हेल्मेटसक्ती

Submitted by प्रकाश घाटपांडे on 12 November, 2014 - 22:55

अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्‍या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी उचल्यांविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरदा, मला प्रयत्न करूनही न डुगडुगणारं हेल्मेट मिळालेलं नाही.
आणि मुळात सपे, शपे, नापे, गंपे, रपे, भपे, बुपे, शुपे, सोपे, मंपे, स्टेशन असल्याठिकाणी स्कूटरवरून फिरताना 'हेल्मेटमुळे मिळणारी सेफ्टी' हे नुसते इल्यूजन आहे.
जिथे तुमचा वेग भरपूर असतो, चारचाकी ट्रॅफिकही भरपूर असतो अश्याच ठिकाणी या हेल्मेटांचा उपयोग होतो.
इथे आपण बैलगाडीशी स्पर्धा करणार वेगामधे आणि हेल्मेटमुळे सेफ्टी म्हणणार याला फारसा अर्थ नाहीये.

एखाद्या गोष्टीची सक्ती केली की "करत नाही जा !!! "म्हणणे ही पुणेरी प्रवृत्ती आहे Light 1

पुण्यात अनेक ठिकाणी सिमेंटचे रस्ते बनवले आहेत. वारजे मधे अशाच एका ठिकाणी २००८ मधे माझ्या वडिलांचा अपघात झाला. त्यांच्या दुचाकीचा वेग कधीच ३० च्या वर नसायचा (आता त्यांनी दुचाकी चालवणे पूर्णपणे बंद केले आहे या घटनेपासून). शेजारुन कट मारुन गेलेल्या कार मुळे तोल जाऊन ते रस्त्यावर पडले.. पडताना थेट उजव्या कानाच्या वरचा डोक्याचा भाग रस्त्यावर आपटला गेला. १ महिना आयसीयू मधे काढला. आता त्यावेळी हेल्मेट असते तर... हा जर तर चा भाग आहे. तरी असं वाटतं की कदाचित त्यावेळी हेल्मेट घालून दुचाकी चालवत असते तर थोडक्यात निभावलं असतं.

वेळ काही सांगून येत नाही. त्यामुळे अंतर कितीही कमी असलं तरी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरावेच हा सल्ला स्वानुभवातुन आलेल्या शहाणपणातून द्यावासा वाटतो. स्वतःची आणि पर्यायाने कुटुंबाची सुरक्षितता पाहता, सकृतदर्शनी वाटणारे हेल्मेटचे तोटे (हातात घेऊन सारखं वागवायला लागतं, घोड्याच्या डोळ्याला झापडं लावल्याने जशी त्याची दृष्टी फक्त समोरच्याच बाजूला राहते.. आजूबाजूला पाहता येत नाही, अशी अवस्था हेल्मेटने होते, डोकं जड होतं, केसांची वाट लागते, पावसाळ्यात सारखं काचेवर पाणी जमून धुरकट दिसतं वगैरे वगैरे ) एकदा सवय झाली की नक्कीच जाणवत नाही.

ही पोस्ट आतापर्यंत आलेल्या कुठल्याही एका विशिष्ठ प्रतिसादाला उद्देशून नसून अनेक नातेवाईक आणि मित्रपरिवार यांच्या बोलण्यातून जाणवलेल्या हेल्मेट वापरण्याबाबतची कुरकुर या पार्श्चभूमीवर आहे. Happy

कमी गतीने गाडी चालविताना डोक्याला जबरी मार बसायला काय हरकत आहे?

अती वेगात गाडी चालवताना डोक्यावरच पडले पाहिजे अशी सक्ती का?

सोय गैरसोय हा वयक्तीक विशय आहे. एकुणात हेल्मेटसक्तीत गैर काहीच नाही.

अवांतरः

अपघातांच्या पाचपट लोक तंबाखूने मरतात. त्यावर बंदी का आणत नाहीत?

