निसर्गाच्या गप्पा (भाग २३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 10 November, 2014 - 14:09

निसर्गाच्या गप्पांचा धागा २३ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.

"हिवाळा" हा सगळया ऋतुंमधे आल्हाददायक ऋतु वाटतो. हिवाळ्याची पहाट खुपच रम्य वाटते. पहाटे सभोवताल पसरलेले धुके, गार वारं, पक्षांचा किलबिलाट, गाईचे हंबरणे, कोवळ्या उन्हाचा किरणोत्सव, आंगणात पेटवलेल्या चुलीचा धुर,वाफाळता चहा.. सगळेच कसे रमणिक आणि प्रसन्न वाटते.

हिवाळ्यात थकवा, चिडचिड जाणवत नाही, शीण येत नाही, एरवी नकोस झालेले उन सुदधा हवेहवेसे वाटते. या दिवसात अहार वाढलेला असतो तसेच पचन शक्ती पण चांगली असते. या ऋतूत सशक्त होऊन ही ताकद साठवुन वर्षभर पुर्वायची असते..

तसेच थंड हवामानामुळे या दिवसात फळ भाज्यांची रेलचेल असते.. पेरु,सिताफळे,पपई,, चिक्कु अशा मधुर फळाची मेजवानी असतेच जोडीला संत्रे, मोसंबी अशी निमफळ पण चाखायला मिळतात. थंडी मुळे फुला - फळांचे रंग अधिकच गडद आणि लोभस वाटतात.

या दिवसात काही झाडांची पान गळती असते तर..काही झाडे ओसंडुन बहरत असतात.
एकी कडे बुची , पारिजातकांचे सुगंधीत सडे पडलेले असतात तर दुसरीकडे शेवंती, चमेली, सायली नटलेली दिसते..
तर असाहा सुगंधोत्सव कधीच संपु नये असे वाटते...

आपण सगळे नुकतीच दिवाळी जलौषात साजरी करुन एका वेगळ्याच जोशात कामाला लागलेले असतो... आता वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे! आपले सगळे सण समारंभ निसर्गाशीच निगडीत आहेत.. उदा. कार्तीक महिन्यातच तुळशी विवाहा असण्याचे कारण असे की या महिन्यात तुळस बहरलेली असते , तिला भरपुर पान आणि मंजीर्‍या आलेल्या असतात.. म्हणजेच विवाहा योग्य झालेली असते... या सणाच्या निमित्याने कन्या योग्य वयात आल्यावरच तिचा विवाह करावा असे तर आपल्या पुर्व़जांना सुचवायचे नसेल ना! असे श्री दिलीप व सौ पोर्णिमा कुलकर्णीं यांच्या एका पुस्तकात वाचल्याचे आठवते..

शिवाय, तुळशीच्या लग्नासाठी लागणारे सगळे साहित्य आपल्याला निसर्गचे देते..उदा. विवाहासाठी लागणारी झोपडी किंवा मांडव उसाची किवा ज्वारीची असते,.. पुजेच्या साहित्यात बोरं, चिंचा, आवळे, सिताफळ हवेच. म्हणजेच काय तर सणा समारंभाच्या निमित्याने आपण निसर्गाचीच पूजा करतो, आभार मानतो. आणि असे करणे गरजेचे आहे.कारण आपण निसर्गाकडुन नेहमिच काही ना काही घेत आलो आहोत. त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, कधी न फेडु शकणारे.

तर अशा या "कधी न संपावा" अस वाटणार्‍या रुतुचे आपण सगळे मना पासुन नि.ग. वर स्वागत करुया.

(वरील फोटो व लेखन मायबोलीकर निसर्गप्रेमी सायली पातुरकर यांच्याकडून)

नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाच्या गप्पा (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>पण तुमच्या खिडकीत , फीडर टाइट कसे बांधले आहे की काही वेगळा सपोर्ट आहे?सांगाल का?माझ्याकडे कबुतरांचा फार त्रास आहे म्हणून हे फीडर बांधले नाही.सांगाल का?

