देवांचे जुने फोटो, धार्मिक पुस्तकांचे काय करायचे?

Submitted by टोच्या on 21 October, 2014 - 11:01

प्रत्येकाच्याच घरात देवांचे फोटो असतात. दरवर्षी त्यात एक-दोन फोटोंची भर पडतच असते. घरात देवा-धर्माची अनेक पुस्तकेही असतात. मग त्यात अगदी महालक्ष्मीच्या पुस्तकांपासून ते गीता, महाभारत, रामायणासारख्या महान ग्रंथांपर्यंत. वर्षानुवर्षे घरात असलेले फोटो कुजतात, फुटतात किंवा अस्पष्ट होतात. धार्मिक पुस्तके आपण कचराकुंडीत फेकून देऊ शकत नाही. धार्मिक साहित्य नदीत सोडावे अशी एक धारणा आहे. मात्र, नदीत सोडले तर त्यावर गाळ साचून, लोकांचे पाय लागून त्याची अधिकच विटंबना होऊ शकते. अशी पुस्तके, फोटो जाळूनही टाकता येत नाही. मग अशा साहित्याचे करायचे काय, याबाबत आपल्या सूचनांचे स्वागत आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मते काही पर्याय:

(१) नदीत किंवा जलाशयात सोडण्यास हरकत नाही. शंका असल्यास एकदा फूल वाहून मनोभावे हात जोडून नमकार करावा अशा पुस्तकांना/फोटोंना व मग नदीत सोडावे.

(२) जाळण्यासही हरकत नाही कारण आपल्याला कितीही प्रिय असला तरी गेलेल्या माणसाला आपण शेवटी अग्नी देतोच, मग जीर्ण पुस्तकांनाही दिल्यास काही पाप लागत नाही/वाईट होत नाही.

(३) कोणी अधिकारी व्यक्ती असल्यास त्याला ही पुस्तकेफोटो द्यावेत व यथायोग्य विल्हेवाट लावायची विनंती करावी.

नदीत सोडून कशाला जल प्रदुषण करताय बूवा? अग्नी द्या. Happy तसे करताना मनाला अरे वाटण्याकरिता प्रार्थना म्हणा हवतर. Happy

कोकणस्‍थ, सेनापती,
घरातील काही जुन्या वस्तू दोन दिवसांपूर्वी जाळल्या. तेव्हा अशी काही जुनी पुस्तके सापडली. पण त्यावरचे देवांचे फोटो पाहून जाळण्याची हिंमत झाली नाही.

रद्दीत देऊन त्यातला कागद रिसायकल करावा, धार्मिक विचार आचरणात आणावेत.
कागद जाळून/ पाण्यात टाकून फक्त घाण वाढेल.

कागद हा कुजणारी वस्तू आहे. विसर्जन करायचे नसेल तर फाडून गांडूळ खत तयार करताना त्यात घाला. गांडूळ खत तयार करणे आणि इतर रासायनिक खतांऐवजी वापरणे ही निसर्गाची, म्हणजे पर्यायाने देवाची पूजा आहे. ज्याचं त्यालाच परत जाणार आहे.

टोच्या,
यज्ञ या प्राचीन संकल्पनेत, देवापर्यंत काही पोहोचवायचे, तर ते अग्नीच्या हवाली करायचे अशी समजूत आहे. देवाचीच प्रतिमा देवापाशी पोहोचवायला यापेक्षा सोपा मार्ग कुठला आहे?

रच्याकने
व्हॉट्सॅप इ. वर येणार्‍या देवाच्या प्रतिमांचं काय करतो आपण?

धन्यवाद अमितव, अश्विनी के, इब्लिस
अशा बाबतीत नेहमीच संभ्रम होत असतो. मग ते घट असो वा निर्माल्य. गेल्या महिन्यात बायकोने सांगितले, घट नदीत सोडा. मी स्पष्ट नकार दिला. म्हटलं, तिथे आधीच ढिग पडलाय माती आणि गाडग्यांचा. त्यात आणखी आपल्या घटाची भर. बायको म्हणाली, ही परंपरा आहे. ती पाळावीच लागेल. मी म्हणालो, नाही पाळली तर काय होते बघूया. मग घटातील माती टेरेसमधल्या कुंड्यांमध्ये टाकून दिली.
वडिलांच्या दशक्रिया विधीचा नैवेद्य आणि बाकी सर्व पूजेचे साहित्य पुरोहिताने नदीत सोडायला सांगितले होते. पण गोदावरीच्या शुध्द पाण्यात ते साहित्य सोडण्याची हिंमत झाली नाही. शेवटी नदीकिनारी ठेवून दिला. थोड्या वेळानंतर काही कुत्र्यांनी येऊन तो नैवेद्य फस्त केला. प्रदूषणही नाही आणि एका जीवाचे पोटही भरले.
पण सगळ्याच ठिकाणी हे शक्य होईल असे नाही.

