निसर्गाच्या गप्पा (भाग २३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 10 November, 2014 - 14:09

निसर्गाच्या गप्पांचा धागा २३ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.

"हिवाळा" हा सगळया ऋतुंमधे आल्हाददायक ऋतु वाटतो. हिवाळ्याची पहाट खुपच रम्य वाटते. पहाटे सभोवताल पसरलेले धुके, गार वारं, पक्षांचा किलबिलाट, गाईचे हंबरणे, कोवळ्या उन्हाचा किरणोत्सव, आंगणात पेटवलेल्या चुलीचा धुर,वाफाळता चहा.. सगळेच कसे रमणिक आणि प्रसन्न वाटते.

हिवाळ्यात थकवा, चिडचिड जाणवत नाही, शीण येत नाही, एरवी नकोस झालेले उन सुदधा हवेहवेसे वाटते. या दिवसात अहार वाढलेला असतो तसेच पचन शक्ती पण चांगली असते. या ऋतूत सशक्त होऊन ही ताकद साठवुन वर्षभर पुर्वायची असते..

तसेच थंड हवामानामुळे या दिवसात फळ भाज्यांची रेलचेल असते.. पेरु,सिताफळे,पपई,, चिक्कु अशा मधुर फळाची मेजवानी असतेच जोडीला संत्रे, मोसंबी अशी निमफळ पण चाखायला मिळतात. थंडी मुळे फुला - फळांचे रंग अधिकच गडद आणि लोभस वाटतात.

या दिवसात काही झाडांची पान गळती असते तर..काही झाडे ओसंडुन बहरत असतात.
एकी कडे बुची , पारिजातकांचे सुगंधीत सडे पडलेले असतात तर दुसरीकडे शेवंती, चमेली, सायली नटलेली दिसते..
तर असाहा सुगंधोत्सव कधीच संपु नये असे वाटते...

आपण सगळे नुकतीच दिवाळी जलौषात साजरी करुन एका वेगळ्याच जोशात कामाला लागलेले असतो... आता वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे! आपले सगळे सण समारंभ निसर्गाशीच निगडीत आहेत.. उदा. कार्तीक महिन्यातच तुळशी विवाहा असण्याचे कारण असे की या महिन्यात तुळस बहरलेली असते , तिला भरपुर पान आणि मंजीर्‍या आलेल्या असतात.. म्हणजेच विवाहा योग्य झालेली असते... या सणाच्या निमित्याने कन्या योग्य वयात आल्यावरच तिचा विवाह करावा असे तर आपल्या पुर्व़जांना सुचवायचे नसेल ना! असे श्री दिलीप व सौ पोर्णिमा कुलकर्णीं यांच्या एका पुस्तकात वाचल्याचे आठवते..

शिवाय, तुळशीच्या लग्नासाठी लागणारे सगळे साहित्य आपल्याला निसर्गचे देते..उदा. विवाहासाठी लागणारी झोपडी किंवा मांडव उसाची किवा ज्वारीची असते,.. पुजेच्या साहित्यात बोरं, चिंचा, आवळे, सिताफळ हवेच. म्हणजेच काय तर सणा समारंभाच्या निमित्याने आपण निसर्गाचीच पूजा करतो, आभार मानतो. आणि असे करणे गरजेचे आहे.कारण आपण निसर्गाकडुन नेहमिच काही ना काही घेत आलो आहोत. त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, कधी न फेडु शकणारे.

तर अशा या "कधी न संपावा" अस वाटणार्‍या रुतुचे आपण सगळे मना पासुन नि.ग. वर स्वागत करुया.

(वरील फोटो व लेखन मायबोलीकर निसर्गप्रेमी सायली पातुरकर यांच्याकडून)

नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाच्या गप्पा (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षू, भारतात अनेक ठिकाणी, अगदी मुंबईतल्या नॅशनल पार्कातही फुलपाखरांची उत्तम पैदास होऊ शकते. पण तशी पैदास व्यावसायिक रुपात करण्यास भारत सरकारची परवानगी नाही. बटरफ्लाय पार्क तशी अनेक आशियाई देशात आहेत, पण भारतात ते शक्य नाही.

