अभिप्राय

Submitted by संपादक on 23 October, 2014 - 21:05

वाचकहो,

आपणां सर्वांस दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा!

मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २०१४बद्दल आपले अभिप्राय येथे वाचण्यास आम्ही उत्सुक आहोत. अनेक मायबोलीकरांच्या स्वयंस्फूर्त सहभागामुळेच या अंकाची निर्मिती होऊ शकली, याची आम्हांस विनम्र जाणीव आहे.

बहुविध साहित्याने नटलेली ही निर्मिती आपल्याला कशी वाटली, हे जरूर सांगा. अंकातील प्रत्येक लेखावर प्रतिसाद देण्याचीही सोय आहे. ते सर्व प्रतिसाद या दुव्यावर पाहू शकता: http://vishesh.maayboli.com/navinlekhan

हितगुज दिवाळी अंक २०१४

विषय: 

अंक छानच झालेला आहे, सर्व संबंधितांचे अभिनंदन! चित्रमय विनोद वाचून खुसकन् हसू आले. इतर भाग वाचायचा आहे. यंदा माझी गझल अंकात असल्याने कुतुहलाने प्रथम त्या विभागात जाऊन गझलवाचन ऐकले. ज्या कोणी माझी गझल सादर केली आहे त्यांनी ती छान सादर केली आहे.

ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी:

मराठी गझलेसाठी नावीन्यपूर्ण अटी घालण्यात आल्या होत्या व त्यामुळे एक प्रकारे तो तरही गझलसारखाच प्रकार झाला होता.

१. गझलेची मध्यवर्ती कल्पना 'काळ' (काळ / वेळ / मृत्यू ह्या अर्थी) असावी. (जरी गझलेत अशी मध्यवर्ती कल्पना नसते तरी ही अट आवडली).

२. गझलेत नऊ रसांपैकी बीभत्स रस व वीर रस सोडून बाकीच्या सात रसांवर प्रत्येकी एक एक शेर रचायचा होता. हे मोठेच आव्हान वाटले.

ह्या नावीन्यपूर्ण कल्पनेसाठी मंडळाचे अभिनंदन! (भले गझल अशी ठरवून केली जात नसली तरी अशी अशी गझल रचायची आहे ही अट सतत आव्हानात्मक वाटत राहिली हे खरे)

जसजसे बाकीचे साहित्य वाचेन तसतसे मत देईनच!

माझ्या गझलेसाठी माझ्या संपर्कात असलेल्या माबोकर देवा ह्यांच्या पेशन्ससाठी त्यांचे विशेष आभार!

शुभदीपावली!

-'बेफिकीर'!

नमस्कार मायबोलीकर,

आपल्या सोयीसाठी लेखकांच्या नावासहित अनुक्रमणिकेचा दुवा 'संपादकीय' या पानावर सगळ्यांत शेवटी दिला आहे. सहकार्याबद्दल आभारी आहोत.

सस्नेह,
संपादक मंडळ
हितगुक दिवाळी अंक २०१४

वरवर चाळला,
छान अंक. वाचावासा वाटावा असा. पुरेपूर कल्पकता जी मायबोलीची खासियतच आहे. छोटीमोटी सदरे पटकन चाळूनही घेतली. माझ्या आवडीचे कथालेखन हा विभाग आणि त्यातील गूढकथा वाचण्यास उत्सुक. ५-६ च आहेत. एकूणएकाचा फडशा पाडण्यात येईल. Happy

छान वाटतोय अंक. अजून पूर्ण बघितलाही नाहीये. श्रेयनामावलीची कल्पना आवडली.

मेघना एरंडेची मुलाखत छान. पूर्वाचं अभिनंदन त्यासाठी.

बाकी देशोदेशीची खाद्यसंस्कृतीमधलं चाळलं. संपदा आणि टण्याने मस्त लिहीलंय.

बाकी संपादकांचं अभिनंदन. शुभ दिपावली.

आउटडोअर्स, लेखाच्या चौकटीच्या आत एक स्क्रोल बार आहे. तो वापरून खाली गेल्यास लेख दिसत जाईल. तुम्ही संपूर्ण लेख स्क्रोल डाउन केला आहे ना?

संपादक , शब्दकोडे-२ मधे एक बारीक मुशो चूक आहे. तिथे कमेन्ट टाकली आहे. कृपया दुरुस्त केले तर बरे होईल. धन्यवाद!

टण्या, कमेंट टाकली तेव्हा तो स्क्रोलबार नव्हता बघितला. नंतर बघितल्यावर कमेंट एडिट केलीये.

मेंडकेंचा सल्ला मधली चित्रं अगदी भन्नाट. मिनोती आणि कंसराज यांचं अभिनंदन.

