Submitted by जो_एस on 14 November, 2014 - 04:07
आज बालदिना निमित्त लहानग्यांना ही भेट
आकाशातल्या चांदण्या (बाल गीत)
आकाशातल्या चांदण्यांची, सुंदर दिसते नदी
लुकलुकत्या या चांदण्यांना, शाळा असते कधी?
आकाशिच्या चांदण्यांना, वाटत नाही भिती
काळ्याकुट्ट अंधारात, खेळती दगड कि माती
आकाशिच्या चांदण्यांना, पाहुन खुलतं कुणी
आमच्या अंगणी, रोज रात्री, फुलते रातराणी
चांदोबा हा लबाड भारी, उगाच करतो खोड्या
कधी होतो बारिकराव, अन् कधी होतो जाड्या
खेळता खेळता एखादी, चांदणी हळूच रुसते
गाल फुगवून आकाशातून, खाली उडी घेते
खट्याळ अश्या चांदण्यांचा, हेवा वाटे मला
दिवसा मिळे झोपायला, मऊ ढगांचा झुला
सुधीर जोशी
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त मस्त!!...........
मस्त मस्त!!...........:स्मित:
मस्त आहे. तालात गाताही
मस्त आहे. तालात गाताही येतेय.
छोट्या मुलींना चांदण्या बनवून त्यांचा नाच बसवता येईल या गाण्यावर
मऊ ढगांचा झुला>>>> खुप खुप
मऊ ढगांचा झुला>>>> खुप खुप गोड. लेकीला वाचून दाखवते
धन्यवाद जरुर वाचून दाखवा
धन्यवाद
जरुर वाचून दाखवा
व्वा, खूपच सुंदर ...
व्वा, खूपच सुंदर ...
छान
छान
कित्ती गोड आणि सुंदर कविता.
कित्ती गोड आणि सुंदर कविता.
अतिशय सुंदर कविता.
अतिशय सुंदर कविता.
धन्यवाद मित्रांनो
धन्यवाद मित्रांनो
कित्ती गोड गाल फुगवलेली
कित्ती गोड गाल फुगवलेली चांदणी
आभारी आहे
आभारी आहे
मऊ ढगांचा झुला.'..कल्पनाच
मऊ ढगांचा झुला.'..कल्पनाच किती गोड .. कविता सुंदरय.
खरचं फार गोड आहे कविता .. छान
खरचं फार गोड आहे कविता .. छान लय आहे कवितेला
छानेय!
छानेय!
मस्त, आवडली.
मस्त, आवडली.
धन्यवाद
धन्यवाद
सुंदर!
सुंदर!
मस्त आहे कविता, आवडली
मस्त आहे कविता, आवडली
अभिप्रायासाठी धन्यवाद
अभिप्रायासाठी धन्यवाद
अभिप्रायासाठी धन्यवाद
अभिप्रायासाठी धन्यवाद
कसली क्युट आहे कविता.
कसली क्युट आहे कविता.
कीत्ती गोड..
कीत्ती गोड..
धन्यवाद
धन्यवाद
गोड बालकविता..
गोड बालकविता..