म्हैसूरचा ढाण्या!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

bengal_tiger.jpg

आपल्याच मस्तीत रुबाबदारपणे चालणारा वाघोबा कॅमेरात पकडण्याचा मोह मलातरी टाळता आला नाही! Happy

LOL बस्के! हो, आंघोळ घालून, तीट पावडर लावून उभा केला होता त्याला फोटोसाठी! Lol

खरच ढाण्या आहे की.
बस्के हो अग प्राणी संग्रहालयातपण रोज आंघोळ करावीच लागते नाहीतर त्याची आई त्याला ओरडते. Proud

खुपच सही!! जाळी दिसत नाहीए, पिंजर्‍यात जाऊन फोटो काढला का?

<< तीट पावडर लावून उभा केला होता >>

ईSS, अंगडे टोपडे नाही तर निदान डायपर तरी लावायचा! तस्साच फिरतो आहे. त्याला नाही तरी त्याच्या आईवडीलांना तरी काही लाज नाही का?

Happy Light 1

वा...

छान आहे फोटो.

--------------
नंदिनी
--------------

मस्तच गं. तुम्ही दोघं लपाछपी खेळताना तो लपायला जागा बघत होता का?
***************
ॐ नमश्चण्डिकायै |

चान्गलाहे फोटो Happy
(बीबीचे नाव बघुन मला आधी वाटले की टीपु सुलतानावर काही लिहील हेस की काय Wink )

खाते पिते प्राणीसंग्रहालयातला दिसतोय वाघ. Happy

कॅमेराची लेन्स जाळीत घुसवुन काढलाय का फोटो ?(मधे जाळी आली नाही ते !)

आयटे, मस्तच फोटो. Happy

किरु, श्रुती, प्रकाश, लिंबूदा, आश्विनी, नंदिनी, श्रावण, मनस्मी, बस्के, प्रीती धन्यवाद.
रुनी, झक्कीकाका Proud
मधे जाळी नव्हती म्हणून आली नाही फोटोमध्ये! Wink

झक्कास फोटो आहे हा.....एकदम रॉयल.

बीबीचे नाव बघुन मला आधी वाटले की टीपु सुलतानावर >>>> मला देखिल .. Happy
असो सध्या माबोवर वाघ आणि त्याच्या मावशीला चांगले दिवस आलेत.
खुप छान फोटो. जाळीच्या इतक्या जवळ जाण्यासाठी safety railing क्रॉस केले का ?
केले असल्यास पुन्हा तसे करु नका.
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

असो सध्या माबोवर वाघ आणि त्याच्या मावशीला चांगले दिवस आलेत. >> Proud कशाचे दिवस येतील सांगता येत नाही , याआधी सरडा,मोर,पाल हिट होते.
चांगला फोटो.

-------------------------
Light 1

छान आहे Happy

बर्‍याच दिवसांनी फुले-पाने सोडून काहीतरी नवीन Happy आणी व्हेजेटेरियन दिसतोय..गवत खायलासारखा वाटतो आहे Proud

मस्त !

मध्ये जाळी नव्हती म्हणजे तू 'काय बाबा वाळलास फार' अशी विचारपूस करायला गेली होतीस? :d

----------------------------------------------
ऐसीयांचा संग देई नारायणा | ओलावा वचनां जयाचिया ||

पावसामुळे औरंगाबादच्या प्राणीसंग्रहालयातील एक भिंत कोसळून आतील एक वाघोबा बाहेर आल्याचं टीव्हीवर ऐकलं. त्याला तर तू पकडलं नाहीस ना कॅमेर्‍यात ? :p
बाकी, फोटो मस्तच. Happy

>>safety railing क्रॉस केले का ?
अजिबात नाही! Happy एका बाजूने पिंजरा आहे, दुसर्‍या बाजूने खंदकासारखे खणलेले आहे, व खंदकाच्या पलिकडे वाघोबा आहेत! त्यामुळे असा फोटो काढणं शक्य झालं.
पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप धन्यवाद.
जीडी Lol

छानै वाघोबा.

सॉरी हं एक स्टुपिड प्रश्नः

ढाणा या शब्दाचा अर्थ काय?

मला वाटतं ढाण्या हे वाघाच्या जातीचे नांव असावे.
खर सांगायचं तर मलाही माहीत नाही.. Uhoh
जाणकारांनी प्रकाश पाडावा.