देवकी. फीडर (म्हणजे बॉटल)च्या निळ्या बुचाखाली (बॉटलच्या मानेला) चक्क सुतळ बांधली आणि ती खिडकीच्या दरवाजाच्या हँडलला घट्ट बांधून टाकली. खिडकीचे दार जुन्या पद्धतीचे आहे अआणि खालच्या बाजूस ती खिळ्यासारखी कडी आहे त्याला टेकून फिडर राहते. अर्थात चिमण्या दोन वगैरे बसल्या त्या चमच्यावर तर थोडे हलते पण फार नाही.
मी तळमजल्याला राहते आणि इथे कबुतरे येत नाहीत निदान माझ्या खिडकीत तरी. कबुतर दिसले असते तर मी काढून टाकणारच होते फिडर. पण सुदैवाने आली नाहीत कबुतरं कधीच. तुम्ही आणखी लहान बाटलीचे फिडर बनवलेत आणि त्यात चिमणीबसू शकेल इतक्याच आकाराचा चमचा/डाव बसवलतात तर मला वाटतं कबुतरं येणार नाहीत. त्यांचं वजन पेलू शकणार नाही फिडर आणि त्यामुळे त्यांना खाता येणार नाही धान्य.

मला निळू दामले यांच्या, माणूस आणि झाड या पुस्तकाबद्दल सविस्तर लिहायचे आहे.
शहरातील म्हणजेच गच्चीतील / बाल्कनीतील शेती असा त्याचा विषय आहे. मराठी विज्ञान परीषद आणि ते स्वतः यांनी या प्रयोगाचा प्रचार करायचा खुप प्रयत्न केला, पण तो प्रयोग यशस्वी झाला नाही. एखादे सामाजिक वा सार्वजनिक कार्य करताना, ते सेवाभावीच असावे त्यातून कुणाचा स्वार्थ साधला जाऊ नये अशी विचित्र धारणा असते लोकांची. समजा अशी झाडे लावली आणि त्यातून हिरव्या मिरच्या, वांगी, भेंडी मिळाली तर ती कुणी घ्यायची, कशी वाटायची यावरून वाद होत असत. ( आमच्या सोसायटीत नारळ सभासदाना विकले जातात ).. प्रयोग अयशस्वी व्हायचे हे एक महत्वाचे कारण.. त्याशिवाय झाडांना माती लागते ती कुठून आणायची ? झाडांमूळे छत गळते, डास होतात असेही गैरसमज असतात.. या सगळ्या मुद्द्यांचे निराकरण तर या पुस्तकात आहेच पण झाडांचे एकंदर जीवशास्त्र छान समजावून सांगितले आहे. ( राजहंस प्रकाशन, किंम्मत ९० रुपये )

मूळातून पुस्तक वाचण्यासारखे आहेच. पण त्यात सांगितलेले काही प्रयोग करून बघितले पाहिजेत.
झाडांना फारशी माती लागत नाही, जी लागते ती घरी "तयार" करता येते. उसाचा रस काढून झाल्यावर जे चिपाड
उरते त्यात झाडे चांगली वाढतात. पिशवीत अर्ध्या भागात ते भरायचे. मग त्यावर सुका पालापाचोळा दाबून बसवायचा. अगदी वर मूठभर नेहमीची माती घालायची. या मिश्रणात झाडे उत्तम वाढतात. लागलाच तर बाहेरून आधार द्यायचा.
ओला कचरा घालायचा तर तो मातीत न मिसळता वर पसरायचा. कारण तो कुजायला प्राणवायू लागतो. ह़ळू हळू
त्याची माती होते.

मायबोलीकर डॉ उज्ज्वला दळवी, यांचा लोकप्रभा मधे एक सुंदर लेख आलाय.

http://www.loksatta.com/lokprabha/antibiotics-1041086/

अवश्य वाचा..

त्यातला एक भाग.

