हेल्मेटसक्ती

Submitted by प्रकाश घाटपांडे on 12 November, 2014 - 22:55

अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्‍या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी उचल्यांविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मुलाला मी जमेल तितक्या बर्‍या शाळेत घातले, त्याची उपस्थिती एन्शुअर केली, सर्व चाचण्या, स्वाध्याय ह्यात तो किमान स्वीकारार्ह पातळीची कामगिरी बजावतो हे नक्की केले, अभ्यासासाठीची सर्व साधने त्याला उपलब्ध करून दिली, अभ्यास करायला पूर्ण वेळ व मोटिव्हेशन देऊ केले, 'अ‍ॅट द कॉस्ट ऑफ अ‍ॅकेडेमिक सक्सेस' त्याला इतर काहीही करायला लावले नाही तर त्याला गुण कमी मिळाले तर का कमी मिळाले हे विचारण्याचा मला नैतिक अधिकार आहे.

('माझ्या मुलाला' ह्यावरून टिपण्णी होणार नाही अशी आशा आहे).

मी त्याला घरकाम सांगितले, फावल्या वेळात नोकरी करायला लावली, शाळेचे कोणतेही नियम पाळण्याची समर्थता त्याच्यात निर्माण होते आहे की नाही हे पूर्णपणे दुर्लक्षिले तर 'तू पास कसा काय झाला नाहीस' असे मी कसे विचारू शकेन?

समथिंग सिमिलर!

'पुण्यात' हेल्मेटसक्ती हा नेमका असाच विषय आहे.

इब्लिसभाय स्ट्रीट ७५० हां....
तुम्ही कॉफी प्यायला कधी बोलवत नाय बॉ..... आम्ही प्रॉपर गिअर मध्ये राईड घेउ हां Wink

बापरे!!चेतनजी तुमचा ओम्नीचा हट्ट सोडा आता आणि चार तर चार सीटर चांगली मारुतीचीच गाडी घ्या सेकंड हॅन्ड मिळेल तुम्हाला चांगली .सीट्बेल्ट साठी तरी .नाहीतर आता एथेही दीवार चा सीन सुरु होईल "जब तक एक भाई बोलेगा तब तक एक भाई जवाब देगा" Proud Happy आज मला नक्कीच मार पडणार आहे माबोवर . पण मी आधीच माफी मागितली आहे . बालदिवसाच्या शुभेछा सर्वांना Happy

काय वाट्टेल ते सुरू आहे या धाग्यावर (नेहमीप्रमाणेच )
हेल्मेट हे सुज्ञ व्यक्तिने स्वताची सेफ्टी म्हणून वापरावे. त्यासाठी सक्ती करावी लागू नये. आपल्याकडे नियमांचा वापर केला जातो. म्हणजे एखाद्या व्यक्तिने हेल्मेट नाही घातलं तर त्याच्याकडून पैसे घेऊन सोडून देतात किंवा पावती फाडतात. अशाने लोकांचा समज होतो की पैसे दिले की हेल्मेट बेल्ट काहीही नाही घातले तरी चालते. त्या ऐवजी जो मनुष्य हेल्मेट घालणार नाही त्याला रस्त्यावर लगेच एक तासाचे हेल्मेट कसे उअपयोगी आहे याचे प्रशिक्षण देणे सुरू करावे. किंवा त्याचे बौद्धिक घ्यावे. तो माणूस आपोआप हेल्मेट घालायाला सुरू करेल.
भिक मिळो ना मिळो कुत्रे आवरले जाईल नक्कीच. Proud

मला वैयक्तिक रित्या हेल्मेट वापरणं फार योग्य वाटतं. मी ते वापरलं आहे सुद्धा. सध्या टू व्हिलर चालव णं अगदी ना के बराबर असल्यानं हेल्मेट वर ठेवून दिलं आहे ते काढावं लागेल.

