भाजप सरकारचा शपथविधी सोहळा - राजेशाही आणि वादग्रस्त?

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 October, 2014 - 12:24

१) वानखेडे मैदानावर सुरक्षाव्यवस्थेवर ताण टाकत हा सोहळा करणे खरेच गरजेचे आहे का?

२) कोट्यवधींचा खर्च होणार आहे. भले कोणी कितीही पार्टी फंड मधून तो येणार असा दावा केला तरी एण्ड ऒफ द डे सामान्य जनतेच्या खिशातूनच वसूल होणार ना?

३) हा शपथविधी सोहळा माजी पंतप्रधान ईंदिरा गांधीजींच्या पुण्यतिथी दिवशी होणे हा योगायोगच समजावा का? आणि असल्यास तो ध्यानात आल्यावर ती तारीख बदलणे शक्य नव्हते का? कि यात काही गैर नाही?

४) समुद्रामध्ये कित्येक कमळांचे होर्डींग जाहिरातबाजी करत तरंगत आहेत. याचा अर्थ हा सोहळा महाराष्ट्र सरकारचा म्हणून नसून सर्वस्वी भाजपाने आपल्या राजकीय पक्षाचे मार्केटींग करायला केला आहे असाच होतो ना? मग एक महाराष्ट्राचा नागरीक म्हणून मला याचा अभिमान वाटावा का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

arc,

वरील संदेशास अनुमोदन (मात्र रश्मी.. यांच्याबद्दल माहीत नाही). या निवडणुकांच्या (लोस+विस) आडून काका पक्षातील दादांसकट इतर सत्ताकेंद्रे निष्प्रभ करू पाहताहेत. काकांच्या शाखा सर्व पक्षांत आहेत. त्या शाखांचा यथोचित वापर कसा करावा ते केवळ त्यांनाच ठाऊक आहे.

आ.न.,
-गा.पै.

राजेशाही सोहळा झाला व वादग्रस्तही! काल नागपूरात उत्स्फुर्त व उदंड स्वागत झाले ! अगदी अभूतपुर्व ! असं वाटत होत जणू राजे मोहीम फत्ते करुन आले ... राजेशाही Happy विशेष गोष्ट नमूद करु इच्छीते ती म्हणजे लगेच झालेली रस्त्यांची सफाई! तशीच रामनवमीला शोभायात्रेनंतर व्हावा....

आर्क, मी भोळेपणाचा आव अजीबात आणत नाहीये. पण इतके दिवस भ्रमात किन्वा खोट्या आशेवर होते असे म्हणा हवे तर. याच दिवाळी मध्ये आमचा भ्रमाचा भोपळा फुटला. दिवाळी मध्ये माझ्या चुलत दिराचे मित्र, जे बान्धकाम क्षेत्रात नोकरीला आहेत, घरी आले होते. त्याच वेळेस त्यानी सान्गीतले की गडकरी आणी पवार यान्ची जूनी मैत्री आहे, त्यामुळे ते भाजपला पाठिम्बा देवो वा न देवो, काका-पुतण्याची प्रकरणे काय निकालात निघणार नाहीत. उनका बाल भी बाका नही होगा. आता राजकारण्यान्ची मैत्री असते इतपत मला माहीत होते. पण ती इतपत गहिरी असु शकते हे माहीत नव्हते. काय माहीत आजपर्यन्त घरातल्या ( वडिल व सासरे) मोठ्या माणसान्चा प्रामाणीकपणाच पाहिल्याने कदाचीत सत्तेवरच्या लोकान्कडुन पण तीच अपेक्षा ठेवण्याची चूक होत होती.

हे लोक आज न उद्या जनतेचे भले करतील अशा भ्रमात रहाणेच आवडते की काय देव जाणे. जसा पडद्यावर हिरोचे काम करणारा एखादा अभिनेता प्रत्यक्षात खलनायक असतो, तर तेच व्हिलनचे काम करणारा प्राण किन्वा निळुभाऊ फुले सारखा माणुस प्रत्यक्ष जीवनात एक माणुसकीचा गहीवर असलेला देव माणुस असतो.