व्हॉट्सॅप सोडा. वर्तमानपत्र, मासिकं, दिनदर्शिका.. अगदी फ्लेक्स बोर्डचं काय करतो? आपल्या पश्चात या सगळ्याचं काय होणारे? आपणच कोणाला त्रास न देता विल्हेवाट लावावी.

Pustake library madhe ghetat ka te vichara.. shunya kimatit sahaj ghetil library madhe... agadich jirna asatil tar chakka recycling saathi wapara...
Photo frames, taak modit kadhaa...
Manatil bhaaw mahatwacha...
Agadich shanka asel tar eka bag madhe bharun maalyawar thewun dya..

काही देवळे किवा समाजसेवी संस्था पुस्तके , पोथ्या घेवून लोकांना दिसेल अश्या जागी ठेवतात, अन्य कोणाला, पुस्तक उपयोगी वाटले तर ते घेवून जावू शकतात. विलेपार्ले येथील पार्लेश्वर मंदिरात अशी सोय आहे.

त्या पुस्तकांमधे माहिती आहे. त्या माहितीचं ज्ञान झालं असेल तर आता ते फक्तं पुस्तकच आहे... निव्वळ कागद. अश्विनी म्हणतेय्य तसा पर्यावरणासाठी काही उपयोग होत असला तर बघा.
नाहीतर त्या पुस्तकातल्या माहितीचा उपयोग होईल अशी माणसं शोधून त्यांना द्या.
पण नदीत सोडणे किंवा जाळणंही हिताचं नाही.

देवाचा फोटो काय मूर्ती काय तिला एक उपयुक्तताच आहे. तुम्ही ती बाळगता तिच्या उपयुक्ततेसाठीच. तुम्ही त्या उपयुक्ततेच्या पुढे गेलात की त्याचं जे काही करायचं ते पर्यावरण इ. ला हानीकारक होणार नाही असच असावं.
देवाला त्याचं काही नाहीये. तो (फक्तं) त्या फोटोत किंवा मूर्तीत नव्हताच.

यज्ञ या प्राचीन संकल्पनेत, देवापर्यंत काही पोहोचवायचे, तर ते अग्नीच्या हवाली करायचे अशी समजूत आहे. देवाचीच प्रतिमा देवापाशी पोहोचवायला यापेक्षा सोपा मार्ग कुठला आहे?>>> चांगले आहे... एकीकडे विश्वास नाही म्हणता नि एकीकडे असे उदाहरण देता? यज्ञात काय प्लॅस्टिक कोटिंगचे कागद, प्रतिमा टाकतात? यज्ञाने हवेची शुद्धी करायची असते, प्रदुषण वाढवायचे नाही.

फोटो पुस्तके फार अडगळ होत नसेल तर नीट ठेवून द्या. बासनात बांधून आणि डांबर गोळी वगैरे घालून. आता घरात जी लहान मुले आहेत ती मोठी झाली की त्यांना इमोशनली कनेक्ट व्हायला फार उपयोग होतो. माझ्या आई कडे देवघरात एक जुनी साईबाबाची तसबीर होती. ती मी घर बसवल्यावर लगेच देवघरात ठेवली. आईचे असे माझ्याकडे तेच आहे आएचा चश्मा व बाबांचे घड्याळ मी जपून ठेवले आहे. ( हे अवांतर)

आजीचे पुस्तक वगैरे मुले जरी धार्मिक वृत्तीची नसली तरी एक भावना मूल्य समजून ठेवायला बघतात. लॅमिनेट करून जपले तर अजून नीट राहते. मुले जगाच्या कोपर्‍यात कुठे ही गेली तरी माय मॉम्स रिलिजस बुक माय फादर्स फेवरिट क्रिश्ना इमेज असे काहीतरी पोस्ट फेस्बुक वर लिहीतात.

न पेक्षा कुठल्यातरी मोठ्या देवळात त्यांचे दान करावे. ठेवून यावे व पुजार्‍याला सांगावे.

