अर्धनटेश्वर

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 28 October, 2014 - 13:01

चिटकवली विजोड जोडपी
फेविकॉली व्यवहारावर
सात टाके खोटे नाटे
देव ब्राम्हण अग्नी समोर
विजोड देही विजोड देव
शाल पांघरून जीवनावर
संसाराचे तप आचरती
दु:खाच्याच कैलासावर
रित्या काळजाचा तुकडा
सदा शोध घेतो अनावर
अपूर्णता जाणुनिया मनी
होय व्याकूळ अर्धनटेश्वर

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्धनारीनटेश्वर असा शब्द आहे माझ्या माहितीप्रमाणे.
याला आम्ही सेमीनार असे म्हणतो. सेमीसर्कल = अर्धं वर्तुळ. अशी सेमी नार = अर्धी नारी.

होय सर ,मला माहित आहे तसाच आहे तो.इथे मी मुद्दाम अर्ध नटेश्वर घेतला ..कारण अर्धा भाग दु;खी आहे
सेमी नार शब्द आवडला .