अमेरिकेला जाताना

Submitted by स्नू on 13 October, 2014 - 06:19

नवर्‍याच्या नोकरीच्या निमित्ताने दोन महिन्याने प्रथम नवरा आणि त्यानंतर महिन्याने मी अमेरिकेला जाणार आहोत. आमचे वास्तव्य न्यू जर्सी राज्यात साधारण 3 वर्षासाठी असेल. पॅकिंग करतांना बरेच प्रश्न माझ्या मनात येत आहेत. माझे काही प्रश्न अगदीच बाळबोध वाटू शकतील पण नेटवर उपलब्ध माहिती माझ्या गोंधळात जास्तच भर घालते आहे. मायबोलीकर मंडळी मदत करतील अशी अपेक्षा करते.

तिकडे जाताच सगळे सामान खरेदी करणे थोडे अवघड आणि खर्चीक होईल असे वाटते. त्यामुळे येथून काही वस्तू नेता येतील का?

• खालील वस्तू बरोबर नेण्याची परवानगी आहे का?
१. देवाच्या चांदीच्या मूर्ती आणि पूजेचे सामान
२. दागिने( खरे आणि खोटे)
खरेदीचे बिल न्यावे लागते का?

• बर्‍याच ठिकाणी प्रेशर कूकर, कढई, तवा आणि frying पॅन नेण्याबद्दल सुचवले आहे. अमेरिकेत हिटिंग Coil असतात का? की फ्लेम असते? आणि असे असल्यास भारतातील कोणती भांडी उपयोगी पडतील? मी Futura चे Hard Ionized नेण्याच्या विचारात आहे.

• पोळपाट लाटणे, मोदकाचा साचा, आप्पे पात्र, इडली स्टँड, चकलीचा सोर्‍या, किसणी हे तिथे मिळते का?

• सुरवातीच्या काही कालावधीसाठी इन्स्टंट पीठे म्हणजे भाजणी, MTR चे इडली/ डोसा/ ढोकला पीठ, कोरड्या चटण्या, लोणचे नेता येईल का?

• खडा मसाला : वेलची, दालचीनी, बडीशेफ गोडा मसाला, लाल मिरची पावडर, हळद, हिंग नेता येते का?

• वेस्टर्न कपडे भारतातून खरेदी करून न्यावे की अमेरिकेत खरेदी करावेत? इथे (दिल्ली) थंडीत वापरात येणारे गरम कपडे (Monte Carlo, Woodland) देखील तेथील थंडीत निकामी आहेत का?

• कुठली औषधे नेण्याची परवानगी आहे? सगळ्या औषधांसाठी prescription लागेल का? आयुर्वेदीक औषधांसाठी देखील prescription लागते का?

• Prescription कोणाचे चालू शकते? डॉक्टर सरकारी हॉस्पिटलचे असण्याची अट तर नाही ना?

• Thyronorm सारख्या औषधाचा साधारण 6 महिन्याचा डोस नेता येऊ शकतो का?

• मला चित्रकलेची आवड आहे. त्यासाठी लागणारे सामान येथून न्यावे की तेथेही मिळू शकते?

• या व्यतिरिक्त MUST CARRY अश्या काही वस्तू आहेत का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

• खालील वस्तू बरोबर नेण्याची परवानगी आहे का?
१. देवाच्या चांदीच्या मूर्ती आणि पूजेचे सामान
२. दागिने( खरे आणि खोटे)
खरेदीचे बिल न्यावे लागते का?

>>>>>>> हो, पुजेच्या सामानात विड्याची पाने, सुपार्‍या नाही आणता येणार. Happy पण इकडे सगळं मिळतं. त्यामुळे फक्त देव आणले तरी चालेल.

• बर्‍याच ठिकाणी प्रेशर कूकर, कढई, तवा आणि frying पॅन नेण्याबद्दल सुचवले आहे. अमेरिकेत हिटिंग Coil असतात का? की फ्लेम असते? आणि असे असल्यास भारतातील कोणती भांडी उपयोगी पडतील? मी Futura चे Hard Ionized नेण्याच्या विचारात आहे.

>>>>>> हो. हिटींग कॉईल असते. पण काही ठिकाणी आपल्या सारखा फ्लेमवाला गॅसही असतो. भांडी आणायची असतील तर कुकर आणावा आणि बाकी आपली स्पेसिफीक भारतीय भांडी आणावी उदा. गाळणं, झारा, चाळणी, डाव, रवी, फोडणीची लोखंडी फळी. साधी शिजवायची भांडी, तवे, फ्राय पॅन वगैरे इथे मिळतं. आधी लिहिलेलीही मिळतात पण आणली तर आल्या आल्या भांडी खरेदीला पळावे लागत नाही.