ईब्लिस,

माझ्या नावा आडनावातील आद्याक्षरे वापरून 'चेसुगु' असे संबोधन करू नये. इतर काही नसले तरी आपल्याला कॉपी पेस्ट ची सुविधा आहे ना? तेव्हा ती वापरून एक तर "चेतन सुभाष गुगळे" असे पुर्ण संबोधन वापरणे अथवा निदान नुसते माझे नाव "चेतन" हे तरी संबोधन म्हणून वापरणे. हे यापूर्वी देखील स्पष्ट केले असताना आपण पी.जी. असल्याचे का दर्शविता? बाय द वे अजून एका मराठी संकेतस्थळावर (जिथे आपणही सक्रिय आहात) एक आय डी माधुरी दीक्षित असे नाव धारण केलेला आहे. आपण त्यांना मादी म्हणून संबोधणार काय?

बाकी, आपण मारूती ओम्नी च्या सीट बेल्ट विषयी केलेले सल्ले विचारात घेतले जातील.

>>>बाकी, आपण मारूती ओम्नी च्या सीट बेल्ट विषयी केलेले सल्ले विचारात घेतले जातील.<<<

कोण सौजन्य हे!

Happy

http://www.maayboli.com/node/26596

असेही असंबद्ध गप्पा सुरुच आहेत तर हे पण वाचा...
जोशी, हे खास तुमच्यासाठी....या धाग्याच्या बाजूलाच तुमच्या लेखाची लिंक खुद्द माबोनेच दिली होती हे पण पहा म्हणून...
म्हणून आणि केवळ म्हणूनच त्याची रिक्षा इकडे चालवली..

मा. अ‍ॅडमीन यान्चे आणी त्यान्च्या मदतनीसान्चे आभार.:स्मित: मला ही बाजूची जुन्या लेखान्ची सुचक सोय खूप आवडते. याच्या मुळे बरेच जुने लेख, पाककृती, माहिती परत वाचायला मिळते. नवीन वाचकाना बरेच जुने लेख माहीत नसतात, या मुळे ते पहायला मिळतात. धन्यवाद, परत एकदा.

चेतन, आपापल्या वाहनाशी ऋणानुबंध हे प्रत्येकाचेच निर्माण होत असतील. कारण ते वाहन आपल्या रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होऊन बसलेलं असतं. त्यामुळे तुम्ही व्यक्त केलेली ''साथ सोडवत नाही इतके ते वाहन छान आहे'' ही भावना प्रत्येकाचीच असेल आपापल्या वाहनाबद्दल. मात्र तुमच्या वाहनाबद्दल तुम्हीच काही निगेटिव्ह गोष्टीही लिहिल्या आहेत. (''सीटबेल्ट लगेच वरच्या बाजूला खेचला जाऊन अतिघट्ट होतो. खांद्यांना काचतो. वाहनाचे स्टीअरिंग फिरविणे, मान वळवून बघणे या सर्वांना प्रचंड त्रास होतो''; ''ओम्नीची जर समोरून कुठल्याही इतर वाहनाशी / वस्तूशी धडक झाली तर तसेही वाचणे अशक्यच''). त्यामुळे हे सांगण्याचं धाडस करतो आहे: ओम्नी हे वाहन डेंजरस आहे. त्याची स्टेबिलिटी, सेफ्टी, हँडलिंग, फॉर्म-फिट-फिनिश, ड्रायव्हिंग, क्वालिटी- काहीही चांगलं नाही. लोक मागतात म्हणून ते विकतात. (कारणं अर्थातच ऑब्व्हियस आहेत. उदा. तुम्हीच लिहिलेलं: ''सीएनजी वर २५ किमी / किग्रॅ कार्यक्षमता आणि आठ प्रवासी घेऊन जाऊ शकणारे तरीही साडेतीन लाख रुपयांत मिळणारे दुसरे कुठले वाहन भारतात उपलब्ध आहे?'' एक्झॅक्टली हेच कारण 'हे वाहन किती डेंजरस आहे' हे सिद्ध करतं!) शक्य असल्यास बदला. नव्या वाहनाचं तुम्ही ओम्नीपेक्षा नक्केच जास्त कौतुक कराल याची खात्री आहे मला. (हे सारं तुमच्या धाग्यावरही लिहिणार होतो, पण तो विषय वेगळा होता. इथं 'सेफ्टी' रिलेटेड विषय चालू आहेत, आणि दुसरी गोष्ट- तुम्ही याची हेल्मेटसक्तीशी तुलना करत आहात- म्हणून राहवलं नाही. तुम्हाला हे सारं अयोग्य / अस्थानी वाटल्यास कृपया दुर्लक्ष करा.)