नी, हिंजवडीमधेच जाते मी गाडीवरून
आणि तसंही आमच्या ऑफिसात बिना हेल्मेट गाडी आत सोडत नाहीत (म्हणजे आपण हेल्मेट घातलेलं नसलं की गाडीला आत सोडत नाहीत) त्यामुळे हेल्मेटल पर्याय नाही. पण हा प्रकार एकंदरच त्रासदायक आहे Sad

>>अपघातांच्या पाचपट लोक तंबाखूने मरतात. त्यावर बंदी का आणत नाहीत?<<
तंबाखू सेवनाची सक्ती नाही ना! ती स्वेच्छा आहे. इथे हेल्मेट वापरण्याची सक्ती आहे ना!

१. पुणे आणि इतर शहरे यामध्ये काहीही फरक नाही.

२. जर शून्य ते कितीही कि.मी. वेगाने स्कूटर जात असेल तर डोके आपटले तर ते फुटणारच. त्याचा वेगाशी फारसा संबंध नाही.

३. लेडिज हेल्मेट असा प्रकार नाही. कदाचित हॉर्स रायडिंग ला घालतात त्या हॅट सारख्या हेल्मेटला लेडिज हेल्मेट म्हणत असावेत. ते बेकायदेशीर आहे. त्याने डोक्याचा बचावसुद्धा होत नाही.

४. मी दिल्ली, बेंगलोर, चेन्नै, हैदराबाद या चारी शहरामध्ये (आणि आता पुण्यात) बराच काळ मोटरसायकल आणि स्कूटर चालवली आहे. माझे वैयक्तिक मत हेल्मेट सक्ती असावी असेच आहे.

५. सक्ती नको असेल तर पोलीस आयुक्तांनी सांगितलेला मार्ग स्वीकारला पाहिजे. आपले लोकप्रतिनिधी लोकसभेत आणि विधानसभेत आहेत. त्यांच्याकरवी कायद्यात बदल घडवून आणावा.

बहुतेक हेल्मेटवाले आजूबाजूला न बघताच चालवतात गाडी. समोरचेच दिसते फक्त त्यांना. बाजूला गल्ली आहे तिथून वाहने येतात, आपण बाजूच्या लेनमधे घुसतोय तर त्या लेनमधे कोण आहे का वगैरे त्यांना दिसतच नाही आणि सवयीने प्रॉब्लेम पण होत नाही.
पावसाळ्यात धुरकट काच झाली तरी कुठे बिघडलं.. फारतर काय होईल आजूबाजूच्यासारखे पुढचेही दिसणार नाही. काय फरक पडतो.. आपण हाणायची गाडी. झाला प्रॉब्लेम तर दुसर्‍याचा. आपण हेल्मेट घातलंय म्हणजे आपण लय भारीच.

>>५. सक्ती नको असेल तर पोलीस आयुक्तांनी सांगितलेला मार्ग स्वीकारला पाहिजे. आपले लोकप्रतिनिधी लोकसभेत आणि विधानसभेत आहेत. त्यांच्याकरवी कायद्यात बदल घडवून आणावा.<<
होय हेच लोकशाहीला धरुन आहे. असे केले तर ज्यांना वापरायचे आहे त्यांना मुभा आहेच व ज्यांना वापरायचे नाही त्यांना सक्ती नाही. अशी परिस्थिती होईल

हेल्मेटबाबत Uhoh
७-८ वर्ष गाडी चालवतेय पूण्यात्...बाणेर पासुन सातारा रोड ह्या एरिपासुन्......एक दोन वेळ पड्लेय पण...पण हेल्मेट नकोच वाटते ते घालुन गाडी चालवता येत नाहि..हेल्मेटम्ध्ये बसल्यासारखे वाटते....

mazya parichayat pune gaav-bhagatach helmet naslyamule duchakivarun padun dokyala serious dukhapat zalyachya don cases ahet.
shivay side-vision la kahi problem mala tari alela nahi. Vyavasthit disata sagala. Side mirrors madhe pan baghayala adchan nahi yet.
Pavasat thodi adchan yete, pan mag mi cover ughada thevun chalavate

साडेसहा वर्षे हेल्मेट घालून दुचाकी चालवलेली आहे. काहीही अडथळा वाटला नाही.

