Ring Around the Rosie

Submitted by असामी on 20 November, 2014 - 15:38

'Ring Around the Rosie' हे nursery rhyme बहुतेकांना माहित असेल. त्यातली शेवटची ओळ 'We all fall down' मला नेहमी विचित्र वाटत असे. थोडी शोधाशोध केल्यावर कळले कि हे युरोपमधे ब्लॅक प्लेगच्या वेळी जन्माला आले. ह्यातले rosie म्हणजे अंगावर उठणारी पुरळ नि शेवटचे वाक्य मरण दाखवते. Basically it describes fatalism and it's surreal acceptance by kids.

त्यावरून अजून शोधाशोध केली तेंव्हा अजून काही नर्सरी र्‍हाईमचा उगम सापडला
http://www.huffingtonpost.com/2014/11/20/nursery-rhymes-real-stories_n_6...

पुढे ग्रिमच्या परीकथा शोधल्या तेंव्हा सगळ्यात मोठा धक्का बसला. मूळ पुस्तकाची एक प्रत माझ्याकडे आहे पण त्या एरवी वाचल्यात असे म्हणून पुढे वाचले नव्हते पण खालची लिंक बघितल्यावर वाचून बघायला हवे हे जाणवले.
http://www.theguardian.com/books/2014/nov/12/grimm-brothers-fairytales-h...

आपल्या भारतीय लोककथा नि बालगीतांना पण असा काही संदर्भ आहे का ? मागे दीपावली दिवाळी अंकामधे 'चल रे भोपळ्या' मधला वाघ नि म्हातारी हे माणसाचे मरणापासून पळण्याचे रुपक आहे अशा अर्थाची बहुधा भरत सासणेंची कथा वाचलेली ती ह्या निमित्ताने आठवली.

ह्या बहुतेक कथा/ गाण्यांना तत्कालीन सामाजिक संदर्भांच्या, इतिहासाच्या चौकटी आहेत तेंव्हा त्यांना आजच्या योग्याग्यतेच्या पारड्यात तोलण्याची चूक करायचे कृपया टाळा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नक्की संदर्भ माहित नव्हता पण ऑल फॉल डाउन चा मरणाशी संबंध आहे हे ऐकले होते खरे.
बरीच बालगीतं निगेटिव्ह नोट वर संपतात असे वाटते. रॉक अ बाय बेबी ...., सॉलोमन ग्रंडी ...
काय कारण असेल ?

ह्या गाण्यामागची पार्श्वभूमी माहित नव्हती. अशा बर्‍याच गाण्यांना असे संदर्भ असतीलही जे बदलता येणं शक्यच नाही. मग का शिकवा मुलांना?

मग का शिकवा मुलांना? >> +१
कालपरत्वे मुलांना सांगायच्या गोष्टी गाणी बदलायला हव्या. कुठल्यातरी एका चांदोबाच्या गाण्यात "तुपात पडली माशी चांदोबा राहिला उपाशी" अशी ओळ आणि आमच एक भाचरु अगदी वेड कोकरू होत. ऐकून रडायला लागायचा. शेवटी त्याला आजीने "तुपांत पडली साखर, चांदोबा जेवला पोटभर"म्हणायला सुरुवात केली. तेव्हा योग्य ते बदल करून घ्यावे.

अशा बर्‍याच गाण्यांना असे संदर्भ असतीलही जे बदलता येणं शक्यच नाही. मग का शिकवा मुलांना? >> कशासाठी शिकवता ह्यावर आहे. बहुतेक गाणी हि फक्त ताल सूर, त्यांनी आपल्या हालचाली follow करून त्याला react करायला शिकावे वगैरेसाठी शिकवली जातात त्यातून काही भावार्थ बोध व्हावा अशी काही भूमिका नसावी. बहुतेक जण आपल्या लहान असताना ऐकलेली recycle करतो, आणखी वेगळे काय.

ह्या युगानुयुगं चालत आलेल्या गोष्टी बदलणं किती सोपं आहे कळत नाही .. मनावर घेऊन बदललं तर होईलही ..

पण उदाहरणार्थ किती नवनवीन आरत्या रचल्या जातात पण सुखकर्ता दुखहर्ता ची सर कशाला येईल असं वाटतंच नाही .. हे कदाचित आपल्या पिढीपुरतं असेल .. आपण सुखकर्ता दुखहर्ता ऐकत मोठे झालो म्हणून .. पण आपल्या मुलांनां कदाचित त्याचं काहीच वाटायचं नाही ..