भोळेपणा नाही पण कदाचीत याच भ्रमात रहाणे मी पसन्त करत असेन असे म्हणा हवे तर. मी खूप आशावादी आहे. म्हणून या लोकान्कडुन चान्गले होण्याची अपेक्षा करतेय. भाजपा ही भगवी कॉन्ग्रेस आहे हे सत्य आहे.

मोठ्या पोस्टबद्दल खरच सॉरी.:अरेरे:

रश्मी, राजकारण्यांचा पिंड तसाच असतो. एकाला झाकावा व दुसर्‍याला काढावा. कुठला पक्ष स्वच्छपणाचे दावे करत असेल तर ते खोटं समजावं. फारतर कमी जास्त बरबटलेले असतील. राजकारण्यांपुढे तर महत्वाकांक्षांचे डोंगर असतात आणि ते डोंगरच त्यांची तत्व वाकवतात Happy त्यामुळेच तर युतींची समिकरणं बदलत असतात, पक्षबदल घडत असतात.

खरय अश्विनी.:अरेरे: पूर्वीच्या भाजपात आदरणीय वाजपेयी होते, तर आता दोन डगरीन्वर हात ठेवणारे गडकरी आहेत. आणी पूर्वीच्या कॉन्ग्रेसमध्ये ऋषीतुल्य असणारे बाळासाहेब भारदे होते तर आता दिग्विजय सारखे सन्धीसाधु पोपट आहेत. आपले नशीब, दुसरे काय.

आपले नशीब, दुसरे काय.>>>> राजकारणाबाहेरही समाजात आपल्याला हा दुटप्पीपणा सहन करावा लागतोच की. त्याच्यातून आपण शक्य होईल तसा मार्ग काढत असतो तसाच इथेही काढत राहायचं. आकाश कोसळल्यासारखं करायचं नाही कारण आपण ते कोसळू दिलं तरच कोसळतं. निगेटिव्हिटी आपल्या आत शिरु दिली तरच शिरते. दर पाच वर्षांनी सरकारचं लग्न लावायचा आपल्याला अधिकार असतोच. नुसती प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीवरुन आकांडतांडव करुन भुई धोपटत सुटण्यापेक्षा शांतपणे पण डोळसपणे सगळं पाहून ठेवायचं. आजपर्यंत पायाखालून चादर ओढून घेतल्यासारख्या वेगवेगळ्या सत्ता उलथल्या गेल्याच ना? हल्ली मला मतदान करता येत नाही, पण जेव्हा मतदान केलं आहे तेव्हा शिवसेना, भाजपा व काँग्रेस अश्या तिघांनाही करुन झालं आहे. राजकिय पक्षांच्या परफॉर्मन्सला अनुसरुन आपणही फ्लेक्सिबल राहायचं.

भारदे यांचा उल्लेख आला म्हणुन आठवले, मला नेहेमी प्रश्न पडतो, भारदे काँग्रेसमधे कसे काय ?
त्यांचे व्यक्तिमत्व पहाता जरा विरोधाभासात्मक वाटते.

महेश, बाळासाहेब भारदे गान्धीवादी होते. माझ्या आईने त्याना पाहीलेय. ते आजीच्या ( आईची आई) माहेरकडुन नात्यातले होते. आई लहान होती तेव्हा ते आजीला भेटायला आले होते. एकदा त्यान्चा विषय निघाल्यावर आईने सान्गीतले.

काका-पुतण्याची प्रकरणे काय निकालात निघणार नाहीत. >>> माझा अंदाज की फक्त काकाची निघणार नाहीत. पुतण्या असाही डोईजड झालेला आहे. तसंच उत्तराधिकारी नेमायचा तर पुतण्याचा पत्ता कट केल्याशिवाय सुप्रियाताईंचा मार्ग खुला होणार नाही. भुजबळ आणि पुतण्याचा बकरा होणार असं वाटतं.

