दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा ! सुका मेवा घ्या !

Submitted by दिनेश. on 14 October, 2014 - 05:10

बघता बघता दिवाळी आली कि तोंडावर. तूम्हा सर्वांना शुभेच्छा आणि वेळेवर पोहोचावा म्हणून देशोदेशीचा सुका मेवा आधीच पाठवतोय..

१) कॅलिफोर्नियाचे बदाम

२) इराणी " अनारदाणा". हा प्रकार मला दुबईला मिळाला. दुकानदाराला नाव विचारले तर त्याने अरबी नाव सांगितले.
चवीला अनारदाण्यासारखाच आहे पण बिया नाहीत. सलादवर टाकल्यास छान दिसतो. चटणी पण छान होते.

३) हॅझलनट्स.. हे फोडून खायचे असतात. आत छोटा नट असतो.

४) हे ब्राझिलनट्स.. अर्थातच ब्राझिलचे. याची चव साधारण सुक्या खोबर्‍यासारखी असते.

५) या आहेत सुकवलेल्या क्रॅनबेरीज. मी न्यू झीलंडवरून आणल्या.

६) अंगोलातले काजू. इथे पोर्तुगीजांनी भरपूर काजूची झाडे लावलीत पण इथल्या लोकांना बिया काढायचे तंत्र नीटसे
अवगत नाही. ( पोर्तुगीजमधे पण "काजू" असाच शब्द आहे. )

७) हे साऊथ आफ्रिकेतून आलेले मकाडामिया. माझ्या सगळ्यात आवडता खाऊ. केनयात हे खुप छान आणि स्वस्त
मिळतात. ( भारतात शेवटी बघितलेला भाव २,४०० रुपये किलो होता )

८) इराणी पिस्ते

९) इराणी शहतूत ( तुतीची फळे ) चवीला फार छान लागतात पण निवडून खावी लागतात.

१०) केनयन चेस्टनटस.. भाजून किंवा उकडून खातात.

११) आक्रोड पण मिळाले काल..

परत एकदा दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव, ब्राझिलनट्स.. काहीसे फणसांच्या उकडलेल्या बियांसारखे दिसतायत. पिस्त्यांवरुन नजर हटत नाहीये.

दिनेशदा, तुम्हाला सुध्दा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
फोटो बघुन सर्वांची चव चाखावीशी वाटत आहे.

दिनेशदा तुम्हालाही (इन अ‍ॅडव्हान्स) दिवाळीच्या शुभेच्छा!!! Happy

पिस्ते सुंदर दिसतायतं !!!!>>>>+१. मस्त फोटो आलाय. Happy

यंदाच्या भारतभेटीत सगळा सुकामेवा घेऊन या. Proud

आभार दोस्तांनो.
मकाडामियाची चव एकमेव असते. अगदी कुरकुरीत पण आक्रोड ते काजूगर कशाचीच तुलना करता येणार नाही.
काही मायबोलीकरांनी चाखले आहेत ते.

हो जिप्स्या, आणायलाच हवा !

मस्तच !
मुंबईत फोर्टला अमेरिकन ड्रायफ्रुट स्टोअरेमध्ये हे सारे पाहिलेत, त्याची आठवण झाली.

मुंबईत फोर्टला अमेरिकन ड्रायफ्रुट स्टोअरेमध्ये हे सारे पाहिलेत, त्याची आठवण झाली.>>>> तिथे ही मकाडामियासुध्दा असणारच. दिनेशदांनी मकाडामियाबद्दल जे लिहिले आहे त्यामुळे मकाडामियासाठी अमेरिकन ड्रायफ्रुटसला भेट द्यावी लागणार.

शिवाजी मंदीरहून, सेनाभवन कडे जाताना डाव्या हाताला रस्त्यावरच आहे. तिथे दोन तीन सुक्यामेव्याची दुकाने आहेत.

दिनेश धागा उघडल्या उघडल्या उगिचच वाटलं की माकडमियाँ चा फोटो नसला तर मी नक्की विचारेन.
एका गटगला उरलेले सर्व माकडमियाँ मी घरी घेऊन गेले होते. त्यामुळे चव मला चांगलीच माहित आहे. Proud

मस्त.ते नारंगी आणि शेवटच केनयन चेस्टनटस माहीत नव्ह्तं. मकाडामिया नाव नसत लिहिलं तर मला त्या नारंगी गोळ्या वाट्ल्या असत्या.

दिवाळीचा हार्दिक शुभेच्छा....
नवीन प्रकारांची माहीती मिळाली.मकाडामिया मला माहित नव्हते.
तुम्हि इतकी भटकंती करता हयाच ही खूप कौतूक वाटल Happy

रीया, फोडता फोडताच तोंडात टाकले जातात. पुढच्या वेळेस आठवणीने फोटो काढेन.
गोपिका, मकाडामिया खुपच छान लागतात चवीला. माझ्या एका मित्राला दिले होते त्याने त्याचे गुरवारचे उपवास केवळ मकाडामिया खाऊन केले Happy भटकंतीची हौस आहेच.

रीया.. आता जुलैपर्यंत वाट बघायला हवी. ऑस्ट्रेलियात पण छान मिळतात ते. तिकडून कुणी येणार असेल तर .. Happy

दिनेशदा मी ह्या सगळ्या वस्तू खाल्ल्या आहेत. आमच्याकडे आई हिवाळा आला की सगळा सुका मेवा कांडून त्याचे लाडू करते. त्यात ती डि़क टाकते. उडीदाचे सुद्धा लाडू करते. इथे सिंगापुरमधे हिवाळा नाही म्हणून ह्या गोष्टी खूप खाता येत नाही. कारण, खूप गरम असतात.

Pages