• मोदकाचा साचा, आप्पे पात्र, इडली स्टँड, चकलीचा सोर्‍या, किसणी हे तिथे मिळते का?
>>>>
आप्पे पात्र, इडलीचा स्टँड, किसणी पाहिले आहेत पटेल ब्रदर्स मध्ये.. सोर्‍या, मोदकाचा साचा माहित नाही.

• सुरवातीच्या काही कालावधीसाठी इन्स्टंट पीठे म्हणजे भाजणी, MTR चे इडली/ डोसा/ ढोकला पीठ, कोरड्या चटण्या, लोणचे नेता येईल का?
>>>>> हो. पण हे ही सगळं मिळतं इथे. पहिल्या दोन-चार दिवसांपुरतं काही आणायचं तर आणू शकता. विकतच्या चटण्या-लोणच्यांऐवजी घरी केलेले काही पदार्थ आणायचे असतील तर ते आणणं जास्त चांगलं. कारण ते नंतर इथे मिळणार नाहीत. Happy

• खडा मसाला : वेलची, दालचीनी, बडीशेफ गोडा मसाला, लाल मिरची पावडर, हळद, हिंग नेता येते का?
>>>>> बहुतेक नाही. पण हे ही इथे मिळतं.

• वेस्टर्न कपडे भारतातून खरेदी करून न्यावे की अमेरिकेत खरेदी करावेत? इथे (दिल्ली) थंडीत वापरात येणारे गरम कपडे (Monte Carlo, Woodland) देखील तेथील थंडीत निकामी आहेत का?
>>>>>> तिथून कितीही कपडे आणले तरी इथे खरेदी केली जातेच हा स्वानुभव! त्यामुळे बेसिक कपडे आणावे. बाकीचे इथे घ्यावे. दिल्ली वगैरेचे कपडे अगदी निकामी नाहीत.

• कुठली औषधे नेण्याची परवानगी आहे? सगळ्या औषधांसाठी prescription लागेल का? आयुर्वेदीक औषधांसाठी देखील prescription लागते का?

>>>> prescription ठेवावे बरोबर. औषधांचा स्पेसिफीक नियम माहित नाही.

• Prescription कोणाचे चालू शकते? डॉक्टर सरकारी हॉस्पिटलचे असण्याची अट तर नाही ना?

>>>>> माझ्या माहितीत तरी नाही.

• Thyronorm सारख्या औषधाचा साधारण 6 महिन्याचा डोस नेता येऊ शकतो का?
>>>> हे माहित नाही.

• मला चित्रकलेची आवड आहे. त्यासाठी लागणारे सामान येथून न्यावे की तेथेही मिळू शकते?
>>>> इथे मिळू शकतं. नेटवर आधी शोधून बघू शकता की हवे ते ब्रँड वगैरे आहेत का.

• या व्यतिरिक्त MUST CARRY अश्या काही वस्तू आहेत का?
>>>> जितकं आणाल तितकं कमीच पडतं. Happy जड सामान अजिबात आणू नये. मराठी पुस्तक, सिडीज, घरचा खाऊ (शिजवलेला.. कच्चं धान्य अलाऊड नाहीये ) वगैरे गोष्टी आणाव्या..

हे सगळं माझ्या अनुभवानुसार, मतानुसार वगैरे वगैरे नेहमीचे डिस्क्लेमर अप्लाय.. Happy

एवढी काळजी करू नका. न्यू जर्सी हे अद्याप अधिकृतरित्या भारतीय संघराज्यात सामील झाले नसले तरी तुम्हाला बाकी फारसा फरक जाणवणार नाही.

>>>> वस्तू बरोबर नेण्याची परवानगी

परवानगीचा प्रश्न फक्त अन्नपदार्थ व औषधे याबाबत असेल. बिलाची वगैरे गरज नाही. औषधाचे प्रिस्क्रीप्शन जवळ ठेवा. विशेषतः खूप जास्त आणत असाल तर.

कुठल्याही प्रोसेस्ड फूडला कस्टम्समध्ये अडचण येत नाही. शेंगदाणे, तांदूळ वगैरे गोष्टी टाळा. खर तर खाद्यपदार्थ व मसाल्याचे पदार्थ वगैरे सगळे मिळतात माफक किमतीत. त्यामुळे ते आणण्याची गरज नाही. अगदी विशिष्ट ब्रँडच पाहिजे असेल तर तिकडून आणा.

आपले प्युअर वूलचे थर्मल्स हे इकडच्यापेक्षा चांगले असतात पण दर धुण्यात आक्रसत जातात असा माझा अनुभव आहे.

