विधानसभेत भाजपा विरुद्ध शिवसेना झाल्यास कोण मारेल बाजी?

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 August, 2014 - 16:33

सर्वप्रथम नमूद करू इच्छितो, राजकारणासंबंधी एक्स्पर्ट कॉमेंट देणे हा माझा प्रांत नाही तर उगाच उसना आव आणायचा नाहीये. सध्या आमच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप वर दोन गटात (खरे तर तीन गटात) पेटलेल्या चर्चेला इथे घेऊन आलोय.

विषय आहे - जर भाजपा आणि शिवसेनेत बिनसले आणि निवडणूकपूर्वी युती तुटली तर निकालात बाजी कोण मारेल?

१) मोदींच्या पुण्याईवर (कर्तुत्वावरही बोलू शकतो) भाजपा सरस ठरेल?
२) बाळासाहेबांच्या महाराष्ट्रात मराठी माणूस आजही शिवसेनेच्या बरोबर उभा राहील?
३) दोघांत भांडण तिसर्‍याचा लाभ, (ज्याची शक्यता फारच कमी दिसतेय सध्या) ?

माझे मत - मी लोकसभेत मोदींना बघून भाजपाच्या पारड्यात टाकले असले तरी विधानसभेत मराठी माणसांचा (म्हणवणारा) प्रादेशिक पक्ष शिवसेनेलाच प्राधान्य देईन. माझ्यामते बहुतांश मराठी माणूस उघडपणे कबूल करो वा न करो ऐनवेळी धनुष्यबाणावरच शिक्का मारून येईल. यात शिवसेनेला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास निकालानंतर पुन्हा युती होऊन ते भाजपाच्या सपोर्टवर सरकार स्थापतील. जेणेकरून केंद्रातील भाजपा सरकारशीही सूत जुळून राहील आणि महाराष्ट्राच्या विकासाला अडथळा येणार नाही.

अर्थात, बाळासाहेबांनतर शिवसेनेने जनतेचा विश्वास बरेपैकी गमावला असूनही दोघांमधील एक पर्याय निवडताना जनता आपले मत शिवसेनेच्या पारड्यात टाकेल. त्यामुळे मोदी यांच्या नावाची कितीही हवा झाली असली तरी भाजपा केवळ दबावतंत्र अवलंबवेल मात्र युती तोडायची हिम्मत ते शेवटपर्यंत दाखवणार नाहीत.

असो, याउपर युती फुटल्यास इतर मित्रपक्ष तसेच मनसे वगैरे काय कोणाशी युती करतील आणि काय नवीन गणिते बनतील यावर जाणकारांनी आपली मते मांडली तर त्यातील काही मुद्दे मला आमच्या ग्रूपवर टाकून राजकीय चर्चेत कच्चा लिंबू समजल्या जाणार्‍या माझ्या स्वताचा भाव वधारता येईल.

आभारी आहे,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चला कल्याण ग्रामीणमध्ये मूळचे शिवसैनिक जे मागच्या वेळी उभे होते 'रमेश म्हात्रे', ह्यांना ह्यावेळी भाजपने तिकीट दिलं होतं पण त्यांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी मागे घेतली त्यामुळे इथे तरी भाजप-शिवसेना ही मतविभागणी होणार नाही अर्थात इथे मागच्यावेळी मनसे निवडून आली होती पण आता बघूया.

शिवसेना, मनसे, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी असा सामना आहे आता.

कल्याण ग्रामीणमध्ये डोंबिवलीचा बराचसा भाग येतो.

भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल असा माझा विश्वास आहे. ज्या पध्दतीने श्री मोदी यांनी देशात विश्वासाची लाट आपल्या कामाद्वारे निर्माण केली आहे त्यावरुन महाराष्ट्राची जनता त्यांच्या पाठीशी उभी नक्कीच राहिल.
त्याच बरोबर स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा असल्यामुळे भाजपाच्या विदर्भातुन ८०% जागा नक्कीच येतील.

