झी-जिंदगी

Submitted by कविता१९७८ on 10 September, 2014 - 00:37

पुर्वी जेव्हा केबल हा प्रकार अस्तित्वात नव्हता तेव्हा दुरदर्शन वर छान मालिका दाखवल्या जायच्या . बहुतकरुन त्या कुठ्ल्या न कुठल्या हिंदी उपन्यासावर आधारीत असायच्या. जास्तीत जास्त २०-२५ भागांची एक मालिका असायची. आतिशय अर्थपुर्ण संदेश देणार्‍या मालिका असुन सुद्धा कुठेही भडकपणा नसायचा. नट्यांचा कमीतकमी मेकअप, साध्या साड्या , सुंदर अभिनय. परंतु साधारण ९०-९२ च्या दरम्यान केबल हा प्रकार आला आणि पुर्ण चित्रच पालटले, मालिकांमधे अतिशय श्रीमंती , भडकपणा दाखवला जाउ लागला, मालिकांची टी.आर.पी. वाढवण्यासाठी काही संदर्भ नसेलेले कथानक वापरले जाउ लागले, एकावर एक मालिका येउ लागल्या, नवनवीन चेहरे येउ लागले. मालिकेचे भाग वाढवण्याच्या नादात कथानकाला भलतेच वळण देणे सुरु झाले, एकाच घरातील एक सुन पहील्या नवर्‍याबरोबर घटस्फोट घेउन त्याच घरातील दुसर्‍या मुलाबरोबर संसार थाटु लागली, एकाच घरात ४-४ कुटुंबे एकत्र नांदु लागली प्रत्येक पात्र थोड्या थोडया वेळाने चांगले आणी वाईट अशी दुय्यम भुमिका साकारु लागले. प्रत्येक पात्र अपघातात मरण पावुन काही एपिसोड नंतर जीवंत होणं , नायक - नायिकांचा स्मृतीभ्रंश होणं हे सगळं करता करता काही मालिका ५०० भागापर्यंत पोहोचल्या. प्रत्येक मालिकेत नायिकेचा भडक मेकअप, मग ती कीतीही गरीब असो, विधवा असो तिला सजुन धजुन दाखवले गेले पण आता सर्वांनाच त्याचा कंटाळा येउ लागालाय, सारखं तेच कथानक , सासु - सुनांची भांडणे , वहीनी - नणंदांची भांडणे , वहीनीची कारस्थानी आई घरात येउन उच्छाद मांडणे म्हणुन ह्या मालिका पाहणेच बंद केले होते.

असेच एके दिवशी चॅनल्स चाळता चाळता झी चे जिंदगी चॅनल लावले. पाकीस्तानी मालिका असतात पण कुठेही भंपकपणा नाही , ३०-३५ भागांची मालिका असते. अतिशय साधेपणा , बोलण्यात अतिशय आदर , कपडे अतिशय साधे, अतिशय श्रीमंत घर असले तरीही बायकांचे ही कपडे अतिशय साधे , दगिने तर शक्यतो लग्नासारख्या समारंभाशिवाय घातलेले दाखवले गेले नाहीत, अर्थपुर्ण मालिका. हा आता पाकीस्तानी मालिका पाहणे न पाहणे हे प्रत्येकावर आहे पण भारतीय मालिकांप्रमाणे अगदी प्रत्येक गोष्टीची अतिशयोक्ती अशा मालिकांमधे दिसत नाही की सारखं अल्ला अल्ला केलं गेलेलं नाही त्यापेक्षा तर भारतीय मालिकेत देवालाही सोडलेलं नाही. कुठेही कृत्रीमता वाटत नाही , घरे सुद्धा आर्थिक परीस्थीतीनुसार दाखवली आहेत.

ह्या चॅनलवरील माझी आवडती मालिका म्हणजे "कीतनी गिर्‍हें बाकी है", ही मालिका स्त्रियांवरील बंधने, अत्याचार, बलिदान ह्या वर आधारीत आहे , रोज वेगळी कहाणी दाखवली जाते. ह्या मालिकेचे सुत्र संचालन कीरण खेर यांनी केले आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हमसफर चं ते कडवं खुप छान आहे.

कभी ये हाल दो दिलों मे यकदिली थी बहोत...
कभी ये मरहबाँ के जैसे आशनाई न थी....
के धुप छाँव का आलम रहा खुदाई न थी....
वो हमसफर था मगर उससे.. हमनवाई न थी...

सीरीयल खुप छान आहे.