तेच तर रामायण महाभारताचं वगैरेही आहे. आपल्या वेळी आपण ही पुस्तकं वाचली पण आता मुलांना हे वाचा म्हणणं योग्य आहे का? मी तरी कधी वाचायला दिली नाहीत.

आपल्या वेळी हॅरी पॉटर नव्हते त्यामुळे महाभारतला तसे ऑप्शन काय होते दुसरे? >> ? अरेबियन नाईट्स, हातीम ताई, सिंदबाद, इसापनिती, सिंहासन बत्तिशी, वेताळ पंचविशी, गुलबकावली, पंचतंत्र वगैरे होते कि. अर्थात वयानुसार ह्या सगळ्यांची diluted versios होती. (खरे अरेबियन नाईट्स वात्स्यायन लिखित पुस्तकाएव्हढे रेटेड आहे.)

हे अजिबात माहित न्हवत.
असामी ++, ही गाणी ताल/ सूर/ दोन शब्द वेगवेगळे म्हणणे आणि सगळ्या शब्दांची भेसळ नाही हे कळणे ह्यासाठीच शिकवतात ना?
परवा मुलाने मला ट्विंकल ट्विंकल चं स्पूफ शिकवलं, डेकेयर मधून शिकून आला,
ट्विंकल ट्विंकल चोकलेट बार | माय ड्याडी ड्राईवस अ रस्टी कार
पुश द बटण पूल द चोक | ऑफ वी गो इन क्लाउड ऑफ स्मोक.
हे त्यांना गम्मत/ किंवा फार तरन्युट्रल म्हणून शिकवलं असेल असं वाटलं. ह्या साध्या गाण्यामागे इतिहास असेल का शोधलं पाहिजे.

तुम्ही गाण्याचं म्हणता मी यु ट्युबवरची गणपतीची गोष्ट लावली होती तर मुलगा रडतच आला बाबाकडे की "बाबा तू असं माझं डोकं कापशील?" त्याला काय समजवावं कळेचना. अचानक वाटलं आम्ही काय निर्ढावलेले होतो का हा राजपुत्र सिद्धार्थ आमच्यापोटी जन्माला आला Wink
ऑफिसमधल्या एका कलिगकडे तेव्हा हा विषय काढला होता त्याचं लॉजिक असं की अपने को एंड पता था की भगवान के साथ सब अच्छा होगा वगैरा म्हणून आपल्याला काहीच वाटलं नाही. मुलांनी पाहताना इतका शेवटाचा वगैरे विचार केला असेल का बाप्पाच जाणे.

नर्सरी र्‍हाइम्सवर आधी पण कुठेतरी वाचलंय. आणखी अशीच उदा. होती पण आता लिंक आठवत नाहीये.

असामी,
रिंगा रिंगा ह्या नर्सरी र्‍हाईम बद्दल जयंत नारळीकरांच्या प्रेषित मध्ये वाचल्याचे आठवतेय.

ह्या rhyme चा अर्थ पहिल्यांदा नारळीकरांच्या प्रेषित कादंबरीमध्ये कळला होता. बाकीच्या गाण्यांना पण दुःखी अर्थ आहे हे पण कुठेतरी वाचले होते.
मराठीतली मला आठवणारी बालगीतं खूप छान आहेत..झुकझुक झुकझुक आगीनगाडी, ससा तो ससा, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, नाच रे मोरा!
पण आपली अंगाईगीतं फार करुण चालीची आहेत असं वाटतं. माझा एक भाचा अंगाईगीत ऐकून रडायला लागायचा. शेवटी आम्ही त्याला सगळी लेटेस्ट सिनेमाची गाणी ऐकवून झोपवायचो! (साल १९९६)

>> पण आपली अंगाईगीतं फार करुण चालीची आहेत असं वाटतं

+१

पण त्याला काही लॉजिक असावं असं वाटतंय .. लहान मुलं झोपेच्या अधीन व्हायला बिथरलेली असतात म्हणून?

(हे खरंतर माझ्या कधीही डोक्यात आलं नव्हतं .. अगदी स्वतःच्या मुलाला झोपवतानाही .. पण भगत्सिंग मधलं गाणं ऐकून प्रकाश पडला ..

सुनाई थी जो बचपन में वोही लोरी सुना दे माँ
तू अपनी गोदमें अब चैनसे मुझको सुलादे माँ

म्हणजे मोठं झाल्यावर मरणाची जी भिती असते तशाच स्केलवरची भिती लहान मुलांनां झोपताना वाटत असावी असं लक्षात आलं हे ऐकून ..)