>>>
अस्सं ! म्हणजे बहुमत घेऊन विधानसभेत घुसले की लगेच त्याच दिवसापासून स्वतंत्र विदर्भ करण्यासाठी महाराष्ट्र तोडायला सुरुवात करणार तर...

भाजपला मत म्हणजे महाराष्ट्राच्या विभाजनाला मत असे नाही काय?

भाजपला मत म्हणजे महाराष्ट्राच्या विभाजनाला मत असे नाही काय?
>>>>>

असे कोणी पटकन विभाजन करत नाही. केले तर नेहमी निवडणूका लढण्याचा मुद्दाच संपला की राव. ते अयोध्या प्रकरण नाही का गेले १५-२० वर्षे कामाला आले. मंदीर वही बनायेंगे पर तारीख नही बतायेंगे.

हे समर्थक आणि विरोधक दोघांना लागू. एखादा मुद्दा दोन्ही पार्टींना पुरतो.

मोदीसरकारच्या कामाचा उरक पाहता बहुमत मिळाल्यास करतीलही.
युपीएने आंध्रविभाजनाचा बराच घोळ घातला होता. आधीच्या एन्डीए सरकारने उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश यांचे विभाजन केले होते.

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला जाहीर पाठींबा असणं व निवडणूक प्रचारात तशा स्वतंत्र राज्य स्थापनेचं ठोस आश्वासन देणं, या भिन्न गोष्टी आहेत. मला नाही वाटत भाजप अशा आश्वासनावर प्रचारात भर देईल असं. विदर्भातील यशासाठी उर्वरित महाराष्ट्रात तो पक्ष स्वतःला कां अडचणीत आणेल ?

मला नाही वाटत भाजप अशा आश्वासनावर प्रचारात भर देईल असं >

आज टिव्हीवर दाखवत असलेल्या पोल वर स्वतंत्र विदर्भाच्या भुमिकेवरुन भाजपाला किती जागा मिळतील यावर चर्चा चालु होती किमान ५०% जागा तरी भाजपाला त्या मुद्द्यावरुन मिळत आहे त्यामुळे तो मुद्दा भाजप सोडतील असे वाटत नाही

मी टिव्हीवरचा तो पोल पाहिलेला नाही पण त्यात सुचवलेला निष्कर्ष पटत नाही. विदर्भात भाजपाचा जोर आहेच व या मुद्द्याचं आत्तां भांडवल करून कदाचित अधिक जागा त्याना तिथं मिळतीलही. पण उर्वरित महाराष्ट्रात नेमकं तेंच त्यांचं बरंच नुकसान करेल, यांत शंका नसावी.

उर्वरित महाराष्ट्र मिळायची शक्यता नसेल तर विदर्भ घेऊन गप्प बसायचं असेल.

तसंच कुठल्या प्रचारात काय बोलायचं याचं गणित त्यांच्याइतकं कोणाला जमणार?

हायपोथेटीकल विचार करता समजा विदर्भ हे वेगळे राज्य तयार झाले तर (राजकारणापलिकडे) ह्या विभाजनाचा महाराष्ट्रीय व वैदर्भीय जनतेला नेमका कसा फायदा किंवा तोटा होणार आहे?
हा फक्त भावनिक मुद्दा आहे की त्याला काही आर्थिक व प्रशासकीय धोरणेही आहेत?

महाराष्ट्राची बहुतांश वीज विदर्भातून येते ,विदर्भात रिसोर्सेस अभावी शेतकर्‍यांच्या आत्महत्त्या जास्त होतात, नक्षलवाद आहे काही भागात, चंद्रपूर, भंडारा वगैरे राज्यात भरपूर खाणी आहेत त्यामुळे चराऊ कुरण वाढवण्यासाठी राजकारण्यांची ही खेळी आहे अशी ढोबळ माहिती आहे, पण अजून काही माहिती मिळावी ह्यासाठी विचारतो आहे.