हमसफर सिरीयल मला आवडते आहे. प्लॉटमधे खूप प्रचंड नाविन्य नसलं तरी ज्या सहज साधेपणाने आणि म्हणूनच आपसूक वाटाव्या अश्यापद्धतीने घटनांची मांडणी केलीये ते फार सुंदर आहे.
सर्व कलाकारांचे ऐकत रहावे असे उर्दूमिश्रीत हिंदी उच्चार. आणि कुणीही बदाबदा अभिणै करत नाही. एकच अभिनेता, अभिनेत्री वेगवेगळ्या सिरीयलींमधे असले तरी ते सगळे त्या त्या व्यक्तिरेखाच वाटतात. हे फार मस्त आहे.

या लोकांचे कास्टिंगच इतके परफेक्ट आहे की पहिल्याच एपिसोडमधे आपण त्या नटाच्या आधीच्या व्यक्तिरेखेला, नटाला विसरून नवीन व्यक्तिरेखा सहजपणे अ‍ॅक्सेप्ट करतो.

अगदी परफेक्ट उदाहरण द्यायचे तर जिंदगी गुलझार है मधली कशफची आई जिने साकारली आहे त्या अभिनेत्रीचे. जवळजवळ प्रत्येक सिरीयलमधे ती दिसलेली आहे. आणि केवढी व्हरायटी.. केवढी सहजता प्रत्येक ठिकाणी. तेच ऑन झारा मधल्या ऑनच्या आईचे...

हमसफरमध्ये आता ट्विस्ट सुरु झाला. आता टेन्शन असेलना. मी नाही बघणार आजपासून. शेवटचे दोन भाग बघेन. इथे लिहा हा प्लीज कोणीतरी शेवट जवळ आलाकी.

मला आशर आणि खैरत आवडले. बाकी कलाकार पण चांगले आहेत.

अन्जु.. अगं हे भाग इतके रडके वगैरे नाहीत.. चुकवु नकोस..

मी आता 'मात' बघायला सुरुवात केली.. दोघी बहिणी २ ध्रुवावरच्या आहेत.. इंटरेस्टिंग!

होय..
या मालिकांमधे कितीही गंभीर प्रसंग असला तरी अगदी संयतपणे नि सुंदर डायलॉग्ज मधे असतात..
उगाच धायमोकलुन रडणे नाही नि ढॅणढॅण संगीत लावुन रिपीट नाही.. केकते सारखे...

अन्जू, आहे खरं टेंशन त्या नविन एंट्रीमुळे. मी युट्युब वर पाहिली. सगळ्यांना नको असेल म्हणून नाहीतर स्पॉयलर इथे दिला असता. Happy

१०० पोस्ट साठी व धागा काढ्ल्या बद्द्ल अभिनंदन. मी आधीपासुन धागा वाचत आहे. मी पुर्ण पाहिलेली या चॅनल वरची पहिली व खुप आवड्लेली मालिका जिंन्दगी गुलजार है.त्यातल शेवटी दाखवणार गाणं मला फार आवडतं.
जिंदगी खाक न थी......खाक उडाके गुजरी . खुपच सुंदर आहे गाणं आणि सिरीयल देखील .

हम्म्म चैत्राली. मला डाऊट आहे त्याला त्या साराने आणलं असणार, तिचा कझिन आहेना तो. दिवाळी आहेना म्हणून मी दोन तीन दिवस स्किप करणार आहे ती मालिका, उगाच सणाचे टेन्शन नको. सोमवारी बघेन.

एक मराठी मालिका बघतेय तिच्यात टेन्शन येणारच आहे, अजून हे पण नको दिवाळीत टेन्शन. सो सोमवारी बघेन. आज नाही बघितली.

जिंदगी गुलजार आहे, दोनदा दाखवली पण मला नीट नाही बघता आली. त्यातली नायिका मस्त होती, फवादबरोबरची आणि हमसफरचीपण आवडली.

आता जिंदगी गुलजार है परत दाखवतील तेव्हा बघेन नीट.

अन्जु हमसफरचे सर्व भाग आवर्जुन पहा , आपण विचारही करु शकत नाही की ती व्यक्ती व्हीलन असु शकेल. एकही भाग मिसण्यासारखा नाही.

सिरीयली बघताना टेन्शन येते इतकं गुंततात लोक?
अवघड आहे..
सिरीयल आवडणे, प्रेमाने बघणे, उत्कंठा असणे हे ठिके पण सणाच्या दिवशी सिरीयलमधे काहीतरी निगेटिव्ह दाखवलं तर टेन्शन वगैरे म्हणजे अंमळ जरा...
सांभाळा!

