पन्नाशीपुढची वाटचाल

Submitted by अश्विनीमामी on 9 October, 2014 - 05:28

पन्नाशीत पाउल ठेवताना असे जाणवते कि अजून दहा अ‍ॅक्टिव्ह वर्षे आपल्या हातात आहेत. त्यानंतर ऑफिशिअली रिटायर व्हायचेच आहे. पण कितीतरी गोष्टी करता येतात. आवडीचे शिक्षण, छंद, भटकंती,
संसाराच्या, नोकरीच्या धावपळीत राहून गेलेले बरेच काही आता आरामात करता येते.

बदलत्या जीवनमानानुसार व चांगल्या आरोग्यसेवांच्या उपलब्धतेमुळे आता खर्‍या अर्थाने ज्येना होण्यास पंचाहत्तरी तरी गाठावी लागते. खुद्द पुण्यनगरीतच ह्याहूनही पुढचे कितीतरी विद्वान, हसरे अ‍ॅक्टिव ज्येना आहेत. जगभरातच जीवनाच्या ह्या कालखंडाकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलत आहे.
व्यवस्थित प्लॅनिन्ग केल्यास, आरोग्य, अर्थ आणि भावनिकद्र्ष्ट्या अतिशय छान, आनंदी जीवन,
वयाच्या पन्नास ते पंचाहत्तर ह्या कालखंडात जगणे शक्य आहे.

पहिला गोल साठीपर्यंत पोहोचणे हा असावा. त्यासाठी आरोग्याचे तसेच पैशाचे व्यवस्थापन गरजेचे आहे. तसेच मुलांच्या जीवनात मायक्रो मॅनेजमेंट न करता आपला रोल आता कन्सल्टंट/ ऑकेजनल हेल्पर असा राहणार आहे हे उमजून घेउन आपले स्वतःचे जीवन कसे जास्त एन्रिच करता येइल या संबंधाने चर्चेसाठी हा बाफ उघडला आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मि. बी, गेट वेल सून! तुमच्या एकदंरीत लिखाणावरुन (सर्वच धाग्यांवरील) तुम्ही पन्नाशीला पोचलात असे वाटत नाही.

गौरी देशपांडे जेंव्हा गेल्यात तेंव्हा त्या ६२ वर्षाच्या होत्या पण त्यांच्या लिखाणावरुन त्या तिशी चाळीशाच्या असाव्यात असे मला वाटत होते. झक्कींचे वय कळेपर्यंत मला ते अगदी रसरशीत तरुण वाटत होते.

वय कोणतेही असो, कितीही असो...प्रकृती व्यवस्थित राखणे हे केव्हाही सगळ्यात महत्त्वाचे आहे...शारिरीक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यही महत्त्वाचे आहे...त्यासाठीच काही छंद असणं जरूरी आहे....वाचन, लेखन, गायन, वादन, नर्तन , चित्रकला, शिल्पकला, हस्तकला, भ्रमंती....असे वा अजून कोणतेही छंद असल्यास उर्वरित आयुष्य... अगदी एकटे असलो तरी बर्‍याच अंशी सुखकारक जाते...प्रत्येकाला शेवटपर्यंत साथ-सोबत मिळतेच असे नाही..म्हणूनच स्वावलंबन अंगी बाणवणं केव्हाही श्रेयस्कर....
मरण आपल्या हातात नाही..मात्र आहे त्या परिस्थितीत आयुष्य चांगलेपणाने कसे जगावे हे आपणच ठरवू शकतो...

देव जी, मी काही तुम्हाला काका दादा म्ह्णणार नाही, कारण मला ते फार इरिटेटिन्ग वाटते. उगीच आपण पन्नाशीला पोहोचलो म्हणजे सर्व दुनियेची आंटी/ काकू झालो कि काय? तुम्ही ह्या फेज मध्ये आल्यावर काय अनुभवलेत ते जरूर लिहा.

छान आहे धागा. मलाही लिहावेसे वाटतेय काहीतरी कारण मीही जवळजवळ पोहोचतेयच तिथे दोनेक वर्षात. वेळ काढुन लिहिन.

बी, तुमचे विचार आणि काही गोष्टीतली निरागसता पाहुन मला तुम्ही अजुन कॉलेजातले आहात असे जरी वाटले तरी तुम्ही प्रौढ आहात हे माहित होते. पन्नाशीला पोहोचला असाल असे मात्र अजिबात वाटले नाही. तुमचे एकुणच सर्व विषयातले गैरसमज लक्षात घेता तुम्ही पन्नाशीला पोचलात हे खरे वाटतही नाही. उगीचच राहावत नाही म्हणुन लिहितेय. डेटींग हे नेहमी सिंगल व्यक्तीला उद्देशुन असते. विवाहित असुनही दुसरीकडे प्रयत्नशील असलेले लोक जे काही करतात त्या गोष्टींना इतर शब्द वापरतात, डेटींग हा शब्द तिथे वापरत नाही. आणि डेटिंग म्हणजे केवळ शारिरीक असेही नाही.

