निसर्गाच्या गप्पा (भाग २२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 September, 2014 - 16:20

निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

सनईचा सूर कसा वार्‍याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला

तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.

गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.

वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हय दिनेशदा! भाजीवर खारट आंबट अशी एक चव असते. माझ्याकडे अजूनही वाळवलेली हरबर्‍याची भाजी आहे पण ओल्या भाजीची चव सुकवलेल्या भाजीला नाही. बहिण मुगाच्या वड्या बनवते घरी त्यातही ही भाजी टाकते. मेथी, पालक, चुका काहीही टाकून वड्या बनवते. ज्या सीझनमधे भाजीपाला मिळत वा परवडत नाही तवा ह्या मुगवड्या कामी येतात.

बी मला पण ही भाजी खुप आवडते, पण अगदी कोवळी हवी.. तुरट आंबट चव छानच लागते..
हरभर्‍याचे शेंडे खुडले तर जास्त घाटे लागतात ++++ हे माहिती नव्हते..
मंजु ताई, पहाटेचा पाहुणा छानच आहे...

विदर्भात हिवाळ्यात भरपूर भाजीपाला होतो. त्यावेळी हे सगळे वाळवण्याचे प्रकार करुन ठेवतात. तूमच्याकडच्या हवेत ते नीट वाळतातही आणि टिकतातही. कोकणात जास्त करून लोणची घालण्याचा प्रघात आहे. मुबलक अशा भाज्या कुठल्याच सिझनमधे पिकत नाहीत.

बी, मुगवड्या म्हणजेच "सांडगे" का? आमच्या घरी "मटकीच्या डाळीचे" सांडगे बनतात. स+++
हो तुमच्या कडे सांडगेच म्हणतात बहुतेक.. पण हे मुगाची सालासकट डाळीचे बनवतात. काही लोक बिना सालाची डाळ पण वापरतात.. तर काही उडीद + मुग पण वापरतात,,

मी मागे पण उल्लेख केला होता. तरी परत..

हरबर्‍याच्या शेतावर रात्री पंचे अंथरतात. सकाळी दव पडले कि ते पंचे आणून पिळतात. त्यातून जो द्रव निघतो तो घाटी. ही घाटी कुठल्याही पोटदुखीवर रामबाण उपाय आहे. अनेक घरात ती संग्रहात असतेच. ती खराब होत नाही.

जिप्स्या, कधी गावात गेलास तर चौकशी कर. तूम्हाला ट्रेकला वगैरे न्यायला चांगली. कुणाचे पोट बिघडले तर अगदी १ चमचा घेतली तरी बरे वाटते.

कुणी खाटी मागितली तर नाही म्हणायचे नाही, असाही प्रघात आहे. तिलाच काही ठिकाणी आंब पण म्हणतात.

दिनेशदा, लसूण पातीचा रंग काय सुरेख दिसतोय! आणि कोणत्या दिवसात, कोणत्या तारखेपासून घरात कुठे उन्हे येतात, त्याप्रमाणे झाडे हलवायची म्हणजे भारीच! __/\__

मंजू, तो फोटोतला तुरेवाला पक्षी 'हुदहुद' (हूपो) आहे.

जिप्सी, आठवण मस्त!
लहानपणी हरभर्‍याच्या शेतातून चालताना पायांना हरभर्‍याची आंब लागल्याने पाय चुरचुरत. चालताचालता हरभरे तोडून खातानाची ती आंबट-तुरट चव आठवुन तोंडाला पाणी सुटले आहे Happy

आमच्या घरी आम्ही खिडक्यांमध्ये रिकामी खोकी बांधून ठेवली आहेत. त्यात चिमण्यांनी घरटी केली आहेत. त्यापैकी एका घरट्याच्या फोटोंची लिंक देते आहे:

https://plus.google.com/photos/101130352736356336200/albums/607920390687...

खोकी बांधल्यापासूनची ही त्यांची दुसरी वीण आहे.

-अश्विनी

अश्विनी, मस्त आहे कल्पना आणि प्र.चि पण... तो वेल कृष्ण कमळाचा आहे ना?

आमच्या सोसाईटीत दखील एकाने लाकडी घरटी विकत आणुन बसवली आहेत. (एक त्रिकोणी आणो एक गोल वगैरे.. )
पण पक्षांची गम्मत पहा कशी असते.. ती घरटी तशीच रिकामी आहेत आणि चिमण्यांनी त्याच्या वर आपले घरटे केले आहे... त्याना सुद्धा आयते नको असते.. स्वकष्टाचेच हवे..:)

हरबर्‍याच्या शेतावर रात्री पंचे अंथरतात. सकाळी दव पडले कि ते पंचे आणून पिळतात. त्यातून जो द्रव निघतो तो घाटी. ही घाटी कुठल्याही पोटदुखीवर रामबाण उपाय आहे. अनेक घरात ती संग्रहात असतेच. ती खराब होत नाही.>>>>>>>>>>>> हं ...मी हेच सांगणार होते.
मंजू पक्षी छाने.
गुर्जी तुमची आठवण पण छाने बर्का!
दिनेश लसूण पातीची चटणी ....खोबरं, मिरची घालून छान होते. तुम्ही करतच असणार म्हणा!
अदिजो चिमणीच्या घरट्याची आय्ड्या भारी.