सर्व कपडे, (स्पेसिफिक भारतीय नसलेली) भांडी, गाद्या, बेडशीटस, शूज, पडदे, फर्निचर, टीव्ही, वगैरे सगळे तुम्हाला २७-२८ नोव्हेंबरला भारतापेक्षा स्वस्त मिळेल. तुम्ही किंवा नवरा तेंव्हा तिकडे असाल असे नियोजन केलेत तर सोपे जाईल.

मला चित्रकलेची आवड आहे. त्यासाठी लागणारे सामान येथून न्यावे की तेथेही मिळू शकते? >>>>

खरं तर इथे चित्रकलेचे जे साहित्य मिळते ते पाहून थक्क व्हायला होईल.. भारतातून आणण्याची गरज नाही,

परागनं सगळं सांगितलं आहेच.

फक्त गरम कपडे आणण्याविषयी सांगते. भारतात मिळणारे कपडे न्यू जर्सीच्या थंडीला कुचकामी आहेत. फारतर थर्मल अंडरगारमेन्ट्स आणता येतील. आणि आल्याआल्या खरेदीला जायचं नसेल तर एखाददुसरा वुलन कोट किंवा तत्सम. १६-१७ वर्षांपूर्वी आम्ही बंगलोरातल्या खास युरोप्-अमेरिकावारीसाठी मिळणार्‍या गरम कपड्यांच्या दुकानात ढिगभर खरेदी केली. पैश्यापरी पैसा गेला. कपडे इथल्या थंडीला कुचकामी ठरले.

तेव्हा इथे आल्यावर खूप जास्त पैसा खर्च न करता बर्लिंग्टन कोट फॅक्टरीसारख्या दुकानांत चांगले विंटरकोट्स, जॅकेट्स मिळू शकतील.

>>• कुठली औषधे नेण्याची परवानगी आहे? सगळ्या औषधांसाठी prescription लागेल का? आयुर्वेदीक औषधांसाठी देखील prescription लागते का?

स्पेसिफिक औषधं आणता येणार नाहीत असं काही वाचल्याचम आठवत नाही. आणायला बंदी असलेल्या औषधांची लिस्ट नेटवर शोधावी लागेल.

• Prescription कोणाचे चालू शकते? डॉक्टर सरकारी हॉस्पिटलचे असण्याची अट तर नाही ना?

अशी अट नाही. एमबीबीएस डॉक्टरांचं असेल तर वांधे कमी. बाकी होमिओपॅथी, आयुर्वेद प्रिस्क्रिप्शन्सबद्दल माहिती नाही.

• Thyronorm सारख्या औषधाचा साधारण 6 महिन्याचा डोस नेता येऊ शकतो का?

हो. नक्कीच. हे प्रिस्क्रिप्शन मेडिकेशन असेल तर योग्य कागदपत्रं जवळ असू द्या.

नेवार्क, जे एफ के, लग्वार्डिया एरपोर्टांमध्ये बरेचदा (बहुतेक देशी तोंडं बघून) कस्टम्सऑफिसर कस्टम्सडिक्लरेशनफॉर्मवर 'A' लिहितो. (अ‍ॅग्रिक्लचरल माल?) म्हणजे झक मारत आपल्याला वेगळ्या ठिकाणी जाऊन बॅगा उचकटू द्याव्या लागतात. तुमची पहिली एंट्री असेल तर आजकाल हे आवर्जून करतात असं ऐकलंय.

तुम्हाला घाबरवायचा उद्देश नाही. पण तुमच्या डोळ्यांदेखत फेकल्या जाऊ शकेल असं सामान न आणण्याची खबरदारी घेतली की सोपं होतं.

>>एवढी काळजी करू नका. न्यू जर्सी हे अद्याप अधिकृतरित्या भारतीय संघराज्यात सामील झाले नसले तरी तुम्हाला बाकी फारसा फरक जाणवणार नाही.>> Lol अगदी खरं आहे.
मोदकाचा साचा, चकली सोर्‍या इथे पाहिल्याचे आठवत नाही तेव्हा तेवढं हवंतर आणा. पण बाकी सगळं इथे मिळतं.

खाण्याच्या पदार्थांवर नियम बदलले आहेत. ठराविक डाळी , काबुली चणे इत्यादीवर बंदी आहे.
या सगळ्या गोष्टी इथे मिळतात , उगाच आणू नये...

लोणची, पापड, पिठें, डाळी, कडधान्ये, तांदूळ वगैरे काही म्हणजे काही आणू नये.

इथे तीनच वर्षासाठी येणार असाल तर मोदक चकलीचा का विचार करत आहात? इथले पदार्थ शिकून घ्या. Happy

प्रवास आणि इथे राहण्यासाठी खूप शुभेच्छा!!

