दांभिक (hypocrites) लोक ओळखण्याचे सात निकष

Submitted by निमिष_सोनार on 21 November, 2014 - 01:06

दांभिक (hypocrites) लोक ओळखण्याचे सात निकष:

१) हे लोक त्याच गोष्टी म्हणतात किंवा करतात ज्या दुसऱ्यांनी करू नये असे यांना वाटते.

२) हे लोक त्या गोष्टी आणि नियम कधीच पाळत नाहीत ज्या इतरानी पाळाव्यात असे यांना वाटते.

3) यशस्वी लोकांवर हे नेहेमी टीका करतात आणि त्यांचा द्वेष करतात. ज्या गोष्टी ते प्राप्त करू शकत नाहीत
त्याबद्दल ते द्वेष आणि तुच्छता बाळगतात.

४) हे लोक इतरांच्या आयुष्याचे अंधानुकरण करतात. आणि जर इतरांसारखे होकारात्मक परिणाम जाणवले नाहीत
तर त्या लोकांच्या आयुष्यांवर टीका करून मोकळे होतात.

५) हे लोक द्वेषापोटी इतरांवर टीका करतात

६) हे लोक व्यक्तिपरत्वे टीका बदलतात.

७) हे लोक खासगीत त्याच गोष्टी करतात ज्या गोष्टींचा ते लोकांमध्ये मिसळले असतांना विरोध करतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

good one..

ही सर्व लक्षणे जरी दांभिकाची असली तरी अशी सर्व लक्षणे असलेले सर्व दांभिक असतात असे नाही हं !!
माबोवर मोदीविरोधी अशी सर्व लक्षणे असलेला एक गट वावरतो पण त्याना दांभिक नाही म्हणता येत ! ते "मोदीविरोधा"च्या प्रेमात आहेत इतकेच ! Happy

(मंडळी हलके घ्या हं!)

सगळ्याच धाग्यांवर मोदीला आणायची गरज नाही.>>सगळ्या धाग्यांवर नाही आणत, पण लक्षणे दिसली नि तात्काळ उदाहरण डोळ्यासमोर आले...

उदाहरणांशिवाय मजा नाही
>>>>>>

चला एक मोदींचे उदाहरण आले, आता जरा मजा येईल धाग्याला.
अजून उदाहरणे येऊद्या लोकहो !!!!

हे नियम कोणी तयार केलेले आहेत ? परंपरागत आहेत की तुमचे स्वतःचे आहेत ?

१) हे लोक त्याच गोष्टी म्हणतात किंवा करतात ज्या दुसऱ्यांनी करू नये असे यांना वाटते.

याच एक उदाहरण मिळाले तर हा नियम समजण्यास सोपे जाईल

^^^^^^^^^^
म्हणजे लोकांनी परिसरात कचरा करू नये असे यांना वाटते, पण रोज सकाळी स्वत: मात्र खिडकीत उभे राहत खसाखस दात घासत फसाफस चूळा मारतात.
(डोण्ट करेक्ट मी ईफ आय अ‍ॅम राँग, बट टेल मी इफ आय अ‍ॅम राईट)

आजकल कुणी प्युअर मराठी स्पीकच करत नाही. आल्मोस्ट सगळे मराठीत इंग्लिश ऑर हिंदीचे अडल्टरेशन करून सोडतात. साला मिलावट का जमाना आया है!

हे सातही निकष पास झाले पाहीजेत कि त्यापैकी काही पास झाले तरी दांभिक पदाला ती व्यक्ती पोहचेल?

किमान तीन.
एखाद दुसरा लक्षण आढळल्यास संशयाचा फायदा देण्यात यावा.
तीन किंवा त्यापेक्षा जास्त लक्षणे ज्या प्रमाणात आढळतील त्यानुसार दांभिकतेच्या स्केलवर मोजमाप करता येईल.

तुम्ही बरोबर आहात ऋन्मेऽऽष Happy

दांभिक (hypocrites) लोक ओळखण्याचे सात निकष पटले पण सगळेच कधी ना कधी दांभीक पणे वागतात.

ऋन्मेऽऽष | 22 November, 2014 - 00:00
किमान तीन.
एखाद दुसरा लक्षण आढळल्यास संशयाचा फायदा देण्यात यावा.
तीन किंवा त्यापेक्षा जास्त लक्षणे ज्या प्रमाणात आढळतील त्यानुसार दांभिकतेच्या स्केलवर मोजमाप करता येईल.

>> अनुमोदन..
(काय दिवस आले राव.. कोणाकोणाला अनुमोदन द्यावं लागतं आजकाल Light 1 )

सोशलसाईटवर कोण दांभिक आहे वा नाही हे ओळखण्याच्या फंदात पडू नका किंबहुना घाईघाईत निष्कर्श तर कधीच काढू नका.
कारण, इथे सारेच ड्यूआय असतात. आयडीमागची खरी व्यक्ती काय कशी आहे हे आपण प्रत्यक्षात ओळखत नाही तोपर्यंत ती इथे काय लिहिते यावरून ठरवण्यात काहीच अर्थ नाही.