Submitted by बेफ़िकीर on 19 November, 2014 - 11:36
गझल - हासल्यासारखी भासती माणसे
हासल्यासारखी भासती माणसे
त्रासल्यासारखी हासती माणसे
फक्त ज्यांना मने मोडणे साधते
जोडली मी सदा खास ती माणसे
जो स्वतः खडबडी वाट चोखाळतो
तो म्हणे मत्सरी ग्रासती माणसे
गाढ आलिंगने द्यायची नाटके
दु:ख दु:खावरी घासती माणसे
फक्त एका क्षणाच्या भयाने इथे
शंभरी आपली नासती माणसे
त्याच रंगात ती जन्मली जाण तू
रंग जो जो तुला फासती माणसे
रोज येतो दिवस तेच ते घेउनी
पण तरी रोज आ वासती माणसे
'बेफिकिर' भासती ती तुझ्यावाचुनी
जी तुला पाहुनी त्रासती माणसे
========================
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गाढ आलिंगने द्यायची
गाढ आलिंगने द्यायची नाटके
दु:ख दु:खावरी घासती माणसे.....massst
एकदम अफाट गझल.... मजा आ गया
एकदम अफाट गझल....
मजा आ गया
सुंदर, खूप आवडली.
सुंदर, खूप आवडली.
दुःख दुःखावरी घासती
दुःख दुःखावरी घासती माणसे......वाह जबरदस्त.....आवडली रचना
छान...
छान...
छान गझल.
छान गझल.
ग्रेटच !!
ग्रेटच !!
कस सुचत हे तुम्हाला??
कस सुचत हे तुम्हाला?? सुरेख...
रोज येतो दिवस तेच ते घेउनी पण
रोज येतो दिवस तेच ते घेउनी
पण तरी रोज आ वासती माणसे
अप्रतिम शेर आहे.