>>लोणची, पापड, पिठें, डाळी, कडधान्ये, तांदूळ वगैरे काही म्हणजे काही आणू नये.

अगदी अगदी! फारतर (कुटलेले) घरचे (पॅकबंद) मसाले आणता येतील. बाकी सगळं मिळतं.

स्नू, न्यू जर्सीत कुठे येणार आहात काही ठरलेय का ? असल्यास तिथक्ल्या दुकानांचे पत्ते , नावे इ. पण इथे मिळेल तुम्हाला. इन जनरल न्यू जर्सीत कुठेही असलात तरी देशी दुकाने, ग्रोसरी, कपडे मिळायला काहीही अडचण नाही.
मसाले वगैरे तर मी भारतात जे पाहिले नव्हते तेही इथे जास्त वापरलेत.
इडली पात्र, आप्पे पात्र, पोळपाट लाटणे, गाळण्या, डाव, झारे ,कढया, पॅन्स, तवे... इथे सर्व मिळते. उगीच सामान वाढवू नका. कुकर मात्र आणलेला बरा.
वर सर्वांनी लिहिल्याप्रमाणे थंडीचे कपडेही इथेच घ्या.

मला चित्रकलेची आवड आहे. त्यासाठी लागणारे सामान येथून न्यावे की तेथेही मिळू शकते?

Ajibat nyaychi garaj nahi. Tithe apratim variety milte.

मला तिथल्या थंडीचा अनुभव नाहीये. पण न्युयॉर्कातले नातेवाईक दिल्ली/पंजाब /हिमाचलमधल्या थंडीसाठी लागणारे कपडे वापरतात तिथे पण. अर्थात अ‍ॅडिशनल तिथे पण घेतातच.

स्नू कुकर न्या. तो मिस्टरांबरोबर पाठवा (त्यांना येतो ना वापरता?)
माझ्याकडे परात (कणीक मळण्यासाठी), पोळपाट, लाटणं, पोळीचा तवा इंडियातून आणलेलं आहे. शिवाय स्टीलच्या ताटल्या, वाटया तिथून आणल्या आहेत.

तुम्ही वेगवेगळे जाणार आहात याचा फायदा आहे- जे अगदी नक्की न्यायचंच आहे ते सामान मिस्टरांबरोबर पाठवा. मग त्यांच्याशी बोलून ठरवा काय तिथे मिळत नाहीये, काय न्यायला हवंय.

तुम्ही धार्मिक असाल तर तुमची नेहमी वाचायची पुस्तकं (पोथी, स्तोत्र, भगवदगीता) न्या.

बाकी न्यू जर्सीत खूप इंडियन्स आहेत त्यामुळे तुम्हाला भारतात नाही आहोत असं वाटणारच नाही Happy

तुम्हाला शुभेच्छा!

डाव्,झारा,पोळपाट लाट्णे,स्टील चा वाट्या (वापरत असल्यास) आणा..इथे खूपच महाग मिळते भारताचा मानाने आणी एवढे चांगले ही नसते...खूप छान छान प्रकारच्या किसण्या तुम्हाला मिळतील इथे (टारगेट मध्ये वगरे)

मी प्रेस्टीज चा कूकर अमेझोन वरून मागवला होता.किमात साधारण भारतात घ्याल तेवढीच होते.तेव्हा इथे आल्यावर घ्या असेच सुचवीन.कारण वजनासाठी पैसे भरण्यापेक्षा इथे दिलेले बरे.

भारतीय पोशाख आणा नक्की.न्युजर्सी ला मी खरेदी केलि आहे.मोनोपॉली मुळे अत्यंत महाग मिळतात.साड्या,लेहंगा,अनार्कली,नेहमीचे कुर्ते,लेग्गींग्स(मला तरी कधी इथे चांगले नाहि मिळाले) वगरे भरपूर आणा...ते तुम्हाला ज्यास्त सोयीच होइल...वेस्टर्न इथेच घ्या...कारण इकडे तुम्हाला स्वस्त पण मस्त माल मिळेल.(आगदी मोजकेच आणा).नाहि तर भारतात का आपण घेतलो याचा खूप पस्चाताप होतो Proud

इथे सगळे मिळते...आगदी ऑनलाईन ही मिळून जाईल.तेव्हा काळजी नसावि.
तुमचा प्रवासासाठी शुभेच्छा

Prescription कोणाचे चालू शकते? डॉक्टर सरकारी हॉस्पिटलचे असण्याची अट तर नाही ना?
>> कमीत कमी एम बी बी एस डॉ असने आवश्यक आहे (किंवा समकक्ष)

किराणा सामान भारतापेक्षा कमी किमतीत मिळतो Happy त्यामुळे शक्यतोवर होममेड पदार्थ आणा. घरची चव विकत नाही मिळणार.