मोनलि... तयाचा वेलू गेला गगनावरी असे माऊलींनीच लिहून ठेवले आहे !>>> अगदी अगदी.
फक्त इथे तो ग्रिलवरी झालय.
बाकी धन्स बी न वर्षू दी.

धन्यवाद @पुरंदरे शशांक.
होय. नवीन कॅमेरा घेतला अलिकडे त्यामुळे प्रयोग चालू आहेत फोटोग्राफीचे.
अर्थात चित्रकला सोडणार नाही कधीच. Happy

कुणाला शक्य असेल तर हा प्रयोग करून बघणार का ?
मोगर्‍याची ताजी फुले, कोरड्या तीळात बुडवून ठेवायची. दुसर्‍या दिवशी तीळ तो सगळा सुगंध शोषून घेतात.
या तीळाचे तेल काढले तर त्यालाही तो सुगंध येतो. घरी तेल नाही काढता येणार पण ते तीळ कोरडेच वाटून, मसाज करण्यासाठी वापरता येतील.

>>मोगर्‍याची ताजी फुले, कोरड्या तीळात बुडवून ठेवायची. ....>>
छान आहे कल्पना!

दिनेशदा, तुम्ही मागे सुचवलेले निळू दामलेंचे 'माणूस आणि झाड' पुस्तक मागवले होते. कालच मिळाले. खूपच रंजक आणि उपयुक्त माहिती आहे. त्यातले प्रयोग अगदी करूनच पहायला हवेत. माहितीसाठी धन्यवाद!

-अश्विनी

अदीजो, अत्तर बनवायची पुरातन पद्धत आहे ही.
ते प्रयोग आपण शहरवासीयांनी करुन बघायला पाहिजेत. त्यांचा प्रचार का होऊ शकला नाही कळत नाही.

हाय नि ग कर्स!...:स्मित:
घारीच्या घरट्यामुळे चिल्ले पिल्ले पक्षी मधे काही दिवस यायचे कमी झाले होते ते आता परत येऊ लागलेत! परत एकदा त्यांचा आनंदोत्सव सुरू झालाय. :स्मित:...
मागच्या वहिनींच्या चिक्कूवर एक बांडगूळ वाढतंय आणि त्याला फुलंही आलीयेत. हे बांडगूळ इथे कसं काय आलं असावं? असा मला प्रश्न पडला होता. पण आज ते कोडं सुटलं... फूलटोच्या नावाचा इटुकला पक्षी त्याला कारणीभूत आहे असं आज मला दिसलं!
गेले ३-४ दिवस 'सीssssक' 'सीssssक' 'सीssssक' असा अगदी बारीक आवाज येत होता. आज सहज म्हणून त्या आवाजाचा वेध घेतला; तर हे एक इटुक चिक्कूच्या झाडावर अगदी कळे न कळे दिसत होतं. हालणार्‍या पानांकडे नीट लक्षपूर्वक बघत होते तेव्हा हे इटुक त्या बांडगुळावर मजेत बसलं (बसलं कस्लं! १-२ सेकंद बसल्यासारखं केलंन त्यानं) आणि गाऊ लागलं. मधूनच काहीतरी खाल्लं.अक्षरशः एखादं १-२ वर्षाचं हायपर मूल कसं करेल तसं त्या बांडगुळावर बागडत होतं. हा उडणारा ठिपका कोण? हे बघण्यासाठी 'पक्षी आपले सख्खे शेजारी' हे पुस्तक काढलं तेव्हा खुलासा झाला. किरण पुरंदरेंनी हा फूलटोच्या आंब्याच्या,सिंगापूर चेरीच्या झाडावर जास्तकरून बागडतो असं दिलंय. त्यांनी त्याला फूलटोच्या पेक्षाही फळटोच्या असं म्हणायला पाहिजे असं म्हटलंय! आता ह्या वहिनींच्या बागेत चिक्कू बरोबर आंब्याचं झाड पण आहे. त्यामुळे आज त्यांना विचारणार आहे की आंब्याच्या झाडावर पण अशी बांडगुळाची काही 'करामत' केलीये का ह्या इटुकल्याने... असेल तर वेळीच ह्या दोन्ही झाडांवरची ती बांडगुळं काढून टाकायला... नाहीतर झाडांचं काही खरं नाही!!....