न पेक्षा कुठल्यातरी मोठ्या देवळात त्यांचे दान करावे. ठेवून यावे व पुजार्‍याला सांगावे. >>> अमांच्या मताशी सहमत.. खरच द्विधा मनस्थिती होते अशावेळी.. जवळपास एखादी लायब्ररी असेल जिथे धार्मिक पुस्तके ठेवत असतील तर तिथेही विचारुन देता येईल

त्या वस्तू निर्जीव असल्या तरी आपल्या स्मृती त्या जोडल्या गेल्या असतात.त्यामुळे मनाला वेदना होतात हे खरे आहे पण फोटो जास्त जुने झाले की एअर बबल व धूळ यामुळे विद्रुप होतात. त्याचे डिसमेंटल करुन भंगारात द्यावे. पोथ्या चाम्गल्या असतील तर गुरुजींना सांगून उपयोगी कुणाला असल्यास द्याव्यात. ते शक्य नसल्यास सरळ रद्दीत द्याव्यात. रिसायकल तरी होतील.जाळून टाकू नये.

गीता, गिरीश, दाद, डी विनीता, अमा, अनंतरंगी, मुग्धटली, प्रकाश घाटपांडे आपण केलेल्या सूचना खरंच उपयुक्त आहेत. या वस्तू निर्जीव असल्या तरी त्याच्याशी आपण खूप कनेक्ट असतो. खरंतर माझा मूळ मुद्दा माझ्या एकट्याच्या घरातील पोथ्या किंवा फोटोशी संबंधित नाहीये. असं कितीतरी साहित्य प्रत्येकाच्या घरात वर्षानुवर्षे धूळखात पडलेलं असतं. त्याला आपल्याला ना फेकून देता येत ना जाळून टाकता येतं. नुसते फोटो आणि पोथ्‍्याच नाही तर अगदी देवाधर्माचे फोटो असलेली कॅलेंडर्स, विविध कार्यक्रमांची पोस्टर्स, इव्हन लग्नपत्रिकांच्या बाबतीत सुध्दा असा प्रॉब्लेम येऊ शकतो.

विश्वास नसताना डॉक्टर लोक सत्यनारायणाची पूजाही घालतात दुकानात धंदा वाढवायला...........आहात कुठे डीविनिता Wink

पाण्यातच सोडावे असे रीतीरिवाजात लिहिले असल्यास घरी एखादे पाण्याच्या टबात विसर्जित करावे मग त्यातून काढून नंतर हवे ते करता येईल.
मी धार्मिक प्रवृत्तीचा नाही, आणि यावर अधिकारवाणीने बोलू शकत नाही पण हि फक्त एक आयडीया आहे जेणेकरून नदी वा कोणतेही जलाशय यांवर अत्याचार होऊ नये एवढाच हेतू, जो धागाकर्त्यांचाही दिसतोय Happy

आमच्या घरी असे जुने देवांचे फोटो आणी लग्नपत्रिका (कारण त्यावरही गणपतीन्चे फोटो असतात) आम्ही साठवून ठेवतो. जवळच्या समुद्रामधे विसर्जन न करता आम्ही पावसाळ्यात बागेच्या जवळुन ओढा वाहतो त्यामधे विसर्जन करतो. आमची आजी असे करायची. वाहत्या पाण्यात नदीमधे विसर्जन करावे असे तिचे म्हणणे असायचे.

कोणत्याही पाण्यात सोडले तरी ते प्रदुषण! छोट्या ओढ्यात सोडणे तर आणखीच वाईट. कारण कुठेतरी अडकून ते पाणी वाहून जाण्यास अटकाव करू शकतात.

जाळणे ही पर्यावरणास हानीकारक.

सर्व प्रकारचे धार्मिक कागद एकतर recycling करता रद्दीत दया अथवा...

अशा भावना गुंतलेल्या कागदांचा पाण्यात बुडवून लगदा करा आणि या लगद्यापासून papiermache च्या काही decorative अथवा उपयोगी वस्तू बनवून वापरा.

मामी प्लॅस्टिकसारख्या कागदाचा लगदाही होत नाही रिसायकलवालेही घेत नाहीत आणि निव्वळ रद्दीवालेही.
(किमान आमच्या गावात) ते अक्षरशः कचर्यात द्यावे लागतात किंवा जाळून टाकावे लागतात.

मामी प्लॅस्टिकसारख्या कागदाचा लगदाही होत नाही रिसायकलवालेही घेत नाहीत आणि निव्वळ रद्दीवालेही.
(किमान आमच्या गावात) ते अक्षरशः कचर्यात द्यावे लागतात किंवा जाळून टाकावे लागतात.>>
खरंय.. साती. रद्दीवालेही असे फोटो घ्यायला तयार नसतात. कारण ते जिथे विकतात, ते लोकच असे साहित्य घेण्याचे टाळतात.

Pages