Submitted by जयदीप. on 8 November, 2014 - 02:14
पुढे सुद्धा थरार आहे ....
चढानंतर उतार आहे!
नशीबाचा नकार आहे
तरीही मी तयार आहे!
कुणी झाला फरार आहे
कुणी झाले शिकार आहे...
सदा माझा विचार आहे.....
मला मोठा विकार आहे !
तुझ्या लेखी चुकार आहे
तुझ्यापेक्षा हुशार आहे
किळसवाणा प्रकार आहे ...
नको तितका प्रचार आहे!
जयदीप
विषय:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा ! वा
व्वा ! वा
पुढे सुद्धा थरार आहे
पुढे सुद्धा थरार आहे ....
चढानंतर उतार आहे!
चांगली द्विपदी.
अल्वी तुमच्यासारखा कुठल्याही प्रसंगावर द्विपद्या लिहितो. हे एक धाडसच म्हणायला हवे.
छान मतलाबंद गझलचा हा प्रयत्न
छान मतलाबंद गझलचा हा प्रयत्न बर्यापैकी यशस्वीच म्हणायला हवा
पुढे सुद्धा थरार आहे
पुढे सुद्धा थरार आहे ....
चढानंतर उतार आहे!
वा. शेर कमी विधाने अधिक होत आहे.
अल्वी तुमच्यासारखा कुठल्याही प्रसंगावर द्विपद्या लिहितो. हे एक धाडसच म्हणायला हवे.
खरे आहे. पण कहन तगडे हवे.
पण कहन तगडे हवे. >>> सहमत
पण कहन तगडे हवे.
>>>
सहमत आहे.