आजूबाजूला बघायचे असेल तर गाडीला साईड मिरर नाहीयेत का? वैयक्तिक डिस्कम्फर्ट आणि सेफ्टी ह्या गोष्टींमधे तुलना कशी काय होऊ शकते बुवा?

हेल्मेट वापरण्याची सक्ती नको आग्रह हवा.

मला व्यक्तिशः हेल्मेट वापरणं पसतं आहे. डोकं शाबूत राहतं प्लस स्किन, नाक डोकं, हवा आणी वार्‍यापासून सुरक्षित राहतं. पण काही लोकांना जेन्युइनली हेल्मेटचा प्रॉब्लेम असतो. दिशा कळत नाही किंवा हेल्मेट घातल्यावर नजरेवर मर्यादा येतात, एरवी नजरेचा जितका आवाका असतो त्यापेक्षा तो घटतो. आणि आजूबाजूची वाह नं कळत नाहीत. हॉर्न नीट ऐकु येत नाहीत. धडका धडकी होते. मानेची दुखणी वेगळीच. अशांना सक्ती असू नये. कारण हे लोक हेल्मेट न घालता जितके सुरक्षित आहेत त्यापेक्षा घालून जास्ती असुरक्षित होती ल.

या शिवाय काही लोकांची कामं थांबत थाम्बत फिरतीची असतील तर दर अर्ध्यातासाने हेल्मेटची काढघाल. ठेवण्याची कसरत. टू व्हिलर वरून माल पोचवणार्‍याची तर हालत होईल जर हेल्मेट सक्ती केली तर.

लेडीज हेल्मेट नसते हे ह्या धाग्यामुळे अज्ञान दूर झाले.

आणि हे खर आहे की एकदा सवय झाली की हेल्मेट नसले तर चुकल्याचुकल्यासारखे वाटते. आणि हेल्मेट घातल्यावर काय आणि न घातल्यावर काय आपण साईड मिरर मधूनच मागचे पाहतो. मागूनचे जे काय यायचे ते साईडने जाते. त्यासाठी मागे मान वळत नाही.

पण काही अडचणी पाहता मलाही वाटत की सक्ती असू नये पण प्रत्येकाला आपल्या सेफ्टीची जाणीव असावी.

हेल्मेट वापरण्याची सक्ती नको आग्रह हवा. >>> आपल्याकडे सक्ती केल्याखेरीज कुठलाही नियम सहज पाळला जात नाही दक्षिणाजी. वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे, कॉर्पोरेटमधे अनेक कंपन्यांनी हे सुरू केले कारण त्यांना त्यांच्या एम्प्लॉईज्च्या सेफ्टीची काळजी आहे प्लस इट इज अ सोशल रीस्पॉन्सिबिलिटी!

हेल्मेटबरोबरचा डिस्कम्फर्ट सवयीने नाहीसा होतोच!

धाग्याशी व सक्तीला विरोध असणार्‍यांशी सहमत.

राँग साईड मरुदे हो, सर्वाधिक वीज बचतीचे फॅन आपल्याला दुचाकीवर भेटतील.
राइट साईडने रात्रीच्या वेळी दिवा न लावता दुचाकी चालवणारे कोणती वीज बचत करत असतात परमेश्वर जाणे.

वैयक्तिक अनुभवः हेल्मेट वापरावे. मी एकदा दुचाकीवरुन फेकला जाऊन आपटलेलो आहे. हेल्मेटमुळे डोक्याच्या मागे इजा झाली नाही.

