आपण यांना पाहिलंत का?

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 11 October, 2014 - 02:15

तीन दशकांहून अधिक काळ मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषांमधील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि नाटके पाहत आहे. अनेकदा असे होते की एखादा चेहरा आवडतो, पण पुन्हा कुठे फारसा दिसतच नाही. माध्यमांतूनही त्या चेहर्‍याची चर्चा होत नाही. जसे काही हा चेहरा सर्वांच्या विस्मृतीतच गेला आहे. नेमका हा चेहरा मला बर्‍यापैकी आठवत असतो, पण इतर अनेकांना त्याचा परिचयच नसतो.

अशाच काही (इतरांच्या) विस्मृतीत गेलेल्या पण मला आवडत असलेल्या या चेहर्‍यांबद्दल.

  1. अभिनव चतुर्वेदी:- हमलोग मालिकेतील नन्हे हे पात्र. या मालिकेनंतर पुन्हा बुनियाद या मालिकेत आणि रिश्ते मालिकेच्या एका भागात पल्लवी जोशीसोबत पाहिले होते, पुन्हा दर्शन नाहीच.
  2. डॉ. पलाश सेनः- फिलहाल चित्रपटात सुश्मिता सेन चा नायक, विद्या बालन सोबत एका विडीओ अल्बम मध्ये नायक व गायक देखील. पुन्हा फारसा दिसला नाहीच.
  3. भानू उदय- स्पेशल स्क्वाड या स्टार वाहिनीवरील मालिकेचा नायक. बराच काळ दूर राहून आता पुन्हा सोनी पल वाहिनीवर डॉक्टरच्या भुमिकेत दिसतोय.
  4. लवलीन मिश्रा:- हमलोग मालिकेतील छुटकी हे पात्र. या मालिकेनंतर पुन्हा स्टार वाहिनीवरील श्श्श कोई है च्या एका भागात इरफान खान सोबत पाहिले होते, पुन्हा दर्शन नाहीच.
  5. काजल किरणः- हम किसीसे कम नही चित्रपटाची नायिका. पुन्हा मांग भरो सजना या चित्रपटात जितेन्द्रसोबत लहानशा भूमिकेत दिसली होती. विक्रम और वेताल च्या दोन भागांमध्येही तिने दर्शन दिले. तिने बहुतेक सर्व बी ग्रेड चित्रपटांतूनच काम केले. तिचे कराटे, सबूत, भागो भूत आया, अंदर बाहर, हमसे बढकर कौन व सात बिजलीयां हे चित्रपट माझ्या संग्रहात आहेत.
  6. वैशाली दांडेकरः- अधांतरी मालिकेची नायिका आणि हमाल दे धमाल चित्रपटात नायिकेची बहीण. पुन्हा दर्शन नाही.
  7. शीतल क्षीरसागरः- रात्र आरंभ चित्रपटातील डॉक्टर. पुन्हा कधीच कुठल्याच चित्रपटात, मालिकेत दिसली नाही. काल अचानक महाराष्ट्र टाइम्स च्या पुणे टाईम्स पुरवणीत दिसली. http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/44755907.cms?prtpa... सत्ताधीश-किस्सा खुर्चीचा, गारंबीचा बापू, इत्यादी नाटकांतून काम करत असते, अर्थात मी अजून पाहिली नाहीत. रामचंद्र पुरुषोत्तम जोशी या आगामी चित्रपटातूनही तिचे दर्शन होईल.
  8. नंदिनी जोग:- काही दूरचित्रवाणी मालिका तसेच पंढरीची वारी, आघात, थांब थांब जाऊ नकोस लांब, कळत नकळत आणि आईशप्पत अशा काही चित्रपटांमधून दिसलेली ही अभिनेत्री आता गायबच झाली आहे.
  9. वन्या जोशी:- हिमालय दर्शन, मैला आंचल, मंझिले, अशा दूरदर्शन मालिका आणि सरदार व संशोधन या चित्रपटांतून दिसलेली ही अभिनेत्री आता कास्टिंग डायरेक्टर बनली आहे.
  10. वंदना पंडितः- अष्टविनायक चित्रपटातून सचिन पिळगांवकर सोबत दिसलेली ही अभिनेत्री पुन्हा कुठेच दिसली नाही.