ऊत्तरांचल, झारखंड राज्ये वेगळी झाली त्याचे नेमके काय परिणाम झाले?

त्याचे नेमके परिणाम हे झाले, की मुख्यत्वे 'मागास' असलेल्या या भागातले नैसर्गिक स्त्रोत कसे ओरबाडले जात आहेत याची पर्वा करायची गरज उरलेल्या प्रगत भागातील लोकांना उरली नाही. प्रगतीच प्रगती होऊ लागली. शिबू सोरेनसारख्या लोकांना मुख्यमंत्रीपदही मिळाले. सर्वत्र आनंदी आनंद झाला.

तुकडे पडलेल्या राज्यात फक्त छत्तीसगड राज्यात प्रगती आहे. सुरुवातीला काँग्रेसचे अजित जोगी जे पूर्वी आय ए एस ऑफिसर होते ह्यांचे द्रष्टे नेत्रूत्व लाभले नंतर रमणसिंह सरकारने ती परम्परा पुढे चालवली त्यानीही चांगले प्रशासन दिले. त्यामुळे छतीसगड राज्य काही क्षेत्रात अग्रगण्य आहे . त्या प्रॅक्तीसेस इतर राज्ये अनुकरण करीत आहेत. इतर राज्ये मूर्ख नेतृत्वामुळे आणखी गाळात गेली आहेत कारण ती राज्ये कुणाला तरी खुर्च्या मिळाव्यात म्हणून निर्माण करण्यात आली आहेत. डॉ. जिचकारांनी स्वतः एक टिपण काढून स्वतंत्र विदर्भ एकॉनॉमिकली व्हायेबल होते नाही हे आकडे वारीसह दाखवून दिले आहे. त्यावर ते प. महराष्त्राचे एजन्ट असल्याचा आरोप करण्यात आला. माझ्या मते आम वैदर्भिय जनतेच्या भावना स्वतंत्र होण्याबाबत तीव्र नाहीत ( जसे तेलंगणात होते . लोक रस्त्यावरच आले होते) विदर्भातल्या काही पडेल पुढार्‍यांची आणि आता मुख्यमंत्रीपद ज्यांना डोळा मारते आहे असल्या लंपट पुढार्‍यांची दुकानदारी आहे.
वैयक्तिक माझ्या मते स्वतंत्र विदर्भ झाला पाहिजे . त्याचा तसाही उर्वरित महाराष्ट्राला काहीही फायदा नाही... कोळसा, खनिजे, या बाबी केंद्राच्या अख्त्यारीत येत असल्याने त्याच्या इक्विटेबल डिस्ट्रिब्युशन बाबत केंद्राचे नियम आहेत.

वैयक्तिक माझ्या मते स्वतंत्र विदर्भ झाला पाहिजे त्याचा तसाही उर्वरित महाराष्ट्राला काहीही फायदा नाही..>>>>>??????????

महाराष्ट्रातल्या प्रचारसभांत मोदीकाका सांगताहेत : महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे घेऊन जाणार.

पुढे या शब्दाचा अर्थ बदलला की काय?

वेगळं होणं ही विदर्भाच्या नेत्यांची मागणी आहे कारण त्यांना मुख्यमंत्री वा इतर पदांची वेगळी कुरणं चरायला हवी आहेत. त्यातून महाराष्ट्रातल्या जनतेचा (विदर्भ व नॉन-विदर्भ) काही फायदा नाही.

विदर्भाचा विकास झाला नाही म्हणायचा तर तो मुंबई-पुणे इथे झालाय असंही म्हणायला जीभ रेटत नाही. शहरांचा विकास झाला पण त्याची फळं बाहेरुन आलेल्यांनाच मिळाली. मराठी लोक मुंबईत गिरगाव-दादरमधून पार टोकाच्या उपनगरांपर्यंत फरफटत गेले आणि पुण्यात जो काही वाहतूककोंडीपासून पाणीटंचाईपर्यंत गोंधळ उडालाय तो सर्वांना माहीतच आहे.