आपल्याला प्रतल तयार करायला, थोडक्यात जमिनीवर 'सुरक्षितपणे टेकायला' तीन बिंदू लागतातच- अशी निसर्गाने नीटच व्यवस्था करून ठेवलेली आहे. तुमची दुचाकी गाडी चालताना फक्त दोन बिंदूंवर जमिनीशी संपर्कात असते- आणि एक्झॅक्टली या (अत्यंत नैसर्गिक आणि साध्या) कारणासाठी हेल्मेट घालणे फार फार आवश्यक आहे. हेल्मेटच्या वापराचा १) गल्लीबोळांतलं ड्रायव्हिंग २) गाडीचा वेग ३) व्हिजिबिलीटी कमी होणे ४) हॉर्न्स ऐकू न येणे इत्यादी गोष्टींशी शून्य संबंध आहे. पहिल्या गोष्टीसाठी तर उलट हेल्मेट आवश्यक वाटावं इतकी भयानक आणि अराजकसदृश परिस्थीती गल्ली-बोळांत-पेठांत आहे. दुसरं कारण नाही, म्हणजे गाडीचा वेग कमी आहे, म्हणून डोक्यावर आपटण्याचे चान्सेस कमी होतात- असा काही कुणी अभ्यास केलेला, आणि त्याचे निष्कर्ष उपलब्ध आहेत का? व्हिजिबिलिटीचा मुद्दा निव्वळ सवयीचा आहे. चारचाकी गाड्यांमध्ये तर दुचाकीच्या २५% सुद्धा व्हिजिबिलीटी नसते. उजव्या-डाव्व्या बाजूचे 'ए' किंवा 'वाय' टाईप पिलर्समुळे काही वेळा शेजारचं सुद्धा वाहन दिसत नाही. आणि हेल्मेट न घातल्याने डोळ्यांत कचरा जाऊन, रोजच्या अशा वापराने डोळ्यांचे बारा वाजून व्हिजिबिलिटी कमी होत नाही का?- याचाही अभ्यास कुणीतरी करायला हवा. 'हॉर्न्स ऐकू न येणे' हेही असेच. इतके सारे हॉर्न्स वाजत असतात, की हेल्मेट घातल्यावर ते कमी ऐकू येणं, किंवा फक्त मागच्याच गाडीचा ऐकू येणं- हे केवढं मोठं सुख आहे- हे मी स्वतः कितीतरी वर्षं अनुभवलं आहे. हेल्मेट कॅरी करावं लागणं- याबद्दल काय बोलावं? लक्ष्मीरस्त्यावरून लढाई लढत वीस किलोमीटरवर्च्या आपल्या घरी जाताना डझनभर पिशव्या बायको, दोन मुलं अशी कसरत आपण करतो तेव्हा काय अनुभव असतो?

