वर्षाविहार: रेडिओ प्रोमो.

Submitted by ववि_संयोजक on 25 June, 2008 - 05:25

नमस्कार ......
दुपारच्या चहाची वेळ झालेली आहे. 'दुपारचा चहा, सोबत रेडिओ ऐकून पहा' सदराअंतर्गत आता आपण ऐकणार आहोत; 'वर्षाविहार: एक अनुभव' हा कार्यक्रम. नेमेचि येणारा पावसाळा आपल्यासोबत यंदाही घेऊन आला आहे, `वर्षाविहार'. अहाहाहाहा! ते पावसाचे थेंब (पावसाच्या थेंबाचा आवाज). तो गरमागरम आले घातलेला चहा (ग्लासात चहा ओतल्याचा आवाज.) आणि भजी... (कढईत भजी तळण्याचा आवाज.)
हे सर्व तुमच्या भेटीला यंदाही.
हा फोन-इन कार्यक्रम आहे. त्यात तुम्ही प्रश्न विचारू शकता, उत्तरे देतील कार्याध्यक्ष व वहिनी.
(रेडिओचे नेहमीचे संगीत पाच मिनिटे वाजते. या वेळात गृहिणींनी चहाचा कप हातात घेऊन रेडिओसमोर बसणे आवश्यक आहे.)

    निवेदक: येथे कार्याध्यक्ष आणि वहिनी अगदी वेळेत येऊन बसलेले आहेत. आपण त्यांच्याकडूनच वर्षाविहाराबद्दल जाणून घेऊया.

      वहिनी: मी काय सांगू? (वर्षाविहाराबद्दल सांगा. - निवेदकाने मनात म्हटलेले वाक्य सुस्पष्ट ऐकू येते. केवढी ती आवाजाची क्लॅरिटी!) आमचा चि. नचि लहान होता ना, तेव्हा एकदा तो म्हटला, आई, आई.... तसा तो बाबांना काही सांगतच नाही मुळी. मलाच सांगतो. तर म्हणाला, आई आई.... माला किनै पावसात भिजायचंय. आता एवढ्याश्या मुलाला का मी पावसात नेऊ? म्हटलं, भिजवणार नाही दाखवेन नुस्तं. चालेल का? तर म्हणाला, चालेल. तसा अगदी ऐकतो हो माझं. तर तेव्हा त्याला पाऊस दाखवावा, म्हणून आम्ही पहिल्यांदा मावळसृष्टीला गेलो. आमच्या `अहोंच्या ' बर्‍याच कविताही ऐकवायच्या राहिल्या होत्या. तो नाही ऐकवत हो. मीच माझ्या सुश्राव्य आवाजात ऐकवते... आता नमुना दाखवू का?

        निवेदक: (गडबडीने) अं नको. आत्ता नको. कारण आपल्याला पहिला फोन आलेला आहे. (फोन कनेक्ट झाल्याचा आवाज!)
        फोन: मै मुन्नाभाई.
        निवेदक: अरे वा, वविची लोकप्रियता इतकी वाढली आहे तर....
        मुन्नाभाई: मेरेको खाली ये पूछनेका था, ये वर्षाविहार मे जो वर्षा है बोलेतो वर्षा उसगावकरच ना? तुम लोग आखिर बजेट बढाता क्यू नही? मुझे बताओ, सर्किटको बोलके अपुन सब फिक्स करेगा. कतरिना कैफ आके डान्स करे तो कैसा रहेगा?
        कार्याध्यक्ष: भाई, ये वर्षा बोलेतो (याचीही भाषा बिघडली!) वो पानीवाली... बारिश बारिश... बोलते है ना भाय. और किसीको भेजने की जरुरत नही है भाई. हमारी सांस्कृतिक समिती है ना वो लोगोंको टॉर्चर करने के नये नये प्लॅन हरसाल बनाती है. हर साल की तरह श्रमाता तो है ही उपर से इस बार नंदिनी को भी लिया है... आप जरुर आना भाई. आपका और सर्किट का नाम लिखके रखता हूं...
        (गडबडीने फोन ठेवल्याचा आवाज.)
        निवेदक: मुन्नाभाई डिस्कनेक्ट झालेले दिसतात. सांस्कृतिक समिती , श्र आणि नंदिनी वगैरे ऐकून त्याना चक्कर आलेली दिसतेय..
        कार्याध्यक्ष: (दु:खी आवाजात गातो) हमसे भूल हो गई, हमका माफी दई दो.
        वहिनी: अय्या, अचाट न अतर्क्य सिनेमांमधली गाणी म्हणण्यापेक्षा मी `अहोंचं ' एखादं विडंबनच म्हणते बाई.... (फोन पुन्हा वाजतो.)

