अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?

Submitted by बेफ़िकीर on 8 October, 2014 - 10:41

आरं कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?

ह्या ओळीने सध्या धुमाकूळ घातलेला आहे. गेल्या दोन दिवसांत माझ्या फोनवर कुठे नेऊन ठेवलाय धृतराष्ट्र माझा, कुठे नेऊन ठेवलात ब्लाऊज माझा आणि कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असे तीन विनोद आले.

ह्या ओळीतील 'महाराष्ट्र' ह्या शब्दाऐवजी कोणताही शब्द घेऊन काहीही लिहिता येते.

दोन विनोदः

१. गांधारी जागी होते. मंचकाची एक बाजू मोकळीच असते. ती दचकून पलीकडे पाहाते तर अंधारात दिसत काहीच नाही. फक्त शौचालयाच्या बाजूने एक तपेली गडगडल्याचा आवाज येतो. गांधारी किंचाळून म्हणते:

"अरे कुठे नेऊन ठेवलाय धृतराष्ट्र माझा"

२. नवरा दारू पिऊन रस्त्यावर लोळून मध्यरात्र उलटून गेल्यावर घरी येतो. भडकलेली बायको विचारते:

"कुठे कडमडला होतात इतक्या रात्री?"

नवरा: महाराष्ट्र शोधायला गेलो होतो. अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?

विरंगुळा म्हणून ही ओळ वापरून आपण काय काय लिहू शकतो ते बघू चला.

सध्या निवडणूकीचे वारे आहेतच. क्रिकेटही सुरू झाले आहे. दिवाळी येत आहे. मायबोलीवर नेहमीप्रमाणे एक से एक धागे येतच आहेत. वाव भरपूर आहे.

बघा काय सुचतंय!

====================================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्यातील ब्राह्मणाचा धागा लंकेतील मारुतीपर्यंत गेला !

कुठे नेऊन ठेवलाय धागा माझा !

.......

देव सरांचे प्रतिशेर वाचुन..

कुठे नेऊन ठेवलाय काफिया माझा

अंगात बनियन! कडेवर एक पोरगं! मानगुटीवर एक पोरगं! आजूबाजूला नुसती झाडी! आरं कुठं नेऊन ठेवलाय नाना पाटेकर माझा?

अजुन एक सापड्लेला.....
मोदी म्ह्णतो सफाई करायची आहे............

केजरीवाल म्ह्णतो ....आर कुट नेउन ठेवलाय झाडू माझा.........

आपण? आपण म्हनजे कोण? सामान्य माणसे की आपले लाडके दोडके नेते?

परवा सकाळ मधल्या ढिन्गटान्ग मध्ये खूप भारी आले होते, पण उदवले लगेच ते. वरुन आदेश आले असतील काकान्चे.:फिदी:

अवघड आहे
महाराष्ट्राची एवढी बदनामी कधीही झाली नसेल
तेवढी बदनामी या पिढीने
केली .. लाज वाटते मला तुमचे
फालतु एसएम्एस
आणि महाराष्ट्रा बाबतीत
ले विनोद
वाचुन.. ज्या प्रकारे
तुम्ही महाराष्ट्राची विटंबना लावली आहे
अशी कधीही झाली नाही..
इतर राज्य आता हसत असतील
ज्या महाराष्ट्राचा एवढा अभिमान
बाळगणारे लोक अशे
का बावचळले आहेत..अहो फुले
शाहु आंबेडकरांची भुमि ही..
कुठे नेऊन ठेवलात महाराष्ट्र ?
म्हणण्या पेक्षा आपण
महाराष्ट्रासाठी काय करत
आहोत हे पण पाहिले
पाहिजेल..
ही तिव्र
प्रतिक्रिया समजा हवेतर
आणि कुठल्याही ग्रुप मधे ..
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र
याला अनुसरून फालतु
अश्लील आणि मुख्य
महाराष्ट्रा ची विटंबना होईल
असे मेसेज कृपया टाकु नका..
तरुणांनो ही तुम्हाला केलेली नम्र
विनंती.... बहु असोत सुंदर
संपन्न की महान प्रिय
अमुचा एक महाराष्ट्र देश
हा...जय
महाराष्ट्र ...