  11. सोनाली जोशी:- एक्स्क्यूज मी चित्रपटातून आणि एका हिन्दी मालिकेतून श्रेयस तळपदेसोबत दिसलेली अभिनेत्री.
  12. फातिमा शेखः- देव आनंद यांच्या सौ करोड या चित्रपटाची नायिका
  13. सारा खान:- ढुंढ लेंगी मंझिले हमें ही दूरचित्रवाणी मालिका आणि पेबॅक हा चित्रपट यात मुख्य भूमिका केल्यावर ही मध्यंतरी टोटल सियप्पा चित्रपटात नायिकेची बहीण म्हणून दिसली होती.
  14. गायत्री जोशी:- स्वदेस चित्रपटाची नायिका आणि मॉडेल. आयएमडीबीनुसार वाँटेड देखील तिच्या नावावर दिसतोय, मला तरी त्यात दिसली नाही. इतरत्रही फारसे दर्शन नाहीच.
  15. बरखा मदन:- काही दूरदर्शन मालिका, खिलाडीयोंका खिलाडी चित्रपटात सहनायिका, भूत चित्रपटातील भूत आणि सोच लो चित्रपटात प्रमुख नायिकेची भूमिका केल्यावर आता संन्यास घेऊन बौद्ध भिक्खू झाली आहे.
  16. अपर्णा टिळकः- फुटपाथ चित्रपटा इम्रान हाश्मीची नायिका, जीत या स्टार वाहिनीवरील अंकूर नय्यर ची नायिका, लेफ्ट राईट लेफ्ट व कही किसी रोज या मालिकांमधील काही भागांत लहानशी भूमिका तसेच जुन्या सब टीवीवरील एका विनोदी मालिकेत कंवलजीत सिंहच्या मुलीची भूमिका करून आता गायब झाली आहे.
  17. पल्लवी कुलकर्णी:- क्या हादसा क्या हकीगत, वैदेही आणि कहता है दिल या मालिका तसेच बॉबी देओलच्या क्रांती चित्रपटात त्याची बहीणीची भूमिका करून सध्या गायब. https://www.youtube.com/watch?v=Rp_dqBOC9t8&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA
  18. वैदेही अमृते:- अभिनेत्री / मॉडेल. गृहस्थी मालिकेत किरणकुमार सोबत होती.
  19. अमृता रायचंदः- चित्रपट - बात बन गयी, मालिका - माही वे, रिअ‍ॅलिटी शो - ममी का मॅजिक, जाहिराती - व्हर्लपूल, पॉण्ड्स व इतर अनेक.
  20. आरती चांदूरकरः- खतरनाक चित्रपटात महेश कोठारेंची नायिका https://www.youtube.com/watch?v=B7fYRg2vdb4&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA
  21. इंदु वर्मा:- सिद्धांत मालिकेतली आर्किटेक्ट अलका, नायक अ‍ॅडव्होकेट सिद्धांतची क्रमांक २ ची प्रेयसी.
  22. जमुना:- दो फंटूश, अंधेरा चित्रपटांतली नायिका, प्रसिद्ध नृत्यांगना

अज्ञात चेहरे:-

  1. हेच माझे माहेर चित्रपटातील मोहन गोखलेची नायिका.
  2. माझं घर माझा संसार चित्रपटातील अजिंक्य देवची नायिका
  3. देव आनंदच्या बुलेट चित्रपटात डॉ. श्रीराम लागूंच्या कन्येची भूमिका करणारी अभिनेत्री
  4. ताल चित्रपटातील ऐश्वर्या राय सोबत असलेली अभिनेत्री. मी चित्रपट पाहिला नसल्याने तिची भुमिका किती मोठी आहे ते माहित नाही पण इथे https://www.youtube.com/watch?v=p_OoCr4uRhM या गाण्यात ३ र्‍या सेकंदाला निळ्या कपड्यांत दिसतेय. अजून एका गाण्यात अक्षय खन्नाला काही तरी चिडवतेय असे पाहिले होते.
  5. पाप चित्रपटातील जॉन अब्राहम ची बहीण https://www.youtube.com/watch?v=ObRQx4PHeTg&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA

हे चेहरे मी उल्लेख केल्याव्यतिरिक्त आपण कुठे पाहिले असल्यास जरूर नमूद करावे. तसेच आपणांस देखील असे कुठले जनतेच्या विस्मृतीत गेलेले चेहरे आठवत असतील तर त्यांचा देखील उल्लेख करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सजन रे सबवरच होती. सुमीत राघवन, टिकू ताल्सानिया, अमी त्रिवेदी.

एका लग्नाची तिसरी गोष्टचा प्लॉट या मालिकेसारखाच होता.

क्योंकी मधले बरेचसे कॅरॅक्टर आर्टिस्ट्स तोपर्यंत स्टेज कलाकार किंवा प्रादेशिक भाषांमधले कलाकार असावेत. . सुधा शिवपुरी (बा) ओम शिवपुरींच्या पत्नी (ओम शिवपुरी म्हणजे ओरिजिनल डॉन)

ओ.के. पण "सजन रे .. " ३-४ वर्षे जुनी असेल कारण मी आधी रेग्युलर पहायचे पण नंतर अगदीच कैच्याकै दाखवायला लागले तेव्हा सोडुन दिली.

आठवतय का कोनाला?<<<, चेलुवी. गिरीश कर्नाडचा अविस्मरणीय सिनेमा आहे. त्यात सोकुल होती. (बहुतेक तिचा पहिलाच सिनेमा!!) कानडी लोककथेवर आधारित कथा होती.>>( omg) नंदिनी मी शोधतच होते हा सिनेमा एका धाग्यासाठी .
जुनी सोनाली कुलकर्नी यात मुख्य 'सुगंधी फुलाच्या झाडाच्या' भुमीकेत होती . बापरे अनेक दिवस मी घाबरून शांत झोपले नव्ह्ते.असे सिनेमे दुपारचे DD वर लागायचे.हा धागाच नॉस्टॅल्जिक आहे.

निशा सिंग - बाजार आणि अंकुश मध्ये होती, नंतर गायब झाली. त्याआधी कित्येक वर्षे एअर ईंडियाच्या पोस्टरवर हवाई सुंदरीच्या वेषात दिसायची. मध्ये १-२ सिरीयल्समध्ये दिसलेली.

अनुपमा वर्मा - ग्रहण नामक सिनेमात जॅकी श्रॉफबरोबर होती, नंतर मोठ्या पडद्यावरुन गायब. मॉडेलिंग चालु आहे अजुन असं ऐकलय.

<<निशा सिंग >> - रंगोली सादर करायची बर्‍याच वर्षांपूर्वी.

<<अनुपमा वर्मा>> - वध चित्रपटात नाना पाटेकर ची नायिका. बिड्डू च्या बूम बूम अल्बम मध्ये अभिनय.

तुझे देख देख सोना, तुझे देख देख जगना... हे गाणं ज्या सिनेमात आहे. कुणाल खेमूचा. त्यात त्याची नायिका होती ती पण नंतर कुठे दिसलीच नाही.

छुई मुई सी तुम लगती हो हे गाण आठवत का कोणाला ? त्यातल ते हातावर बांधायच छोट टेडी बेयर जाम फेमस झालेल . या गाण्याच्या विडिओतला नायक आठवतो का ? अब्बास अस काहीस नाव होते . या गाण्यानंतर तो गायबच झाला . निदान माझ्या पाहण्यात तरी आलेला नाही . त्यातली नायिका प्रीति जांगयानी असते अधून मधून पेज थ्री वर . परवीन डब्बास बरोबर लग्न झाल आहे तीच . मोहब्बते मध्येही होती

निशा सिंग (मला) सगळ्यात आधी अ माउथफुल ऑफ स्काय मध्ये दिसली होती. त्या मालिकेत दिसलेले बहुतेक कलाकार अजून दिसतात.

