हेल्मेटसक्ती

Submitted by प्रकाश घाटपांडे on 12 November, 2014 - 22:55

अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्‍या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी उचल्यांविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< चेतन, तुम्ही तुमच्या अनुभवांतुन काढलेली गाडीबद्दलची सारी निरीक्षणे आणि निष्कर्ष फार इंटरेस्टिंग आहेत. मात्र ही निरीक्षणे आणि अनुमाने तज्ज्ञांकडून 'व्हॅलिडेट' करून घेतल्यास त्यांना अधिक बळकटी आणि ऑथेंटिसिटी मिळेल असं वाटतं. >>

धन्यवाद साजिरा, पण माझी निरीक्षणे आणि निष्कर्ष मी माझ्या वैयक्तिक गरजेसाठीच वापरतो / वापरले आहेत. माझ्या अनुभवांचा सार्वजनिक उपयोग करण्यासंदर्भाने या विषयातील मार्गदर्शक तज्ज्ञ श्री. अदिल जाल दारूखानवालांसोबत काही काळापूर्वी संपर्क साधला होता पण त्यांनी प्रतिसाद नाही. त्यांना बहुदा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगची पदवी असलेल्यांकडूनच अशी अनुमाने हवी असावीत. असो. मलाही इतरांना हे बोधामृत पाजण्यात फारसा रस नाहीच. हे माझ्यापुरतंच मी ठेवलं होतं. इथे अनेकांनी ओम्नी बदलण्याचा सल्ला दिला म्हणून मी ती का बदलत नाही याची कारणे देताना ते स्पष्टीकरण देणं अपरिहार्य ठरलं इतकंच.

अवांतर:- मी आधी डेवू सिएलो, मग टेम्पो ट्रॅक्स टावून अ‍ॅण्ड कन्ट्री, मग मारूती ८०० डीलक्स ही जुनी वाहने वापरली आणि नंतर या वाहनांच्या देखभालीच्या आणि अपघाताच्या (http://www.maayboli.com/node/48000) अनुभवातून शहाणे होत जुने वाहन नको (बेभरवशाचे असते म्हणून), डिझेल वाहन नको (कारण नियमित वापर नाही), जास्त ताकदीचे नको (उपद्रवमूल्य वाढते म्हणून) आणि वातानुकूलित तर अजिबात नको (कारण देखभाल खर्च फारच जास्त) म्हणून २०१० मध्ये नवे ओम्नी मॉडेल खरेदी केले. माझ्या भावाने २०१२ मध्ये इंडिका विस्टा हे वाहन खरेदी केले. तेही अधूनमधून वापरत असतोच. याशिवाय अनेक मित्रांच्या / परिचितांच्या / नातेवाईकांच्या - वॅगन आर, अ‍ॅल्टो, सॅन्ट्रो, फिगो, इंडिगो या वाहनांचा वापर केला आहे. तसेच टाटा वेंचर, टॉयोटा इनोव्हा, मारुती झेन एस्टिलो, शेवरोलेट स्पार्क, तावेरा, एन्जॉय, इऑन, फोर्ड क्लासिक, फोर्ड एस्कॉर्ट, निस्सान इव्हालिया या वाहनांच्या टेस्ट ड्राईव्ह घेतल्या आहेत. माझी वैयक्तिक वाहतूक गरज आणि माझी आर्थिक कुवत या बाबींचा विचार करता सध्यातरी मला ओम्नीशिवाय दुसरा पर्याय नाही

हेल्मेट वापराबद्दल वरती लिहिले गेलेच आहे . पण प्लीज प्लीज हेल्मेट वा प रा च . ओळखीच्या लोकात खुपशा अपघाताच्या केसेस पाहिल्या आहेत .. वाईट वाटुन राहत मग . सक्तीसाठी नव्हे स्वताच्या सेफ्टीसाठी तरी वापराच..>>
हजारो अनुमोदन. अगदी जवळचे २ लोक डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे गेले आहेत. त्यापैकी एक पुण्यात दांडेकर पूल ते सारसबाग ह्या रस्त्यावर झालेला अपघात आहे आणि दुसरा अन्य गावी पेट्रोल भरून बाहेर पडत असताना दुसर्‍या गाडीने (दुचाकी) धक्का मारल्यामुळे पडून डोक्याला ईजा झाली होती. वेग अगदी नगण्यच होता तरीही.....!!