उत्सुकतेने वाट बघत असलेला अंक हाती पडताच आधाशासारखा वाचायला घेतला. अजून पूर्ण वाचून झालेला नाही अर्थातच.
आवडलेल्या काही गोष्टी

  1. संपादक मंडळ, रेखाटनकार यांची फोटो/चित्रासकट थोडक्यात ओळख ही भन्नाट आयडिया आहे. खरेच अभिनव.
  2. कथा आणि काव्य वाचनाची कल्पना
  3. रेखाटने
  4. सहजपणे मेन्यू अ‍ॅक्सेस करता येणं
  5. लेख/कविता/कथे च्या पानावर लेखकाचा/कविचा थोडक्यात परिचय
  6. बॅकग्राउंडवरची कोयरीच्या डिझाइनची नाजूक नक्षी
  7. मुखपृष्ठावरची कृष्णधवल चित्रे आणि संगीत
  8. त्या त्या लेखाखाली प्रतिसाद देण्याची सोय
  9. विषयांचे वैविध्य
  10. छोट्या जाहिराती
  11. मेंडकेची रेखाटने - आधी रेखाटनांचा उल्लेख केलेला आहेच पण मेंडकेची चित्रं डिजर्व स्पेशल मेन्शन
  12. त्या सोनेरी लखोट्यावर लिहिलेल्या सुरस इंफोबिट्स
  13. कथांमाध्ये पॅरेग्राफ मध्ये येणारी नाजूक नक्षी

आता थोड्या (दॄष्ट लागू नये म्हणून) जाणवलेल्या उणिवा

  1. IE मधून मला मुखपृष्ठावरून अंकाच्या मेन पानावर जाता आलं नाही. क्रोम मध्ये मात्र नीट चाललं
  2. मेन पानावर मेन्यूच्या वर असणारी बदलत्या चित्राचं बॅनर. खूप जागा व्यापली त्यानी असं वाटलं आणि बाकीच्या लुक अँड फीलला मॅच न होणारी चित्रं वाटली ती. रेखाटनकारांच्या मेहेनतीची जाणीव अर्थातच आहे पण..
  3. सगळ्या कविता/गझला एकाच ऑडियो फाइलमध्ये एकत्रित केलेल्या नाही आवडल्या फारशा. नजरेसमोर एक कविता आणि ऐकू येणारी वेगळीच असं काहीसं रसभंग करणारं झालं ते
  4. अंकाची वाट बघायला लागणं Happy
  5. खाद्ययात्रेतले सुर्‍या/जपानी कुझिन सोडता इतर लेखांत वेगळ उठून दिसणारं काही वाटलं नाही
  6. विचारमंथनाचा जरा ओवरडोस झाला माझ्यासाठी वैयक्तिकरीत्या. अर्थात हीच गोष्ट इतर अनेकांसाठी पॉझिटिवच्या यादीत जाइल याची जाणीव आहेच.

छान कलरफुल वाटतोय अंक .मेंडकेचा सल्ला ,देशोदेशीची खाद्यसंस्कृती, मुलाखती आवडल्या. कथा अजुन वाचायच्या आहेत पण दिवाळी अंक आवडला .

शब्दकोडी छान आहेत.... शब्द शोधताना डोक्याला छान चालना मिळते.

शब्दकोडी इंटरअ‍ॅक्टिव्ह करता आली असती तर ऑन लाइन सोडवण्यात अधिक मजा आली असती.

शूम्पी यांनी मांडलेल्या वरील मुद्द्यांपैकी बहुतांश मुद्द्यांशी सहमत.

"सगळ्या कविता/गझला एकाच ऑडियो फाइलमध्ये एकत्रित केलेल्या नाही आवडल्या फारशा. नजरेसमोर एक कविता आणि ऐकू येणारी वेगळीच असं काहीसं रसभंग करणारं झालं ते" >>> याबाबत अजूनही काही बदल करता येणे
शक्य असल्यास संपादक मंडळाने विचार करावा.

संपादक मंडळाचे आभार की त्यांनी त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून मेहनत घेऊन दिवाळी अंक प्रकाशित केला. त्यासाठी आपल्या वैयक्तिक आयुष्यात किती तडजोडी कराव्या लागतात, किती व्यक्तिगत कार्यक्रम बाजूला ठेवावे लागतात याची कल्पना आहे, त्यामुळे ती जबाबदारी घेणे आणि अंक प्रकाशित करणे यासाठी मंडळाचे कौतुक. संपादक मंडळाची करुन दिलेली ओळ्ख फारच छान आणि अभिनव कल्पना आहे. अंकावर काम करणार्‍या इतरही सर्वांची ओळख खरंच मस्तपणे करून दिली आहे! खूपच आवडले हे... शिवाय अंक नेहमीच्या प्रथेप्रमाणे नरकचतुर्दशीला प्रकाशित होणार नाही हे लक्षात आल्यावर मंडळाने त्याची सूचना दिली हे विशेष कौतुकास्प्द आहे.