हेल्मेट न घालता गाडी चालवणं हे अत्यंत धोकादायक आहे. हायवेवरच नाही, तर गावातल्या गर्दीतही मोठी गाडी तुम्हाला धक्का मारू शक्ते, आणि तुमचा स्पीड कितीही कमी असला, तरी तुम्ही कोलमडून (कदाचित डोक्यावर) पडू शकता. (जास्त वेग असला तर फुटबॉलसारखे हवेतच गाडीसकट उडू शकता). सक्तीचा, त्याच्या विरोधी मुद्द्यांचा, राजकारणाचा, पालिकेचा, पोलिसांचा- या सर्व विचारांपेक्षा आपल्या जीवाचा विचार फार महत्वाचा आहे. तो गेला तर पुन्हा येत नाही. पुनर्जन्म घेऊन आलाच पिछले जनम का बदला लेनेके लिये हेल्मेट, सक्ती, पालिका, पोलिस, नेते, हेल्मेट कंपन्या यातलं काहीही असेल की नाही, काहीच माहिती नाही.

साजिरा,
मला सलग बराच वेळ / अंतर प्रवास करायची आवड आहे. मी धुळे - दिल्ली हा प्रवास साडे बावीस तास आणि परत येताना साडे तेवीस तासांत पूर्ण केला. इंधन भरणे व दोन वेळा जेवणे याव्यतिरिक्त फारसा थांबलो नाही. १२०० किमी वाहन चालवूनही त्रास जाणवला नाही

हे ओम्नी शिवाय इतर वाहनावर शक्य नाही. हे मत स्वानुभवाने मांडतोय

गेल्या महिन्यांत चार वेळा पुणे मुंबई पुणे प्रवास इंडिका विस्टाने केला. दरेकवेळी ३७५ किमी अंतर असुनही गुडघेदुखीचा त्रास जाणवला. असे का झाले याचा शोध घेतला असता लक्षात आले की इंडिका विस्टाचे क्लच, ब्रेक व अ‍ॅक्सलिरेटर पेडल एका पातळीत नाही. शिवाय गिअर बदलताना क्लच पूर्ण दाबला जातो तेव्हा डावा पाय जितका पुढे पोचतो तितका पुढेपर्यंत उजवा पाय कधीच पोचत नाही कारण ब्रेक अगदी पुसटसा दाबला तरी वाहन चटकन थांबते शिवाय अ‍ॅक्सलिरेटर देखील फार थेटपर्यंत दाबावा लागत नाही शिवाय पुढे चाक असल्याने अ‍ॅक्सिलेरेटर पेडल क्लच व ब्रेक पेडलच्या तूलनेत बरेच अलीकडे आहे.

ओम्नीत पुढची चाके आसनाखाली असल्याने सर्व पेडल्स एकाच पातळीवर आहेत आणि अगदी थेटपर्यंत दाबावी लागतात त्यामुळेच दोन्ही पायांची हालचाल सारख्याच अंतरात होते शिवाय ही पेडल्स वरून खाली दाबली (व्हर्टिकल मूवमेंट) जातात इतर सर्व वाहनांत ती समोर दाबावी (हॉरिझोन्टल मूवमेंट) लागतात. त्यामुळे ओम्नी वगळता इतर वाहनांत दूरच्या प्रवासात वाहनचालकाला गुडघे दुखून येतात असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.

मी हा प्रकार अगदी साडे पंधरा लाखांत मिळणार्‍या इनोव्हा मध्येही अनुभवला. त्यातल्या त्यात बरी म्हणावी अशी फक्त निस्सान इव्हालिया वाटली पण ८५ अश्वशक्ती करिता दहा लाख रुपये ही किंमत फारच जास्त वाटते.

टाटा व्हेन्चर मध्ये ओम्नीची नक्कल केली आहे त्यामुळे तिथे ओम्नीसारखा फायदा मिळतो पण ती का घेत नाही यावर एक स्वतंत्र लेख लिहावा लागेल इतकी मोठी कारणांची यादी आहे.

असो. दिलीप छाब्रिया अथवा तत्सम तज्ज्ञ मंडळींकडून ओम्नीतच काही सुधारणा करता येतील का हे पाहतो.

अहो ओम्नी बदलून टाकायला छाब्रिया जितके पैसे घेतील त्यांत कितीतरी नवीन ओम्नी गाड्या येतील!