आजची सकाळमधील बातमी

आता 'ज्यांना निवडून दिले ते मतदाराम्च्या जीवावर उठले' असा एक सैल ताशेरा काहींकडून अपेक्षित आहे.

>>>जगायचीही सक्ती आहे, मरायचीही सक्ती<<<

जगायची सक्ती नाही आहे.

जेथे सर्वजण हेल्मेट घालू इच्छितात तेथे स्थलांतरीत होण्याचे ऑप्शन अजूनही उपलब्ध आहे. Wink Light 1

चला. शेवटी एकदाचा थांबला वाटतं गदारोळ.
पण यावरून हे पुरेसं आणि पुन्हा एकदा (कितव्यांदा तरी) स्पष्ट होतंय की पुणेकरांना कोणत्याही नियमाची सक्ती, किंबहुना नियमच आवडत नाहीत.
तेव्हा असे करून बघितले तर?
सरकारने एक नियम करावा. यापुढे पुण्यात कोणीही डोक्यावर हेल्मेट घालून दुचाकी चालवू नये. जर कोणी चुकार हेल्मेटधारी दुचाकीस्वार सापडलाच तर त्याला जबर दंड करून वर त्याचे हेल्मेट जप्त करावे. (आणि ते मुंबईतल्या सेकंड बाजारात किंवा ओएलेक्सवर विक्रीस द्यावे. )
त्यानंतर पुणेकरांना (त्यांच्या) नियमानुसार हा नियम तोडावाच लागेल. ते कदाचित 'जेलभरो' आंदोलनाप्रमाणे (हेल्मेटात) 'डोके भरो' आंदोलन सुरू करतील. हेल्मेट घालून आर.टी.ओ.वर दुचाकी मोर्चा काढतील..
वगैरे.
हेल्मेटधार्‍यांना 'मेट इन हेल' नावाचा नवा ग्रूपही फे.बु.वर स्थापन करता येईल.
आमीन.

आपणच निवडून दिलेले प्रतिनिधी, आमदार इ. सक्तीविरूद्ध रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे हेल्मेटसक्ती पुन्हा एकदा रद्द होणार हे निश्चित. पुणे हे शेकडो स्क्वेअर किलोमीटर पसरलेलं आणि अर्धा पाऊण कोटी लोक भरलेलं एक महाखेडं आहे- याची आता मी माझ्यापुरती खात्री करून घेतली आहे. जगायचीही सक्ती आहे. मरायचीही सक्ती आहे. >> अगदी अगदी साजिर्‍या. आम्ही भारतीय आजपर्यंत कधी स्वतःच्या आयुष्याचे मोल नाही ओळखू शकलो तिथं कुणीतरी दुसर्‍यांच्या आयुष्याबद्दल विचार करणं ही जरा जास्तच अपेक्षा आहे.

हेल्मेटचे राजकारण काय मला माहित नाही पण
१. दुचाकी चालवताना स्वतः आणि जर कुटुंबातील व्यक्ती साथी राईडर असेल तर त्यांच्यासाठीही हेल्मेट कृपया वापराच.
२. कार ड्राइव्ह करताना सीटबेल्ट वापराच.

पुण्यातील रस्ते चांगले होतील (किंवा नाही) तेव्हा होतील, वाहतुक सेफ होइल (किंवा नाही) तेव्हा होइल पण आपण आपल्या सेफटीची काळजी घ्यायलाच हवी. नियती/प्रारब्ध वगैरे ठीक आहे पण हेल्मेट/सीट बेल्ट घालुन आपण रिस्क नक्कीच कमी करु शकतो.
स्वतःच्या आयुष्यासाठी ३०००. (२ हेल्मेटचे) खिशाला जड नसावेत. सीट बेल्ट लावणे तर फ्रीच आहे Happy

ड्राईव्ह - राईड सेफली.