स्नू एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही इथे आल्यावर सर्व गोष्टी पहिले सहा महिने रूपयात कन्वर्ट करणार. ते करू नका.

अमेरिका भारताच्या तुलनेत खूप स्वस्त आहे. सगळं सामान नवीन विकत घ्या कारण तुम्ही तीन एक वर्ष राहणार आहात तर बेड, टिव्ही ते सोफा असं सगळं घ्या. फारतर $५००० लागतात. आणि जाताना विकता येईल. पण इथे जे ऑनसाईट येतात, त्यांची विचारसरणी थोडी वेगळी असते त्यामुळे बरेचदा पब्लिक काटकसरीत राहतं, पण तुम्ही घालवलेले तीन वर्ष परत येणार नाहीत हा विचार जरूर करा.

तिथे सगळे मिळते. एक चक्कर वॉलमार्ट किंवा टारगेटला मारा अ‍ॅन्ड यु विल बी डन.

वरती बरीच माहिति दिलि आहे. त्यावरुन पुर्ण कल्पना आलिच असेल.. तरीहि मी add करतो

इथे सगळ मिळत.. आणि स्पेशली न्यु यार्क/न्यु जर्शी.. जास्त काहि आणण्याच्या भानगडीत पडु नका.. नाहितर उगाचच extraa लगेज चे पैसे द्यावे लागतात.. तेवढ्या पैशात इथे सगळे मिळुन जाते.. आल्या आल्या एखादे भारतिय स्टोर बघुन जे लागेल ते विकत घ्यावे. भाज्या/डाळी/तेल्/तांदुळ/हळद्/मीठ्/मोहरी/कांदे/बटाटे/लसुन्/चहा पावडर/ साखर असे सर्व काही जे लागेल ते.... १००/१२५ डॉलर्स होतात.. आणि सेटल होइ पर्यंत १०/१५ दीवस ते पुरते.. फक्त तुम्हाला लागनारा मसाला.जर तुम्ही कुठला घरगुती तयार केलेला मसाला वापरत असाल तर. तो भरपुर आणा.. ..आणि आम्ही कोकणि असल्यामुळे आम्ही कोकम फार वापरतो पण ते इथे चांगल्या प्रतीचे मिळत नाही.. त्यामुळे ते तुम्ही वापरत असाल तर तेही एक दोन वर्ष पुरेल एवढे घेवुन या.. आणि आम्हाला पण थोडे द्या..Dolo.gif
प्रेशर कुकर.. तोहि मिळतो.. पण आणलेला बरा.. आणि लहान कोणि बरोबर असेल तर तर त्याची बेसीक औषधे. सर्दी/ताप्/पडस/जंत.. prescription ठेवा बरोबर आणि जेथुन घेतले त्याचि बिले..आणि छोट्याची भारतात रेग्युलर डोस दिल्याची फाइल..... ग्राइप बॉटल इथे मिलते...
मी बर्‍याच वेळा औषधे घेवुन आलोय.. अजुन पर्यंत तर मला कधी prescription मगितली नाहित. पण असावे बरोबर..

तुमचा प्रवासासाठी शुभेच्छा..

भाजणि पिठ, इडियन कपडे,
( कुरडया, सालपापड्या, नाचणी सत्व/ पापड हे अजुन आमच्याकडे मिळत नाही.

कुठली औषधे नेण्याची परवानगी आहे? सगळ्या औषधांसाठी prescription लागेल का? आयुर्वेदीक औषधांसाठी देखील prescription लागते का?

• Prescription कोणाचे चालू शकते? डॉक्टर सरकारी हॉस्पिटलचे असण्याची अट तर नाही ना? >>>>>>>>>> कुठ्ल्याही डॉक्टरचे घ्या काही फरक पड्त नाही.......सगळ्या औषधाचे घ्या.........आणि मु़ख्य म्हण़जे तुमच्या डॉक्टरला कुठ्ल औषधा कशासाठी आहे ते तुमच्या माहितीसाठी लिहून देण्यास सान्गा म्हण़जे जर चेक इन करताना विचारले तर तुम्ही गड्बडून जाणार नाही...... आणि तुम्ही प्रप्येक बॅगेत( म्हणजे २३ kg chya ) सगळी औषधे विभागून ठेवा म्हण़जे एकात जरी काढून घेतली तरी दुसरर्या बॅगेतली तरी असतील आणि एकात मूळ आणी दुसरर्यात XEROX ठेवाprescription ची

अमेरिकेत हिटिंग Coil असतात का>>>> काही ठिकाणी असतात पण मी जेर्सी सिटीत राह्ते माझ्या कडे गॅस आहे

• सुरवातीच्या काही कालावधीसाठी इन्स्टंट पीठे म्हणजे भाजणी, MTR चे इडली/ डोसा/ ढोकला पीठ, कोरड्या चटण्या, लोणचे नेता येईल का?>>>>>>>>. हो नेता येते (२३ kg chya bagetun ).. MTR च्या तयार भाज्यापण असतात फ्रोजन ,.. सुरवातीच्या(१ आठ्वडा) काही दिवसासाठी त्या पण घेउन जा इथली माहिती होइपर्यन्त ..