याआधीच्या तेरा संपादक मंडळांना अंकावर काम करायला जितका वेळ मिळायचा त्यापेक्षा कितीतरी अधिक अवधी या वेळेस उपलब्ध असल्याने अपेक्षा फारच उंचावल्या होत्या आणि अंक पाहताक्षणी त्या फुग्याला टाचणी लागली. एकतर साहित्य स्वीकारणे बंद केल्याचा दिनांक (मंडळाच्याच घोषणेनुसार) आणि नरकचतुर्दशीचा दिवस यात जवळ्पास एक महीना आणि एक आठवडा होता. इतका प्रदीर्घ कालावधी या आधीच्या कोणत्याच मंडळाला मिळाल्याचे स्मरणात नाही. असे असतानाही दिसायला इतका निराशाजनक अंक आधीच्या तेरा वर्षात पाहिला नव्हता.

मुखपृष्ठ दिवाळी अंकाची शान वाढवणारे असावे - किमान ते पाहून अंक वाचायची उत्सुकता वाढायला हवी. अगदीच कल्पनेचं दारीद्र्य वाटलं मुखपृष्ठ पाहून. एका दृष्टीने बरेच आहे - ते पाहून आत काय वाढून ठेवले आहे याचा साधारण अंदाज येतो आणि अंक तो अंदाज अगदी सार्थ ठरवतो! वेब डिझाईनच्या भाषेत ज्याला real estate म्हणतात तिचे नियोजन हा अत्यंत म्हत्त्वाचा मुद्दा पार भिरकावून दिलेला आहे. त्याऐवजी लेखनाचा font मोठा केला असता तर ते सदुपयोगी झाले असते. संपादक मंडळाच्या झालेल्या काही गैसमजाच्या निमित्ताने मंडळाशी ई-पत्रव्यवहार झाला होता तेव्हा मी या गोष्टींसाठी मदत देऊ केली होती कारण मी आणि प्रमोदने मिळून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायांच्या websites तयार करून दिलेल्या आहेत आणि देतो. शिवाय हे आणि याआधीचे वर्ष वगळता मायबोलीच्या बर्‍याचश्या दिवाळी अंकांमध्ये काही ना काही काम केले आहे - अगदी संपादक मंडळातही! त्यामुळे मंडळापुढे उभ्या राहणार्‍या विविध प्रकारच्या अडचणींची जाणीव आहेच आणि त्या याही मंडळापुढे उभ्या राहिल्या असतील याची कल्पना आहे. पण त्यांचा सामना करुनही नरकचतुर्दशीचा प्रकाशनाचा दिवस कधी चुकला नव्हता. सर्वांत जास्त वेळ मिळूनही ती परंपरा मोडली गेली याची टोचणी मलाच लागली आहे. बरं स्वयंसेवकांची यादी वाचली तर मोठाच ताफा उपलब्ध होता असे दिसते. 'तांत्रिक अडचण' ही अत्यंत सोयीची आणि काहीही न सांगता बरेच काही सांगून जाणारी सबब आहे.

संपादकीय वाचले, अंक चाळला. बाकी अंक वाचला(च) तर योग्य जागी प्रतिक्रिया देईन. आशीष महबळ्चा लेख एवढे एकच आकर्षण सध्या तरी दिसते आहे आणि आशीष कधीच निराश करत नाही.

संपादकीय सोडून काहीही अंक न वाचता, तो वाचण्याची अनिच्छा व्यक्त करून, स्वतःला न आवडलेल्या गोष्टी सांगताना भारंभार सरसकटीकरण करून, पहिल्या परिच्छेदात वाटलेल्या विशेष कौतुकास्पद गोष्टीविषयी प्रतिसाद पूर्ण करेपर्यंत स्वतःचे मतपरिवर्तन झालेले बघून गम्मत वाटली. नक्की वाईट कशाचं वाटतंय?
१. अंक नीट इंटीमेट करून पाडव्याला येणे.
२. या मंडळाला वेळ जास्त मिळणे.
३. गैरसमजातून तुम्ही काहीही मदत न करता सुद्धा अंक देखणा होणे.
४. मुखपृष्ठ तुम्हाला न आवडणे.
५. real estate चे नियोजन तुम्हाला न आवडणे.
अंक जरूर वाचून बघा.

