मेहेंदी

Submitted by टीना on 27 October, 2014 - 12:11

खुप दिवस झाले हा धागा काढायचा विचार करत होती आता जाऊन वेळ मिळाला ..

जवळपास सर्वांना मेहेंदी काढायला आवडतं .. मलासुद्धा ..
पन हातभर काढण्यापेक्षा हितभर काढायला मला जास्त आवडत .. कारण दुनीयाभराचा कंटाळा आणि संयमाचा अभाव ... त्यातही वेळेवर डोक ब्लँक होण .. खुप मुड आला तर कुठ त्या मेहेंदीच्या कोनाला माझा हात सहन करावा लागतो Lol ..

यातलेच काही मुड असताना काढलेले हात ..

यातले डिजाईन्स नेट च्या कॄपेने हाती अवतरलेल्या .. तुम्हीसुद्धा तुमच्या मेहेंदी डिजाईन्स शेअर करा (आवडलेल्या समोरच्या व्यक्तीला ढापता येईल ही परमिशन मनोमन देऊन Wink )

१. ही दसर्‍याला काढलेली (हातावर जाऊ नका..)

DSC01219.JPG

२.

DSC01454.JPG

३.

DSC01457.JPG

४.

DSC01464.JPG

५.

DSC01474.JPG

६.

DSC01475.JPG

या दोन इन्स्टंट मेहेंदी कोन चा वापर करुन काढलेल्या आहेत .. लोक्स म्हणतात कि याचे साईड ईफेक्ट्स होतात .
मला अजुनतरी अनुभव नाही याचा सो चालु द्या सदरात मोडतो .. एवढ्या २ ४ वर्षात वापर केलेला नाही त्यांचा पन बघु काय होत ते ..

७.

DSC02590.JPG

८.

DSC02591.JPG

९.

DSC04869.JPG

तुम्हा सर्वांना तुमच्या मेहेंद्या इथे पोस्ट करायला आमंत्रण .. तुमच्यामूळे मलाही वेगवेगळ्या डिजाईन्स शिकायला मिळतील .. Proud

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टिना मला का तुझ्यासारखी मेंदि काढू मैत्रिण मिळाली नाही Sad
आत्तापर्यंत मी कायम पैसे देऊन मेंदी काढून घेतली आहे पण ती ही हवी तशी नाहिच Sad

व्वाह! खुपच सुरेख आहेत सर्व मेहंदी.
मलापण खुप हौस आहे मेहंदी काढुन घ्यायची. लहानपणापासुनच अगदी पुर्ण हातभर मेहंदी काढत असे छोट्या छोट्या डिझाईन्स आपल्याला चालायच्याच नाहीत. रक्षाबंधन, गणपती, दिवाळी असा कोणता सण नसेल की माझ्या हातावर मेहंदी नसेल.
३ वर्षापुर्वी आत्येभावाच्या लग्नात असेच हातभर मेहंदी काढली थोड्यावेळाने हात सुजला व हातावर पित्तासारखे उठले व हात प्रचंड दुखु लागला इतका की पेनकिलर घेऊनही थांबेना शेवटी डॉक्टरने इंजेक्शन दिले आणि मेहंदी पुसायला लावली. या प्रकराणाआधी शेवटची मेहंदी मी माझ्या ओटीभरणीला काढली होती त्यानंतर लेक ६-७ महिन्यांची होईस्तवर मेहंदी काढणे झाले नव्हते म्हंजे वर्षभर तरी मी मेहंदी काढली नव्हती परंतु या वर्षभरात माझी साईज मात्र दुप्पट झाली होती. वातामुळे फुगलेस असे आई म्हणतच होती पण या मेहंदी प्रकराणामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले.
तरीही माझे मेहंदी प्रेम काही कमी होईना म्हणुन सख्या भावाच्या लग्नात त्यावेळची (आत्येभावाच्या लग्नातली) मेहंदीच खराब होती असे सांगत पुन्हा हातभर मेहंदी काढुन घेतली आणि थोड्यावेळाने मागील सर्व प्रोसेस पुर्ण करुन मी सुजलेल्या व मेहंदी धुतलेल्या हाताकडे बघत होती Sad

अय्यो टीना,
कित्ती सेम टु सेम... मी पण मेंदी कधी संपुर्ण तळव्यावर काढत नाही..
अशीच हातावर एका क्बाजुला... तोरणासार्खी डीझाईन्स मी काढते. Happy

अग रान्गोळीच्या बाफवरच्या काही रान्गोळ्या उदा. पणती, नुसतीच ज्योत असे प्रकार मी पण करते..तेव्हाच माझ्या मनात आले ... ही तर माझीच बहीण दिसते... Wink

आणी ते टॅटू टाईप मेन्दी चे ओम आणि गणपती पण खुप आवडले.