भाषावार प्रांतरचनेमुळे विदर्भ मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आला. प.महाराष्ट्राचं राजकीय वर्चस्व असलेल्या महाराष्ट्रात विदर्भाचे वसंतराव नाईक हे दीर्घ काळ एक सक्षम व निरंकुश सत्ता हातीं असलेले मुख्यमंत्री होते . नंतर कन्नमवारही मुख्यमंत्री होते. जर ते विदर्भाचा विकास मार्गीं लावूं शकले नाहीत तर केवळ वेगळ्या विदर्भाचा मुख्यमंत्री झाला कीं हें काम मार्गीं लागेल अशी अपेक्षा करणं फारसं तर्कशुद्ध वाटत नाही. पण त्याचबरोबर विदर्भाला नैसर्गिक संपत्तिचं वरदान आहे व त्याचा व्हावा तेवढा लाभ ['ओरबाडणं' नव्हे !] विदर्भासाठीं व महाराष्ट्रासाठीं करून घेतां आलेला नाही, हें ही सत्य आहे. 'वेगळा विदर्भ' ही मागणी याकडे लक्ष वेधण्यापुरतीच समर्थनीय असावी व ती बव्हंशी तशीच आहे, असं मला वाटतं. अजूनपर्यंत तरी आत्तांच्या प्रचारात भाजपने ' वेगळा विदर्भ' या मुद्द्यावर जोर दिलेला नाही, हेंही महत्वाचं.

भाऊ,
भाजपाचा प्रचार जाहीर बोलणे, अन कुजबुज अशा दोन पातळ्यांवर चालतो, हे तुम्हाला ठाऊक नाही असे समजून चालू का? Wink अमुक मुद्द्यावर जोर दिला / दिला नाही, तरी तो त्यांच्या अजेंड्यावर आहे, हे कसे विसरता येईल?

<< अमुक मुद्द्यावर जोर दिला / दिला नाही, तरी तो त्यांच्या अजेंड्यावर आहे, हे कसे विसरता येईल? >> इब्लीसजी, वरतीं माझ्या २५ ऑगस्टच्या पोस्टमधे म्हटल्याप्रमाणे << वेगळा विदर्भ मागण्यामागे हेतू फक्त विकासाचाच होता कीं वेगळ्या विदर्भात सत्ता मिळण्याची दाट शक्यता हा होता, यावर गणिताचं उत्तर अवलंबून असावं. केंद्रात सत्ता आल्यामुळे कदाचित ही मागणी रेटण्याची गरज भाजपाला आत्तां भासणार नाही >>. त्यामुळें, मुद्दा 'वेगळ्या विदर्भाची मागणी' अजेंडावर असण्याचा नसून आत्तां त्याला अग्रक्रम देण्याचा आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्वव ठाकरेंचा सध्या 'केजरिवाल' झालेला दिसतोय. निवडणुकी आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादि कसे चोर, भ्रष्ट आणि राज्य चालवायला कसे नालायक आहेत हे ओरडुन सांगत होते. आता प्रचारात भाजपा व मोदि यांच्या वरच टिका करत आहे.

आता प्रचारात भाजपा व मोदि यांच्या वरच टिका करत आहे.
>>
एक्स्पेक्टेडच आहे हे.
काँग्रेसवर टिका करण्यात जास्त वेळ दवडून फारसा फायदा नाही, त्यांचा ढिसाळ राज्यकारभार जनतेपर्यंत पोहोचला आहे याचे उत्तर लोकसभेत मिळाले आहे. तर आता ती काँग्रेसकडून फिरलेली मते आणि युतीचीही स्वताची मते जास्तीत जास्त आपल्याकडे कशी वळवता येतील हे चालूय.
तरीही राहिला प्रश्न काँग्रेसच्या पराक्रमांची जनतेला पुन्हा आठवण करून द्यायची तर त्यासाठी मोदी खुद्द आले आहेतच की Happy

१]आतांपर्यंत तरी युति तुटण्याचा दोष भाजपाकडेच जातो असं लोकमत तयार करण्यात उद्धव ठाकरे यशस्वी झालेले दिसतात व २] अख्ख्या महाराष्ट्राला भावणारं स्थानिक नेतृत्वच भाजपाकडे नाही, हेंहीं मोदींवरच प्रचाराची धुरा सोपवल्याने लोकाना जाणवत व खुपत असावं. या दोन मुद्द्यांचा लाभ निवडणूकीत शिवसेनेला नक्कीच मिळेल असं वाटतंय.