पुण्यातील रस्ते चांगले होतील (किंवा नाही) तेव्हा होतील, वाहतुक सेफ होइल (किंवा नाही) तेव्हा होइल पण आपण आपल्या सेफटीची काळजी घ्यायलाच हवी. नियती/प्रारब्ध वगैरे ठीक आहे पण हेल्मेट/सीट बेल्ट घालुन आपण रिस्क नक्कीच कमी करु शकतो.
स्वतःच्या आयुष्यासाठी ३०००. (२ हेल्मेटचे) खिशाला जड नसावेत. सीट बेल्ट लावणे तर फ्रीच आहे >>>>>
१००% अनुमोदन. शेवटी 'मर्जी है आपकी क्योंकी जिंदगी है आपकी'. स्वतःच्या सुरक्षिततेसंबंधी आपल्यापरीने काळजी घेणे एवढे तर आपल्या हातात आहेच.

>>>पुणेकरांना कोणत्याही नियमाची सक्ती, किंबहुना नियमच आवडत नाहीत.<<<

असे म्हणणे योग्य होणार नाही. पुणेकरांना काही साहित्यिकांनी बदनाम केले आहे म्हणून तीच परंपरा पुढे चालवण्यातील आसुरी आनंद मिळवण्याचे सुख कृपया घेऊ नये. लोक (मुंबई हा पर्याय नसला किंवा असला तरीही) पुण्यात येऊन सेटल होतात ते येथील सुविधा, संधी, वातावरण व सुरक्षा (आजकाल हा घटक काहीसा प्रभावित) ह्यामुळेच!

पुणेकरांच्या माथी मारलेली बी आर टी ही सुविधा (?) अजूनही पाळली जाते. ती बेसिकली असुविधा / गैरसोय आहे.

पुण्याची अनियोजित वाढ करून पुण्यातील नैसर्गीक रिसोर्सेसचे शोषण करण्याच्या कारखानदारी व राजकीय वृत्तीने स्वतःसाठी भली अशी योजना राबवताना नेत्या/उद्योजकांनी पुण्याबाबत सावत्र आईची वागणूक पत्करली आहे. पुण्याचा दुर्दैवी कायापालट हा लेख कृपया वेळ मिळेल तेव्हा नजरेखालून घालावात अशी विनंती!

पुण्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली नाही. रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणांबाबत प्रशासन कडक धोरण स्वीकारत नाही. पंधरा वर्षापूर्वी कर्वे रोडच्या डोक्यावरून एक फ्लायओव्हर उभारून पर्यायी कर्वे रोड तयार करायला हवा होता ज्याचे आज साधे चिन्हही दिसत नाही. पुण्याबाहेरून पुण्यात येऊन स्वतःचे आयुष्य बनवणारे संधी मिळाली की पुणेकरांच्या तथाकथित बदनाम स्वभावावर आवेशाने टिपण्णी करतात. पुण्यात गेल्या तीन दिवसांत मी एकही दुचाकीस्वार पोलिस हेल्मेट वापरताना (वागवतानाही) पाहिलेला नाही.

आम्ही कायदे करणार, आम्ही स्वतः ते पाळणार नाही, आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारची सुधारीत प्रशासन-व्यवस्था देणार नाही पण तुम्ही हेल्मेट घातलेले नसेल तर दंड किंवा चिरीमिरी मागणार! अशी भूमिका पुणेकरांनी सहन करावी हे तुम्ही नेमके कोणत्या भूमिकेतून म्हणता?

पुण्यात अक्कल नसलेले लोक राहतात व हेल्मेट आपल्या सुरक्षिततेसाठी आहे हे त्यांना समजू शकत नाही असे तुम्हाला वाटते का?

आम्ही कायदे करणार, आम्ही स्वतः ते पाळणार नाही, आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारची सुधारीत प्रशासन-व्यवस्था देणार नाही पण तुम्ही हेल्मेट घातलेले नसेल तर दंड किंवा चिरीमिरी मागणार! अशी भूमिका पुणेकरांनी सहन करावी हे तुम्ही नेमके कोणत्या भूमिकेतून म्हणता? >>>>
शासन किंवा पोलीस कायदे पाळोत ना पाळोत, तरीही केवळ आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरणे हे हिताचेच आहे, शेवटी तो निर्णय त्या व्यक्तीनेच घ्यायचा आहे, शासन वा पोलीस यंत्रणेला दूषणे देऊन हेल्मेट न वापरण्याचं कोणी समर्थन करत असेल तर ते दुर्दैवी आहे. त्या यंत्रणेवरील संताप जरी रास्त असला तरी शेवटी आपल्या जीवापुढे काहीही महत्त्वाचे नाही आणि त्याची काळजी घेणे, निदान आपल्यापरीने प्रयत्न करणे तर आपल्याच हातात आहे.