या व्यतिरिक्त MUST CARRY अश्या काही वस्तू आहेत का?>>>>>>>. गाळण, चहा प्यायचा प्लॅस्टिक चा कप, नेलकटर आणी बाकी प्रसाधनाच्या वस्तू....., छोटी कात्री,पाण्याची मोकळी बाट्ली,

वेस्टर्न कपडे भारतातून खरेदी करून न्यावे की अमेरिकेत खरेदी करावेत>>>>>>>. इथे बर्र्चदा पारदर्शी टॉप असतात........थोडे तरी भारतातून आणा...

चहा प्यायचा प्लॅस्टिक चा कप, नेलकटर आणी बाकी प्रसाधनाच्या वस्तू....., छोटी कात्री,पाण्याची मोकळी बाट्ली, >>>> ??? हे काही कळले नाही! हे सगळे मिळते की इथे. पाण्याची मोकळी बाटली अन प्लॅस्टिक चा कप पण कशाला ते समजले नाही.

Vote up!

चहा प्यायचा प्लॅस्टिक चा कप, नेलकटर आणी बाकी प्रसाधनाच्या वस्तू....., छोटी कात्री,पाण्याची मोकळी बाट्ली, >>>> ??? हे काही कळले नाही! हे सगळे मिळते की इथे. पाण्याची मोकळी बाटली अन प्लॅस्टिक चा कप पण कशाला ते समजले नाही>>>>>>>>>>. ह्म्म १५ रूपयाच्या या गोष्टीना ५ डोलर गेले कि दुख होत म्हणून

पण इथे कमवतातही डॉलर्समध्येच. Happy

नेलकटर्स इथे उत्तम प्रतीची मिळतात. चांगल्या प्रतीच्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्याही मिळतात. काचेच्या डिशवॉशरसेफ कप-बश्या, इतर भांडी सगळं मिळतं. २३ किलोत कायकाय ओढून आणत बसायचं?

इथे बर्र्चदा पारदर्शी टॉप असतात........थोडे तरी भारतातून आणा... << हो का?

इथे रोजच्या वापराच सगळ मिळत काहीही मिस होत नाही. तरीही दिलेल्या लिमीट मधे जितक मावेल तितका आणलच जात. मला भारतातुन डेकोरेशनच्या वस्तु आणायला आवडतात.

इथे बर्र्चदा पारदर्शी टॉप असतात........थोडे तरी भारतातून आणा... << हो का? >>>>>>>>>. होय आणि खूप खोल गळे पण असतात......जर तुम्ही कॅरी करू शकत असाल तर वेल अ‍ॅण्ड गुड....... मी याबाबत फारच मागास आहे Lol Proud

अहो, पण ते खोल गळे, पारदर्शक टॉप्स विकत घ्याच असं कोण म्हणतंय? बंद गळ्याचे आणि जाड कापडाचे टॉप्सपण मिळतात.

अहो, पण ते खोल गळे, पारदर्शक टॉप्स विकत घ्याच असं कोण म्हणतंय? बंद गळ्याचे आणि जाड कापडाचे टॉप्सपण मिळतात >>>>>>>>>>OK

अहो, पण ते खोल गळे, पारदर्शक टॉप्स विकत घ्याच असं कोण म्हणतंय? बंद गळ्याचे आणि जाड कापडाचे टॉप्सपण मिळतात. << +११

बाकीची बरीच माहिती लिहिलेली आहेच. पण जर पुढे शिकायचा विचार असेल तर शैक्षणिक सर्टीफिकेट्स मार्कलिस्ट इ. जरूर आणा.

तोषवी, खूप चांगला सल्ला!

मार्कलिस्ट्स सीलबंद (ट्रान्स्क्रिप्ट्स) आणि सीलबंद रेकमेंडेशन लेटर्स, दोन्ही.

My two cents!

१> जर आपल्याला गाडी चालवायला येत नसल्यास आधी गाडी शिकावी. येत असेल आणी लायसन्स असेल तर international लायसन्स घेऊन येणे. international लायसन्स वर तुम्ही १ वर्ष गाडी चालवु शकता. बर्याच ईन्सुरन्स कंपन्या ते accept पण करतात.