          निवेदक:(सुटकेचा श्वास टाकून) आता कोण आहे?
          हिमेश: मी रेशमिया.
          निवेदक: अरे वा... (त्याला मध्येच तोडत)
          वहिनी: अय्या तुम्हीच का ते रेशमिया? कसले गाता हो! आमच्या ह्यांनी..... तुम्हाला माहीत असेलच म्हणा... तुमच्यावर केलेल्या विडंबनामुळेच ते नेटवर वर्ल्ड फेमस झालेत ना...
          हिमेश: तेच विचारायचं होतं. ते वाचून माझा गाण्याचा कॉन्फिडन्स गेलाय हो. मला वविला गाऊ द्याल का? त्यामुळे तरी माझा कॉन्फिडन्स परत येईल असं वाटतंय. वाटलं तर मी ववि स्पॉन्सर करतो अख्खा...
          कार्याध्यक्ष: (उत्साहाने) हो... तुम्हाला कोण नको....(त्याला तोडत)
          वहिनी: काही नक्को. मला तिथं अज्जिबात स्पर्धा नकोय. आपण काय सारेगमप कार्यक्रम करायला चाललोय तिथं? आणि तुम्ही फार भांडता बाई. रियालिटी शो मध्ये पाहिलंय मी.... तसे मी सगळेच रियालिटी शो बघते नि चर्चा पण करते. तर ते नकोच.
          हिमेश: (हताश आवाजात) निदान मग मला एखादी मायबोली टोपी तरी पाठवाल का? टीशर्ट समितीला सांगून? ती तरी लकी ठरते का बघतो.
          (हताश होऊन फोन आपटल्याचा आवाज.... मागून 'त्रासिक बनाया आपने...' चे सूर)

            निवेदक: कार्याध्यक्ष, पुढला फोन येईपर्यंत तुम्ही तुमच्या संयोजनकौशल्याबद्दल काहीतरी सांगा बरं.
            कार्याध्यक्ष: तसा मी आद्य वविकर. सगळ्यांत पहिला वर्षाविहार झाला त्यात मी होतो. नंतर मी अज्ञातवासात गेलो. ववि संयोजनावर मी दोन वर्षं सखोल संशोधन केलं आणि नंतर सूत्रं हातात घेतली. घेतली कसली, आली म्हणा... (बाकीच्यांना काही करायला नको! कार्याध्यक्ष म्हटलं की झालं! )शा र, परदेशाहून आलेल्या मायबोलीकरांच्या भेटी.... असं करता करता ववि देखील माझ्याच कडे आलं बघा.

              निवेदक: पुन्हा एक फोन आलेला आहे. अर्रे... हे तर आपलेच एक मायबोलीकर अरुण....
              अरुण: कार्याध्यक्ष, लब्बाड... इथे आहात होय? तरीच म्हटलं तुम्ही फोन का उचलेनासे झालात? मला एकच प्रश्न आहे.
              कार्याध्यक्ष: अरुण, आपण हे ऑफलाईन बोलूया ना!
              अरुण: अरे नाही, आत्ताच उत्तर दे. मला बरीच तयारी करावी लागणार आहे.
              कार्याध्यक्ष: (भेदरून) कालचाच प्रश्न ना?
              अरुण: (उत्साहाने) हो... मला सांग. यंदा वहीचा साइझ वाढवला आहेस ना? दोनशे पानी वही यंदा केलीये मी कवितांसाठी. खेरीज तिथे wi fi मिळतं का बघ ना? माझा लॅपटॉप आणेन मी. ब्लॉगवरच्या कविता....
              निवेदक: (धीर एकवटून) अरुण, मला नक्कीच खात्री आहे, यंदा तुम्हाला तुमची दोनशे पानी वही अथपासून इतिपर्यंत ऐकवायची संधी मिळणार आहे. तुम्ही तुमच्या तयारीला लागा कसे! (फोन बंद होतो.)
              कार्याध्यक्ष: म्हणून मी त्याचा फोन घेत नव्हतो कालपासून! पण शेवटी इथे गाठलंन...