चित्र खूप छान आहेत. अंक अजून चाळलाच आहे तरी काव्यधारा आणि देश विदेशाच्या खाद्य प्रपंचावरचे लेख आवडलेत. मुखपृष्ठावरील फ्लिकरींग आवडले नाही. सेल्फस्केचेस आणि ओळखची संकल्पना मस्त Happy

संगिताने सुरुवात , संपादक मंडळाचे ओळखीचे नाविन्य या गोष्टी मनापासून आवडल्या. वाचायला आजच सुरुवात केली आहे .

अंक प्रकाशनाबद्दल संपादक मंडळाचे अभिनंदन!
सहभागी अनेकांच्या अनेक प्रयत्नांचे हे 'फळ' आहे याची जाणिव आहे.
अंक वरवर चाळला आहे... काही विभाग पूर्ण वाचले/ऐकले. त्यातही सुधारणांना खूप जास्त वाव आहे असे वाटते. वर काही वाचकांनी नमूद केले आहेच.

वेळ मिळेल तसा संपूर्ण वाचायचा / ऐकायचा प्रयत्न आहे.

अधिक लिहीत नाही पण थोडक्यात, वै.म./प्र.: कधी कधी फराळाचा बेत तर छान असतो, पण सर्वच पदार्थ मात्र खमंग वा चविष्ट होत नाहीत. चालायचेच! Happy

'स्वतः वाचक' या भूमिकेतून संपादक मंडळाची प्रतिक्रीया वाचायला अधिक आवडेल.

अंक आवडला.
छान आहे.
देखणा आहे.
संपादक मंडळ आणि अंकाशी संबंधित सगळ्यांनाच धन्यवाद आणि अभिनंदन.

मेंढकेची चित्रे लाजवाब आहेत. मिनोती, कंसराज, तुम्ही मेंढकेला अगदी जिवंत केले आहे.

संपादक, मेंढकेच्या विभागात प्रतिसादाची खिडकी येत नाही.

अंक बघताक्षणी देखणा वाटला. संपादकियांची ओळख आणि मैत्रेयीची रेखाटनं खूप आवडली. अंकाच्या कामात मदत करणार्‍या सगळ्यांची अशी वेगळी ओळख करून द्यायची संकल्पना छान आहे.
मेंडकीची चित्रं भन्नाट आली आहेत. कंसराज आणि मिनोती मस्त काम केलं आहे तुम्ही.

बारीक नक्षीकाम, रांगोळ्या, सजावटी आवडल्या.. पण परत परत अंक उघडल्यावर या सजावटीचा ओव्हरडोस झाल्यासारखं वाटतंय. त्यातल्या त्यात वरची चित्रं सारखी बदलत जातात तो प्रकार, थोड्यावेळानी कंटाळवाणा वाटायला लागतो. एकच चित्र हवं असं वाटलं दुसर्‍यांदा अंक उघडल्यावर.

अजून १-२ कथाच चाळल्या आहेत. विचारमंथनातले पण लेख नुसतेच वरवर चाळलेत. सविस्तर वाचल्यावर त्यावर प्रतिक्रिया देईनच. पण कथा विभाग अंमळ छोटाच वाटला मला. मी बहूतेक विचारमंथन आणि कथा विभागात भरपूर साहित्याची अपेक्षा केली होती. त्यामानाने कमी लेख /कथा जाणवल्या. एकुण विचारमंथन विभाग भरगच्च दिसतोय पण त्यातले विषय वेगवेगळे केल्यावर लेख कमीच वाटताहेत. Happy

कविता, गझल भाग सगळ्यात शेवटी बघेन. Happy शब्दकोडी, हास्यटपर्‍या, जाहिराती हे प्रकार नविन आहेत.

अभिनंदन संपादकमंडळी..

अंक ऑस्सम झाला आहे. अंकाची टेंप्लेट मला आवडली.

संपादक मंडळाचे आणि अंकासाठी ज्यांनी ज्यांनी काम केले त्या सर्वांचे अभिनंदन !

मंडळातील सर्वांची ओळख आणि त्यांची रेखाटनं लिखाण केलेल्या सर्वांचा फोटो आणि थोडक्यात ओळख मायबोलीसाठी नावीन्यपूर्ण.

पण कथा विभाग अंमळ छोटाच वाटला मला.
>>
हे माझेही मत Happy
कारण माझीही पहिली धाड कथा विभागावर होती, किमान १० कथांची अपेक्षा होती. अर्थात यात मंडळाची काहीच चूक नसून तितकेसे साहित्य आले नसणार हे उघड आहे, त्यामुळे पुढच्यावेळी येथील सर्वच लेखक मंडळी हे मनावर घेतील अशी अपेक्षा Happy

Pages