एकूण हेल्मेटसक्ती, हेल्मेटची उपयुक्तता व हेल्मेटमुळे होणारी गैरसोय अशा तीन मुद्द्यांच्या विचारांचा हा सौदा आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी लागणार्‍या ज्या ज्या गोष्टी लागत आहेत त्यात हेल्मेटचा प्राधान्यक्रम किती? हा मुद्दा गौण ठरला आहे.

साजिरा, जाऊ दे रे. त्यापेक्षा ओम्नी हे जगातलं सर्वांत उत्तम वाहन आहे हे कबुल कर. ते सोपं जाईल.

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी लागणार्‍या ज्या ज्या गोष्टी लागत आहेत त्यात हेल्मेटचा प्राधान्यक्रम किती >>>
अहो, हा संपूर्णच वेगळा विषय आहे. आपल्या जीवाचा आकडा किती लावायचा, हे ज्याच्या त्याच्या विचारावर अवलंबून आहे. टूजी आणि सिंचन घोटाळे झालेयत म्हणून मी फुटपाथवर अनहायजिनिक फुड देणारी हातगाडी ठेवणारच, शिवाय मी पण कटाक्षाने तिथलंच खाणार- असं म्हणण्यासारखं आहे हे.

बाकी आपली वाहतुकव्यवस्था आणि आपले सोशल सिव्हिक सेन्सेस- हे मोठं अराजक आहेच आहे. आपण महासत्तेची स्वप्न बघतो आहोत, पण आपले 'लढे' अजून फारच सामान्य पातळीवर, बेसिक गोष्टींत अडकलेत, हे सत्य आहे. वी हॅव अ लाँग वे टू गो यट. पण मी माझ्यापासून सुरूवात करणार नाही- असं एकदा म्हणून टाकल्यावर प्रश्नच मिटला. आपण होऊ लवकरच महासत्ता.

मामी, ते तर छाब्रिया सुद्धा सहज कबुल करतील. Proud

फक्त थर्माकॉलचे हेल्मेट मिळते का ? त्यात काळा रंग दिला तर उत्तम
ना रहेगा जड हेल्मेट ना भ्रष्ट ट्राफीक पोलीसांची भिती

साजिरा,
फार दिवसांनी सेन्सिबल लिहिणे वाचले माबोवर. मनःपूर्वक धन्यवाद. लिहीत जा. Happy

*

किरणकुमार,

थर्माकोलचे हेल्मेट पोलीसांना मूर्ख बनवायला चांगले असते. झटपट लोटगाडीवरचं कलिंगड कापून डोक्यात हेल्मेटसारखं घालणार्‍या हुशार बिनडोकाची जाहिरात हिट्ट होते आपल्याकडे.

रस्त्यांवर झालेल्या अ‍ॅक्सिडेंट्स अन हेड-इंजुर्‍यांनी मला किती पैसे मिळतात, याचा हिशोब मी सांगितला, तर "हेल्मेट वापरा", असे लिहायची माझी हिम्मत कशी होते? हा प्रश्न मीच मला विचारायला हवा. हेल्मेट घाला - न-घाला. तुमचं डोकं फुटलं तर मला करोडोंची कमाई आहे, 'आईच्यान'!

जागू यांनी 'मी दुचाकीवर बाजूला उभी होते. तेव्हा क्रेन मुळे डोक्यावर पडले, पण हेल्मेटमुळे वाचले' असे लिहिल्यानंतर 'पुण्यात क्रेन्स अन रेल्वे फाटके नसतात' असला निर्बुद्ध युक्तिवाद वाचून खरंच काळजाला पीळ पडला. हे असले प्रतिसाद आधीच डोक्यावर पडलेल्या लोकांकडूनच येतात असे माझे वैयक्तिक मत आहे.

असो.

मुद्दा हा, की पोलीसाला मूर्ख बनवाल हो! यमदूतांचं काय?