हे असे एकदा दिसून गायब झालेले लोक बिग बॉसमध्ये येतात. अनुपमा वर्मा सुद्धा होती.

अब्बास आधीपासून साऊथ इंडियामध्ये होता.. तमिळमध्ये बर्‍यापैकी फेमस आहे. त्याचा हिंदीमध्ये डब होऊन दुनिया दिलवलोंकी म्हणून सिनेमा आलेला. आता कैच्यकै जाड झालाय.

तुझे देख देख सोना, तुझे देख देख जगना... हे गाणं ज्या सिनेमात आहे. कुणाल खेमूचा. त्यात त्याची नायिका होती ती पण नंतर कुठे दिसलीच नाहीन।।।>> कलयुगमधलं गानं का? त्यामध्ये स्माईली सुरी होती. दिग्दर्शक मोहित सुरीची बहिण. ती स्टेज डान्सर आहे आणी त्यामध्येच करीअर करत आहे (बहुतेक लग्नही झालंय)

मंदाकिनी चं लग्न मर्फी शी झालंय असं कुठंतरी वाचलंय.

तारा देशपांडे ला MTV वर आणि Bombay Boys आणि इतर एक दोन शिन्मात पाहिलं

सायरस ब्रोचा cnn ibn वर पकवत असतो,

दिल धडके फेम बाबा सेहगल पण दिसत नाही

रॅप्पर बाली ब्रह्मभट्ट पण दिसत नाही

आर्यन्स ची बॅन्ड पण दिसत नाही

निशा सिंग शेखर कपूर आणि श्रीराम लागूंबरोबर उपन्यास मालिकेत पण होती. ती मालिका अर्धवटच बंद झाली बहुदा
शिवाय तो सिनेमा (नाव आठवत नाहीये) ज्यात 'इतनी शक्ती हमें देना दाता' आहे - ते गाणं पण तिच्यावर चित्रित झालं आहे.

वरती आलेल्या बहुतेक सर्वांच्या नावाने गूगललं तर लेटेस्ट माहिती मिळेल की! Wink

तारा देशपांडे -शर्मन च्या 'स्टाइल' आणि अजय फणसेकर डिरेक्ट केलेल्या एन्काउन्टर चित्रपटामधे पाहिलं होतं.तीचे केस लांब व सुंदर होतेआणि गालावर खळी पडायची.

आठवतय का कोनाला?<<<, चेलुवी. गिरीश कर्नाडचा अविस्मरणीय सिनेमा आहे. त्यात सोकुल होती. (बहुतेक तिचा पहिलाच सिनेमा!!) कानडी लोककथेवर आधारित कथा होती.>>( omg) नंदिनी मी शोधतच होते हा सिनेमा एका धाग्यासाठी .
जुनी सोनाली कुलकर्नी यात मुख्य 'सुगंधी फुलाच्या झाडाच्या' भुमीकेत होती . बापरे अनेक दिवस मी घाबरून शांत झोपले नव्ह्ते.असे सिनेमे दुपारचे DD वर लागायचे.हा धागाच नॉस्टॅल्जिक आहे.
<<<

धन्यवाद सगळ्यांचे खुप दिवसापासुन मी शोधात होते मला नावच माहित नव्हते...पुर्वी डीडी वर नेहमीच लघुपट वैगेरे लागायचे ते मस्तच असायचे...आय मीस्ड देम टु मच...

७ ते ८ वर्षापुर्वी एक मालिका दुरदर्शन वर रवीवारी ८ का ८.३० ला लागायची त्यात एक चीनी का नेपाळी राजघराने दाखवले जायचे व त्याचे कीचन आणी त्यातली स्वयंपाक करणारे यावर मालीका आधारीत होती.त्यात स्वयंपाकाच्या विवीध पध्तती दाखवल्या जायच्या राजघराण्यामधले राजकारण त्यातली ती नायीका स्वयंपाकघराची हेड बनते शेवटी आणी नंतर ती डॉक्टर पण बनते मस्त मालीका होती...मला खुप आवडली होती मी आणि माझा भाऊ न चुकता पाहायचो...