ची ताजी फुले, कोरड्या तीळात बुडवून ठेवायची. दुसर्‍या दिवशी तीळ तो सगळा सुगंध शोषून घेतात.>>> आम्ही उन्हाळ्यात मोगर्‍याचे फुल माठात टाकतो. मस्त सुगंधीत पाणी होते मग. Happy

शांकली माहिती छान.
आमच्या पेरूच्या झाडावर गेल्या वर्षी वाढलेल्या बांडगुळाचे कारण हाच फुलटोच्या तर नसेल?

मोगर्‍याची ताजी फुले, कोरड्या तीळात बुडवून ठेवायची. दुसर्‍या दिवशी तीळ तो सगळा सुगंध शोषून घेतात. ...
==== असे सर्व सुगंधी फुले घेवुन करता येईल ना. मी बकुळ आणि सोनचाफा याचे करुन बघेन गावाला गेल्यावर तिथे फुलांना सुगंधही जास्त असतो आणि तीळही मिळतील.
तीळ कुठले लांब असतात काळे ते की सफेद तीळ .

शांकली माहिती छान.
फूलटोच्या म्हणजे टोकदार लांब चोच असते तोच ना. आकारने चिमणी एवढा.

सुदुपार निगकर्स
दिनेश अत्तर करण्याची भारी आय्ड्या!
शांकली मस्त निरीक्षण!
आमचा सिटाउट आमचे किचन आणि आमची बेडरूम यामधली मोकळी जागा आहे...झाडं आणि कुंड्यांनी भरलेली. तर आम्ही किचनमधे ब्रेकफास्ट करत असताना काल सिटाउटमधे एकदम खूपच काहीतरी हलल्यासारखं वाटलं तर एक मोठ्ठा भारद्वाज कठड्यावर बसला आणि आमच्या सिटाउटात बागडू लागला. लोखंडी जिन्यावर उडून जाऊन बसला आणि चालत चालत (म्हणजे अहो....छोट्या उड्या मारत....खरंच!) चक्क जिना चढून वर गच्चीत गेला.
इतक्या जवळून भारद्वाज पहिल्यांदाच पाहिला. काय सुंदर दिसतो!
सगळ्या मोठ्मोठ्या खिडक्यांना जाळ्या असल्याने बाहेरच्यांना कळतच नाही की इथे माणसाचा वावर आहे.
थेट समोर खाली अंगणातल्या घुमारदार कडुलिंबावर हे सगळे पक्षी असतात.
बराच वेळ तो सिटाउटात बागडत राहिला आम्ही आतून गुपचुप पहात राहिलो मग मी हळूच जाळीचं दार लोटलं तर तेवड्यात तो गच्चीतून उडून खाली आला होता, त्याला चाहूल लागली.. परत समोर च्या कडुलिंबात उडून गेला आणि घूघूत्कार करत राहिला. बहुतेक त्याच्या मित्रांना घडल्या घटनेचा रिपोर्ट करत असावा.
पण नेमका आय पॅड जवळ नसल्याने फोटो नाही काढता आला.

आम्ही उन्हाळ्यात मोगर्‍याचे फुल माठात टाकतो. मस्त सुगंधीत पाणी होते मग. स्मित+++१

हे बांडगूळ काय आहे? फुलटोच्या म्हणजे मधचोख्या का?