*

बेफि,
Wink

साजिरा, पोस्ट खूप आवडली!
मला वाटतं की हेल्मेट सक्तीला विरोध करणाऱ्यांची बाजू अशी आहे की योग्य मापाचे आणि comfortable हेल्मेट मिळत नाही. इथे हेल्मेट वापरणाऱ्यांनी आपल्याला पटलेले brands, दुकाने इ. सुचवावेत म्हणजे विकत घेणाऱ्यांना उपयोग होईल.

जिज्ञासा, मी Studds या कंपनीचे हेल्मेट वापरतो. वापरायला बिनाकटकटीचे आहे. दुचाकी जिथून घेतली होती तिथूनच घेतले होते.

योकु, लिंकबद्दल धन्यवाद.

इब्लिस, सतत डॉक्टरकीच्या बढाया मारणे बंद करा. एवढी जोरदार प्रॅक्टिस असलेल्या माणसाल सतत मायबोलीवर पडीक राहून दुसर्‍यांना निर्बुद्ध म्हणणे, डोक्यावर पडलेले म्हणत रहाणे, इतरांच्या प्रोफेशनला नावे ठेवत सुटणे(हे इथे नाही पण एरवी करतच असता) आणि स्वतःचा इगो कुरवाळून घेणे यासाठी रिकामा वेळ नसतो..

>>>आपल्याला प्रतल तयार करायला, थोडक्यात जमिनीवर 'सुरक्षितपणे टेकायला' तीन बिंदू लागतातच- अशी निसर्गाने नीटच व्यवस्था करून ठेवलेली आहे.<<<

हे वाक्य समजले नाही.

पादचारी?

================

>>>मुद्दा हा, की पोलीसाला मूर्ख बनवाल हो! यमदूतांचं काय?<<<

इब्लिस,

हा मुद्दा लिहायला आधीचे दोन तीन पॅरा अनावश्यक असावेत.

साजिर्‍या मस्त पोस्ट.

हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. >> ह्या दोन वाक्यांमधला परस्परसंबंध इब्लिस नि बेफि ह्यांच्या मैत्रीएव्हढाच घनिष्ट आहे. Lol

साजिरा, फार दिवसांनी सेन्सिबल लिहिणे वाचले माबोवर.मनःपूर्वक धन्यवाद. लिहीत
जा.>>>>> +१११

हेल्मेट वापराबद्दल वरती लिहिले गेलेच आहे . अजून लिहित नाही . पण प्लीज प्लीज हेल्मेट वा प रा च . ओळखीच्या लोकात खुपशा अपघाताच्या केसेस पाहिल्या आहेत .. वाईट वाटुन राहत मग .. सक्तीसाठी नव्हे स्वताच्या सेफ्टीसाठी तरी वापराच..

>>>मुद्दा हा,की पोलीसाला मूर्ख बनवाल
हो! यमदूतांचं काय?<<< प्रचंड अनुमोदन

<<< >>>आपल्याला प्रतल तयार करायला, थोडक्यात जमिनीवर 'सुरक्षितपणे टेकायला' तीन बिंदू लागतातच- अशी निसर्गाने नीटच व्यवस्था करून ठेवलेली आहे.<<<

हे वाक्य समजले नाही.

पादचारी?>>>

यात न समजण्या सारखे काय आहे? सुरक्षितपणे टेकायला कुठल्याही सजीव / निर्जीव यांना किमान तीन बिंदू लागतातच. चार किंवा अधिक असले तर अतिशय उत्तम. किमान तीन पायांची तरी स्टँड्स असावी लागतातच ना? तीनपाई. चारपाई असेल तर अधिकच उत्तम. तसेच तीनचाकाची रिक्शा रस्त्यावर थांबलेल्या स्थितीत देखील उभी राहू शकते. चारचाकी वाहन अजूनच व्यवस्थित उभे राहते. दुचाकी वाहन तसे राहते का? वाहनचालकाला किमान एक पाय खाली टेकवावाच लागतो. किमान साईडस्टँड लावावा लागतो. मेनस्टँड जास्त सुरक्षित.

