून घ्यायलाही माझी ना नाही. मात्र मी पुरवठा हा वरा संदर्भात उपलब्ध वधू या अर्थानेच घेतोय.

Pages