हेल्मेट सक्ती हायवेवर असावी , शहरात गरज नाही तसेही ज्यांना भ्या वाटते ते घालतातच कि न सांगता. नियम बनवायचे आणि चौकाचौकात उभे राहून चिरीमीरी खात रहायचे हा ट्राफीकवाल्यांचा जूना धंदा आहे, पण आता चिरीमिरीची रक्क्म वाढत चालली आहे. शहरी भागासाठी हेल्मेट सक्ती केल्यास हेल्मेट डिझाईन बदलणे अत्यावश्यक वाटते. सध्या सायकलसाठी असणारे हलके हेल्मेट वापरता येण्यासारखे आहे.
अपघातांचे प्रमाण आणि त्यातील मृत्युचे प्रमाण यांचा हेल्मेट घालणे वा न घालणे याच्याशी संबंध जोडून उपयोग नाही. पुण्यातील अपघात बहुतांशी रत्याच्या अवस्थांमुळे आणि बेशिस्त ड्राईंविंगमुळे होतात.
रस्तावर रातोरात केलेले स्पीडब्रेकर, डिव्हायडर, रस्ते दुरुस्तीसाठी खोदाई आणि त्यांची आगाउ सुचना मिळणेचे दृष्टीने आवश्यक ते उपाय (कॅट आईज, थर्मोप्लास्ट पेंतचे पट्टे, सूचना फलक) वेळीच न करणे ही बाब अपघातांना आमंत्रित करत असते.
मला हेल्मेट घालायला अजिबात आवडत नाही, मुळात ते घेवून मिरवायचे कुठे कुठे त्यात कामाचा भार कमी असतो का हेल्मेटचा भार घेवून फिरायला. या सक्तीला कडाडून विरोध आहे.

पुण्यातील अपघात बहुतांशी रत्याच्या अवस्थांमुळे आणि बेशिस्त ड्राईंविंगमुळे होतात.
रस्तावर रातोरात केलेले स्पीडब्रेकर, डिव्हायडर, रस्ते दुरुस्तीसाठी खोदाई आणि त्यांची आगाउ सुचना मिळणेचे दृष्टीने आवश्यक ते उपाय (कॅट आईज, थर्मोप्लास्ट पेंतचे पट्टे, सूचना फलक) वेळीच न करणे ही बाब अपघातांना आमंत्रित करत असते.

>> याच्याशी सहमत.

हेल्मेट चा उपयोग आहे की नाही हा खरा मुद्दा नाहीये.
खरा मुद्दा हा आहे की ह्या भारत सरकारला हेल्मेट सक्ती करायचा अधिकार आहे का?

त्याची कारण म्हणजे

- कोणालाही दुचाकीवरुन जाताना अपघात झाला तर सरकार उपचाराची फुकट व्यवस्था करत नाही. कोणी मेले तर भरपाई देत नाही. मग सरकारला काय अधिकार आहे हेल्मेट सक्ती करायला? ज्या देशात कल्याणकारी योजना आहेत आणि वैद्यकीय उपचार सरकारची जबाबदारी आहे तिथे अशी सक्ती समजु शकतो, भारत सरकार कुठल्या अधिकारात हे सांगते आहे?
- हेल्मेट न घालता एखाद्याने दुसर्‍याला इजा केली ( अपघात करुन ) तरी सरकार काही वेगळी जबाबदारी घेत नाही.
- हेल्मेट न घातल्या मुळे कोणी कायमचा अपंग झाला, तर सरकार पेन्शन वगैरे देत नाही. हेल्मेट घातले असले तरी देत नाही.
- हेल्मेट घातले कींवा नाही ह्याने सरकार वर कुठलाही वेगळा बोजा पडत नाही.
- विमा कंपनी हेल्मेट घालत नसाल तर जास्त प्रिमियम मागू शकते, पण भारत सरकार कुठलाही नैतिक अधिकार नाही सक्ती करायचा.