लसूण पात घालून केलेले शुद्ध तूपातले ऑमलेट शक्तीवर्धक असते. ( गरजूंनी करुन खावे. )

असे आयत्या घरट्यात घर करणारे पक्षी असतात तसेच मासेही असतात. मोठे स्क्वीड्स आणि ऑक्टोपस मासे असेच पकडतात, उभट मडकी पाण्यात सोडली कि हे त्यात जाऊन बसतात, मग मडकी वर काढली कि ते अलगद पकडता येतात. एरवी हाताने किंवा गळाने / जाळ्याने हे मासे पकडणे अवघड.

मी घालायची लसूण पात परतलेल्या भाजीत वगैरे, माझ्याकडे आली होती तेव्हा.

अदिजो थँक्स पक्षाचं नाव सांगितल्याबद्दल.

ओला लसुण, हिरव्या वाटाण्याच्या कचोरीत आणि कोथिंबीर वडीत आमच्या कडे आवर्जुन वापरतात..
शिवाय इकडे विदर्भात नविन तांदळाचे धिरडे करतात त्याला पण पातीचा लसुण मिरची चे वाटण लावतात...

किति मस्त फोटो आणि माहिती आहे सगळ्यांची.

आमच्या सगळ्या मांजरी आता गुल झाल्या. आता मांजरींचा नाद सोडुन् द्याय्चे ठरलेय. मला अर्थातच या निर्णयाचा आनंदच झाला. एकतर मला मांजरे अज्जिबात आवडत नाहीत, (तरी सिनियर एस हा केवळ आमच्या कल्याणार्थ जन्मलेला संतविभुती असल्याने त्याचा खुपच लळा लागलेला.) दुसरे म्हणजे ही मांजरे माझ्या कुंड्या रोज सकाळी उकरुन ठेवत, त्यामुळे माझे डोके अगदी फिरुन जाई. शिवाय इतक्या सा-या कुंड्या म्हणजे इतकी सारी टॉयलेटे असे त्यांना वाटे आणि रोज त्या इतक्या सा-या टॉयलेटांना न्याय द्यायची जबाबदारी ते आपल्या चिमुकल्या खांद्यांवर घेत. रोज नविन टॉयलेट.. मला तर कुंड्यांना हातही लावावासा वाटत नव्हता.

आता माण्जरे गेल्यामुळॅ आम्ही आमचे लक्ष परत पक्ष्यांकडे वळवले आहे. आमची मांजरे गेली याचा शोध सर्वप्रथम मेल्या कबुतरांना कसा लागला देव जाणे. ती नालायक कबुतरे चक्क हॉलमध्ये यायला लागलीत. तरीही मानवतावादी दृष्टिकोन लक्षात ठेऊन आम्ही बर्ड फिडर ठेवलाय. बघु आता किती पक्षि येतात आमच्या बर्डफिडरवर ते.

आता परत बीया बिया जमवुन शेती करणार. मागे लावलेलापालक आणि माठ माण्जरानी उकरुन ठेवलेला. आता ती भिती नाही.

तर लसुण पात कशी लावायची ते सांगा भराभर. लसुन मोकळा करुन पेरायचा काय?

१) इकडे तुळशी वॄंदावन / कुंडीवर विवाहा समयी,
बोर भाजी आवळा! कृष्ण देव सावळा!
असे लिहायची पद्धत आहे..
२) हरभर्‍याचे शेंडे खुडले तर जास्त घाटे लागतात त्याला. म्हणून मुद्दाम खुडतात ही.
३)हरभर्‍याच्या शेतातून चालताना पायांना हरभर्‍याची आंब लागल्याने पाय चुरचुरत.
४) मोठे स्क्वीड्स आणि ऑक्टोपस मासे असेच पकडतात, उभट मडकी पाण्यात सोडली कि हे त्यात जाऊन बसतात, मग मडकी वर काढली कि ते अलगद पकडता येतात. एरवी हाताने किंवा गळाने / जाळ्याने हे मासे पकडणे अवघड.
.... माझ्यासाठी ही माहिती नविनच आहे.

घाटी कुठल्याही पोटदुखीवर रामबाण उपाय आहे. ------ हे माहीत आहे, पण आमच्याकडे हीला खाटी म्हणतात.

मी एकदाच लावली होती. माझ्याकडे लसणीला मोड आले होते तेव्हा. त्या काही लसणी मी कुंडीत मातीत खुपसून ठेवल्या, मग आल्या त्यांना पाती.

Pages