>>>हिताचेच आहे<<<

हे सर्वांना मान्य आहे. स्वखुषीने कोणीही हेल्मेट वापरेलच! वापरतातच!

पुणेकरांवर ताशेरे कशासाठी?

जर फारच सूज्ञ असलेले लोक दिल्लीत, हैदराबादमध्ये आणि बंगळूरूत राहतात तर तेथे 'हेल्मेट वापरा' हा 'नियम' का करावा लागतो? ते तर सूज्ञ असतात ना?

>>>हेल्मेटसक्तीचा नियम मला वाटते संपूर्ण देशभर आहे/ बहुधा असावा. हिरिरीने विरोध मात्र फक्त पुण्यात होतो.<<<

तुमच्या सदस्यत्व अवलोकनात तुम्ही मुंबईचे असल्याचे दिसत आहे.

पुणे हे 'तुला मी माझ्याकडून पत्नीचा दर्जा देईन पण लग्न करणार नाही' ह्या प्रकारातील शहर झालेले आहे व ह्याला जबाबदार प्रशासन आहे.

इतर शहरांचे तसे नाही. मुंबईत भरपूर उड्डाणपूल आहेत. दिल्लीतील रस्ते रुंद, अतिक्रमणविरहित (बहुतांश नवी दिल्ली, नॉयडा, गुडगांव वगैरे), हैदराबादमधील रस्ते क्रॉसरोडविरहित (पुण्यापेक्षा खूपच अधिक प्रमाणात) आणि बंगळूरूमधील रस्ते व वाहतूक व्यवस्था 'कायदा मोडताच येणार नाही' ह्या प्रकारची (पुण्याच्या तुलनेत) आहे.

पुण्याची तुलना औरंगाबाद, नगर, बीड, परभणी, गाझियाबाद, जबलपूर, बेल्लारी, कर्नाल ह्यांच्याशी का केली जात नाही? बाकी भारतात हा कायदा किती पाळला जातो हे का लिहिले जात नाही आहे येथे? तौलनिकच लिहिणे शक्य असले तर तुलना कशाची कशाबरोबर करायची हा चॉईस प्रतिसाददात्यांचा कसा काय?

पुण्याची तुलना औरंगाबाद, नगर, बीड, परभणी, गाझियाबाद, जबलपूर, बेल्लारी, कर्नाल ह्यांच्याशी का केली जात नाही?
<<
बेफि,
तुलनाच करायची, तर 'ते बरे', असेच म्हणावे लागते.

प्रतिसाददात्यांचा चॉईस कसा असावा, किंबहुना त्यांना चॉईस असावा किंवा कसे, हे ठरविणारे तुम्ही कोण?

>>>प्रतिसाददात्यांचा चॉईस कसा असावा, किंबहुना त्यांना चॉईस असावा किंवा कसे, हे ठरविणारे तुम्ही कोण?<<<

प्रतिसाददात्यांनी पुण्याची तुलना मुंबई, दिल्ली सारख्याच शहरांशी का केली असे विचारण्यामागे एक कथानक आहे.

पुण्यात संधी, वातावरण व 'सहजपणे तेथील म्हणवले जाण्याची' क्षमता ह्या वर उल्लेखिलेल्या शहरांइतकीच होती पण पुण्याच्या वाढीच्या प्रक्रियेत प्रशासन तितक्या प्रमाणात सहभागी झालेले नव्हते. थोडक्यात, पुण्याला वार्‍यावर सोडण्यात आले.

हे माझे वैयक्तीक मत आहे. ह्यावर चर्चा होऊ शकतेच.