२> ज्या गोष्टीचा आपल्याला छंद आहे ते घेउन येणे. उदा. जर वाचनाची आवड असेल तर चार पुस्तके घेउन येणे.

३> प्रेशर कूकर, कढई, तवा आणि frying पॅन वगैरे amazon.com वर बघा. किती सामान आणु शकता आणी काय उपलब्ध आहे त्यावर ठरवा. न्यू जर्सी च्या दुकानात amazon पेक्षा कमी किमतित मिळतिल पण तुम्हाला अंदाज घेण्यासाठी उपयोगी ठरेल.

४> सुरवातिला credit card मिळायला त्रास होतो. जर american express/citi bank चे कार्ड असेल तर त्याची माहिती घेउन या. माझे १ महिन्यात ३ कार्ड application reject झाले तेव्हा american express ला मागच्या कार्ड चा reference दिल्यावर लगेच कार्ड दिले.

खायच्या गोष्टी आणी कपडे तर न्यू जर्सी मध्ये कुठेही मिळतिल. मी एडिसन न्यू जर्सी मध्ये फक्त साड्या विकणारी दुकाने बघितली आहेत.

तुम्ही न्यू जर्सी भागात असणार आहात त्यामुळे बरेचसे किराणा सामान मिळेल त्याची काळजी नको. पण जर तुम्ही काही विशिष्ट तेल, शाम्पू, पावडर इ. वापरत असाल तर त्याची एक मोठी बाटली घेऊन या (इंडीयन स्टोर मध्ये मिळते की नाही हे कळेपर्यंत तरी उपयोग होईल). शिवाय नेहमीची औषधे अमृतांजन, व्हिक्स, त्रिभुवन कीर्ती, कैलास जीवन वै. पण आणू शकाल. इथे त्याचे counterparts मिळत असले तरी आपल्याला त्या brands ची सवय असते.

कपड्यांमध्ये आतल्या कपड्यांचे किमान १०-१५ जोड नक्की आणा. इथे आठवड्यातून एकदा laundry करतात.जर मशीन घरात नसेल तर नक्कीच कारण पूर्ण लोड असल्याशिवाय laundry करणे फायद्याचे नसते.
शिवाय प्रवासात bags हरवणे, उशिराने मिळणे असे प्रकार होऊ शकतात तेव्हा एक-दोन कपड्यांचे जोड (सेट) carry on luggage मध्ये नक्की ठेवा.

स्वयंपाकाच्या भांड्यांत पोळपाट, लाटणे सवयीचे असेल तर ते आणू शकता. मिसळणाचा डबा, त्यात मावणारे छोटे चमचे अशा गोष्टी बरोबर आणणं सोपं पडेल. अजून सुचलं तर इथेच लिहेन! Happy packing!

हलके घ्या -

विळी मिळत नाही. आणली तर अडवत नाहीत. फ्रोझन नारळ वापरतात त्यामुळे खोवणी लागत नाही. पण हौसच असेल तर स्क्रेपर घेऊन या. नारळ फोडायला कोयती होम डेपो मध्ये मिळते.
पुरणयंत्र मिळते - व्हेजिटेबल मिल नावाने मागावे लागते.
कातणे तुळशीबागेइतके सुबक मिळत नाही पण इटालियन दुकानात पिझ्झा कटर (नक्षीचा पण मिळतो) मिळतो त्याने काम भागते.
खलबत्ता पटेल दुकानात मिळतो तो हलका असतो (मात्र एखादा दांडगोबा पटेल बत्ता असतोच, शोधावा लागतो) हलक्या बत्त्याने फक्त वेलदोडे कुटल जाईल. वर्ल्ड मार्केट मध्ये रब्बू सारखा दगडी खलबत्ता मिळतो. तो बरा.
मिसळणाचा डबापण वर्ल्ड मार्केट मध्ये मिळतो. $१५ किमत आहे. स्टील हलके आहे.
केस बारीक कापून या. न्हावी किमान $२० घेतो. चांगल्या सलोन (सलून नाही सलोन) मध्ये गेलात तर $८० ते $३०० ला फोडणी बसते. खोबरेल तेल आणू नका. इथे मिळते आणि न्यू जर्सीच्या थंडीत काय उपयोग?.
हिमालय लीप बामला तोड नाही. २-३ तरी घेऊन या. बाकी प्रसाधने इथे घेता येतील.
घरफोडी फारशी होत नाही पण "गोदरेज"चे कपाटही नसते. दागिने असेच क्लोजेट मध्ये/बॅगेत बिना कुलुपाचे पडून राहतील. मनाची तयारी ठेवा. लाडाचे दागिने असतील तर बँकेत लॉकर मिळेल दर महा $२० ते काहीही फी असते.
नियमितपणे सौभाग्यलेणी वापरत असाल तर एक चांगली हिर्याची अंगठी करून घ्या. विवाहित स्त्रिया तेवढीच वापरतात.