टीना तसंही बाहेरच्या काही देशांमधे मेंदीला टेम्पररी इंडियन टॅटूच म्हणतात आजकाल . सर्च मार तिथेही काही वेगळ्या डिझाईन्स सापडतील. माझं एक फोल्डर खच्चुन भरलय नेटच्या डिझाईन्सनी. ओम मुलांमधे फेमस आहे.या माझ्या छोट्या (चुलत) भावाच्या हातावरुन कळेलच .यातला एक हात माझा आहे. Happy . Happy (हिंट -जिथे पायाचा अंगठा दिसतोय तो) .

mmd.jpg .

मी काही काही डिजाईन्स ड्रॉईंग बुक मधे काढून ठेवते .. मग एखाद्याला पकडायच २रा हात रंगवायला ..
मोस्ट ऑफ द टाइम एकच हात रंगवते ..
दोन हात दिसतात ते वहिनीचे आहेत .. बाकी मैत्रीणी वगैरे ..
ताईच्या लग्नातली मेहेंदी ते फक्त माझे आहेत २हि हात . Happy

मेहेंदी डिझईन्सच एक अ‍ॅण्ड्रॉईड अ‍ॅपसुद्धा आहे.. त्यात खूप सुंदर डिझाईन्स आहेत...

२न्ही हातांनी .. वॉव ..
>>
हो मी नेहमी दोन दिवस आधी सुरवात करते पहील्या दिवशी डाव्या हातावर ,दुसर्या दिवशी उजव्या हातावर्..मोबाईलवरुन फोटो डाउनलोड होत नाहीये.

सीमा२७६ - दोन्ही हातांनी? सॉल्लिड्ड.

बाकीच्या सगळ्या मेंदी की मेंद्या मस्त्च आहेत. मीही काढते कधी कधी पण काही वर्षात काढली नाहीये. पण एवढी सुंदर सुबक नाही येत. आपली कामचलावू

टिना... कलाकार आहात.. मानलं तुम्हाला !!!

तुमच्या डिझाईन्स कॉपी करायला तुमची ना नाही.. पण इतकी सुबक वळणं/ रेषा आल्या नाहीत तर मेहेंदी इतकी पण खास दिसत नाही हा माझा अनुभव आहे.

असंच कुठलेतरी मासिकातले फोटो वै. घेऊन मेहंदी काढायला बसते. पण हाताला सराव नसल्याने रेषा वळणदार येत नाहीत अज्जिबात. त्यामुळे हुबेहुब डिझाईन काढलेलं असलं तरी "काढायला गेलो गणपती.." असं होतं माझं. अर्थात सरावाने येईल सफाई.. पण तोवर काय?

मेहंदीच्या निमित्ताने एक हृद्य आठवणः

माझ्या कॉलेजमध्ये एक मुलगी खुप छान मेहंदी काढायची. तिला मी माझ्या हातावर मेहंदी काढायला सांगायचे तेव्हा माझ्या हातावर काढुन द्यायची नाही. म्हणायची.. "तुझ्या लग्नात काढेन". कॉलेज संपल्यावर थोडे दिवस काँटॅक्ट होता. पण नंतर काहीच काँटॅक्ट उरला नाही. काही वर्षांनी माझं लग्न ठरलं. कसं कोण जाणे पण तिला ते कुठुनतरी कळलं. तर तिने मला फेसबुकवर शोधुन माझ्याशी संपर्क करुन ती घरी आली आणि रात्रभर जागुन लग्नाची मेहंदी काढुन निघुन गेली. जॉबमुळे लग्नालासुद्धा आली नाही. "जुबान के इतने पक्के" लोकांना माझा खरंच_____/\_____

धन्यवाद पियू ..
सर्वांनी प्लीज मेहेंद्या शेअर करा न .. स्वतः काढलेल्या नसल्या काढून घेतलेल्या असल्या तरी चालेल ..

आहा... लग्नाच्या वेळची सोडली तर गेल्या २५ वर्षात माझ्या हातावर दुसर्‍या कुणी मेंदी काढली नाहीये.
स्वतःला येते त्यामुळे मूड आला की कोन करायचा आणि काढायची असला प्रकार.
काढता येते मेंदी म्हणून ठिके पण दुसर्‍या कुणीतरी काढून देण्यातली मजा वेगळी. Happy

ही दोनतीन वर्षांपूर्वी नागपंचमीला माझ्याच हातावर मीच काढलेली मेंदी.
mendi1.jpg

चार महिन्यांपूर्वी श्रमपरिहारार्थ वाडीतून कोन विकत आणून स्वतःच स्व:तचे केलेले पॅम्परींग..
mendi.jpg

Chanach.

Pages