मुख्यमंत्र्यांच्या घरच्यांनी कुठली भाषा बोलावी, हे पण जनता ठरवणार का?
अन त्यावरुन मुख्यमंत्री परप्रांतिय धार्जिणे वाटतात??? हद्दच झाली.

मुख्यमंत्र्यांच्या घरच्यांनी कुठली भाषा बोलावी, हे पण जनता ठरवणार का? > इतरजणांच्या बाबतीत तर मिडीया ठरवते आणि सतत बटबटीत ते दाखवत असते तेव्हा हद्द होत नाहीच ना ? उदा. केजरीवाल राज ठाकरे. त्यांच्या मुलांवर ब्रेकिंग न्युज बनतात तेव्हा मिडीया काय कश्या प्रकारे दाखवत असते तेव्हा हा प्रश्न पडायला हवा.

<<मुख्यमंत्र्यांच्या घरच्यांनी कुठली भाषा बोलावी, हे पण जनता ठरवणार का?
अन त्यावरुन मुख्यमंत्री परप्रांतिय धार्जिणे वाटतात??? हद्दच झाली.>>

ठरवत नाही आहोत. फक्त नोट करतोय की मुख्यमंत्र्यांना आपल्या मुलीला मराठी भाषा शिकवावीशी वाटली नाही. त्यांना मराठी भाषा ही गोष्ट पुढच्या पिढीला वारसा म्हणून देण्याइतकी महत्वाची वाटली नाही का?

मला वाटत एक टीव्ही चॅनेलवरची क्लिप पाहून लोक इथे अस गृहित धरत आहेत की देवेन्द्र फडणवीसांच्या मुलीला मराठी अजिबात येत नाही अन हे फारच आक्षेपार्ह आहे असा एक सूर लावला जात आहे. तस पाहील तर विदर्भात मराठी लोक सुध्दा - अनेकदा घरातही - बरेच वेळा हिंदी मधे बोलतात. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपूर्वी नागपूर हे मध्यप्रांत व वर्‍हाड ची राजधानी होत. हिंदी भाषिक व दक्षिणेच्या आंध्र मधील लोकांबरोबर चे व्यवहार हिंदीत, बाजारातली भाषा हिंदीच. मला आठवत, लहानपणी अकोल्यास मी माझ्या शाळेतील मित्रांशी हिंदीतच जास्त बोलत असे. तर हे कुणी मुद्दाम करीत नसत, तोंडात आपोआपच हिंदी येत. सतरा वर्ष अलीबाग ला राहून ही आजही माझ्या तोंडी सुधा येत. अन तस म्हटल तर नव्या पिढीला चांगल मराठी याव ही अतिशय योग्य असलेली बाब साध्य करण्यासाठी किती मराठी लोक मुद्दाम प्रयत्न करतात ? ( माझ्या मुलाशी बोलतांना मी आवर्जून हा प्रयत्न करतो ) आपल्या मातृभाषेवर कस प्रेम कराव हे शिकायच असल तर मल्याळी लोकांचा आदर्श समोर ठेवावा. जगात जेथेही असतील तिथे आपल नेटवर्क बनवतात, मलयाळम वृत्तपत्र, एफ एम रेडिओ वगैरे सुरु करतात ( हे आपण करत नाही अस नाही पण अपवादात्मकच .) मल्याळी मनोरमाचे खपाचे आकडे बघितले तर थक्क व्हाल.

एकदाचा
न ला न म्हणणारा
आणि
ण ला ण म्हणणारा
मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला .....! ( भेटला नाही ) received this on whatsapp.

. अन तस म्हटल तर नव्या पिढीला चांगल मराठी याव ही अतिशय योग्य असलेली बाब साध्य करण्यासाठी किती मराठी लोक मुद्दाम प्रयत्न करतात ? ( माझ्या मुलाशी बोलतांना मी आवर्जून हा प्रयत्न करतो )

+१ श्रीकांत! हाच मुद्दा आहे!
म्हणजे इथल्या काही मंडळींना हेच मान्य नसावं की नव्या पिढीला मराठी येणं ही योग्य बाब आहे. त्यांच्या दृष्टीने मराठी ही भाषा 'आली तर ठीक, नाही आली तरीही ठीकच' इतकी बिनमहत्त्वाची असावी असं दिसतंय.