                निवेदक: ओहोहो... आत्ता फोनवर आहेत परदेशात काही वर्षं राहुन नुकत्याच भारतात परतलेल्या श्यामलीताई.....
                ताई: यंदा किनै सरप्राईझ आहे बर्का माझ्याकडून! मी बकलावा आणते ना नेहमी... पण यंदा मी भार्तातच आहे. तर किनै मी बकलावा घरच्या घरीच बनवला आहे. ह्यांना खायला दिला तर हे गुंग होऊन झोपलेच चोवीस तास नि त्यांची परतीची फ्लाईट हुकली. अर्थात जागे झाल्यावर ह्यांनी म्हटलंच, बरं झालं. मला अजून सुट्टी भारतात घालवायला मिळाली तुझ्या बकलाव्यामुळे... तर अस्सं आहे. मी जवळपास एक डबाभर बनवला आहे. आणणार आहे हं वविला....
                (फोन एकाएकी कट होतो. कार्याध्यक्ष, निवेदक आणि वहिनी एकदम किंकाळी फोडतात)
                कार्याध्यक्ष: बसप्रवासाचा नवीन नियम - कुणालाही खाद्यपदार्थ घेऊन गाडीत चढता येणार नाही.... हुश्श!

                  निवेदक: आता गरजेचा आहे एक ब्रेक.
                  (मधले संगीत. जाहिरात.)

                    रिसॉर्टचे भाडे: १०० $ Proud
                    बसभाडे: २०$ Proud
                    मधले खाणे: १५$ Proud
                    मायबोलीकरांसोबत एक पूर्ण दिवस: Priceless.

                    (कार्यक्रम पुन्हा सुरु.)

                      निवेदक: पुढचा फोन आलेला आहे आपल्याला घारुअण्णांकडून. ते मुंबईचे ज्येष्ठ संयोजक. त्यांनाही इथं बोलावलं होतं आम्ही चर्चा करायला पण काय आहे ना, ते प्रत्यक्ष भेटीपेक्षा मोबाईलवर जास्त भिस्त ठेवतात.)
                      घारुअण्णा: कार्याध्यक्ष, कसं काय? पुण्यातली तयारी नीट चालू आहे ना? म्हटलं आता फोन लावलाच आहे इथं तर तुझ्याशी बोलून घ्यावं. (फोन वाजतो.) जरा होल्ड करा हां... (दुसर्‍या मोबाईलवर बोलू लागतात. पुन्हा फोन वाजतो.) तुम्हीही होल्ड करा हां....
                      निवेदक: घारुअण्णांकडे मोबाईल आहेत तरी किती?
                      घारुअण्णा: हां बोला.
                      निवेदक: तुमच्या संयोजनकौशल्याबद्दल बोलायचं होतं.............
                      घारुअण्णा: सगळी मोबाईलची कृपा... पहिल्यांदा मावळसृष्टीला गेलो. तिथल्या सुप्रसिद्ध धबधब्यात उडी घेतली. ईश्वरी संकेतच होता म्हणा ना तो. तशीच उडी ववि संयोजनातही घेता येईल असा स्पष्ट संकेत मिळाला. मुंबईचा कार्यभार घ्या म्हणाले... घेतला.
                      निवेदक: कार्यभार ना?
                      अण्णा: मोबाईल.... तेव्हा पहिला... मग दुसरा... असं करता करता आज डझनभर आहेत.
                      निवेदक: वा अण्णा....
                      घारुअण्णा: निघायला हवं... फोन वाजतोय. वविला भेटूयाच.