भाऊसाहेब,

दै. सकाळ मध्ये लोकसभा निवडणुकीपासुन ४ वेळा ओपीनीयन पोल आले ज्यात उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणुन सर्वात जास्त टक्केवारी होती.

या ओपीनियन पोल ची रिलायबलीटी काय होती हे एकट्या शरद पवार साहेबांना माहिती. त्यांनी उध्दव साहेबांना हे पटवुन देण्यात यश मिळवले की महाराष्ट्रात तुम्ही एकटेच मुख्यमंत्री व्हायला लायक आहात.

परिणामी भाजपच्या जागा कमी झाल्या पण शिवसेना १५१ वर जी अडली आणि युतीला हीच गोष्ट नडली.

शरद पवार साहेबांची ही निती भाजपवाल्यांना कळली असावी म्हणुन त्यांनी वाटाघाटी ताणल्या आणि पर्यायी प्लॅन तयार केला.

राष्ट्रवादी युती तुटायची वाट पहात होतीच.

शरद पवार साहेब ग्रेट आहेत. भाजप विरुध्द सर्व अशी योजना करुन ते शांत पणे आपल्या उमेदवारांचे प्रचार करण्यात गुंतले आहेत.

<< .... परिणामी भाजपच्या जागा कमी झाल्या पण शिवसेना १५१ वर जी अडली आणि युतीला हीच गोष्ट नडली.>> नितीनचंद्रजी, प्रत्यक्ष युति कां व कुणामुळे तुटली, हा संशोधनाचाच विषय आहे. पण लोकमत तरी सध्यां याबाबतींत भाजपाला दोष देण्याकडे झुकलेलं दिसतं. निवडणूकीत यालाच महत्व आहे, एवढंच मला सुचवायचं होतं.

मला नाही वाटत शिवसेनेला प्रचंड यश मिळेल. भाजपलाच सर्वाधिक जागा मिळतील असे मला वाटत आहे.

मला नाही वाटत शिवसेनेला प्रचंड यश मिळेल. भाजपलाच सर्वाधिक जागा मिळतील असे मला वाटत आहे.
<<
<<
अगदि,
सध्या हे उद्वव महाशय कोणत्या काळात वावरत आहेत तेच कळत नाही, निजामशहा, अदिलशहा काय तोडांला येईल ते बरळत सुटलेत. म्हणे दिल्लीवरुन अफजल खान महाराष्ट्र जिंकायला आलाय, आता हा अफजल खान दिल्लीवरुन कसा काय येऊ शकतो? त्यामानाने राज ठाकरे अगदि योग्यप्रकारे प्रचार करत आहेत.

विदुषका , सत्य बोल्लास.. जनतेने सेना भाजपावर आता झाडु फिरवावा.
<<
<<
ताईसाहेब तुडतुडकर, हे येणार्‍या १९ तारीखेला कळलेच, कुणी कुणावर झाडु फिरवला ते.

>>>निजामशहा, अदिलशहा काय तोडांला येईल ते बरळत सुटलेत. म्हणे दिल्लीवरुन अफजल खान महाराष्ट्र जिंकायला आलाय,<<< + १

>>>ताईसाहेब तुडतुडकर<<< Proud

भाजपने एक फेकलेले मंत्रीपद केंद्रात सोडायची तयारी नाही, तिथे लाचारी आणि इथे फार मोठा स्वाभिमान दाखवतायत.

Pages