निसर्गाच्या गप्पा (भाग २२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 September, 2014 - 16:20

निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

सनईचा सूर कसा वार्‍याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला

तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.

गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.

वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा हेमा ताई, कसला सुरेख फोटो काढलाय! Happy

फोटो बघुन चंद्रकांत गोखले यांच्या ओळी आठवल्यात..
" झाडावरुन प्राजक्त ओघळतो त्याचा आवाज होत नाही,
याचा अर्थे असा नाही की त्याला इजा होत नाही!"

सप्तपर्णी ची फुलं कशी असतात?

हेमाताई मस्त फोटो पारिजातकाचा. आमच्या सोसायटीत आहेत झाडं लकीली.

सप्तपर्णी ची फुलं कशी असतात?>>>>सप्तपर्णीची फुले साधारण रातराणीसारखीच दिसतात.

याचे बोटॅनिकल नावः alstonia scholaris

इथे आहेत सप्तपर्णीची फुले आणि झाडाचा फोटो Happy
http://3.bp.blogspot.com/-bOn00HtOpZc/TrL2O5AGrYI/AAAAAAAAA0U/KqQK1BWgaI...

छान आहे फोटो हेमाताई.

याला सप्तपर्णी म्हणतात, वेलची सारखा वास आसतो, मला त्रास होतो याचा वास आला का,पण आज सोध लागला या झाडाच्या नावाचा, खुप झाड आहेत घराजवळ,त्याला शेंगा पण येतात ना?

अन्जू, रस्त्याच्या कडेला याची भरपूर झाडे असतात (निदान विक्रोळी-पवईला तरी आहेच). Happy

वेलची सारखा वास आसतो,>>>>>पलक, अगदी अगदी. Happy अजुन कुणालातरी याच्या वासाचा त्रास व्हायचा, बहुतेक साधना (?).

उत्तराखंड मध्ये मात्र सप्तपर्णी अशी दिसते. Happy

(हा फोटो रानीखेतच्या चौबतिया बागेत काढलाय).

जिप्सी, धन्यवाद... सध्या ही फुलं खुप दिसतायत, मी फोटो टाकणारच होती हे विचारायला की ही फुलं कसली?
उत्तराखंड मधली सप्तपर्णी व्वा! खुपच देखणी आहे...

व्वॉव्व सुंर्रेख फोटो ,जिप्स्या..
आणी ममो ती प्राजक्ताची फुलं ही गोडमिट्टं दिस्ताहेत

जिप्सी, फोटो मस्त आलाय. लिंक मध्ये आहे तशी सप्तपर्णीची झाडं ठाण्यामध्ये राम मारुती रोड वर दुशीकडे लावली आहेत. झाड ही हिरवं आणि फुलं ही हिरवी. छान दिसतात.

उत्तराखंड मध्ये मात्र सप्तपर्णी अशी दिसते >>>>> ते हे झाड आहे जिप्सीभौ Happy - Indian or Himalayan Horse Chestnut - Aesculus indica

विजयदशमीच्या हार्दीक शुभेच्छा.

वासना / क्रोध / मोह / लोभ / मद / मत्सर / स्वार्थ / अन्याय / अमानवता / अहंकार -- या दहा शत्रूंवर विजय मिळवायचा दिवस.

शोभिवंत माश्यांचे प्रदर्शन

http://www.mid-day.com/articles/fish-exhibition-in-kandivali-begins-toda...

efdd5f03e823b62c6cfb261aeeb3b86d.jpg

दिनांक: १ ते ६ ऑक्टोबर, २०१४.
वेळ: सकाळी १० ते रात्री ९
पत्ता: Aqua Life exhibiton, Kandivali Recreation Club, Opp. KES college, Shantilal modii Rd., Bhagat colony, Kandivali West, Mumbai 67.
प्रवेश फी: ६० रू.

मनीमोहोर, पारिजातकाचा फोटो खूप आवडला आणि सायलीने उद्धृत केलेल्या काव्यपंक्तिही!
सप्तपर्णीच्या फुलांचा फोटो खासच, जिप्सी.

सायली.. सुंदर कविता..

विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा.. सर्वांना... Happy

विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!!

हि फुलांची रांगोळी आज सकाळी मी काढली (दिनेशदा ऐकताय ना "मी" काढलीय, तुमच्या "सुनबाईंनी" नाही. :फिदी:) Happy आणि थोड्या थोड्या वेळाने पाण्याचा स्प्रे मारत राहिलो. आत्तापर्यंत एकदम ताजी आहेत फुलं.

Pages