एक जुनी सिनेअभिनेत्री (होम्ट्युटर) , अमोल पालेकर ,त्याचा रॉबिन नावाचा मुलगा, आजोबा ( ते बहुतेक बावरची मधे पण आजोबाच होते ) अशी एक सीरियल लागायची डीडी वर. त्याचं नाव आठवत नाहीये.

ती मेहेंदी तेरे नाम की, देस में निकला होगा चांद या मालिकांची नायिका आजकाल एका चहाच्या जाहीरातीत दिसते... बाकी मालिकांमधुन गायब

"नरम गरम" मध्ये आणी "प्रेम रोग" या चित्रपटानमधे "किरण वैराळे" नामक एक नटी दिसली होती. ती पुढे दिसली नाही.

१९८५ च्या सुमारास डी डी वर "खानदान" नावाची सीरीयल आली होती. त्यातील अभिनेत्यान्पैकी "जयन्त क्रुपलानी" हे एक नाव आठवते. अजुनही बरेच चान्गले अभिनेते त्यात होते. कुणाला काही आठवते का ?

"नरम गरम" मध्ये आणी "प्रेम रोग" या चित्रपटानमधे "किरण वैराळे" नामक एक नटी दिसली होती. ती पुढे दिसली नाही>>> किरण वैराळे अर्थ आणि नमकीन फिल्ममध्ये पण होती. नंमकीन फिल्म साठी तिला फिल्मफेअरचे बेस्ट सहाय्य अभिनेत्रीचे नामांकनही मिळाले होते.. खुप छान अभिनेत्री आहे ती...

राजा बुंदेलांची मधे बातम्यांमध्ये मुलाखत आली होती. त्याने वेगळे बुंदेलखंड लढ्यासाठी अभिनय क्षेत्र सोडले असे ऐकले मुलाखतीत.

राजा बुंदेला अर्जुन सिनेमात पण होता. ममय्या केरो केरो केरो मामा हे अजब मस्त गाणे आहे हय सिनेमात. सनी पाजींनी मस्त काम केले आहे.

ओह.. तरीच दिसत नाही तो अजिबात.
हो त्या गाण्याचे लिरिक्स जाम फनी वाटायचे. Happy

राजा बुंदेला अर्जुन सिनेमात पण होता.>>>> अर्जुन आणि अंकुश तमाम तरुणांचे आवडते चित्रपट .एकात सनी देओल तर दुसरयात नाना पाटेकर आहेत .राजा बुंदेला गोविंदाच्या शोला और शबनम मधेही होता . अनुपम खेर ला या चित्रपटात वात आणला होता अगदी गोविंदा आणि त्याच्या मित्रांनी(रेडिओ वाला सीन आठवा).
नाव गुगलुन पाहीलं तर त्याची पत्नी सुश्मीता मुखर्जी आहे (गोलमाल मधील परेश रावल ची आंधळी बायको)असं कळलं.तीने पण मस्त काम केलय या चित्रपटात (आठवा तो सीन ज्यात त्यांचा नोकर घरी येतो 'जब ये छोटा बच्चा था) .

१. अनेक चित्रपटात पूर्वी किरकिर्‍या लहान भावाची भूमिका केलेला मुलगा आता काय करतो? (बातो बातो मे मधे टिना मुनिमचा लहान भाऊ, खूबसूरत मधे राकेश रोशनचा लहान भाऊ). एकदम बारीक मुलगा होता. कामे चांगली करायचा.
२. बेताबी आणि प्यार किया तो डरना क्या मधे असलेली अंजना झवेरी आता काय करते?
३. स्टाईल चित्रपटात शर्मन जोशीबरोबर दुसरा हिरो होता तो आता काय करतो?
४. बनेगी अपनी बात मधला राहुल काय करतो? मानव पण गोंडस होता.

Pages