भरवा करेला ( मसल्याची कारली)

Submitted by सायु on 9 October, 2014 - 08:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

छोटी कारली = ६ ते ७
धणे पुड = १/२ वाटी
तीळ - ४ चमचे (चहाचे)
बढी शोप = १ चमचा (चहाचा)
लसुण = १ छोटं फुलं (१० ते १५ पाकळ्या)
लाल सुक्या मिरच्या = २
आमचुर पावडर किंवा लिंबा एवढी चिंच (भिजवलेली)
जिरे = १ चमचा
तेल = १ प़ळी
हळद, तिखट, मिठ, साखर अंदाजे

क्रमवार पाककृती: 

सगळ्यात आधी कारली स्वच्छ घुवुन पुसुन घ्यावी. सोलणीनी पाठ सोलुन घ्या. बिया सोलणीनी काढुन घ्या (बीया पण वाफवायच्या , त्या मसाल्यात वापरायच्या आहेत) मसाल्याची वांगी चीरतो तशीच चिरुन घ्या किंवा सरळ दोन काप करा आणी एका भांडयात घालुन कुकर मधे दोन शीटया होऊ द्या.

आता कढईत धणेपुड, जिरे, तीळ, शोप, सुकी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या एक चमचा तेलात खमंग भाजुन घा, आणि थंड झाल की मिक्सर मधुन बारिक गीरवुन घ्या. हा मसाला एका बाउल मधे काढुन घ्या त्यात साखर( नेहमी पेक्षा जास्त घालावी) साधारण दोन चमचे, मिठ अंदाजे, आणि चिंचेच कोळ घालुन भिजवावा. (किंवा आमचुर पावडर घालुन,मसाल्यात थोड पाणी घालुन भिजवावा) त्यात मगाशी शिजवलेल्या कारल्याच्या बिया पण घालायच्या आहेत. हा मसाला शिजवलेल्या/ वाफवलेल्या कारल्यात भरावा.

कढईत एक पळी तेल घालुन जिरं तडतडल की, हळद तिखट घालुन, त्यात भरली कारली सोडावी, वरुन परत मिठ आणि साखर घालावे. ५ ते ७ मी.वाफ काढुन बारिक चिरलेली कोथिंबीर घालुन सर्व्ह करावे...

गरम गरम फुलके, साधं वरण आणि भरवा करेला,,,,मस्त कोंबीनेशन आहे.:)

वाढणी/प्रमाण: 
३ ते ४ जण
अधिक टिपा: 

कारली सोलुन कुकर मधे वाफवली तर कडु पणा तर जातोच शिवाय भाजी पटकन होते, शिजायचा वेळ वाचतो.
समजा दुसर्‍या दिवशी सकाळी डब्याला कारलं करायच असेल तर, रात्रीच कारली वाफवुन फ्रीज मधे ठेवावी. आणी हा मसाला पण तयार करुन फ्रीज मधे ठेवता येतो (भरली भेडी , वांगी पण हा मसाला वपरुन करता येईल) असे केले तर मसाल्याची कारली १० मी.तय्यार

वि. टी. नेहमी छोटी कारली बाजारात असतातच असे नाही, जर मोठी कारली असतील तर सरळ मधुन कापुन दोन ते अडीच इंचाचे काप करावे. मसाला धरुन राहातो कारण, कारले शिजलेले असते आणि मसाला पण ओलाच असतो, शिवाय आपण पाणी घालणारच नाहीये...

माहितीचा स्रोत: 
सई ची ट्युशन टीचर तृप्ती तिवारी.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ‍ॅन्डॉइड +१११११११११११११ Lol

कारली अजिबाआआआआआआआआआआआआअत्च आवडत नाहीत Sad
फोटोत दिसणार्‍या सुंदर चविष्ट कारल्यांनी मला माफ करावं Happy

पाकृ करून बघू शकणार नाही पण दोघींनी टाकलेले फोटोज अप्रतिम दिसतायेत

Pages