हीरा जेव्हा प्रतिसाद देतात तेव्हा कदाचित भारतातील पुण्याच्या तुलनेत अतीप्रगत / प्रगत शहरांचा अनुभव पाठीशी धरून देतात. मात्र, पुण्याचे नांव जोडायचे मुंबईबरोबर आणि प्रशासन ठेवायचे अहमदनगरसारखे हा घटक लक्षात घ्यायला हवा हे ध्यानात घेतले जात नाही. Happy

खड्डे फक्त पुण्यातल्या रस्त्यांवरच आहेत का?
एकदिक वाहतूक न पाळणे , सिग्नल तोडणे या गोष्टी (ज्यांमुळे ताशी ३० कि.मी.इतकी कमी वेगमर्यादा राखावी लागते) पुणेकर का करतात?
फक्त पुण्याच्याच अंतर्भागात ताशी ३० कि.मी. इतकाच जास्तीतजास्त वेग ठेवता येतो का? इतर शहरांच्या गल्लीबोळांत काय अवस्था आहे? ते लोक हा नियम पाळतात ना? कमीतकमी त्याविरुद्ध जाहीर आंदोलने तरी करीत नाहीत ना? विना हेल्मेट पकडले गेल्यावर निमूटपणे दंड भरतातच ना?
भारतातल्या इतर शहरात नेमकी कश्या प्रकारची उच्च शासनव्यवस्था आहे?
पुण्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या हे चांगले झाले की वाईट? त्यासाठी बाहेरच्यांचे पुण्यात येणे आणि त्यामुळे पुण्याची लोकसंख्या वाढणे हे टाळायला हवे होते का? आधी रोजगार की आधी रस्ते? आधी रिकामे शहर उभे करायचे आणि मग कंपन्यांनी त्याचा लाभ घ्यावा म्हणून त्यांना हाका मारायच्या? इंफ्रास्ट्रक्चर आणि रोजगारौपलब्धता हे एकाच वेळी समांतर घडत असते. किंबहुना एकामुळे दुसर्‍याला-परस्परांमुळे एकमेकांना- चालना मिळते. पुण्यात सध्या जिथे आय.टी. पार्क्स वगैरे आहेत, तिथले रस्ते चांगले आहेत. तिथले शहरनियोजनही बरे आहे. जुन्या वस्त्यांमध्ये, गावठाणात सुधारयोजना राबवणे कठिण असते. मुंबईत काळबादेवी, भुलेश्वर, सी.पी.टँक भागात वीस कि.मी. ची वेगमर्यादाही गाठता येत नाही. तेच पवई-हिरानंदानी, लोखंडवाला, लिंक रोड,पाम-बीचरोड वर मोकळे वाटते.
आता पुणे वाढेल ते बाहेरच वाढेल आणि तेथले नियोजन अधिक आधुनिक असेल. आणि नियोजित अथवा अनियोजित, कसल्याही तर्‍हेच्या वाढीमध्ये नैसर्गिक साधनांचे शोषण होणे टाळता येणार नाही. यू कान्ट हॅव द केक अँड ईट इट टू.
तात्पर्य, पुण्यातल्या सोयी-गैरसोयी इतरांपेक्षा वेगळ्या नाहीत. पुणेकरांच्याच खास अश्या काही तक्रारी असावयास सकृतदर्शनी काही कारण दिसत नाही.

जे पुण्यातले नाहीत, जे कदाचित कधीही पुण्यातले होणार नाहीत, त्यांना पुणेकरांनी काय करावे व काय करू नये ह्याबाबत इतक्या तीव्रतेने अपेक्षा मांडताना पाहून गंमत वाटली.

नि:संदिग्ध शब्दात सांगायचे, तर पुण्यात हेल्मेटसक्ती आवश्यक आहे हे आधी सिद्ध करा आणि नंतर ती लागू करा!

====================

ह्यासाठी अनेक गोष्टींची आवश्यकता भासेल.

१. अपघातांची शहरनिहाय आकडेवारी - इतर शहरांत झालेले अपघात व हेड इन्ज्युरीमुळे मेलेले किंवा सर्वस्व गमावून बसलेले रुग्ण किती व पुण्यातले किती?

२. हेल्मेट घालूनही निव्वळ प्रशासनाच्या कमकुवत आचरणशैलीमुळे जीव गेला तर हेल्मेटसक्ती रद्द करणार का?