तसेच पादचारी - चालताना खरे तर काठी सोबत असणे अतिशय गरजेचे. ब्रिटीश लोक तेच करतात. आपल्याकडे कित्येक लोक साठीनंतर देखील काठी वापरत नाहीत लाज वाटते म्हणून. खरं तर सर्वांनीच वापरायला हवी. आपण चालताना बिनाकाठीचे चालू शकतो / उभे राहू शकतो कारण तेव्हा आपण त्याकरिता विशेष प्रयत्न करीत असतो आपल्याही नकळत. दोन कानांच्या मध्ये असलेल्या द्रवामुळे आपल्या मेंदूला पातळी समजायला मदत होते आणि त्यानुसार आपल्याला दोन पायांवर स्थिर उभे राहण्यास मेंदू विशेष प्रयत्न करतो. अर्थात आपणांस चक्कर आली किंवा झोप आली तर मात्र आपण दोन पायांवर स्थिर उभे राहू शकत नाही.

पुन्हा दुचाकीकडे वळूयात. दुचाकी गतिमान असताना केवळ दोन बिंदूंवर असते ही खरंच एक जोखमीची बाब आहे. वाहनचालकाच्या अथक प्रयत्नांमुळेच ती खाली पडत नाही. कुठल्याही क्षणी या प्रयत्नांत किंचित देखील कसूर झाला तर तिचा तोल जाऊ शकतो. चटकन पाय खाली टेकवणे दरेकवेळी शक्य होईलच असे नाही.

  1. ऑटोमॅटिक गिअर ची वाहने - दोन्ही ब्रेक हातात असल्याने दोन्ही पाय मोकळेच असतात. त्यामुळे पाय टेकविणे तूलनेने सुलभ असते.
  2. गिअर्सच्या स्कूटर - ज्या आता सहसा मिळत नाहीत (बजाज / व्हेस्पा / इटर्नो इत्यादी) - इथे मागचा ब्रेक उजव्या पायापाशी असल्याने एकच पाय (डावा) मोकळा असतो त्यामुळे पाय टेकविणे थोडे अवघड.
  3. गिअर्सच्या बाईक्स - उजव्या पायात ब्रेक आणि डाव्या पायात गिअर शिफ्टर त्यामुळे. दोन्ही पाय मोकळे नसणे. आधी वाहन न्यूट्रल मध्ये करून मग डावा पाय टेकविणे. मग पुन्हा वाहतूक हळूहळू पुढे जाऊ लागली की चटकन उजवा पाय टेकवून वाहन पहिल्या गिअर मध्ये घेणे, पुन्हा उजवा पाय वर ब्रेक पेडलवर घेऊन डावा पाय खाली टेकवत क्लच हळूहळू दाबत / सोडत आणि त्यानुसार अ‍ॅक्सिलरेटर थ्रोटल कमी जास्त पिळत वाहन गर्दीतून हळूहळू पुढे काढणे. यातही पाय टेकविणे तूलनेने अवघड.
  4. जुनी बुलेट - यात गिअर शिफ्टर उजवीकडे आणि ब्रेक पेडल डावी कडे असल्याने उजवा पाय जमिनीवर टेकवावा लागतो. हे माझ्या मते फार अवघड काम. मी आधी बजाज कब स्कूटर चालवायचो नंतर १९९७ मध्ये बुलेट चालवायला लागलो. गर्दीतून वाट काढताना उजवा पाय खाली टेकवायची मानसिकताच होत नव्हती. उजवीकडून जाणारी वाहतूक आपल्या पायावरून जाईल अशी भीती वाटायची. पुण्यातल्या दुभाजक नसलेल्या अरूंद रस्त्यांवरून तर हे फारच जाणवायचे.