सुमित कदम,

त्या ओळीतील महाराश्ट्र शब्द वगळुन दुसरा शब्द घालुन विनोद निर्मिती करायची आहे.

महाराष्ट्राचा अपमान कसा होतो ?

यात महाराष्ट्राची बदनामी होतेय!

सहमत आहे!

दुर्दैवी आहे!

जरी इथे महाराष्ट्राच्या जागी इतर काही टाकले तरी मूळ संकल्पनेत महाराष्ट्रच असल्याने आपण त्याचाच प्रसार करत आहोत.

याउपर धागाकर्त्यालाही शीर्षकात महाराष्ट्राचे नाव ठेवावेसे वाटले यातच ते आले.

शक्य असल्यास हे थांबवा.

इथेच नाही तर सगळीकडेच.

फक्त विनंतीच करू शकतो. __/\__

जय महाराष्ट्र !

बेफी,
खास तुमच्या साठी.....

१३ सप्टेंबर ला आशाताईंचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.........आन युगी घाबरली होती, आरं कुठे नेउन ठेवलाय अन्या माझा !!!!!

Light 1 घ्या Lol

पाच फुल्या घातल्या काय अन् आणखी काही घातले काय मुद्दा तो नाही आपण ह्या असल्या भिकार गोष्टींचा विरोध केला पाहिजे पण आपण तर मजा घेण्यात धन्यता मानत आहोत

महाराष्ट्र शब्दच लिहिलेल्या विनोदात नसेल तर तुमच्या विरोधाला का जुमानायचे ?

का भाजपाच्या जाहिरातीची थट्टा करणे हा फ्यासिस्ट भाजपाने गुन्हा ठरवला म्हणायचा ?

ही भाजप पक्षाची जाहीरात आहे परंतु त्याचा सोशल मिडीयावर उलटा परिणाम झाला आणि ती हास्यास्पद बनली.
आता ही जाहीरात बंद करुन नविन जाहीरात येणार आहे.

यामुळे आपण महाराष्ट्राची आणि भाजपाची दोघांची थट्टा करत आहे असे वाटत आहे

यात महाराष्ट्राची बदनामी होतेय!
<<
<<
कशी??
शरदबाबु ही असेच म्हणतायत की भाजपाच्या ह्या जाहीरातीने महाराष्ट्राची बदनामी होतेय. मात्र गेल्या पंधरा वर्षातील कॉंग्रेज व राष्ट्रवादि च्या काळ्या आणि भ्रष्ट कारस्थानाने/कारभाराने महाराष्ट्राची जितकी बदनामी व्हायची होती तितकी आधीच झालेली आहे. फक्त ह्या जाहीराती राष्ट्रवादिचा भ्रष्ट चेहरा महाराष्ट् आणि हिंदुस्थानासमोर आणतायत. म्हणुन तर त्यांच्या कन्या जाहीर सभेत म्हणतात "जर का माझ्या वडिलांच्या बाबतीत भ्रष्टाचारातील फक्त "भ्र" जरी कुणी उच्चाराला तर गाठ माझ्याशी आहे."

हे मला आलेले व्हॉट्सअ‍ॅप. कॉपी पेस्टबद्दल क्षमस्व. आत्ता भाषांतर करायला वेळ नाहीये.
पण खरंच यात तथ्य आहे का?

Debatable topic indeed. No doubt maharashtra is much ahead of gujarat, but I don't think question here is which state id better. Question is which state (or govt) is performing better over last 10 years. I would comment on few things I know for sure

Automobile industry:
Telco - didn't even think of increasing investment in maharashtra due to poor policies. Instead tried bengal first & settled finally in gujarat. Also have offloaded huge work to pantnagar, lucknow, jamashedpur & dharwad plants. This has caused huge direct & indirect job losses

Bajaj - almost on the verge of closing aurangabad plant. Not able to provide lightest on pocket vehicles it was known for. Again something to be blamed on taxation policies.

Kinetic -no more working

Force Motors -no growth at all

VW group (Audi, skoda, volkswagon)- Stopped workers intake in pune.