हेल्मेट घातल्यावर अनेकदा आपल्या वेगाचा अंदाज येत नाही. हे जास्त घातक आहे.

हे काय भलतेच हेल्मेट घातल्यावर वेगाचा अंदाज येत नाही. कहर आहे...यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे कळत नाहीये.

डोक्यावर मडकं घालून पुढे पहाण्यापुरते भोक पाडले तर जो प्रकार होईल तसले हेल्मेट म्हणजे उपाय कमी आणि अपाय जास्त. व्हिजन ब्लॉक होते त्याने.

तुम्ही अशी हेल्मेट कुठे पाहिलीत देव जाणे. पण आयएसआय प्रमाणीत हेल्मेटला कुठेही व्हिजन ब्लॉक होत नाही हे मी खात्रीशीररित्या सांगू शकतो. गेली १२ वर्षे पुण्यात मी हेल्मेट घालून गाडी चालवतोय. एकदाही व्हिजन ब्लॉक झाल्याचे जाणवले नाही.

बहुतेक हेल्मेटवाले आजूबाजूला न बघताच चालवतात गाडी. समोरचेच दिसते फक्त त्यांना. बाजूला गल्ली आहे तिथून वाहने येतात, आपण बाजूच्या लेनमधे घुसतोय तर त्या लेनमधे कोण आहे का वगैरे त्यांना दिसतच नाही आणि सवयीने प्रॉब्लेम पण होत नाही.

हेल्मेटवाल्यांना फक्त समोरचेच दिसते.. अरे देवा...मला माहिती नव्हते बाकीचे विदाऊट हेल्मेट लोक १८० च्या अंशात बघु शकतात ते....सर्वसाधारणपणे गाडी चालवताना जेवढी व्हिजन मिळते तेवढीच हेल्मेट घालून पण मिळते. कैच्याकै विधाने...म्हणे बाजूच्या लेनमध्ये कोण आहे ते दिसत नाही. आवराच जरा


पण काही लोकांना जेन्युइनली हेल्मेटचा प्रॉब्लेम असतो. दिशा कळत नाही किंवा हेल्मेट घातल्यावर नजरेवर मर्यादा येतात, एरवी नजरेचा जितका आवाका असतो त्यापेक्षा तो घटतो. आणि आजूबाजूची वाह नं कळत नाहीत. हॉर्न नीट ऐकु येत नाहीत. धडका धडकी होते. मानेची दुखणी वेगळीच.

दक्षे, तु स्पेसिफिकली कुठल्या लोकांबद्दल बोलतीयेस...मानेचे दुखणे समजण्यासारखे आहे पण नजरेचा आवाका घटतो, हॉर्न ऐकू येत नाही हे फारच अतिशयोक्ती आहे.

वरती ही जी काय विधाने झाली आहेत ती अत्यंत विनोदी आहेत. तु्म्हाला हेल्मेट नसेल घालायचे तर नका घालू पण असली बिनबुडाची हास्यास्पद विधाने तरी नका करू......

नवीन हेल्मेट घ्यायचे असेल तर कोणत्या प्रकारचे, कसे दिसणारे घ्यावे?
फ्लिपकार्ट, स्नॅपडील इत्यादिंवर खुप ऑप्शन्स आहेत.
कन्फ्युज व्हायला होतंय.

@ आशुचँप - हेल्मेट चा उपयोग आहे का नाही हा मुद्दा नाहीये.

जे सरकार नागरीकांची कुठलीही जबाबदारी उचलत नाही त्या सरकारला सक्ती करायचा अधिकार आहे का?
हेल्मेट न वापरल्या मुळे दुसर्‍या कोणाला नुकसान होत नाही. त्यामुळे ती सामाजिक जबाबदारी पण होत नाही.

हेल्मेट घातलेले असताना अपघात झाला आणी पाय मोडला तर सरकार उपचार फुकट करुन देणार आहे का? हेल्मेट घातलेला माणुस मेला तर सरकार कुटुंबियांना पेन्शन देणार आहे का?