मनुषी ताई, छान कीस्सा. मागे जुन मधे भावाकडे पुण्याला गेले होते, तर खिडकीशीच एक कडुलींबाचे झाड होते
त्यावर भारद्वाज पक्षाचे घरटे होते.. खुप आत होते त्यामुळे घरटे काही दिसत नव्हते पण त्याचा विशिष्ट आवाज आला की आम्ही सगळे धावतच यायचो.. कधी उड्या मारणे, कधी पपईच्या झाडावर बसणे, कधी जोडीदाराला साद घालणे एक एक लीला दाखवायचा.. सगळेच खुप रमायचो..

तसेच भावाच्या घराजवळ एक पटांगण आहे तीथे एका टिटवी च बस्तान होत.फार मज्जा यायची तीला बघतांना
हा पक्षी अत्यंत देखणा पण खुपच डोमीनेटींग आणि एकलकोंडा असे लक्षात आले... सगळ्या छोट्या पक्षांच्या मागे धावुन त्यांना हुस्काउन लावायची.. पक्षीच काय तर एक कुत्र्याच नुकतच जन्मलेल पिल्लु आणि कुत्री यांना सुद्दा तीथे मज्जाव नसे.

फतकल मारुन बसणारा पहिलाच हा पक्षी बघीतला, जरा कोणाची चाहुल लागली की, आधी खुप वेळ बसल्या बसल्या मान वर करुन स्तब्ध बघायच आणि मग अक्षरशाहा त्याच्या मागे धावत जाऊन त्याला सळो की पळो करणे..आणि धावण पण साध सुध नाही शाहामृगा सारखे.. खुप खुप मज्जा यायची.
रात्री पण टिटवी- टिटवी असा आवाज आला की मी खिडकीतुन टॉर्च नी बघायची... आत्ता पण भावाला फोन केला की विचारते टिटवी आहे का रे?तो म्हणतो.आहे. पण आता खुप दिसत नाही आवाज कायम येत असतो.. त्या पटांगणावर खुप गवत आणि झुडपं वाढली आहेत म्हणे.. भारद्वाजानी पण बस्तान हालवलय पण सकाळी येतो,पपई च्या झाडावर बागडत असतो..

पक्षी कीत्ती वेड लावतात नाही!

शांकली, बांडगूळाच्या बिया चघळायला पक्ष्यांना फार आवडते. त्या बिया त्यांना गिळता येत नाही पण त्यांच्या चोचीला त्या चिकटतात. दुसर्‍या झाडावर चोच घासली की बी तिथे रुजते.
घार, मला नाही वाटत, घरट्यातील पिल्लांवर हल्ला करत असेल. उंचावरून शिकार हेरून तिच्यावर झडप घालणेच तिला मानवते. अशी घरट्यातील पिल्लांवर हल्ला करायची "कावळेगिरी" ती बहुतेक करणार नाही.

मानुषी, भारद्वाजाला सकाळी सकाळी उडायचा कंटाळा येतो. खुपदा असे चालत चालतच जातो तो.

कामिनी, आपले साधे पांढरे तीळ. बिना पॉलिशचे घ्यायचे. कुठल्याही सुंगंधी फुलांवर हा प्रयोग यशस्वी होईल असे वाटतेय.

सायली, Dendrophthoe falcata हे त्या बांडगुळाचं नाव.
फूलटोच्या म्हणजे मधचोख्या नाही. हा फूलटोच्या फूलचुखीपेक्षा छोटा असतो. अगदी ठिपका वाटेल इतका छोटा!..
'पक्षी आपले सख्खे शेजारी' मधे बघितलं याचं शास्त्रीय नाव, - 'Dicaeum erythrorhynchos' ( डायसियम इरिथ्रोर्‍हिंकॉस) (कसं टंग ट्विस्टर आहे की नै?? मराठीतलं आपलं बरं फूलटोच्या!! जसं लिहिलं तसं वाचता येतंय!!! Wink
टिटवीला काही भागात 'पोरे चाळवणी' असंही म्हणतात... तू वर दिलेल्या तिच्या सवयीमुळे..
मानुषी.. मस्तच गं. मज्जा येते ना! Happy बाहेरच्या पक्ष्याला आपण आत आहोत हे कळत नसल्याने त्यांच्या हालचाली अगदी स्वाभाविक असतात. आपली चाहूल लागली, की मग मात्र ते अगदी सावध होतात.