Mahindra - moved whole r&d base to tamilnadu, again due poor policies. Cost 3-4k direct jobs and many more indirect ones

General Motors -moved operations to gujarat & karnataka (not to mention, again due to policies). Only few strategic departments exist in pun

Fiat - struggling to survive

Premier -shut down long ago

No new auto company has come up in maharashtra in last 10 yrs. Tamilnadu got ford, Renault, Nissan, bmw, Daimler, chrysler. Gujarat got tata, gm. AP got Isuzu, hm...

Kuthe ahe maharashtra?

industrialisation -how many new industries came up in maharashtra? Baroda ahmedabad corridor in gujarat, orgadam kanchipuram & padi in Chennai, noida in delhi have grown superfast...

Foreign Investments - has there been an event like vibrant gujarat or easy investment policies like tamilnadu, in maharashtra in last 10 years?

Power generation - congress had promised in 2009 that maharashtra would be load shading free by 2012. Except mumbai, whole state is still getting free load shading. Gujarat have started generating huge solar power while tamilnadu have reduced average load shading from 6 hrs to 2hrs by generating huge tidal power.
What has maharashtra govt done in last 10 yrs on this front?

Irrigation&water supply-don't know about other states but most parts of marathwada & vidarbh still have to depend on rains. And they get drinking water once in 7 or 15 days

Taxes-Latest LBT is driving businesses out. Vehicle taxes at 10-11% in maharashtra. In states like himachal, it is 5-6%
Max cap on multiplex movie tickets at rs120 in tn. That is not even minimum in maharashtra. Thanks to taxes.

Transport-huge taxes on petrol diesel in maharashtra & less on liquor. Reverse in goa. Petrol 80rs/lit in maharashtra, 60rs/lit in goa.
State transport intersity min fare-maharashtra:rs 0.9/km
tn:rs 0.5/km
Gujarat: rs 0.6/km

No doubt there are huge number of medical&engg colleges in maharashtra, but are there enough jobs/business opportunities for scholars going out of these colleges?

Indeed if you Google, u will see many more such facts.

And this is why it is, "kuthe neun thevalay maharashtra maza magchya 10-12 varshat?"
And not "kuthe ahe maharashtra gujarat chya comparison madhe"
One more thing. Those who feel maharashtra has good roads should travel on all roads in tamilnadu, most of the roads in ap, karnataka, rajasthan. And those who think mumbai pune express way is best should travel on Chennai-bangalore, bangalore-hyderabad, Chennai-hyderabad, belgaum-bangalore, hyderabad outer ring road, baroda-ahmedabad, yamuna express way and many more. Most of these roads have been built in last 10-15 years. Do visit them

MAHARASHTRA MAI BHI ABKI BAAR BJP SARKAAR

अरे यार ईथे भाजपाशी काही घेणे नाही आणि विरोध ही नाही फक्त पटलं तर घ्या एवढंच बाकी तुम्ही मर्जीचे मालक.
<<
<<
इथे पटने न पटन्याचा प्रश्न येतोच कुठे! तुम्ही म्हणताय वरिल जाहीरातीनी महाराष्ट्राची बदनामी होतेय, तर ती कशी? इतकाच प्रश्न आहे. कॉंग्रेसच्या जाहीरातीत माजी मुख्यमंत्री म्हणतात 'माझ्या राज्यात दंगे, गुंडगिरी नाही 'तिथे पुण्यात नरेंद्र दाभोळकरांचा भरदिवसा रस्त्यावर खुन होतो'. तरिही सर्वात पुढे महाराष्ट्र माझा. ह्या अश्या जाहीरातीनी नक्कीच शान वाढत असेल महाराष्ट्राची.

पटायचा संबंधच नाही. लिहिलेल्या विनोदात म्हाराष्ट्र हा शब्दच नसेल तर तुम्ही विरोध करु नये.