जोडीदार म्हणजे स्त्रीचा पुरूष आणि पुरुषाची स्त्री हे जरी खरे असले तरी प्रत्येक वयातली जोडिदाराची गरज आणि त्याच्याकडुनच्या अपेक्षा जशा वेगळ्या असतात तसेच प्रत्येक शब्द वापरतानाही ज्या संदर्भात तो वापरलाय त्या संदर्भात त्याचा अर्थ आणि व्याप्ती बदलते.

बी पन्नाशीचे आहेत? पण इथे सिनीयर लोकांना अहो जाहो करायची पध्दत आहे ना. बीना का सगळे अरेतुरे करतात मग?

बी, तुमच्या काळात लोक काय म्हणतील, हे बरं दिसतं का वगैरे विचारांचा खूप पगडा होता. पण आताची पिढी खूप ओपन विचारांची आहे. त्यामुळे आता लोक काय म्हणतील याचा इतका बाऊ करायची गरज नाही.

बी पन्नाशीचे आहेत? पण इथे सिनीयर लोकांना अहो जाहो करायची पध्दत आहे ना. बीना का सगळे अरेतुरे करतात मग?

बी पन्नाशीचे आहेत हे लोकांना आजच कळलंय हो वेदिका. Happy

Happy "आताची" पिढी ओपन विचारांची फक्त स्वतःपुरती आहे म्हणण्याचे धाडस करू का? आजही कुणी बाबांनी (आई जाऊन अनेक वर्षे झाल्यावरही) पुन्हा विवाह करायचा विषय काढला तर मुलांचा विरोध (वारसाहक्क पायी) झालेला ऐकला आहे. आईचा पुन्हा विवाह म्हणजे तर मी काही न बोलणे बरे. गुजरातेत ह्यावर तोड म्हणून प्रौढ लोकांच्या लिव्ह-इन साठी मेळावे घेतात. मला वाटते जर कुणाला डेटिंग (व्याप्ती ज्याची त्यांनी ठरवावी पण दोन स्वतंत्र निवास असावे आणि दोन व्यक्ती एकमेकांना नियमित भेटत असाव्या) करायची इच्छा झाली तर मुलांनी सपोर्ट करावे.

प्रोफायलात शाळेतला फोटो लावण्याला प्रौढत्वि निज शैशवास जपणे असे म्हणावे काय? Wink
यानिमित्ताने आमचे परममित्र लिंबाजीरावांचा शिशूअवस्थेतला प्रोफाईल फोटू आठवला

सीमंतीनी सहमत. आपल्या पालकाने दुस-या इनिंगसाठी जोडिदाराचा शोध घेणे हे आजची मुले स्विकारत नाहीत. किंबहुना अशी गरज आहे हेच मु़ळात ती स्विकारत नाहीत. त्याचवेळी स्वतःच्या जोडीदाराबाबत मात्र ती खुप आग्रही झालीत. पालकांनी त्यांना समजुन घ्यावे ही अपेक्षा असते.

अमा, प्रत्येकाची शैक्षणिक पात्रता, आर्थिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमी वेगवेगळी असते आणि म्हणूनच जे नियम सर्वसाधारणपणे सगळ्यांना लागू पडतात तेच मी सांगितले..मात्र वैयक्तिक अनुभव हे सार्वजनिक रित्या उपयुक्त असतीलच असे नाही..म्हणून मी माझा वैयक्तिक अनुभव इथे लिहीत नाहीये...पण मी पन्नाशीच नाही तर आता साठीही ओलांडलेय.

मी शाकाहारी आहे आणि नियमित योगाभ्यास (आसने आणि प्राणायाम) करतो. शिवाय, सिंगापुरचे पाणी खूप छान आहे. रोजची इतक्या तासांची नोकरी आणि परत घरी जाऊन घरची कामे ह्यामुळे शरिर चांगले राहते. म्हणून, माझे वय दिसून येत नाही. विचाराने तुमच्या इतका परिपक्व नाही ह्याचे शल्य जाणवत असते पण त्याला उपाय नाही. आपल्यापेक्षा मुर्ख जसे भेटतात तसे आपल्यापेक्षा ज्ञानीही भेटतात. असो एखाद्यच्या वयाबद्दल आणि मतिबद्दल चर्चा करणे असुपणाचे लक्षण आहे.

साधना, रोजच तुला इथे मी वाचतो. टु बी ऑनेस्ट २५ ची वाटत होतीस..

