जुन्या मायबोलीवर एक धमाल धागा होता, त्यातले काही अस्सल किस्से इथे संदर्भासाठी...
शिवाय त्याची ही लिंक
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/85214.html?1223306531 -
----------------------------------------------------------------------
बाई : ए लिंबं कशी दिली रे?
भाजीवाला : बहनजी २ रुपैय्ये का ५
बाई : इतना महाग काय को देता हय? वो कोपरे का भैय्या देड मे ५ देता हय.
भाजीवाला : बहनजी वो खराब माल बेचता है.
बाई : हां मेरे को शेंडी मत लगाओ, पिछली बार यहां से लिया था तो उसमे से २ किडा हुआ निकला था.
भाजीवाला : आज का माल अच्छा है बहनजी, चलो २ रुपैये का ७ लेलो,
बाई : हां, बराबर मोजा क्या?
------------------------------------------------------------------------
आमचे काका केबल वाल्याला तक्रार करतात
हमारे टिव्ही मे मुंगी मुंगी दिखता है...
------------------------------------------------------------------------
आमच्या समोरच्या फ्लॅटमधली बाई एकदा दुधवाल्याला म्हणाली "भैय्या हमारा एक लिटर
दूध तुम्हारे अंगपर है..."
-----------------------------------------------------------------------
घरमालक : सोनावनेजी आपका भाडा देनेका बाकी है.
सोनावने : अरे देता तो है ना, डुबवतंय काय? तुम्हारा डुबवके हमको क्या चैन मिलने वाला
हय? पण जरा तुम हमारी परिस्थिती हाय का नाय काय बघतंय का नाय? का नुसता उठसूठ
भाडा मागताय? हमारी परिस्थिती भी जरा बघो ना.......
घरमालक : लेकिन वो पिछले महिने का भी......
सोनावणे : अरे बाबा पिछले महिने हम वो पोळा सण के लिए गाव कू गया था ना...
घरमालक : पोळा???
सोनावणे : तुमको पोळा नै मालूम? उस दिन नही क्या वो बैल के शिंग को रंग लगाते है,
बैला के पाठिपर झूल टाकता है... तुम्हारे गाव मे नही होता है क्या...?
घरमालक : नही. इस महिने का तो देना ही पडेगा..
सोनावणे : ऐसा क्या? तो जरा अंदर आवो घर के. ये तुमने हमारे घर मे बांबु लगाया, कितना
बांबु लगाया, हमारा घर केवडा और तुम्हारा बांबु केवढा, अब हमारे घर में जब पावना लोग आता
है तो झोपनेकू जगा नही मिलती.. जगा नही मिलती तो कुछ पावना बांबु को टेकता है, वो बांबु को
टेकता है तो, उपर से माती गिरता है, हमारी मंडळी के कानानाकमें जाता है, वो तुम नीट करो पयले.
घरमालक: ???????
---------------------------------------------------------------------------
अजून शोधून लिहिन.... तो पर्यंत तुमचे लिहा...
माझा मित्र पत्ता
माझा मित्र पत्ता सांगताना..
पत्त्ता विचारणारा: भाई सिध्दिविनायक मंदिर कहा है|
मित्रः ये जो समोर गल्ली है ना उसमे से सिधा जाओ फिर आडा रास्ता आयेगा उसको पल्टी मारो समोर मंदिर दिखेगा|
रस्तेको पल्टी मारो!!!
रस्तेको पल्टी मारो!!!
आडा रास्ता आयेगा उसको पल्टी
आडा रास्ता आयेगा उसको पल्टी मारो समोर मंदिर दिखेगा|>>>>.
परवाच आमच्या कंपनीच्या कँटिन
परवाच आमच्या कंपनीच्या कँटिन मध्ये ....
माझ्या समोरच्या टेबलावर दोघे बसले होते. त्यांच्या टेबलावरील पाण्याच्या जगातील पाणी संपले होते.
पहिला(वेटरला) : अरे पाणी दो ना )
वेटर (जगाकडे बोट करत) : उसमेसे लेलो
पहिला : अरे रीकामा है वो
दुसरा : अरे मोकळा है वो
अरे मोकळा है वो
अरे मोकळा है वो
माझ्या आईलापण गप्पा मारण्याचे
माझ्या आईलापण गप्पा मारण्याचे भारी वेड,आणि लोकंही तीच्याशी फारशी ओळख नसताना लगेच गप्पा सुरु करतात. तसं ती हिंदी सरावाने नीटच बोलते पण कधीतरी लगेच शब्द न आठवल्यामुळे विनोद होतात .जसा की हा ---
युपी साईडची एक बाई (आई त्यालोकांना जो शब्द वापरते तो मी इथे वापरत नाही
)आईला म्हणाली" देखो ना मै बारिश मे पुरी भीग गयी ,घर से निकली तो बिल्कुल बारिश नहीं थी".
.