अरे बापरे आता तुम्ही माझ्या डोक्यात किडा टाकला, आता मी साराची आई, आशरची आई, स्वतः आशर सर्वांवर संशय घेणार. ती फ्रेंड खैरतची.

बघणार आहे मी पण सोमवारपासून.

अन्जु इतक सीरीयसली घेउ नका , सीरीयल आणि सिनेमे हे निव्वळ करमणुकीसाठी असतात. ते पहायचे आणि सोडुन द्यायचे असतात , जगायचे नसतात.

हो निधप आणि कविता हल्लीच यायला लागलंय टेन्शन मला आणि हल्लीच गुंतायला लागलेय मी नाहीतर असं व्हायचं नाही कधीच, कारण जरा सिरीयल बिघडली कि मी सोडून देते बघायचं.

म्हणूनच कुठलीही सिरीयल बघायलाच घ्यायची नाही असं ठरवलं पण हमसफर बघावीशी वाटली. माझी आई सर्व सिरीयलमध्ये गुंतते तर तिला नावं ठेवणारी मी तिच्याच वाटेवर जातेय की काय अशी भीती वाटतेय मला. त्यामुळे बघायची नाही नवीन सिरीयल हा फंडा.

आज बरेच दिवसांनी बघितली हमसफर.

साधारण अंदाज आला मध्ये काय घडलं त्याचा. आता बघेन रोज.

जिंदगी गुलजार आहे, येत्या रविवारी दिवसभर आहे.

'मात' सुद्धा आवडली.. एकामागे एक बरेच धक्के होते त्यात.. शेवटही एकदम वेगळा..
आता जरा ब्रेक घेतेय या सिरीअल्स मधुन ..

ओके अर्चना.

अग जास्त बघत नाही. हमसफरबद्दल ऐकलं होतं आणि ते दोघेही आवडले. आज त्या खैरतचा अभिनय खूप छान होता विशेषतः ती आशरला भेटायला जाते ऑफिसमध्ये तेव्हा, डायलॉगही सुंदर होते तिचे.

जिंदगी गुलजार है, बघायला मिळते का बघूया.

झी-जिंदगी वर कोणी ' आईना दुल्हन का' पाह्तंय का? ती 'मात' सिरीयल मधल्या अभिनेत्रीचा किती वेगळा रोल आहे यात. ' मात' मध्ला तिचा रोल मला एकता कपुरच्या हिरॉईन सारखा वाट्ला होता, सगळ्या त्यागाची जबाब्दारी आपल्याच डोक्यावर असल्यासारखा.
पण यात एकदम विरुद्ध रोल आहे. आजीने लाडावलेली, स्वतःपुरते पाहणारी. काल स्वतःच्या आईविषयी बोलताना कसा वाकडा चेहरा केला तिने. मला रागच आला तिचा.. Proud

'हमसफर मी यू ट्यूब वर बघितली. कथेला धरून मालिका पुढे जातेय हे आवडले . बाकी सर्व तसेच आहे.पण वेगळे वातावरण,भरजरी साड्यांचा ,दागिन्यांचा अभाव हे छान वाटले.थोड्या भागात मालिका संपली हे आजून छान.जिंदगी गुलजार है' संथ वाटतेय.यू ट्यूबवर इंडो-पाक वेबयुद्ध चालले असते ते वाचायला आवडते.

वेबयुध्द-म्हणजे?>> ज्या सिरीयली पाकिस्तानच्या आहेत त्या किंवा भारतीय सिरियली ज्या पाकीस्तानातील लोक पाहतात .त्यांच्या तुनळी(युट्युब ) वरच्या कमेंट्स पाहील्यावर लक्षात येईल तुमच्या. नीट पाहीलं तर या धाग्यावर ही लुटुपुटुची लढाई दिसेल सुरवातीला .:फिदी: Happy

मात मी पाहात होते सुरवातीचे भाग एवढे पटले नाही पण शेवटच्या भागात कसला जबरी सीन आणि अभिनय केलाय मोठी बहीण ऐमन ने,कसली सुनावते त्या नवरयाला एकदम जबरी. शेवट पण भारी सिरीयलचा.मस्तच Happy

जिंदगी गुलजार है मलापण संथ वाटली. मागे रविवारी दिवसभर होती पण खूप स्लो असल्याने मी जास्त वेळ नाही पाहू शकले. हमसफर मात्र छान वाटली, वेग होता कथानकाला.

Pages