थोडा लिखा बहुत समझना और जल्दी चली आंना Happy

सगळ्यांचे खूप खूप आभार...किती बारीक बारीक पण महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहे तुम्ही सगळ्यांनी. उगाच नाही मायबोलीचे व्यसन लागत....

एवढी काळजी करू नका. न्यू जर्सी हे अद्याप अधिकृतरित्या भारतीय संघराज्यात सामील झाले नसले तरी तुम्हाला बाकी फारसा फरक जाणवणार नाही. >>>> जीएस, Lol Lol खूप हसले..

ह्या 27-28 नोव्हेंबरला तिथे असणं शक्य होईल असे वाटत नाही......

गोष्टीगावाचे, मृण्मयी, सायो,maitreyee, मृदुला, वर्षा, अल्पना, prafullashimpi, प्राजक्ता, सुम, साहिल शहा ..धन्स !!

...इथे तीनच वर्षासाठी येणार असाल तर मोदक चकलीचा का विचार करत आहात? इथले पदार्थ शिकून घ्या. >>>>सीमंतिनी, केक डेकोरेशन खूप दिवसापासून खूणवतयं, एच4 च असा सदुपयोग करीन म्हणते...

वेदिका२१... Lol मी पण त्याच विचारात आहे. सगळी भांडी कुंडी आणि Misc सामान नवर्‍याबरोबर पाठवून द्यावं म्हणते. म्हणजे माझ्या सगळ्या कपड्यांना आणि चपलांना देखील अमेरिकेची वारी घडेल... Lol Lol
आणि ..नवर्‍याच्या कूकर वापरण्याबद्दल म्हणाल तर एक्स्ट्रा गॅसकेट बरोबर पाठवणारच आहे मी.. Lol Lol

गोपिका, इंडियन कपडे तर घेऊन जाणारच आहे मी.. तरी देखील काही कपड्यांना टाकून देतांना जीव तुटतो आहे हो :(... इथल्या सामानाची विल्हेवाट लावणं हा मोठा टास्क आहे सध्या आमच्या पुढे... प्रत्येक वस्तूशी आठवण निगडीत आहे..आणि सगळं सामान जास्तीत जास्त ३ वर्ष जुनं आहे... Sad

कोकण्या, कोकमं तुमच्यासाठी किती आणू ते सांगा...

आणि तुम्ही प्रप्येक बॅगेत( म्हणजे २३ kg chya ) सगळी औषधे विभागून ठेवा म्हण़जे एकात जरी काढून घेतली तरी दुसरर्या बॅगेतली तरी असतील आणि एकात मूळ आणी दुसरर्यात XEROX ठेवाprescription ची .. >>>> हा उपाय मस्त आहे.

आदिती, डेकोरेशनच्या वस्तू म्हणजे काय ते समजले नाही?? paintings किंवा artifacts का?

केदार, अगदी अगदी !! डस्टबिन च्या शेजारी पडलेले उचलून घरी न्यायचा प्रकार ऐकून आहे But I think that's not our cup of tea!!

तोषवी, पुणे विद्यापीठाच्या इंजीनीरिंग च्या डिग्री साठी transcript घेण्याची गरज असते का? एच1 अप्लाय केला होता तेव्हा तर गरज पडली नव्हती पण higher Education साठी लागत असावे बहुदा

सुरवातिला credit card मिळायला त्रास होतो. जर american express/citi bank चे कार्ड असेल तर त्याची माहिती घेउन या. माझे १ महिन्यात ३ कार्ड application reject झाले तेव्हा american express ला मागच्या कार्ड चा reference दिल्यावर लगेच कार्ड दिले. >>> उपयुक्त आहे ही माहिती. citibank चे क्रेडिट कार्डस कॅन्सल करणार होतो जाण्यापूर्वी आता सांभाळून ठेवेन.

जिज्ञासा, ४६ किलो पैकी ४५ किलो नक्की वापरेन म्हणते..... Happy

सीमंतीनी, मस्त तपशील...आवडला... थॅंक्स..

सर्वांचे मन:पूर्वक आभार !!

बाजिंदा, पियू, मला वाटले ठळक केल्याने वाचतांना त्रास होणार नाही... Lol आजच्या ठळक बातम्या शिळ्या केल्या आहेत... Lol

ते काही माहिती नाही स्नू. विकिपिडिया वरच्या article वरुन वाटत नाहीये की induction बेसची गरज असेल. इकडे भांडी घेताना कधीच असा criteria लागला नाही. आता तिन्ही styles वापरुन झाल्यात - coil, electric & gas.

Pages