                        निवेदक: घारुअण्णा वविला तरी प्रत्यक्ष भेटतील ही आशा करूयात. पुढला फोन आहे स्वाती २६ यांचा.
                        स्वाती: नमस्कार. वैनी, पाया पडते हं.
                        निवेदक: वा वा... केवढा आदर. ...
                        स्वाती: तुमच्याही पाया पडते हं.
                        निवेदक: (गोंधळतो.) वा... असू दे, असू दे.
                        स्वाती: कार्याध्यक्ष....
                        कार्याध्यक्ष: असू दे. असू दे.
                        निवेदक: बोला.
                        स्वाती: (लाजत) मी यंदाच्या वविला खास कार्यक्रम सादर करणार आहे म्हटलं. म्हणून फोन केला.
                        निवेदक: वा... काय करणार आहात?
                        स्वाती: (दुप्पट लाजत) जादूचे प्रयोग...
                        कार्याध्यक्ष: काSSSSSSSSSSSSSय?
                        वहिनी: माहित्ये. कळलं. भर पावसाळ्यात 'सूर्यदर्शन'. हो की नै?
                        स्वाती: इश्श्श्श! (फोन कट होतो.)
                        निवेदक: वैनी... ह्ये वागनं बरं न्हवं....

                          (फोन वाजतो.)
                          निवेदक: बोला.
                          रीना: मी बोलतेय.
                          निवेदक: वा... बोला की!
                          रीना: मी हिप्पोवर बसून बोलतेय.
                          निवेदक: (भयचकित होऊन) वा.. वा...
                          रीना: कार्याध्यक्ष, यंदा राईडला कुठला प्राणी आहे हो? मी किनाई हत्ती, जिराफ, झेब्रा ... झालंच तर हिप्पो यावर बसून प्रॅक्टिस केलीये. शिवाय जीन पण आहे नवीन.
                          कार्याध्यक्ष: जीन????????????? वविला मादक पेयं अलाउड नाहीत, रीना..
                          रीना: अय्या, तुम्ही शब्दार्थ वगैरे बघत नाही वाटतं? जीन म्हणजे खोगीर.
                          कार्याध्यक्ष: असं का? ते चालेल.
                          रीना: ते नवीनच घेतलंय मी. म्हशीच्या पाठीवर ते घालून पुन्हा प्रॅक्टिस करून बघितली. तिच्यावर बसूनच येणार होते पण वविला पोचायला उशीर होईल असं म्हणाले सगळे..... माझं स्किल त्यांना बघवत नाही नं.... असो. यंदा राईडला गेंडा ठेवा बर्का.... येते.
                          (फोन कट होतो. कार्याध्यक्षांनी व वहिनींनी टाकलेल्या सुटकेच्या निश्वासांचा आवाज.)

                            निवेदक: (गडबडीने) अधिक फोन येण्याआधी आपण इथेच थांबूयात.
                            कार्याध्यक्ष: सर्व 'धोके' पत्करून तुम्ही मायबोलीकर वविला नेहमीप्रमाणेच भरघोस प्रतिसाद द्याल याची आम्हाला खात्री आहे . . . Happy ठिकाण ठरलंय, दिवस ठरलाय. तुम्हाला लवकरच सांगतोय. हा कार्यक्रम रेडिओ प्रोमो होता. लौकरच मुख्य पोस्ट येईलच. सज्ज व्हा तर मंडळी. भेटूयात तर मग.
                            वहिनी: ते माझं विडंबन गायचं राह्यलं ना...
                            निवेदक: ते आता वविलाच....
                            (कार्यक्रम संपल्याचे संगीत.)

