स्त्री समीप येते...

Submitted by अ. अ. जोशी on 9 November, 2014 - 07:58

स्त्री समीप येते प्रेम वाटल्यावरती
पण तुमची होते सत्य बोलल्यावरती

जे कळले नव्हते का जपायची होती
ते कळले आता लाज सोडल्यावरती

जे अपुले नाही त्यात तू नको गुंतू
मन होते बघ परकेच गुंतल्यावरती

ज्यांना जे मिळते आणखी मिळो त्यांना
आपल्यास मिळणे फक्त आपल्यावरती

जे दिसत नसे त्यालाच फक्त पूजावे
जे दिसते, येतो हक्क पूजल्यावरती

डोळ्यांनाही इतकी तहान लागावी
की पितात अश्रूंनाच साठल्यावरती

नाती अनेक आहेत सांगण्याइतकी
एकटा तरीही भाव दाटल्यावरती

भळभळा मनाची जखम वाहते आहे
थांबवू कशी मी प्रेम टोचल्यावरती

नसतेच प्रिये नाते असे जपायाचे
येतात लोक जे फक्त जिंकल्यावरती

रागवू नको तू आपल्या अपयशाला
त्याचेही असेल प्रेम आपल्यावरती

ते फुसके ठरले बार 'अजय' प्रेमाचे
बघ, असेच होते आव आणल्यावरती

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

कैलास,

लय बिघडलेली नाही.

>>> त्यालाच फक्त पूजावे <<<

याप्रमाणे,

आहेत सांगण्याइतकी

हेही आहेच.

सुरुवातीचा भाग मात्रा सांभाळून आणि नंतरचा गालगाल गागागा असा घेतला आहे.

अर्थात,
मी लिहिल्यानंतर लय चुकली हे म्हणणारे आता लय झाले आहेत हे मानायलाच हवे.... Lol

व्वा अजयजी बहुतांशी शेर फार आवडले
तुमच्या गझलची तुमची अशी खास शैली आजकाल अधिक सुडौल होत चालली आहे असे वै म कृ गै न

धन्स

Wink

तुमच्या गझलची तुमची अशी खास शैली आजकाल अधिक सुडौल होत चालली आहे>>>

कोण कुणाला प्रमाणपत्रे वाटत फिरत आहेत ते पहा.

मी लिहिल्यानंतर लय चुकली हे म्हणणारे आता लय झाले आहेत हे मानायलाच हवे

गंमतीचा भाग वेगळा, मात्र मी आपल्याशी सहमत आहे.

नाती अनेक आहेत सांगण्याइतकी
एकटा तरीही भाव दाटल्यावरती

हा शेर आवडला.

'नाती' आवडला.

खुप दिवसानंतर माबोवर आलोय आणि खुप काही चांगलं वाचायला मिळतय. नाहीतर आजकाल माबोवर यायची भीतीच वाटायला लागली होती. जिकडे तिकडे काहीना काही विषयावर दंगल, मारामार्‍या चालूच Wink

खूप आवडली. गझलेचा फॉर्म वगैरे तपशिलात जाण्याची गरज नाही वाटली. मतलाच इतका प्रामाणिक आणि खरा आहे. एखाद्या पुरुषाला हे समग्र कळणं आणि त्याचा दोन मिसर्‍यांचा मतला करण्याएवढं ते महत्वाचं वाटणं हे फार भिडणारं आहे.
बाकी शेरही मस्तच आहे. तो पूजल्याचा शेर वाचताना गडबड होत असेल ( मला पर्सनली पूजणे हे क्रियापद मराठीत खटकतं समहाऊ. आवडत नाही म्हणजे ) पण त्याचा अर्थ अगदी परफेक्ट आहे.