३. स्वयंचलीत दुचाकीवरून चाळीस किलोमीटर पर अवर ह्या वेगाने दहा वेळा भर रस्त्यावर पडूनही जिवंत राहून दाखवले तर ही सक्ती रद्द करणार का? (डोळा मारा)

गेल्या तीन वर्षात फक्त पुणे शहरात हेल्मेट नसल्याने अपघातात मृत्यु पावलेल्यांची संख्या ५८६ आणि या जानेवारीपासून आत्तापर्यंत १६९ मृत्यू....संदर्भ पुणे पोलिस (सकाळ टाईम्सचे वृत्त)
अजूनही पुण्यात हेल्मेट वापरण्याची आवश्यकता नाही असे कुणाचे म्हणणे आहे..

याचबरोबर अजून एक माहीती...या वर्षभरात पुणेकरांकडून तब्बल ८ कोटींची दंडवसूली झाली आहे. यात सर्वात जास्त दंड सिग्नल तोडल्याबद्दल (१ कोटी २९ लाख) आणि त्याखालोखाल नो पार्किंग (१ कोटी १० लाख) केला आहे. सर्वात कमी हेल्मेट नसल्याबद्दल (१२ लाख) आहे. (संदर्भ लोकमत)

एकूणातच पुणेकरांना कसलाही कायदा पाळायचा नाही. आम्ही मेलो तरी बेहत्तर पण नियम पाळणार नाही....

उत्तम

आम्ही मेलो तरी बेहत्तर पण नियम पाळणार नाही... > +१०० पुणेकरांना तसे ही सांगुन काही फायदा नाही आहे.

वरिल रिपोर्ट वाचुन एवढेच म्हनावे वाटते
शिक्षनाच्या माहेर घरात कायदा पाळायच्या बाबतित एवढा आडानी पना शोभत नाही.

साजिरा ह्यांच्या प्रत्येक पोस्टशी सहमत.

बाकी पुणे शहराच्या कल्याणकर्त्यांनी मांडलेल्या विविध मतांनी जबरदस्त मनोरंजन झाले आहे. कुठलाही जनरल धागा उगाचच पुण्यातल्या प्रश्नांकडे कसा वळवायचा हे पुणेकरच करू जाणे!

पुणेकरांच्या माथी मारलेली बी आर टी ही सुविधा (?) अजूनही पाळली जाते. ती बेसिकली असुविधा / गैरसोय आहे. >> मी जेव्हा जेव्हा पुण्यातून जातो, मला या गोष्टीचे आश्चर्य वाटत राहते की पुणेकर ही असुविधा का म्हणून सहन करत आहेत. अजून कोणी न्यायालयाचा दरवाजा कसा ठोठावला नाही.

अजून कित्येक भागांमध्ये सुविधा सुरु नाही, पण रस्ता अडवून ठेवला असल्यामुळे इतर वाहने + PMPML च्या बसेस उरलेल्या रस्त्यामध्ये दाटीवाटीने प्रवास करत आहेत. खरच ज्या कुठल्या सडक्या डोक्यामध्ये ही कल्पना आली असेल त्याला अशा रस्त्यावर फरफटत नेले पाहिजे. हडपसर भागामध्ये सुविधा सुरु झाली असून सुधा ज्याप्रकारे वाहतूक गर्दी जाणवते त्यावरून त्याचा फोलपणा लक्षात येतो.

जानेवारीपासून आत्तापर्यंत १६९ मृत्यू....संदर्भ पुणे पोलिस (सकाळ टाईम्सचे वृत्त)
>>>>>
ही खोटी आकडेवारी आहे. ह्यात पादचारी पण पकडले आहेत.
आणि ह्या लोकांनी हेल्मेट घातले असते तर मृत्यु आला नसता हे नक्की सांगता येइल का?

ह्यात पादचारी पण पकडले आहेत.

पादचारी...अहो बरे आहात ना....
हेल्मेटलेस रायडर असा स्पष्ट उल्लेख आहे...माझ्या माहीतीप्रमाणे रायडर्स हे गाडीवरून जाणाऱ्यालाच म्हणतात....

आणि ह्या लोकांनी हेल्मेट घातले असते तर मृत्यु आला नसता हे नक्की सांगता येइल का?