यावर आईने चटकन उत्तर दिले "अभिच तो उन ,अभिच तो पाउस की जोरदार सर, ऐसाही होता हय श्रावण मै " घर से छ्त्री लेनेका हमेशा, उन मै भी काम आती हय ओर पाउस मै भी "
त्यावर ती बाई काही म्हणाली नाही पण तीने दुसरा विषय काढुन पुन्हा गप्पा मारायला सुरुवात केली . आईला विचारले ,तु़झं असं हिंदी त्या बाईला समजलं असेल का? तर ती म्हणाली ,उगाच मग ती तासभर माझ्याशी गप्पा मारेल का ?
माझ्या चेहर्यावरचे प्रश्न चिन्ह पाहुन वर परत आई म्हणाली ,अग या युपीवालींना सगळं मराठी कळतं चटकन त्या शिवाय का ऐवढे युपीवाले कामं करतायत मुंबईत.आता मलाही तिचं तीच्या या वाक्यावर विश्वास ठेवावासा वाटत होता.
.
मी मागे इथे लिहिले आहे का
मी मागे इथे लिहिले आहे का आठवत नाही....पुन्हा एकदा डकवतो..
माझी एक दुर ची आजी मराठी उत्तम बोलत असे पण हिंदी बोलताना मराठी + हिंदी अशीच बोलायची. पुर्वी बर्याचदा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आमच्या नागपुर साईड ला थंड ताक विकायला भय्ये / गरीब गरजु लोक यायचे. त्यांच्या कडच्या त्या मातीच्या मटक्या मधे ताक असायचे, बरेचदा त्याला आले, मीठ लावलेले असायचे. एकदा माझी ही आजी नेहमीच्या भैया ला म्हणाली..." अरे ओ भैया, ताक अच्छा है ना ? उस मे अल्ला डाला है ना ?" भैया उडालाच....मग त्याला लक्षात आले की ताकाला आले लावले आहे का असे विचारायचे आहे
अल्ला डाला है ना ?" अभिच तो
अल्ला डाला है ना ?"
अभिच तो उन ,अभिच तो पाउस की जोरदार सर, ऐसाही होता हय श्रावण मै
अल्ल्ला
अल्ल्ला
अल्ला डाला आई ग मेले हसून
अल्ला डाला
आई ग मेले हसून
अल्ला....
अल्ला....
उस मे अल्ला डाला है ना >>
उस मे अल्ला डाला है ना >>
आमच्या एका मराठी जनरल
आमच्या एका मराठी जनरल मॅनेजरने भर मीटिंग मध्ये अशीच धम्माल उडवली होती. प्रोजेक्ट रिव्यूची अगदी सिरियस मीटिंग चालू असतांना अचानक stationary वाला मुलगा आत आला आणि त्याने एक डायरी जीएमच्या समोर ठेवली. तो जाणार इतक्यात जीएम ओरडले, " अरे तुमको बोला था ना खिसेके साइज की डायरी लानेको. ये डायरी संभालनेकी पंचाईत होती है !!"
अल्ला>> अवघडे
अल्ला>> अवघडे
माझ्या आज्जीचा असा समज होता
माझ्या आज्जीचा असा समज होता कि माझा भाऊ हा आमच्या कोणत्यातरी पुर्वजाचा पुनर्जन्म आहे. एकदा भावाची मैत्रीण आलेली असतांना ती मैत्रीणीला सांगत होती.."इसके आंग मे हमारे आजोबा आये हैं"
साबांचा केटरींगचा बिझनेस आहे. मागे कोणालातरी तुप न घातलेले लाडू हवे होते तेव्हा त्या म्हणाल्या "तुप नहीं डाला तो लाडू वळके कैसे आयेंगा?" :हहपुवा:
पियु
पियु
कहर किस्से
खरंच कहर किस्से
खरंच कहर किस्से

अल्ला डाला .. बाकीचे किस्से
अल्ला डाला .. बाकीचे किस्से पण ...
अल्ला, हे राम
अल्ला, हे राम
सॉल्लिड आहेत नवे किस्से
सॉल्लिड आहेत नवे किस्से
अल्ला... हे राम
अल्ला... हे राम
(No subject)
'अल्ला डाला'........
'अल्ला डाला'........
जबरी किस्से.
अल्ला डाला है ना ?" भैया
अल्ला डाला है ना ?" भैया उडालाच.>>>>
नशीब त्याला कळलं ,नाहीतर तो जिथे अल्ला शोधायला गेला असता त्या लोकांनी त्यालाच ताकात बुडवुन बदडलं असतं .
.
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=Q4EbklFEXOg
चारीमुंड्या चित
अल्ला
अल्ला
(No subject)
अमेरिकेत जन्माला आलेली/
अमेरिकेत जन्माला आलेली/ वाढलेली एक मुलगी, भारतीय चित्रपटाचे संवाद म्हणतेय...
' हे भगवान, सारी दुनिया भरकी खुशियां इसकी चोलीमें भर देना....'
Pages