असो. तर हे सारे पाय टेकविण्याचे कौशल्य सरावाने जमत असले तरीही दरेकवेळी इतके व्यवस्थित ते जमेलच असे नाही. त्यामुळे तोल जाऊ शकतो. म्हणून हेल्मेट हवेच. हेल्मेट सक्तीला माझा जोरदार पाठिंबा.

हेल्मेट सक्ती विरोधकांना दोन पर्याय अजून ही खुले आहेत कायद्याने.

  1. ज्यांना आपण ताशी तीस किमीपेक्षा जास्त वेग घेत वाहन चालविणार नाही असे खात्रीने वाटते अशांनी ५० सीसी पेक्षा कमी क्षमतेची दुचाकी वापरावी. त्या वाहनांची अश्वशक्ती, उंची आणि वजन देखील कमी असते. मुख्य म्हणजे या वाहनचालकांना हेल्मेटची सक्ती नाहीये. बिनधास्त बोडक्या डोक्याने चालवा.
  2. पगडी घालणार्‍या विशिष्ट समुदायाच्या अनुयायांनी कुठलेही दुचाकी वाहन चालविले तरी त्यांना देखील हेल्मेट सक्ती नाहीये.

@ साजिरा,
.
<< व्हिजिबिलिटीचा मुद्दा निव्वळ सवयीचा आहे. चारचाकी गाड्यांमध्ये तर दुचाकीच्या २५% सुद्धा व्हिजिबिलीटी नसते. उजव्या-डाव्व्या बाजूचे 'ए' किंवा 'वाय' टाईप पिलर्समुळे काही वेळा शेजारचं सुद्धा वाहन दिसत नाही. >>

इथे ओम्नी फायदेशीर ठरते. ओम्नी चालविण्याची सवय असल्यामुळेच मला इतर वाहनांत हा त्रास जास्त प्रकर्षाने जाणवतो. म्हणूनच समोरुन अपघाताच्या क्षणी ओम्नीत जीव वाचण्याची शक्यता नसली तरी असे अपघात पूर्णपणे टाळणे देखील ओम्नीत निदान मला तरी सहज शक्य होते.

<< मात्र तुमच्या वाहनाबद्दल तुम्हीच काही निगेटिव्ह गोष्टीही लिहिल्या आहेत. (''सीटबेल्ट लगेच वरच्या बाजूला खेचला जाऊन अतिघट्ट होतो. खांद्यांना काचतो. वाहनाचे स्टीअरिंग फिरविणे, मान वळवून बघणे या सर्वांना प्रचंड त्रास होतो''; ' >>

याबाबतीत मारूती तील तज्ज्ञ मंडळींशी नुकतेच बोलणे झाले. त्यांच्या मते हा ओम्नीचा दोष नाहीये. उलट सीटबेल्टचे जे खरे कार्य आहे ते अतिशय प्रामाणिकपणे ओम्नीत घडून येत आहे. इतर कुठल्याही वाहनापेक्षा जास्त प्रभावीपणे. हे ओम्नीच्या विशिष्ट उंचीमुळे आणि त्यानुसार असलेल्या सीटबेल्टच्या रचनेमुळेच. दोष असलाच तर तो विषम पातळीतील रस्त्यांचा आहे. अगदी घाट रस्त्यांवर देखील डावी व उजवीकडील चाके समान पातळीत राहतील असे रस्ते बनविणे सहज शक्य आहे. म्हणूनच बेफिकीर यांना पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर ओम्नी चालवून देखील सीटबेल्टचा असा त्रास जाणविला नाही.

सीटबेल्टची सक्ती करण्याआधी रस्त्यांमधला हा दोष दूर होणे गरजेचे. एकदा असे रस्ते असले म्हणजे माझी सीटबेल्ट सक्तीला हरकत नसेल.

[सिनि आता खरंच दीवार चा सीन बरं का - हां मै साईन करूंगा, लेकिन पहले उसका साईन लेके आओ जिसनें ....]

Pages