शक्यता तरी कमी होते का नाही....का ते पण मान्य नाही....
तसे असेल तर तुमच्यासाठी हेमाशेपो....आपण नाही बोलू शकत या युक्तीवादावर

>>>ही खोटी आकडेवारी आहे. ह्यात पादचारी पण पकडले आहेत.
आणि ह्या लोकांनी हेल्मेट घातले असते तर मृत्यु आला नसता हे नक्की सांगता येइल का?<<<

माहिती खरी आहे की खोटी आहे हे ज्यांचे त्यांना माहीत! हेल्मेट नसल्यामुळे मेलेल्यांची संख्या किती अशी आकडेवारीही दिली जाऊ शकेल कदाचित! पण सगळ्यांनी हेल्मेट वापरायला सुरुवात केली तर स्वतःचे डोकेच शाबूत राहणार आहे ना? की पुण्यातील सर्व वाहतूक चांगली होणार आहे? मग ज्याच्या त्याच्या डोक्याचे जो तो बघेल की? आधी वाहतुकीचे प्रश्न तर सोडवा?

>>>याचबरोबर अजून एक माहीती...या वर्षभरात पुणेकरांकडून तब्बल ८ कोटींची दंडवसूली झाली आहे. यात सर्वात जास्त दंड सिग्नल तोडल्याबद्दल (१ कोटी २९ लाख) आणि त्याखालोखाल नो पार्किंग (१ कोटी १० लाख) केला आहे. सर्वात कमी हेल्मेट नसल्याबद्दल (१२ लाख) आहे. (संदर्भ लोकमत)<<<

नो पार्किंगबद्दलच तर कोणी बोलूच नये. निव्वळ पॅथेटिक अवस्था आहे प्रशासनाची. वाहनांची संख्या, रस्त्यांवरील अतिक्रमणे, बेकायदेशीर बांधकामे, पार्किंगला उपलब्धच नसलेली जागा ह्या सगळ्याचा काही ताळमेळ आहे का? पार्किंग मिळत नाही म्हणून चारचाकी घरी ठेवून मी स्वतः कैकोवेळा रिक्षेने गेलेलो आहे. नाहीतर मग पार्किंग करायचे दिड दिड किलोमीटरवर! नुसते सगळीकडे नो पार्किंगचे बोर्ड लावून एक व्हॅन चालवत ठेवून राँग पार्किंगवाले पकडून दंड ठोठावला की झाले काम! एखाद्या शहरात जास्तीतजास्त किती वाहनांना परवाने द्यावेत ह्यावर काही नियंत्रण आहे का?

सिग्नल तोडणार्‍यांबरोबरच रात्री कितीही उशीरा सिग्नल असताना एकट्याने सिग्नल पाळणारेही बरेच आहेत. उगाच दंडांच्या रकमा डकवून पुणेकरांवर ताशेरे कशाला ओढायचे? बाकीच्या गावातले लोक वाहतुक नियमांचे पूर्ण पालन करतात की तेथील दंडांच्या रकमा उपलब्ध नाही होऊ शकल्या? तसेही, सिग्नल तोडणे, राँग पार्किंग ह्याचे येथे कोणीही समर्थन करत नाही आहे आणि घाईघाईने तसा समज करून घेऊन शाब्दिक हल्लकल्लोळ करू नये, कृपयाच!

हेल्मेटलेस रायडर असा स्पष्ट उल्लेख आहे...>>>>>
अहो तुम्ही पोलिसांच्या आकडेवारी वर विश्वास ठेवताय? तुम्ही फारच भाबडे आहात.

पुण्यात कीती पोलिस आहेत हे सांगायला सुद्धा जमणार नाही.

तसेही, मुद्दा सक्ती असावी का नसावी हा आहे, हेल्मेट चांगले का वाईट हा नाही.

>>>हेल्मेट नसल्याने अपघातात मृत्यु पावलेल्यांची संख्या ५८६ <<<

आणि

>>>हेल्मेटलेस रायडर्स<<<

ह्यात फरक आहे.

छातीच्या फासळ्या तुटूनही मृत्यू ओढवू शकतो. चिलखताची कल्पना कशी वाटते? हेल्मेट प्रकरण संपल्यावर?

Pages