                            विषय: 
                            Group content visibility: 
                            Public - accessible to all site users

                            सहीच रे देवा, येताना वही बरोबर एक साखरेची वाटी पण घेऊन ये तेवढी...
                            ==================
                            फुकट ते पौष्टीक

                            हे व. वि. वह्यांची पाने मोजता... महिनाभर चालेल असं वाटतंय.. मधेच कधीतरी आल्यास चालेल का?
                            .
                            विनय.
                            Lol

                            Lol
                            जबरा लिहिलय Happy
                            अरे कोणीतरी प्रवासातच अरुणची वही गायब करायला हवी.
                            हम्म पिलॅन करना मंगताय ववि झाले आणि मी निगडीत उतरलो की वही परत सापडेल अशी व्यवस्था करावी Happy

                            .............................................................

                            देवा Biggrin गझल मोड अजून ऑन आहे वाटते तुझा Happy

                            अरे कोणीतरी प्रवासातच अरुणची वही गायब करायला हवी.>>> झकास अरे पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? Happy

                              ================
                              आज झालो तुझी मी वदंता नवी
                              कालची बातमी काल होती खरी

                                शेवटी शेवटी खूप आल्या सरी

                                  -एक झलक, वैभव जोशी यांच्या लवकरच येणार्‍या ’सोबतीचा करार’ या गझल अल्बमची!

                                  झकास ला सुपारी द्या ना... घंटा बांधायची!!!

                                  ह्म्म, तयारी तर जोरात चालु आहे की Happy
                                  आता तारीख, वार, महीना, वर्ष सगळं तपशीलवार येऊ द्या लवकर Happy
                                  झक्या, तु घंटा आणच, कसं जमवायचं ते बघु Happy

                                  बापरे अरुणची दोनशे पानी वही आणि वहिनींच गायन>>>
                                  मला आधीच कुणकुण लागली होती. बरे झाले ऊसगावात आलो. येताना टीशर्टाचे पैसे आणु का? Proud

                                  बाकी सही चालले आहे. जबरी. Lol फोन लाईन कधीपर्यंत ओपन आहेत?

                                  अरे वा.... झाली का घोषणा...
                                  तयारी करतेय मी सुद्धा Happy

                                  अरे तुम्ही काय समजलात काय अ. आंना...? ते बॅकअप वही पण आणतील. Proud (काहि झालं तर IT वाले आहेत नको त्याचा बॅकअप ठेवतील, हवं त्याचा मिळणार नाही.)
                                  ~~~~~~~~~
                                  ~~~~~~~~~
                                  Happy

                                  मि पण call केला होता पण कार्याध्यक्षानी Wrong No. म्हणुन ठेवुन दिला... :P..
                                  संयोजक समिती आणी सां.स. ... सुरुवात खुपच छान झाली आहे.. अभिनंदन.... Happy

                                  अरे यंदा राईड ला म्हशीच्या एवजी काय गेंडा ठेवणार आहे का खरच? ते ही बघाव. ते जर ठरले तर लिंबुटिंबुचे त्या प्राण्याबद्दल सुक्ष्म निरीक्षण केलेला, माहितीपुर्ण निबंध झेलायला तयार रहा.. (संदर्भः मागच्या वविला म्हशीवर बेतली होती) Happy

                                  टीपः गेंडा म्हणजे जाडजुड मायबोलीकर... नाही SSSS

                                  किती ती माझ्या वहीबद्दल इतरांना काळजी ?????? Happy
                                  तर मित्रहो, ही सुवर्णसंधी दवडू नका. वविच्या निमित्ताने तुम्हाला माझ्या कविता ऐकायला मिळतील ........ Rofl

                                    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
                                    Dream is not what you see in sleep
                                    But it is the thing which does not let you sleep

                                    वविच्या निमित्ताने तुम्हाला माझ्या कविता ऐकायला >>
                                    वविच्या निमित्ताने तु कवि होणार आहेस तर. Lol

                                    व.वि. पण करणार का अमेरीकेत?>>>
                                    त्याचीच तर चाचपणे करण्याकरता आलोय मी. Proud

                                    !फिदि!

                                    फिदी फिदी कसं हसायचं?

                                    जगमोहनप्यारे, ! ऐवजी : द्या फिदीच्या मागे आणि पुढे.. आणि दी दीर्घ .. Proud

                                    Pages