वेदिका,
तुम्ही नि ष्कर्ष फार लवकर काढता असं दिसतंय एकुण.
देवेंद्रची मुलगी हिंदीमधे बोलली म्हणजे १) मुमं परप्रांतिय ध्हर्जिणे वाटतात २) मुलीला मराठी अजिबात येत नाही ३) ते शिकवणं त्यांना महत्वाचं वाटत नाही ४) "इअथल्या मंडळींना मराठी बिनमहत्वाचं वाटतं

सटासट शिंका याव्या तसे सटासट निष्कर्ष काढताहात..

प्रश्न मला तरी दिसले नाहीत. पण असो.
नागपुरला लोक घराबाहेर मराठी बोलत नाहीत. एवढंच तुमच्या सगळ्या आक्षेपांचं उत्तर आहे. मी स्वतः पण नागपुरला असताना कधीही घराबाहेर मराठी बोलले नाही. ( आणि इथे जरी मी "बोलले /आले/ गेले" लिहित असले तरी प्रत्य्क्ष बोलताना मी नेहमीच " बोलली/ आली/गेली" असंच बोलते. ही पण नागपुर स्टाइल + सवय. येण्याचा / न येण्याचा संबंध नाही.)

<<एकदाचा
न ला न म्हणणारा
आणि
ण ला ण म्हणणारा
मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला .....! ( भेटला नाही ) >>

हे ते ब्राम्हण आहेत म्हणुन आहे का. आणि आता पर्यंत जे मुमं झाले त्यांना ण आणि न त ला फरक समझत नव्हता का.. आणि फक्त ब्राम्हणांना हा फरक माहिती असेल तर मनोहर जोशी कोण होते..

हे ते ब्राम्हण आहेत म्हणुन आहे का>>>>> "जोक को जोक ही रहने दो... कोई जात न दो" !! _/\_ हात जोडून विनंती आहे.

अहो पण हा जोक अस दर्शवतो की आधी कोणालाही हा फरक माहीती नव्हता. आता पर्यंत झालेले सगळे मूमं हे अशुध्द बोलायचे. आणि आता शुध्द बोलणारा मूमं मिळाला असेच हा विनोद दर्शवीतो. हा बाकी सर्व मूमं चा अपमान नाही आहे का..

हा बाकी सर्व मूमं चा अपमान नाही आहे का..>>> बाकी, कशानेही जाऊ देत, पण मुख्यमंत्री असे स्पष्ट लिहा ना. मूमं काय आहे?

हे शॉर्टफॉर्म मायबोलीवर अति होत चाललेत.

नताशा..तसं नागपूर स्पेसिफिक काही मराठी न बोलण्याचं कारण असेल असं माहीत नव्हतं मला तरी. तुम्ही सांगितल्याबद्दल धन्यवाद Happy

कासवा, आजकाल विरोधात असलेल्यांचा हिडिस शब्दांत अपमान केला, तरच तुम्ही भारी असे समिकरण आहे. तेव्हा जुन्या मुमंचा अपमान वगौरे जाऊच द्या. असले विनोद वाचून बटणं दाबणार्‍यांना असलेच सत्ताधीश नशीबी आहेत. डझन्ट म्याटर.

देवेन्द्र फडणविस हाफ-ओबीसी (आईकडून) आहेत असंही कुठेतरी वाचलं. त्यांच्या मातोश्री सरिताताई पॉलिटिकल फॅमिलीतून (माहेरकडूनही) आलेल्या आहेत हेही वाचलं. सरिताताईंची मुलाखत तर फारच छान होती. सही आहेत त्या एकदम. अतिशय तत्वनिष्ठ, पुरोगामी विचार वाटले त्यांचे. आणि त्याही ण ला ण व न ला न च म्हणत होत्या. उगाच कशाला जातीयवादात शिरताय?
बाकी देवेन्द्र किंवा पंकजा मुंडेंसारखे एकाच वेळी ब्राम्हण आणि ओबीसी असणारे नेते म्हणजे फोडा-झोडा किंवा आरक्षणाचं राजकारण करणार्‍यांसाठी nightmare आहेत.