साधना, रोजच तुला इथे मी वाचतो. टु बी ऑनेस्ट २५ ची वाटत होतीस..
>>>
२५ चीच आहे ती Happy
एव्हर ग्रीन आणि सदातरुण Happy

पन्नाशीत पाउल ठेवताना असे जाणवते कि अजून दहा अ‍ॅक्टिव्ह वर्षे आपल्या हातात आहेत. त्यानंतर ऑफिशिअली रिटायर व्हायचेच आहे. >>> कदाचीत इथेच आपण मानसिकरित्या म्हातारे होतो. बरीचशी अशी उदाहरणं बघण्यात आहेत की रिटायर होईपर्यंत अत्यंत अ‍ॅक्टीव असणारे , रिटायर झाल्यानंतर २~३ वर्षांतच खुप खंगल्यासारखे वाटतात.
शारिरीक, मानसिक आणि आर्थिक समतोल बाळगणं महत्वाचं आहे.

अमा,

मी जिथे योग शिकलो त्याचेच दुवे देतो. एक नजर अवश्य टाका?:

आसनांची आणि श्वसनक्रियेची माहिती इथे दिली आहे.
http://www.yoganikam.org/basiccc.html

आणि येथून पीडीऐफ फाईल डाऊनलोड करा. खूप सुंदर माहिती आहे.

http://www.yoganikam.org/terms.html

ओके बी धन्यवाद. माझ्याकडे अय्य्ंगारांच्या मुलीचे पुस्तक आहे पण कधी फारसे वाचले गेलेले नाही

अमा,

शिंन्गापुरला जावं लागेल बघा. निकम गुरुजीकडनं योगा शिकायला.

तुमच्या शिर्डीत कोणी नाही का?

काय हे दिवस आलेत !

बाफ ५० शी चा आहे. (मी आधी ४० व्या बाफ वर लिहिले होते वाटतं). पण माझ्या डॉक ने ३० व्या वर्षीच मला स्त्रीयांनी (आता मी स्त्री आहे म्हणून 'स्त्रीयांनी' नाहितर कोणीतरी फालतु कोटी करेल, पुरुषांने का नाही) काय चेक अप करावे ह्याची लिस्ट दिली.
त्यात ३०- ४० मध्ये कोणत्या टेस्ट (हे सगळं तुमच्या जीवनशैली, आहार व कौंटुंबिक आजारा नुसार)
४०-५० मध्ये कोणत्या टेस्ट वगैरे दिले होतं.

तो चार्ट मी हरवला. पण बर्‍याच गोष्टी कळल्या तेव्हा. आपल्याला आपण खूप निरोगी आहोत वाटतो पण बर्‍याच छुप्या कमतरता असते जीवनस्त्वात आणि त्याने त्रास सुरु होतो.

त्यामुळे, पहिले शरीराची काळजी मग इतर गोष्टींची शिस्त लागतेच.(इति डॉ़क)

मला माझ्या ईअरली ज्या चाचण्या करायच्या असतात त्या करायच्या आहेत. पुण्यात ह्या चाचण्या कुठे होतात? मुम्बईत हिन्दूजामधे १० हजार दिले की सर्व चाचण्या करुन मिळतात. तशी सोय पुण्यात आहे का?

मी रोज एक आवळा खातो हे वर सांगायचे राहिलेच. एक चमचा मध. एक कप गवती चहा. दोन वा तीन फळे. दोन वेळा गार पाण्यानी स्नान.

चला परत तो डेटींगचा विषय येऊ द्या पुढे. कुणाकुणाचे काय काय राहून गेले ते लिहा आणि करायचा यत्न करा.

मी पण डेटींगचा विचार करत आहे. पण कुणी मिळण्याचे चान्सेस स्लिम आहेत.

मी पण डेटींगचा विचार करत आहे. पण कुणी मिळण्याचे चान्सेस स्लिम आहेत. >>> बी निराश होऊ नकोस , तुलाही चांगली जोडीदार मिळु शकेल. तुझी सगळ्यात स्ट्राँग बाजु म्हणजे तुझं मन साफ आहे.
आणि ऑनलाईन डेटिंग वेबसाईट्सपासुन सावध रहा नाहीतर फुकट गंडशील.

बी, अगदी थेट डेटींग शब्द जरा कमी वापरतात आजकाल. I am seeing somebody.. असे म्हणतात.

निखळ मैत्री घडवायची असते रे. त्यात निव्वळ आवडीनिवडीचा निकष असतो. एखाद्याची / एखादीची कंपनी आवडणे. त्या व्यक्तीबरोबर बोलायला, तिच्याशी संपर्कात रहायला आवडणे .. एवढेच असते.
मला वाटते आपण गेली १०/१२ वर्षे तरी ओळखतोय एकमेकांना. माझ्या अंदाजाप्रमाणे तू कौटुंबिक जबाबदार्‍या
पार पाडत होतास. स्वतःकडे लक्ष द्यायला सवड मिळाली नसेल.
पण यापुढे सर्व नातलग आपापल्या व्यापात बुडले असतील तर तूला एकटेपण जाणवू लागेल. अश्यावेळी एखादा खास मित्र वा मैत्रिण असणे गरजेचे असते. कुठलिही अपेक्षा न ठेवता केलेली अशी मैत्री.. अजाणता सर्वच अपेक्षा पुर्‍या करून जाते.

Pages