भारद्वाजाच किस्सा मस्तच! भारद्वाज घरी येऊन गेला...मला तर हेवाच वाटला. याचं नुसतं दर्शन होणंही शुभसंकेत मानतात - तुमच्याकडे तो अख्खा घरी येऊन गेला Happy

हे या वर्षी मे महिन्यात भिगवणजवळ उजनी जलाशयावर दिसलेले चित्रबलाक. तिथे त्यांची वीण वसाहत होती.
bhigwan2.JPGbhigwan3.JPG

त्यांच्या वसाहतीतल्या बाभळीच्या झाडांखालून हिंडताना जागोजागी अशी पिसं, चोचीतून पडलेले मासे, फुटलेली अंडी दिसत होती.

bhigvan1.JPG

गुलबाक्षीच्या बीया पेरल्या होत्या, तीन रुजल्या, तीन रोपटी छान वाढतायत.. त्यातल्या दोन झाडाला कळ्या धरल्या आहेत.. हे पहिल्या झाडाचे फुल... कळी वरुन अंदाज आला होता, पांढरे + गुलाबी मिश्र असावे.. दुसरे पिवळे असावे असे वाटते... रंग माहिती नसल्या मुळे फुल उमलण्याची वाट बघायला खुप मज्जा येते आहे...:)

GB.jpgदोन्ही तीन्ही रंगाच्या
GB1.jpgGB2.jpg

भारद्वाजाला सकाळी सकाळी उडायचा कंटाळा येतो. खुपदा असे चालत चालतच जातो तो.>>>>>>>> हं हे ऐकलं होतं ;:स्मितः
अदिजो..............भारद्वाज नेहेमीच असतात लिंबावर, आवारात. पण अगदी घरातच इतक्या जवळ पहिल्यांदाच.
आणि चित्रबलाक मस्तच!

पेंटेड स्टॉर्क्स फार सुंदर दिसतात. फोटो मस्त आलेत. भिगवणला पक्षी निरीक्षणासाठी जायचं माझं स्वप्न आहे.

भिगवणजवळ उजनी जलाशयावर दिसलेले चित्रबलाक>>> मस्त आहेत.
बहुदा हेच वा यांचे जातभाई अलिकडे नवी मुंबईत, सीवुडला डीपीएस स्कुलमागच्या खाडीवर पाहिले. पण कसरत करुन तिथवर पोहोचलो होतो. शिवाय बरोबर चिल्लीपिल्ली व खालची दलदल सो जास्त पुढे न जाता व फोटोच्या भानगडीत न पडता ५-१० मिनीटात परत फिरलो.

भिगवणला पक्षी निरीक्षणासाठी जायचं माझं स्वप्न आहे. >>>>+१००००, मला ही जायच आहे पण कधी आणि कोणाबरोबर हा मोठाच प्रश्न् आहे. कारण आमच्या अहोंना तशी खास आवड नाही. मीच त्याला नवीन काही दिसल तर दाखवत असते आणि तो नंतर कौतुक करतो. पण आपणहून पक्षी निरीक्षणाकरता जाऊ अस तो म्हणण्याची सुतराम शक्यता नाही.

अदीजो, मस्त फोटो आलेत.
या प्रजातीतल्या पक्षांची फॅमिली मॅनेजमेंट जरा गडबडते. घालताना दोन अंडी घालतात पण दोन पिल्लांना वाढवणे जमत नाही त्यांना. त्यातले धटींगण किंवा आधी जन्मलेले असते ते दुसर्‍याला ढकलून देते..
खरं तर घरट्याखाली असा कचरा म्हणजे शिकार्‍यांना आमंत्रणच कि.

मानुषी, भारद्वाज जमिनीवर असला की सहसा आवाज करत नाही पण झाडावर असला तर मात्र कूsssप असा आवाज करतो.

Pages