पोल माझा - विधानसभा २०१४

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 October, 2014 - 12:29

२०-२० क्रिकेट वर्ल्डकपपेक्षा मजेदार झालेल्या यंदाच्या "महाराष्ट्र विधानसभा - २०१४" रणधुमाळीला उद्या १५ ऑक्टोबरला अर्धविराम लागणार आणि १९ तारखेला पुर्ण निकाल.

बस्स तो निकालच काय लागेल हा आपापला अंदाज या धाग्यावर व्यक्त करूया.

भावनेच्या आहारी न जाता आपली बुद्धी काय बोलते हे ऐकूया.
ज्याचा अंदाज तंतोतंत बरोबर येईल त्याला "मायबोलीचा चाणक्य" पदवीने गौरवूया.

पोल माझा -

कॉंग्रेस -
राष्ट्रवादी -
भाजपा -
शिवसेना -
मनसे -
अन्य -
एकूण - २८८
सत्ता =

असा एकच क्रम राखल्यास उत्तम Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोल माझा - ऋन्मेऽऽष

कॉंग्रेस - ४५
राष्ट्रवादी - ४८
भाजपा - ९८
शिवसेना - ६६
मनसे - १८
अन्य - १३
एकूण - २८८

सत्ता = भाजपा + शिवसेना

डोंट माईंड पण मी कुठेतरी वाचले कि उद्या निकाल लागेपर्यंत कोणतीही राजकीय चर्चा (सार्वजनिकरित्या) करणे आचारसंहितेच्या अगेन्स्ट आहे. आधी कन्फर्म करा अन्यथा धागा डिलीट करा.

नक्की कुठे कन्फर्म करायचे हे खरेच माहीत नाही, इतर धाग्यांवर तर चर्चा चालू आहेतच, तरी अ‍ॅडमिनना निकालाची चर्चा अयोग्य वाटत असेल तर उद्या संध्याकाळपर्यंत (मतदान संपेपर्यंत) कुलूप लाऊन पुन्हा चालू केल्यास बरे राहील. किंवा जे योग्य वाटेल ते Happy

तरीही माझ्यामते नियम प्रचाराबाबत असावा. टिव्हीवर देखील मस्त चर्चा झडत आहेतच.

मला नाही वाटत हा धागा आचारसंहितेच्या विरुद्ध ठरू शकेल.

ह्याचे कारण आत्ता महाराष्ट्र व हरियाणात १०.०८ वाजलेले आहेत. येथील चर्चा वाचून कोणी अचानक शेवटच्या क्षणी आपले मत बदलून तिसर्‍याच पक्षाला मत देईल ह्याची शक्यता कमी आहे.

भारतातील रात्री अमेरिकेतील लोकांची मते बदलली तर येथे काहीच फरक पडणार नाही.

येथील चर्चा वाचून कोणी अचानक शेवटच्या क्षणी आपले मत बदलून तिसर्‍याच पक्षाला मत देईल ह्याची शक्यता कमी आहे.

>> असं काही नाही. या वेळी मी जरा कन्फ्युज आहे. Happy

कॉंग्रेस ३०-३५
राष्ट्रवाद-४५-५०
भाजपा -९०-१००
शिवसेना- ८५-१००
मनसे-१५-२०
अन १०-१५
एकूण - २८८
सत्ता =

कॉंग्रेस - ४३
राष्ट्रवादी - २९
भाजपा - १२९
शिवसेना - ६१
मनसे - ९
अन्य - १७
एकूण - २८८

सत्ता = भाजप + अन्य = १४६

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस - ८१
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - ६१
भारतीय जनता पक्ष - ६१
शिवसेना - ५१
मनसे - १२
इतर + अपक्ष - २२
एकूण - २८८
सत्ता = भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस + राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष + इतर + अपक्ष

कॉंग्रेस - 40 to 46
राष्ट्रवादी - 40 to 46
भाजपा -70 to 75
शिवसेना -70 to 75
मनसे + अन्य - 40 to 46
एकूण - २८८
सत्ता = ??