इथली christmas carols पण मला फार करूण वगैरे चालींची वाटतात.. ती ऐकली की उदासच वाटतं..

nursery rhyme बद्दल आधी वाचले होते. माझ्या मुलाला शाळेत एकही पारंपारिक nursery rhyme शिकवली नव्हती. त्याची ३ वर्षाचा असतानाच्या प्रीस्कूलमधेही नाही आणि ४थ्या वर्षापासुन कॅथलिक शाळेत होता तिथेही नाही. brown bear brown bear what do you see , polar bear polar bear, I am going on a bear hunt वगैरे गाणी म्हणायचे.

अरे वा मी आत्ताच तिकडे आवडती पुस्तकं मध्ये प्रेषित लिहून आले. पण मला आत्ता जाम आठवत नाहीये की रिंगा रिंगा बद्दल प्रेषित मध्ये वाचलं होते वगैरे. पण रिंगा रिंगाचा अर्थ माहीत होता. मी लहानपणी हाश्शा हुश्शा वी ऑल फॉल डाऊन असं काहीतरी निरर्थक म्हणायचे. पण ते मूळात अ‍ॅशेस अ‍ॅशेस वी ऑल फॉल डाऊन आहे. Sad

ते इट्स रेनिंग इट्स पोअरिंग, ओल्ड मॅन इज स्नोअरिंग.. पण अस्लंच डिप्रेसिंग आहे. ही वेंट टू बेड अ‍ॅड बम्प्ड हिज हेड अँड कुडन्ट गेट अप इन द मॉर्निंग?! Uhoh

रॉक अ बाय बेबी मध्ये देखील क्रेडल फांदीला लटकवतात आधीच. मग फांदी तुटून क्रेडल खाली पडणार इत्यादी. Sad

हम्प्टी डम्प्टीचे दोन तुकडे होतात. , जॅक & जिल धडपडतात, लंडन ब्रीज पडतो, बिचार्‍या ३ ब्लाईंड माईसची शेपूट कापतात..There was an Old Lady Who Swallowed a Fly हे गाणं तर अशक्य अ नि अ आहे. हॉरिबल आहे सगळं! तरीही पिढ्यान्पिढ्या ही गाणी चालत आली आहेत! कमाल आहे खरंच..

आपल्याकडचंही बेडकीच्या पिल्लाने बैल पाहीला अस्लंच धक्कादायक गाणं.

हो हो वाचले मी. जज नाही करत आहे. पण माझ्या मुलाला गाणी भयंकर आवडत असल्याने हे सगळं सारखं आदळत असते घरात. अगदी परवाच नवर्‍याशी ह्या विशयावर बोलले त्यामुळे टॉपिक अगदी ताजा आहे डोक्यात, उदाहरणांसकट! Happy

हो खरंच हा विचार डोक्यात आलाच नाही कधी.
ते गीज पण एक गाणं असलंच आहे. ते बदक म्हातार्या माणसाला जिन्यावरून खाली पाडतं.

खूप इंटरेस्टिन्ग माहिती.
आपल्याकडे तुपात पडली माशी
चांदोबा राहिला उपाशी
आहेच की.

मला तर माझ्या बालपणी मी जे जे वाचल ऐकल ते खूप रसाळ होत अस वाटत त्या वयासाठी. त्या जादुच्या कथा, राजाराणीच्या कथा, चेटकीन, महाभारत, रामायण आणि नंतर आलेल्या दुरदर्शनवरील विविध मालिका जसे की सिंहासन बत्तिशी, तेनाली रामा हे सर्व मी खूप खूप मनसोक्त एन्जॉय केलेले आहे.

माझ्यामते मुलांना हे सर्व ऐकवायला हव.

से से माय प्लेमेट हे गाणं सुद्धा तसंच आहे. त्यात आपल्या बाहुलीला फ्लू झाल्यामुळे खेळायला मैत्रिणीकडे जाता येणार नाही असे शब्द आहेत Sad पण निदान शेवट तरी 'वी स्टिल विल बी जॉली फ्रेंड्स' असा आशादायक आहे Happy

प्रेषित मलाही आठवलं. गोल गोल फिरून ती सगळी मुलं शेवटी खाली पडतात तेव्हा तो आलोक उभाच असतो आणि 'ते खरोखर मेले का?' असं विचारतो.

इंटरेस्टिंग माहिती. या सगळ्या लिंक्स वाचेन सावकाशीनं.

मला हॅलोविनची भोपळे कोरण्यामागची कथा आणि एकुणच हॅलोविनबद्दल वाचून असंच थोडं शॉकिंग वाटलं होतं. सध्या तरी हॅलोविन एकदम आनंदाचा सण म्हणूनच साजरा होताना दिसतो.

Pages