रेझिस्टंट, जीवघेणे जंतू एकदा तयार झाले की त्यांची लागण कुणालाही होऊ शकते, अगदी इमाने-इतबारे सात दिवस अँटिबायॉटिक घेणाऱ्यालाही! मुंबईच्या बसेस-लोकल्समध्ये शिंका-खोकल्यांतून त्या जीवाणूंचं भरघोस वाटप होतं. हे असंच चालू राहिलं तर आपल्या पिढीच्या हयातीतच कॉलऱ्याची पुन्हा 'मरिआई' होईल; प्लेग 'काळं मरण' बनून येईल आणि सध्या नामोहरम वाटणारे स्ट्रेप्टोकॉकाय हृदयाला घरं पाडून तिथे त्यांच्या सैन्याचे तळ ठोकतील!
ही लढाई फक्त औषध कंपन्यांची आणि डॉक्टरांची नाही. पिकांना आणि प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या अँटिबायॉटिक्सबद्दल, सांडपाण्याच्या प्रदूषणाबद्दल जगात सगळीकडेच हाकाटी व्हायला हवी. सरकारांनी त्या बाबतीत लक्ष घालायला हवं. अँटिबायॉटिक्सचा वापर कमीत कमी व्हावा म्हणून नव्या, प्रभावी रोगप्रतिबंधक लशींचे शोध लागायला हवेत.

http://www.youtube.com/watch?v=DfX6mY5m58I

नॅशनल जिओग्राफिक वर WILD नावाची सिरीज चालू आहे. भारतात दिसत नसेल तर यू ट्यूबवर काही भाग आलेत, अवश्य बघा.

purple rumped sunbird male. हा माझ्या घराच्या अवतीभवती रोजच दिसतो. जोडीने bleeding heart vineच्या लाल फुलातला मध पित असतात.

सुंदर फोटो, वर्षा.
हा पक्षी इतका चंचल असतो, कि असा नीट फोटो काढणे कठीण असते.

साधना,
तू अगदी अवश्य वाचच ते पुस्तक.

अश्विनी, उज्ज्वला रेगे या नावाने असणार बहुतेक त्या.

सनबर्डचा फोटो जबरीए .....

http://www.maayboli.com/node/24654 - सनबर्डला हा माझा झब्बू ... Happy

दिनेशदा - "माणूस आणि झाड" - विकत घेणारच आणि त्याप्रमाणे प्रयोगही करणार ...

डॉ. उज्ज्वला दळवी म्हणतात ते अगदी खरे आहे. या अँटिबायॉटिकच्या अतिरेकी वापरामुळे पुढील पिढीचे आयुष्य धोक्यात आले आहे. सध्याचे आमच्या ओळखीतले अनेक डॉ. अँटिबायॉटिकचा वापर टाळत आहेत. घरगुती उपचार, क्रोसिन एवढेच काही दिवस वापरुन पहा म्हणून आपणहून सांगताहेत - असे अनेकजणांनी सुरु केले तर फार मोठा फरक पडेल - या सूक्ष्मजीवांच्या अँटिबायॉटिक रेझिस्टन्ट स्ट्रेन्समधे ... Happy

मघाशी सांगायचं राहूनच गेलं... आमच्या शेजार्‍यांकडच्या नारळाच्या झाडावर घारीने घरटे केलेय..:स्मित: सकाळी सकाळी सहा साडेसहा पासून त्यांचे चीत्कार ऐकू येऊ लागतात.

आणि आणखी एक... मागच्या वहिनींच्या चिक्कूच्या झाडावर बांडगूळ वाढलंय. १-२ दिवसांत त्याचा फोटो काढून इथे देईन. आत्ताच फ्लॉवर्स ऑफ सह्याद्रीमधे नाव बघितलं - Dendrophthoe falcata हे नाव आहे त्याचं.

शांकली, घारी सहसा एवढ्या खाली आणि घरांजवळ घरटे बांधत नाहीत... हे नवलच आहे.