कॉंग्रेस - ५५
राष्ट्रवादी - ३० -३५
भाजपा - ७०-८०
शिवसेना - ९०-९५
मनसे - १२
अन्य - २०-३०
एकूण - २८८
सत्ता = सेना + भाजप

पोल माझा - संदीप
कॉंग्रेस - ४५ - ५०
राष्ट्रवादी - ३० - ३५
भाजपा - ९५ - १००
शिवसेना - ६५ - ७०
मनसे - १५ - २०
अन्य - २० - २५
एकूण - २८८

सत्ता = भाजपा + मनसे + अन्य (तरीही बहुमतासाठी ५ ते १० जागा कमी)
(राष्ट्रवादीचा बाहेरुन पाठिंबा जाहिर)

पोल माझा
कॉंग्रेस - ४४
राष्ट्रवादी - ४२
भाजपा - १०१
शिवसेना - ७४
मनसे - १२
अन्य - १५
एकूण - २८८

सत्ता = भाजपा + ?

कॉंग्रेस - ४०
राष्ट्रवादी - ३८
भाजपा - १२०
शिवसेना - ६५
मनसे - १३
अन्य - १२
एकूण - २८८

सत्ता = भाजपा + शिवसेना

माझा पोल
शिवसेना- १४५ ( उद्धव ठाकरे म्हणतात शिवसेना बहुमताने आणी मुख्यमंत्री मीच )
बाकीचे मिळुन - १४३

काँग्रेस- १४५ ( पृथ्वीराज चव्हाण म्हणतात काँग्रेसच बहुमत घेणार )
बाकीचे मिळुन - १४३

राष्ट्रवादी - १४५ (शरद पवार म्हणतात जनता आम्हालाच बहुमत देणार )
बाकीचे मिळुन - १४३

भाजपा- १४५ ( फडणवीस : भाजपाच येणार बहुमताने )
बाकीचे मिळुन - १४३

मनसे- १४५ ( राज ठाकरे ;मनसेचे इंजीनच चालणार)
बाकीचे मिळुन - १४३

मला वाटते वरच्यांना ४०-४० सीट मिळोत म्हणजे झाले २०० आणी उरलेले ८८ इतरांना (सटर-फटर पार्टी)

सेना + मनसे आले तर इट वुड बी इंट्रेस्टिंग. मग खरचं म्हणावं लागेल कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा !

भाजपाकडे नेताच नाही. ते आले तर पंकजा मुंडे कदाचित मुख्यमंत्री होतील असे दिसते. फडणवीस ब्राह्मण आहेत. त्यामुळे अंमळ अवघडच !

एक वेळ राष्ट्रवादी तरेल पण काँग्रेस .. ??

मग खरचं म्हणावं लागेल कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा >> नुसतं म्हणावंच नाही तर खरंच शोधावा पण लागेल Wink

>>पंकजा मुंडे कदाचित मुख्यमंत्री होतील असे दिसते. <<
मग म्हणावं लागेल - काय समजताय तुम्ही महाराष्ट्राला माझ्या?

भाजपला कितीही जागा मिळाल्या तरी (जर स्पष्ट बहुमत नसले तर) सरकार स्थापनेचा दावा त्यांनी करू नये. भाजपकडे महाराष्ट्रासाठी नेता नाही ही चर्चा वांझ आहे. नेता एका दिवसात उभा केला जाऊ शकतो व लादलाही जाऊ शकतो.

आज झालेल्या मतदानाचा चेहरामोहरा 'राष्ट्रवादी नको' असा असावा (इच्छा नव्हे, कल्पना) असे राहून राहून वाटते आहे.

पृथ्वीराज चव्हाण हे व्यक्तीमत्व वादग्रस्त नव्हते. त्यांनी कोणत्या फायलींवर सह्या केल्या नाहीत हे पाहण्यापर्यंतची पहूंच सामान्याकडे नाही. पण त्यांच्यावर भलतेसलते आरोप झाले नाहीत.

ह्या निवडणूकीपूर्वी झालेल्या गदारोळातून काही गोष्टी स्पष्ट झाल्या. त्या रोचक आहेत.

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस - 32
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - 41
भारतीय जनता पक्ष - 104
शिवसेना - 86
मनसे -08
इतर + अपक्ष - 17
एकूण - 288
सत्ता = भाजपा + निवड्णूक पूर्व युतीतले पक्ष - जानकर, शेट्टी, आठवले : (शिवसेना व मनसे बाहेरुन पाठींबा)
श्री एकनाथ खडसे मुख्यमंत्री