मुख्यमंत्री जाताना इकोनॉमी क्लास ने गेले ( मिडीयाने दाखवले व्वा व्वा झाले)
परत कसे आले माहीत आहे का? माहीती करून घ्या

तो मुख्यमंत्र्यांचा आणी गडकरींचा फोटो बघुन हसू आले. अशा लोकांमध्ये भुजबळ पण सामिल आहेत. ( संघात नव्हे) अशा लोकांना/ मुलाना आम्ही आमच्या कॉलेज जीवनात ग्राईप वॉटरची गोंडस गुटगुटीत बाळे म्हणायचो ते आठवले.:फिदी:

<< आता कुणाच्या निष्ठा कुठे आहेत ते खरे कळून येईल >> सर्वसाधारणपणे सर्वच नेत्यांच्या निष्ठा त्यांच्या पक्षांपेक्षां सत्तेकडेच झुकताना दिसताहेत ! Wink

या धाग्यावरील प्रतिसाद क्र:-१

भाजपा ने सुरुवात मराठीतुन केली. आणि शेवट गुजरात मध्ये करणार हे आता हळु हळु स्पष्ट व्हायला लागले आहे.

Submitted by कासव on 30 October, 2014 - 21:58

>>>>>>

तुमच्या दूरदृष्टीला सलाम!

Screenshot_2020-07-15-01-03-42-926_com.android.chrome.png

हे पूर्वापार चालत आले आहे. आधीही काही दांडिया कार्यक्रम व्हायचे जिथे फक्त ठराविक कम्युनिटीजना एंट्री असायची.

@सगळ्यांपैकी_कोणिही
वेगळ्या विदर्भाची मागाणी का होते आहे?
वैदर्भिय लोक महाराष्ट्रात सुखी, आनंदी नाहीयेत का?

राहिला प्रश्न सत्तेचा...
देश सांभाळायला 'मोदी' सोडून कोणता दुसरा पर्याय कोणाच्या डोळ्यांसमोर येतोय का?
तोवर चालू देत ... "नमो नमो!!"

वेगळ्या विदर्भाची मागाणी का होते आहे?
>>
ते आतापर्यंत सगळ्यात जास्त काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भुषवणा-या मुळच्या विदर्भातील असणा-या मुख्यमंत्र्यांना, त्यांच्या राजकीय व वैचारीक वारसदारांना व पक्षाला विचारले पाहिजे.

मोदी नव्हते तेंव्हा देश चालत नव्हता का ?

मोदी नाहीत म्हणून जसोदाबेन उपाशी राहिली का ?

ते स्वतःच बोलतात , मी झोला घेऊन जाईन तुम्ही आत्मनिर्भर व्हा

Proud

मोदींशीवाय कोण आहे का ? असे विचारणारे मूर्ख आहेत , मोदी स्वतः बोलतात , आत्मनिर्भर व्हा , आणि हे मोदी मोदी करत नाचतात, मोदींचा वैचारिक पराभव त्यांचे भक्तच करतात

( ह्या वाक्यात कुणाही महापुरुषांचे नाव घालू शकता)

फक्त भाजपच धार्मिक द्वेष करतो का?
कॉग्रेसींच खालच्या पातळीच राजकारण .... गेली सहा दशकं पाहिलेली लोकं अस्तित्वात आहेत म्हटल अज्जून! Lol

फक्त भाजपच धार्मिक द्वेष करतो का?
कॉग्रेसींच खालच्या पातळीच राजकारण .... गेली सहा दशकं पाहिलेली लोकं अस्तित्वात आहेत म्हटल अज्जून!

नवीन Submitted by प्रगल्भ on 29 July, 2020 - 13:30
>>>>>
काँग्रेसने खालच्या पातळीच राजकारण केले म्हणून भाजपने तेच केले तर समर्थनीय कसे?

Pages