आशुचँप, इतरांचे अनुभव म्हणजे बिनबुडाची हास्यास्पद विधाने असं तुमचं मत असेल तर ते तुमच्यापाशी ठेवा.

>>> बहुतेक हेल्मेटवाले आजूबाजूला न बघताच चालवतात गाडी. समोरचेच दिसते फक्त त्यांना. बाजूला गल्ली आहे तिथून वाहने येतात, आपण बाजूच्या लेनमधे घुसतोय तर त्या लेनमधे कोण आहे का वगैरे त्यांना दिसतच नाही आणि सवयीने प्रॉब्लेम पण होत नाही. <<<
हे वाक्य ज्या पोस्टीत आहे त्याच्या वरती १-२ पोस्ट सोडल्यावर एक खवचट पोस्ट आहे. त्याला प्रतिक्रिया म्हणून ते वाक्य होते. समजणार्‍यांना समजले. तुम्हाला नाही समजले. तो काही माझा प्रॉब्लेम नाही.

वर्ष १९८६ - गाव परवानू - जिल्हा - सोलन राज्य -- हिमाचल प्रदेश
प्रवास - सेक्ट्र ४ ते सेक्टर १ - चार दुर्गम वळणे
वेग ताशी ४० कि मी , वेळ - सकाळची - ८ वा. महिना - जानेवारी - बाहेरील तापमान - ६ डि से
वाहन - विजत सुपर , चालक - अस्मादिक
समोरून एका वळणावरून जीप आली व हेड ऑन टक्कर
गाडीचा चुरा, मी डोक्यावर पडलो
हेल्मेटला क्रॅक, मी बेशुध्द, इतर काही इजा नाही
२४ तासांनी डिस्चार्ज
हेल्मेट नसती तर?????

टोचा मी ही त्या मुद्द्यावर बोलत नाहीच आहे. मी जरी हेल्मेटचा कट्टर पुरस्कर्ता असलो तरी त्याची सक्ती होऊ नये हे माझेही मत आहे. किंबहुना हेल्मेट काय कुठल्याची गोष्टीची सक्ती करण्याची वेळ येऊ नये असेच मला वाटते.
रच्याकने, हेल्मेट नसेल तर इन्शुरन्स कंपनी क्लेम सेटल करताना कटकट करते असे ऐकीवात आहे.

नीधप - कुणाचे असे अनुभव आहेत??? मी आजतागायत व्हिजन ब्लॉक करणारे हेल्मेट पाहिले नाहीये. तुम्हाला राग अाला असेल तर नाईलाज आहे पण या वाक्यांना कसलाही आधार नाही.

बाकी ती उपरोधिक पोस्ट असेल तर त्याबाबत सॉरी. मला नाही कळला तो उपरोध.

हेल्मेट सक्तीच्या विरोधी मत म्हणजे हेल्मेट वापरणार्‍यांवर गदा येणार असे काही आहे का?
१) कायदा/ नियम पाळण्याची व्यवहार्यता
२) अंमलबजावणीचा प्राधान्यक्रम
हे मुद्दे चर्चेत अधिक यावेत.

हेल्मेट सक्तीच्या विरोधी मत म्हणजे हेल्मेट वापरणार्‍यांवर गदा येणार असे काही आहे का?

उलट आहे...सक्ती झाल्यावर हेल्मेट वापरणाऱ्यांचेच त्रास वाढणार आहेत. मागच्या वेळी पुण्यात सक्ती झाली होती तेव्हा माझे हेल्मेट चोरीला गेलेले. त्यामुळे यावेळी मला चांगले लक्ष ठेवावे लागणार आहे. मधल्या काळात नुसते गाडीला अडकवून गेलो तरी हात देखील लावायचे नाही कुणी. आता मागणी वाढेल आणि चोऱ्याही

Pages