एकुण भाजपाच्या जागा ९०-१०० पर्यंत जातील. पण भाजपा ला अगदी बहुमत मिळाले तरी पंकजा मुंडेना मोदी मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत असं वाटतं. फडणवीस ब्राह्मण असल्यामुळे त्यांचा पण पत्ता कट. एकनाथ खडसेंबद्दल मला फार माहिती नाही त्यामुळे काही सांगता येत नाही.
काँग्रेसला राष्ट्रवादी पेक्षा जास्त जागा मिळतील पण दोघांना मिळुन बहुमतापेक्षा कमी असतील असं वाटतय.
काँग्रेस ६०-६५ व राष्ट्रवादी ४०-४५ जागा मिळतील.
शिवसेनेच्या प्रमुखांनी वाचाळपणा न करता मतदारांच्या खर्‍या प्रश्नांवर प्रचार केला असता तर त्यांना जास्त मते मिळाली असती. त्यांनी सुवर्णसंधी दवडली असं माझं वैयक्तिक मत आहे. मुख्यमंत्री मीच होणार म्हणायचं पण निवडणुक मात्र लढवायची नाही हा विरोधाभास का? हा मी व माझ्या बर्‍याच मित्रांना पडलेला प्रश्न आहे. त्याचा सेनेला तोटा होईल असं वाटतं. पण तरीही ते ८०-९० जागा मिळवतील.
मनसे उगाच ९-१० जागा मिळवुन बाहेरुन जी कोणती नवीन युती सत्तेत येत असेल तिला पाठींबा देईल.
उरल्या सुरल्यांना बाकिच्या उरल्या सुरल्या जागा Happy

शिवसेनेला एक तरी जागा जास्त मिळावी भाजपा पेक्षा.. आणि भाजप ला थोडा लगाम लागला पाहिजे... भाजपा चे नॅशनल नेते उच्च प्रतीचे आहेत.. पण महाराष्ट्रात सगळे टवले बावळे आहेत..भाजपाचे जे मजबुत नेते होते ते गेले.. आणि हे राहिलेले वाटाणे आता शहाणपणा करतायत.. त्यामुळे त्यांना लगाम लागला पाहिजे..

भाजपला कितीही जागा मिळाल्या तरी (जर स्पष्ट बहुमत नसले तर) सरकार स्थापनेचा दावा त्यांनी करू नये. >>> पूर्ण अनुमोदन

<<भाजपला कितीही जागा मिळाल्या तरी (जर स्पष्ट बहुमत नसले तर) सरकार स्थापनेचा दावा त्यांनी करू नये. >>
शिवसेना + भाजप..पुन्हा युती होणार आणि सत्ता पण स्थापनार . पण मुख्यमंत्री कोणाचा होणार.. हे जनता ठरवेल.. त्यांची भांडन हि मुख्यमंत्री पदावरुन झाली.. आणि भाजपा ला माहिति आहे कि सेने शिवाय पर्याय नाहि. पन सेनेला ताकत दाखवने पण गरजेजे होते.. आणि हाच चांस होता.. म्हणुन बहुतेक युती तुटली..

कॉंग्रेस - ३५
राष्ट्रवादी - ३५
भाजपा - ११५
शिवसेना - ७५
मनसे - १५
अन्य - १०-१५
एकूण - २८८

सत्ता = भाजपा + राष्ट्रवादी

युती तुटण्याची सुरूवात सेनेच्या १५१ च्या अट्टहासामुळे झाली. भाजपाने चार पाचदा १३०+ पर्यंत आकडा नेण्याचा प्रयत्न केला. पण सेनेने मात्र मीच मुख्यमंत्री होणार आणि आम्हीच काय ते महाराष्ट्राचे तारणहार अशी भूमिका घेतली त्यामुळे ही युती तुटली.

आता युती तुटल्यावर फक्त कोण मुख्यमंत्री होणार ह्यावरून युती तुटली असे सांगीतलं जातं आहे.

भाजपा राष्ट्रवादीसोबत जाणार नाही ! माझ्यामते परत युती होईल. ती पण गरज पडली तरच.

भाजपा आले तर खडसे, फडणवीस आणि पंकजा मध्ये पंकजा बाजी मारतील असे आज टाईम्स देखील म्हणत आहे. गुजरात आवृत्ती. फडणवीस उत्कृष्ट संघटक आहेत, त्यांना विरोध झाला तर केवळ त्यांच्या जातीमुळे होईल. अन्यथा काही कारण नाही. म्हणूनच पंकजाचे पारडे थोडेसे जड दिसते. खडसे तर शर्यतीत आधीपासून आहेतच. आणि ते जुणे जाणते असल्यामुळे कदाचित ते ही बाजी मारू शकतील. इंटरेस्टिंग आहे एकूण.