शशांक, लहानपणापासून चिंचा, बोरे, पेरू वगैरे खाल्ले तर लहान मुलांचा सर्दी पडश्याचा प्रतिकार चांगला होतो, असे ऐकले होते. माझ्या ओळखीतल्या सगळ्या लहान मुलांना मी हे आवर्जून खायला लावतो. आणि तसेही हा मेवा सगळ्यांनी खाल्लाच पाहिजे नाही का ?

हो दा, आम्हाला पण याचं नवलच वाटतंय. पण त्यामुळे झालंय काय; सकाळी नेहेमी हजेरी लावणारे छोटे छोटे मेंबर्स येत नाहीयेत. दुपारी जेव्हा त्या दोघी घारी फारशा येत नाहीत त्यावेळी चश्मेवाला फक्त एकदा येऊन काहीतरी निषेधाचं बोलून गेला तेव्हढंच!... कावळे मात्र कावकावून खूप नाराजी दाखवत असतात. काल दुपारी जवळजवळ ७-८ कावळ्यांची बहुधा निषेध सभा झाली असावी आणि शेवटी दुर्लक्ष करावं असा काहीसा ठराव संमत झाला असावा.

वर्षा काय सुंदर फोटो आलाय!
शांकली ...लक्ष ठेव घारीवर.
चश्मेवाला फक्त एकदा येऊन काहीतरी निषेधाचं बोलून गेला तेव्हढंच!...>>>>>>>>> हेहेहेहे!
अँटिबायॉटिकचा वापर टाळत आहेत. >>>>>>>>>>>> आम्हीही मुलांना शक्यतो अ‍ॅन्टीबायोटिक्स देण्याचं टाळतच होतो.
मंडळी ..........अरे काय हा पाऊस..............कालही संध्याकाळपासून रात्रीही पडत राहिला.
आत्ता ५ वाजताच सुरू झालाय अगदी पावसाळ्यासारखा.............गडगडाट इ.इ.
माझी आवळा कॅन्डी २ दिवसांपूर्वी लागोपाठ २ दिवस गच्चीतच. पण काल मात्र गच्चीत मुलांचे पाय वाजत होते आणि उई काप्या इ.इ. आरोळ्या ही. म्हणून गच्चीत बघायला गेले . कारण मागील वर्षी याच सीझनला माझी बरणी मुलांनी लाथाडली होती. त्यात कॅन्डीच्या प्रथमावस्थेतले आवळे होते.
तर या वेळी माझी कॅन्डी मुलांपासून आणि मुख्य म्हणजे या पावसापासून वाचली....वेळेवर खाली आणली.
आता कडक उन पडल्याशिवाय काही खरं नाही.............अजून वाळायला हवीये.

वर्षाताई, फोटो तर छान आहेच पण ते फुल कसले सुंदर आहे. मला मधुमालतीची आठवण झाली पण ती वेल आणि हे झाड. मी ती तॉम याम सुपाची शेंग इथे टाकेन. माझ्या आयफोनवर आहे.

सर्वांच्या पोष्टी खूप छान आहे.

साधना, त्या पुस्तकात. झाडांच्या मूळाचे, पानांचे कार्य कसे चालते. बी का रुजते, फळे का धरतात अश्या सर्वाची शास्त्रीय माहिती अगदी सोप्या भाषेत दिली आहे. शैली फारच सुंदर आहे. अगदी छोटेसे पुस्तक आहे. एका दिवसात वाचून होते.
तूला प्रयोग करायला छान वाव आहे.

शांकली, पक्षी घरटे करताना सुरक्षितता आणि मुबलक अन्न या दोन गोष्टी बघतात. एवढ्या भर वस्तीत घारींना सुरक्षित का वाटले असावे ?
आणि कावळे त्यांच्या पिल्लाना त्रास दिल्याशिवाय राहणार नाहीत.

ह्यावर्षी पाऊस नगरवर मेहेरबान. आम्ही होतो त्या जिल्ह्यात ४ वर्षे तर जेमतेम पाऊस. वीजा आणि गडगडाट मात्र भरपुर.

गर्जेल तो पडेल काय, हे अगदी खरं वाटायचं तेव्हा.

Pages