अरारारा! सुमित भाऊ तुम्ही फारच मनाला लावुन घेतलत. अहो यात कसला आलाय महाराष्ट्राचा अपमान? आपण सर्वसामान्य माणसे कष्ट करतो, प्रामाणीक रहातो, टॅक्स भरतो, मग आम्हाला लाज आणी खन्त कशाला वाटायला पाहीजे? लाज तर फुले-आम्बेडकर आणी शिवाजी महाराजान्चे नाव घेउन राजकारण करणार्‍या, स्वतची तुम्बडी भरणार्‍या नेत्याना वाटली पाहीजे. ती वाटतीय का? असे तुम्ही त्या नेत्याना विचारा.अगदी कॉन्ग्रेस-राष्ट्रवादी-भाजपा-शिवसेना-मनसे या सगळ्या रथी महारथीना विचारा, आणी मग धागाकर्त्याला का त्याचे वाटावे ? ऑ?

लिहिलेल्या विनोदात म्हाराष्ट्र हा शब्दच नसेल तर तुम्ही विरोध करु नये.
<<
<<
तुडतुडकर साहेब.
पण मी म्हणतो माणसाने नको तिथे विनोद करावेच का? समर्थांनी सांगितलेच आहे "टवाळ आवडे विनोद"

विजय आणि रश्मी.., यांच्याशी सहमत!

वि आं संबंध आहे तुम्ही म्हणता दंगे होतात मला तर नाही माहीत बुवा महाराष्ट्रात शेवटचा दंगा कधी झालता
अन् मी काँग्रेस च्या जाहिरातीचे समर्थन करत नाही
तूमच्या राजकीय फायद्या साठी तुम्ही महाराष्ट्राला का बदनाम का करता हा माझा प्रश्न

कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र म्हणणारे आणि महाराष्ट्र सर्वात पुढे म्हणणारे निवडणूक निकालानंतर एकत्र येऊन सत्तेसाठी दावा टाकतील, कमी वेळेत प्रचार करण्यासाठी जाहिराती आणि सोशल मेडीयाचा आधार घेतला जात आहे. त्यात काही नविन नाही.

कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा या वाक्यातील महाराष्ट्र काढून कोणताही शब्द टाकला तरी डोक्यात पहिल्यांदा महाराष्ट्रच येतो. असो धागा मनोरंजन करण्यासाठी आहे त्यात महाराष्ट्राचा अपमान होण्याचा प्रश्न उदभवत नाही, आपण सर्वच महाराष्ट्रावर भरभरुन प्रेम करतो आहोत त्यामुळे महाराष्ट्र मनात आहे जाहिरातीत नाही.

अरे मराठी माणसाने कुठे नेऊन ठेवल्या आहेत खालील गोष्टी ???

अस्मिता, अभिमान (जाज्वल्ल्य), कणखर पोलादी मनगटे, एकजूट(?), अटकेपार झेंडे रोवणारी दुर्दम्य लढाऊ वृत्ती, केवळ महाराष्ट्रच नव्हे तर पुर्ण देशाचे भले करण्यासाठी लावता येणारी जीवाची बाजी, संस्कार, भक्ती, चांगुलपणा, नम्रता, वैज्ञानिक दृष्टीकोन, इ. इ.

वर एक व्हॉट्स अ‍ॅपवरून फिरत आलेला इंग्रजीतला प्रतिसाद आहे, त्यासंदर्भात :

वाहन-उद्योग : M&M, Tata Motors, VW and Bajaj make heavy investments in Maharashtra for expansion ऑगस्ट २०१४
जनरल मोटर्स : The company added that the Beat is produced at GM India’s manufacturing facility in Talegaon, Maharashtra.

पॉवर जनरेशन कपॅसिटी :
महाराष्ट्र ३१९३४ मेगॅवॅट गुजरात २६१२६ मेगॅवॅट
रिन्युएबल एनर्जीमध्येही महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. दरडोई वीज मात्र गुजरातची अधिक आहे.

गेल्या पाच वर्षांत या क्षेत्रात महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातही बराच मोठा पल्ला गाठला गेला आहे.

एफ.डी.आय.

Maharashtra has highest FDI share of 18% at Rs 10.21 lakh crore

Gujarat share in FDI slips to 2.38%, 6th rank

सगळी आकडेवारी लेटेस्ट असेलच असं नाही. पण फारतर वर्ष-दीड वर्ष जुनी असेल.

बाकी मुद्द्यांवर वेळ मिळाल्यावर.

Pages