राष्ट्रवादी आले तर ( शक्यता शून्य ) दादा आणि काँग्रेसचे बाबा!

सेनेला बहुमत मिळायला नको त्यांच्यात आणि राष्ट्रवादी मध्ये काही फरक नाही हे खरे पण उद्धव हे कुशल संघटक आहेत हे त्यांनी दोनदा दाखविले आहे आणि बाळासाहेबांनतर सेना आता मवाळ भूमिका घेत आहे. ( विच इज गुड फॉर सेना) त्यामुळे आत्ता जर सत्ता आली तर ती परत पूर्वीसारखीच राऊडी सेना होईल.

त्यांना विरोध झाला तर केवळ त्यांच्या जातीमुळे होईल >> आणि त्यांच्या प्रो-विदर्भ भूमिकेमुळे.... पंकजाला अनुभव नाही. त्यामुळे खडसेंना चान्स मिळेल असे दिसते. बाकी स्वबळावर लढावे हे सूतोवाच माधव भंडारींच्या तोंडुन करविण्यात आले होते. त्यामुळे सेनेने ताणले वगैरे भाजपाच्या बोंबा आहेत. त्यांना युती तोडायचीच होती आणि तीदेखिल फक्त 'एम' फॅक्टर चालला म्हणुन.

एकाट्याच्या जीवावर निवडणुका लढऊन भाजपने इतिहास रचला आहे असे मतामोजणी पुर्व अंदाज सांगत आहे.

वाचाळ आणि नाठाळ शिवसेनेबरोबर पुन्हा जुळवुन न घेतल्यास उत्तम. ज्या पध्दतीने शिवसेनेने वाचाळ पण केला त्यावरुन त्यांना लांब ठेवणे जास्त गरजेचे आहे.

भाजप पूर्ण बहूमताने वा अपक्ष किंवा मनसेच्या साथीने सत्तेवर आल्यास आणि शिवसेना दुसरी मोठी पार्टी म्हणून निवडून आल्यास

१) मुख्यमंत्री बनण्याच्या अति महत्त्वाकांक्षेपायीच ऊद्धव ठाकरेंनी जास्तीच्या जागांसाठी युती तोडली. लोकसभा निवडणुकातला मोदी फॅक्टर पूर्ण अंडर एस्टिमेट केला आणि तयारी नसतांना ऐनवेळी मोठा घास घेण्यास सेनेला भाग पाडून शिवसैनिकांवर पराभव थोपला, असे म्हणत भाजप ठाकरेंना शिवसैनिकांच्याच नजरेत पराभवाचे धनी ठरविल का?

सत्तेवर आल्यानंतर प्रादेशिक भाजपनेते, पक्षावर आणि विशेषतः मोदींवर शिवसेनेकडून आणि सामनातून शेवटच्या काही दिवसात झालेल्या टीकेचे येनेकेन प्रकारे रिटॅलिएशन करतील(च) हा एक होरा.

२) १५ दिवसांपूर्वी सत्ता युतीचीच म्हणत प्रचंड आत्मविश्वासाने आणि ऊत्साहाने प्रचार करणारे शिवसैनिक आता भाषणांचा ओघ संपल्यावर सत्य परिस्थितीचा धक्का कसा पचवतील? सेनेचे पक्षश्रेष्ठी ही परिस्थिती कशी हाताळतील?

३) 'आता मीच शिवसेनेच्या बहुमताने येणार्‍या सरकारचा मुख्यमंत्री ' म्हणत दंड थोपटणारे ऊद्धव ठाकरे विरोधी पक्षनेत्याच्या बाकावर बसतील का?

मीही कॉग्रेसचं तण नष्टं होऊन सेना-भाजपचे सरकार येणार ह्याच आनंदात होतो पण मागच्या काही दिवसातली सेनेची एकंदर रणनीती बघता, भाजपला सेनेशी किंवा कुणाशीही पुन्हा युती करायला न लागून पूर्ण बहूमत मिळावे अशीच अपेक्षा आहे.

कॉग्रेसची जातीयवादी नोट फॉर वोट पॉलिसी, राष्ट्रवादीचे मराठा /आरक्षण कार्ड, सेनेचा मराठी अस्मितेचा मुद्दा, आणि मनसेचे मराठीचा कैवार घेणारी परप्रांतियावरची अरेरावी असे सगळे हुकमी अस्त्र मोदी/शहा फॅक्टर आणि भाजपच्या थोड्याफार विकासाच्या गप्पा ह्यापुढे आजिबातंच निष्रभ झाल्यासारखे वाटत आहेत.

ईथून पुढे फक्त विकास एके विकास आणि सुशासन हाच मुद्दा असावा असा पायंडा पडला तर चांगलंच आहे.

फडणावीस आणि मुंडे नक्कीच प्रॉमिसिंग वाटत आहेत.

काल मतदान संपल्यापासून ते मतमोजणी चालू होईपर्यंत मधल्या काळात मतपेट्यांच नेमकं काय केलं जातं.
मध्ये दोन-तीन दिवसांचा अवधी नेमका कशासाठी असतो?

चाणक्य -सी व्होटर सर्व्हे

कॉंग्रेस -३६
राष्ट्रवादी-२४
भाजपा-१५१
शिवसेन-- ६५
मनसे- ५
अन्य - ११
एकूण - २८८
सत्ता = भाजपा पूर्ण बहुमताचे सरकार

इथे काही जणांनी भाजपा आणि राष्ट्रवादीची युती होईल असा अंदाज वर्तवला आहे.
काहीसा धक्कादायक वाटला तरी हे समिकरण जुळण्याची शक्यता आहे...
कालच एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याशी बोललो आणि त्यातून एक धक्कादायक माहीती कळली.
त्याच्या नुसार त्यांनी प्रचार जरी राष्ट्रवादीचा केला असला तरी त्यांना अंतर्गत सूचना होत्या की भाजपाचा उमेदवार चालवायचा म्हणून...
काय कळत नाही राव वरच्या लेव्हलला नक्की काय चाललंय...कंटाळा आलाय या सगळ्याचा..यावेळी म्हणून प्रचारालाही नाही गेलो फारसा..
अशी त्याची प्रतिक्रिया होती.

मला असे वाटते अगदी सत्तेत हातमिळवणी जरी नाही केली तरी पवारसाहेब काहीतरी पदरात पाडून घेणारच. (अजितदादांना क्लिनचीट इ.इ.) आतून कुठे आणि कसे धागे जुळले असतील त्याबाबत आपण सर्वसामान्य प्रचंड म्हणजे प्रचंड अंधारात असतो.
इथे सगळे जण तावातावाने आपापल्या पक्षाची बाजू मांडतात पण प्रत्यक्षात हे पक्ष नक्की कुणाच्या बाजूला आहेत हे त्यांच्या कार्यकर्त्यांनाही माहीती नाहीये.

कॉंग्रेस -३५
राष्ट्रवादी -४४
भाजपा -१४१
शिवसेना -५६
मनसे -८
अन्य -४
एकूण - २८८
सत्ता = भाजपा + मनसे + अन्य
मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस

हे व्हायची तर सुतराम शक्यता वाटत नाही. प्रचारात उद्धव ठाकरेंनी जी काय मुक्ताफळे उधळली आहेत. पार अगदी पंतप्रधानांच्या वडीलांचा उल्लेख करून इतक्या खालच्या लेव्हलचा प्रचार केला आहे, तो भाजपावाले सहजासहजी विसरणार नाहीत. त्यामुळे मी मरेन पण तुला विधवा करेन ही भूमिका त्यांनी घेतली तरी आश्चर्य वाटणार नाही.

कॉंग्रेस -३४
राष्ट्रवादी -४५
भाजपा -१२५
शिवसेना -७२
मनसे -५
अन्य -७
एकूण - २८८
सत्ता = भाजपा+राष्ट्रवादी

कॉंग्रेस =50
राष्ट्रवादी =39
भाजपा+ =112
शिवसेना =75
मनसे =6
अन्य =6
एकूण = २८८
सत्ता = महाराष्ट्राची "दिल्ली" होईल...!!!

प्रचारा दरम्यन आलेली कटुता बघता शिवसेना भाजप एकत्र येण्याची शक्यता कमीच.... भाजप क्र.1 चा पक्ष ठरल्यास युतीत शिवसेनेच्या वाट्याला धाकट्या भावाची भूमिका येईल... ती नको होती म्हणून युती
तुटली...इतकं होऊनही युती झालीच तर 'मनं' किती जुळतील हा प्रश्न उभा राहीलंच...!!!
.
शेवटी निकाल आल्यावर पवारांचा रोलही कमी लेखून चालणार नाही... बहुतेक या दिवाळीला महाराष्ट्राला नवीन सरकार मिळणार नाही... दिल्लीसारखं महाराष्ट्राचंही "भिजत घोंगडी"च राहील..

Pages